Skip to main content

साजरं ( शतशब्दकथा )

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 28/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिशाहीन चालत होता. बेवड्या बापाने आज परत त्याला चोपले होते आणि मायने मध्ये पडून त्याला सोडवले होते. वाढते वय, वाढती भूक आणि ती भागवायला बापाचा मार आणि कधीतरी मिळणारे वडापावच्या गाडीवरचे काम. पक्याची गाडी उचल्यापासून ते काम पण बंद होते. शाळा बंद म्हणून खिचडी पण बंद... स्टेशनवर हमालीसाठी पण कोणी उभं करत नव्हतं. मनात नसतानाही तो स्मशानाच्या रस्त्याला लागला... आज गरजेच्यावेळी त्याला ते सापडत होते.... कधी नुसतेच कधी फुलांबरोबर कधी गुलालाबरोबर... तो दिसेले तिथून घेत होता मागचा पुढचा विचार न करता... मायला हे आवडणार नाही त्याला माहित होते पण.. जगण्यासाठी त्याला कुणाचं तरी मरण साजरं करावं लागणार होतं...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2597
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

वाईट खूप वाईट!!! कधी नुसता वरण भात केला म्हणून कातावणारे आपण? अशा तर्हेचं लेखनच आपल्याला अधूनमधून थप्पड देऊन जागं करतं.

लिखते रहो !!

काय काय सोसावं लागतं काही लेकरांना!

:(

:-(

:-(