तंत्रदर्शन-- १

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
7 Sep 2014 - 10:33 am

तंत्र (भाग १)

जगातील सर्वांत जास्त पुरातन, आजही जगभर, सर्व धर्मातील लोकांचा ज्यावर विश्वास आहे असे तत्वज्ञान कोणते असे विचारले तर याचे उत्तर आहे "तंत्र".
विश्वात एक विशिष्ठ शक्ती आहे. काही तांत्रिक प्रक्रियांच्या (उदा. मंत्र, यंत्र, मुद्रा इ.) सहाय्याने या शक्तीस वश करता येते. ही वश झालेली शक्ती तुम्हास पंचमहाभूतांवर ताबा मिळवून देवू शकते व तुम्ही असाधारण कृत्ये करून दाखवू शकता असे हे तत्वज्ञान मानते. ही एक "यातु" विद्या आहे. यातु म्हणजे जादू. थोडक्यात तंत्र म्हणजे जादूटोणा. आता तुम्हाला पहिले वाक्य हास्यास्पद वाटेल. पण थोडे थांबा. वैदिक व हिंदू, बुद्ध व जैन धर्मातील तंत्रप्रभाव आपण खोलांत बघणार आहोतच, ख्रिस्चन धर्मगुरू शिंपडतात ते Holy Water, मक्क्केत काब्याला सात फेर्‍या मारणे, गंडा-ताईत बांधणे, ज्यूंचे Wailing Wall चे घेतले जाणारे चुंबन हे तंत्रच आहे हे आपल्याला पटावयास हरकत नाही. आजही पुण्यात श्री. दाभोळकर यांच्या हत्याप्रकरणी पोलिस प्लॅंचेटचा उपयोग करतात व अनुयायी त्याचा निषेध करतात व त्याच वेळी आपण मात्र हत्येच्या जागी फूटपाथवर झोपून निषेध वा लोकजाग्रण की काही तरी करतात. एका विशिष्ट वेळी, (मासिक दिन) विशिष्ट जागी, (पूल) विशिष्ट क्रिया, (फूटपाथवर झोपणे) याने खुनी सापडेल (किंवा पोलिस यंत्रणा जास्त क्रियाशील होईल) असे समजणे म्हणजेच तंत्राची कॉपी केली म्हणावयास काय हरकत आहे ? फार तर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी, सुशिक्षित लोकांनी केले म्हणून त्याला मॉड, हाय टेक तंत्र म्हणू. मला तरी हा तंत्राचाच भाग वाटतो. प्लॅंचेट इतकाच (खुळचट) जादूटोणा. असो. आज जगभर तंत्राचा प्रभाव लोकांवर आहे हे दाखवावयास एवढे पुरे.

लेख ३ भागांत विभागला आहे. पहिल्या भागांत प्राचिन काळापासून जगभर याची सुरवात शेतीपासून जास्त उत्पादन मिळावे म्हणून कशी झाली व त्याचा संबंध स्त्री सृजनतेचा कसा जोडला गेला हे बघू व हा धागा तंत्रावर केवढा प्रभाव पाडतो ते पाहू. दुसर्‍या भागात
भारतातील धर्मांवरचे तंत्राचे वर्चस्व, तंत्रा॒चे सिद्धांतात्मक स्वरूप व प्रत्यक्षातील वर्तन यावर विचार करू. तिसरा भाग तंत्र व लोकायत किंवा चार्वाकमत यांचा काय संबंध यावर आहे. तीन लेख खरे म्हणजे स्वतंत्र (pun inintended) आहेत पण तीनही तंत्राशीच संबंधीत असल्याने १,२,३ असे म्हटले आहे.

