सांख्य दर्शन
सांख्य दर्शन
सांख्य हे सर्वाधिक प्राचीन दर्शन आहे. एक महत्वाची विचारधारा. साख्यांचा गौरव करतांना महाभारत म्हणते
ज्ञानंच लोके यदिहास्ती किंचित् !
सांख्यांगतं तच्च मह्न्महात्मन् !!
गार्बे लिहतो
In Kapil"s doctrine, for the first time in the history of the world, the complete independence and freedom of human mind, its full confidence in its own power were exibited. It is the most significant system that India has produced.
या दर्शनाने जे महत्वाचे सिद्धांत दिले, विचार दिले, त्यातील कांही ना कांही भाग पुढील दर्शनांनी उचलला. मग ते अवैदिक बौद्ध/जैन दर्शन असो किंवा स्वत:ला सांख्यांचा शत्रु समजणारे अद्वैत असो. लो.िळक यांच्या मते सांख्य व अद्वैत यांच्यामधील ज्या कल्पना सारख्या आहेत त्या सांख्यांनी उपनिषदांतून कीं उपनिषदांनी सांख्यांतून उचलल्या हे सांगणे अवघड आहे.दोघांची वाढ दोन भावंडांसारखी बरोबरीनेच झाली. भारतातील सर्व विचारधारा सांख्यांच्या ऋणी आहेत.
परंपरा : कपिलमुनी हा आद्यसंस्थापक. मग तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र (महाभारत) म्हणा किंवा विष्णुचा अवतार (भागवत पुराण).गीतेत श्रीकृष्ण म्हणतात "सिद्धानाम कपिलो मुनी ". कपिलाला झालेले परमज्ञान त्याने आसुरीला व आसुरीने पंचशिखास दिले. पंचशिखाने त्याचा विस्तार केला. त्यानंतर येतो ईश्वरकृष्ण. हा ऐतिहासिक. पहिल्या तिघांचा एकही ग्रंथ मिळत नाही. ईश्वरकृष्णाची सांख्यकारिका हा सर्वात प्राचीन उपलब्ध ग्रंथ. याचा काल इ.स.दुसरे शतक (किंवा त्यापुढे). ग्रंथाचे चीनी भाषांतर मिळते. या नंतरचे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. आता दर्शनाचे थोडे प्राथमिक स्वरूप बघू..
(१) आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक दु:खांचे निवारण करणे हे दर्शनाचे उद्दिष्ट आहे.
(२) प्रत्यक्ष, अनुमान व आगम ही तीन प्रमाणे होत.
(३) सत्कार्यवाद हा मूलभूत आधार. प्रत्येक वस्तूचे कारण असतेच कारणाशिवाय कार्य निर्मित होणे अशक्य आहे. शून्यातून विश्व निर्माण होत नसते.
(४) प्रकृति व पुरुष हे विश्व निर्मितीचे कारणरूप अनादी द्वंद्व आहे.
(५) प्रकृति ही त्रिगुणात्मिका, अविवेकी, अचेतन व प्रसवधर्मी आहे.
(६) प्रकृति व पुरुष दोन्ही अव्यक्त आहेत.
(७) सत्व, रज व तम हे प्रकृतीचे तीन गुण आहेत.
(८) प्रकूति एक आहे.
(९) पुरुष अनेक आहेत.
(१०) प्रकृति व पुरुष हे आंधळ्या-पांगळ्याच्या जोडीसारखे एकमेकाच्या मदतीने विश्वसर्ग करतात.
(११) चेतन पुरुषाच्या संगतीने अचेतन प्रकृती चेतनवत् भासते.
(१२) अव्यक्त प्रकृतीपासून प्रथम महत् (बुद्धी) व व्यक्त अहंकार निर्माण होतो. अहंकारापासून एकीकडे पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, व मन हा सात्विक सर्ग तर दुसरेकडे पंचतन्मात्रे व पंचमहाभुते हा तामस सर्ग निर्माण होतो.
(१३) प्रकृतीचा हा सर्ग पुरुषाच्या मुक्तीसाठी असतो.
(१४) सांख्यशास्त्राच्या सम्यक ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो.
(१५) सांख्य हे स्वभाववादी व परिणामवादी आहे.
लक्षात घ्या : इथे कोठेही ईश्वर नाही. सांख्य तत्वज्ञान निरीश्वरवादी आहे.
२५ तत्वे : प्रकृती, पुरुष, महत, अहंकार, मन, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच महाभुते, पाच तन्मात्रा या पंचवीसांना तत्वे म्हणतात. यांच्यापासून विश्वनिर्मिती होते. संतसाहित्यात आढळणारा "पंचवीसा पलिकडला " हा शब्दप्रयोग ईश्वरदर्शक असतो.
