तो दिशाहीन चालत होता. बेवड्या बापाने आज परत त्याला चोपले होते आणि मायने मध्ये पडून त्याला सोडवले होते.
वाढते वय, वाढती भूक आणि ती भागवायला बापाचा मार आणि कधीतरी मिळणारे वडापावच्या गाडीवरचे काम.
पक्याची गाडी उचल्यापासून ते काम पण बंद होते.
शाळा बंद म्हणून खिचडी पण बंद... स्टेशनवर हमालीसाठी पण कोणी उभं करत नव्हतं.
मनात नसतानाही तो स्मशानाच्या रस्त्याला लागला...
आज गरजेच्यावेळी त्याला ते सापडत होते.... कधी नुसतेच कधी फुलांबरोबर कधी गुलालाबरोबर... तो दिसेले तिथून घेत होता मागचा पुढचा विचार न करता... मायला हे आवडणार नाही त्याला माहित होते पण..
जगण्यासाठी त्याला कुणाचं तरी मरण साजरं करावं लागणार होतं...
वाचने
2597
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आई गं..
वाईट खूप वाईट!!!
भीमा आठवला ! (कृष्णाकाठच्या
स्मशानातलं सोनं , इयत्ता
In reply to भीमा आठवला ! (कृष्णाकाठच्या by उगा काहितरीच
मस्त.....
देवा!
कटु सत्य :(
:(
दुर्दैवी पण सत्य आहे.
बाप्रे !!
:-(
:-(