धरतीचे सृजन हे स्त्रीच्या सृजनाशी जोडले गेले. जगभर धरतीला माता म्हणतात ते यामुळेच. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुफलीकरणविधी हा यात्वात्मक विधी. आदीम समाजात मैथुनाने उत्पादनवृद्धी होते अशी समजुत. त्यामुळे शेतात जर मैथुनविधी केले तर शेतीचे उत्पादन वाढेल या कल्पनेने असा प्रकार सुरू झाला. ही समजुत मध्य अमेरिका, जावा, पेरू अशा दूरदूरच्या प्रदेशात होती. सभावात्माक क्रिया ही यातूची मूल कल्पना. सभावात्मक क्रिया म्हणजे काय ? समजा, तुम्हाला एका व्यक्तीला पीडा द्यावयाची आहे. तुम्ही एक कापडी बाहुली तयार करता. मग ही भावना करता की ती व्यक्ती म्हणजे ही बाहुली. मग तुम्ही ती बाहुली उचलून खाली आदळलीत तर ती व्यक्ती उचलली जावून खाली आदळली जाईल. बाहुलीचा हात मोडलात तर त्या व्यक्तीचा हात मोडेल. जादूची ताकद तुमच्या भावनेवर म्हणजेच मानसिक शक्तीवर अवलंबून असेल. यालाच black magic म्हणतात व यावर विश्वास ठेवणारे कोट्यावधी लोक आज जगात आहेत. ही शक्ती आजच्या शास्त्रालाही मान्य आहे. हिप्नोटिझम म्हणजे दुसरे काय ? तंत्राच्या बाहेरही ही कल्पना मान्य केली गेली आहे. संत " भाव तेथे देव " म्हणतात तेव्हा त्यांना हेच सांगावयाचे असते.
ही अशी सुरवात. यात स्त्रीला महत्व जास्त. पुरुष पाहिजे पण तो दुय्यम भूमिकेतला. त्यामुळे पुढील सर्व यात्वात्मक प्रक्रीयांमध्ये स्त्रीला जास्त महत्व मिळाले. तांत्रिक मार्गात स्वैर लैंगिकता, कामाचार यांना परवांगी मिळाली.यामुळे तंत्र व भोगवाद एकमेकात मिसळून गेले. पुढे भारतात तंत्राचे ध्येय मोक्ष मिळवणे असेच होते पण व्यवहारात मात्र पंचमकाराना प्राधान्य मिळाले. संतांनी त्यामुळेच तंत्राला झिडकारले.

काही शब्दांना विशिष्ठ सामर्थ्य आहे. त्यांना अर्थ असतोच असे नाही. एकाक्षरी शब्दांना बीजमंत्र म्हणतात. उदा. हं ठं, सं क्लीं यां पासून मंत्र तयार होतात वा बीजमंत्रांचा उपयोग इतर मंत्रात होतो. इथेही भावनेला महत्व आहे., नुसता मंत्र लाख वेळेला घोकून त्याचा फायदा होणार नाही. मंत्राप्रमाणेच यंत्र म्हणजे विशिष्ठ भौमितीक आकृती. या य़ंत्रांमध्ये बर्‍याचवेळी बीजमंत्रही असतात. निरनिराळ्या देवतांची,तसेच मंत्रांची निरनिराळी यंत्रे असतात. बाजारात तुम्हाला तांब्या-चांदीच्या पातळ पत्र्यावर ठसा दाबून तयार केलेली विकतही मिळतात. मंत्र-यंत्र यांच्याप्रमाणे तंत्रात आसन-मुद्रा यांनाही महत्व आहे. ह्या आसनात हा मंत्र जपावा असे उल्लेख मिळतात. तसेच काही मांत्रिक स्मशानात, अमावास्येला मंत्र जपावा असाही आग्रह धरतात. असल्या माहितीला अंत नाही. तांत्रिक पंथ, त्यांचे आचार्य, त्यांचे ग्रंथ अगणित आहेत. इथेच थांबावे.

आज एका प्रसिद्ध यंत्राचे चित्र पाहू. श्रीयंत्रातील त्रिकोणी आकृत्यांचा शरीरातील षटचक्रांशी संबंध जोडला आहे.
https://www.flickr.com/photos/26568156@N05/14976814717/
यंत्राप्रमाणेच एक मंत्र पहा
श्री मधुमति दिश: स्थावरजंगमा: सागरपुररत्नानि सर्वेषां कर्पिणी ठं ठं स्वाहा: हा मधुमती विद्या या नावाने प्रसिद्ध असून रोज १०८ वेळा या प्रमाणे एक वर्ष नित्य जप केल्यास तो सिद्ध होतो. सिद्ध झाल्यावर पुरुषाला दिशा सागर, नदी, रत्ने ,स्त्री, वनस्पती इ. ज्ञान होते.