योगशास्त्राने ही पंचवीस तत्वे स्विकारली व त्यात आपले सव्वीसावे "ईश्वर " हे तत्व मिसळले
प्रकृती अचेतन आहे. ती स्वत:हून काहीही करण्यास असमर्थ आहे.चेतन पुरुष्याच्या सहाय्यानेच ती विश्वनिर्मिती करू शकते. पण या सर्व कार्यात पुरुष संपूर्णत: निष्क्रिय, उदासिन, अलिप्त आहे.
विश्वनिर्मिती कशी हा कोणत्याही तत्वज्ञानातील मूल प्रश्न. सांख्य विचाराप्रमाणे अचेतन प्रकृती २३ तत्वे (प्रधान) व चेतन पुरुष यांच्या सहाय्याने हा विश्वाचा पसारा मांडते. हा झाला प्रधानकारण वाद. एकापासून निर्मिती कशी होणार ? किमान दोघे पाहिजेतच. म्हणून सांख्यांनी द्वैत स्विकारले. वेदांतामते "अकेला" ब्रह्म विश्वनिर्मिती करण्यास समर्थ आहे (ब्रह्मकारणवाद) म्हणून ते अद्वैतवादी. ब्रह्मसूत्रे वा शंकराचार्य सांख्यांवर तुटून पडतात ते यामुळे. प्रधानकारणवाद व ब्रह्मकारणवाद हा दोन दर्शनांमधील वादाचा प्रमुख मुद्दा आहे.सांख्य सत्कार्यवादी आहेत. प्रत्येक कार्य हे उत्पत्तीपूर्वी कारणात अव्यक्त रुपाने विद्यमान असते. जसे दह्यात दूध. वेदांताच्या ब्रह्म्याला तो एकटा असूनदेखील कारणाशिवाय कार्य निर्माण करता येते. असो.
सर्वसामान्यपणे आपण जीवात्मा-परमात्मा यांतील ऐक्याला अद्वैत म्हणतो. दोन माणसांत एकाच परमात्म्याचा अंश असल्याने दोघांत अद्वैत आहे असेही म्हणतो. हे अद्वैत "आध्यात्मिक" आहे. माणसा-माणसामध्ये फरक असणारच, भले दोघांमधील जीवात्म्याचा अंश एक असला तरी. सांख्यमते ही भानगडच नसल्याने त्यांनी प्रत्येक व्यक्तीत निरनिराळा पुरुष मानला. हा निष्क्रिय पुरुष व प्रसवशील पण स्वत: काही करावयास असमर्थ अशी प्रकृती विश्वसर्गाची निर्मिती कशी करतात ? सांख्यांच्या मते ती आंधळ्या-पांगळ्याच्या जॊडीप्रमाणे आहेत.आंधळा धडधाकट आहे पण त्याल दिसत नाही. तो पांगळ्याला खांद्यावर घेतो व दोघे वाट चालू शकत्रात.
.आणखी जास्त खोलात न शिरता श्री माहीतगार यांच्या गोष्टीकडे वळू. अध्यात्म व आजचे विज्ञान या दोन निरनिराळ्या पातळीवरच्या गोष्टी आहेत. त्यांची एकमेकात गल्लत करणे. फक्त श्री वर्तकांना शक्य आहे. आपण शरीरांत ७२००० नाड्या व कुंडलिनी शोधू नये हेच उचित. दुसरे पुराणे व सांख्य यांच्यांत शेकडो वर्षांचे अंतर आहे. पुराणातील वांगी वीजेच्या
ग्रीलवर भाजण्यात अर्थ नाही.
दर्शनांवर मी लिहलेले मागचे लेख
दर्शने १ ... प्रास्ताविक http://www.misalpav.com/node/15041
दर्शने २ !! थोड्या विस्ताराने http://www.misalpav.com/node/15109
दर्शने ३ मिमांसा http://www.misalpav.com/node/15316
दर्शने ४ अद्वैत http://www.misalpav.com/node/15384
दर्शने ५ चार्वाक किंवा लोकायत http://www.misalpav.com/node/15418
दर्शने ६ पातंजल योगदर्शन http://www.misalpav.com/node/15809
तंत्रदर्शन -१ http://www.misalpav.com/node/28774
तंत्रदर्शन -२ http://www.misalpav.com/node/28774
तंत्रदर्शन -३ http://www.misalpav.com/node/28863
शरद
.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचनखूण साठवली आहे. सवडीने
असेच बोलतो.
हा लेख पाहुन आमच्या निराकार
धन्यवाद
आपल्यावर टीका करण्याचा हेतु
मस्तच! लिहाल, अशी अपेक्षा
शाक्त मते प्रकृती किंवा शक्ती
पुराणातील वांगी वीजेच्या ग्रीलवर भाजण्यात अर्थ नाही.
+१११११
छान .. लेखन आवडले.
धन्यवाद आणि काही शंका
नुसते ब्रह्म-माया ईश्वर-कर्म
थोडी जास्त माहिती
१.आपण त्रिगुणांना समजून
आजही आपण बघतोच की मरमर काम