प्रश्न असा की या तंत्राला किंवा जादूटोण्याला लोक बळी का पडतात ? याची दोन मह्त्वाची कारणे. पहिले म्हणजे तुमच्यावर अनेक शतकांचे, पिढ्यांचे संस्कार असतात. त्यातून सुटका होणे अतिशय अवघड असते. आईचे मुलावर प्राणांतिक प्रेम असते. पण खोल विहिरीत एक फडके धरून चार माणसे असतात व आई आपले तान्हे मुल वरून खाली टाकते. एकविसाव्या शतकांत ! दुसरे म्हणजे लोकांना समस्या असतात. त्याची उत्तरे मिळत नसतात. इतरांनी सांगितलेले पटण्यासारखे असतेच असेही नाही. अशा अगतिक माणसांना काही वेळा हाच मार्ग खुला असतो. घरांत कॅन्सरचा रुग्ण असेल व उपचारासाठी २-३ लाख उभे करणे शक्यच नसेल तर तुम्ही "हे बाबा मंत्राने कोणताही आजार बरा करतात "या वर विश्वास ठेवून हजार पाचशे रुपये घालवता
. फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की !

आज पहिल्या भागांत आपण तंत्र म्हणजे काय ? त्याची सुरवात कशी झाली, त्याची व्याप्ती कुठवर आहे, त्याचा सर्व धर्मांमध्ये चंचुप्रवेश तरी आहेच, तसेच मंत्र, यंत्र, आसनादी अंगे पाहिली. लोक याला का शरण जातात त्याचे कारणही पाहिले. या जुजबी माहिती नंतर दुसर्‍या भागात वैदिक व हिंदू धर्म आणि बुद्ध-जैन धर्मांतील तांत्रिक पंथाचा विचार करू.

शरद

.

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

7 Sep 2014 - 12:10 pm | आदूबाळ

त्याच वेळी आपण मात्र हत्येच्या जागी फूटपाथवर झोपून निषेध वा लोकजाग्रण की काही तरी करतात. एका विशिष्ट वेळी, (मासिक दिन) विशिष्ट जागी, (पूल) विशिष्ट क्रिया, (फूटपाथवर झोपणे) याने खुनी सापडेल (किंवा पोलिस यंत्रणा जास्त क्रियाशील होईल) असे समजणे म्हणजेच तंत्राची कॉपी केली म्हणावयास काय हरकत आहे ?

हे खुनी सापडायला मदत व्हावी या हेतूने नव्हे तर प्रतीकात्मक निषेध/लोकजागृति या हेतूने केलं होतं.तो तंत्रसिद्धीचा खुळचट प्रकार नक्कीच नाही.

बाकी चालूद्या.

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2014 - 4:09 pm | प्रभाकर पेठकर

१०० टक्के सहमत.

उदाहरण देताना, नुसते चुकीचेच नाही तर अत्यंत संवेदनशील विषयाचा उथळ वापर केला आहे. आवडलं नाही.

बॅटमॅन's picture

8 Sep 2014 - 12:36 pm | बॅटमॅन

अगदी अस्सेच म्हणतो. उथळपणा आज्याबात आवडला नाय. बाकी चालूद्या....

उगा काहितरीच's picture

7 Sep 2014 - 12:46 pm | उगा काहितरीच

पुढील भागाच्या प्रतीक्षेत....

पोटे's picture

7 Sep 2014 - 2:12 pm | पोटे

ऊगा कहीतरीच

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2014 - 2:47 pm | टवाळ कार्टा

२००+ नक्की? ;)

जेपी's picture

7 Sep 2014 - 3:26 pm | जेपी

टका यांची भविष्यवाणी तंत्रशक्तित मोडते का मंत्रशक्तित ?

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2014 - 3:39 pm | टवाळ कार्टा

लेखात बराच मालमसाला आहे...बघु कोण किती मोकळा आहे क. का.कु. साठी ;)

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2014 - 3:40 pm | टवाळ कार्टा

क.का.कु. ऐवजी का.कु. असे वाचावे

पोटे's picture

7 Sep 2014 - 5:26 pm | पोटे

ऑम भगभुगे भगिने भागोदरे ओम फट स्वाहा .. हा मन्त्र कोणत्या पुस्तकात आहे.

प्यारे१'s picture

7 Sep 2014 - 5:52 pm | प्यारे१

डॅम इट.
-सबइन्स्पेक्टर प्यारेश कोठारे

बाकी शरदरावांकडून अशा धाग्याची अपेक्षा नव्हर्ती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2014 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंत्र-तंत्र पुजा करा की अशा पद्धती प्रचलित होत्या असं सांगितलं शरदसरांनी ?
म्हणजे काय अपेक्षित नव्हतं बरं त्यांच्याकडुन ?

-दिलीप बिरुटे

स्पा's picture

8 Sep 2014 - 10:50 am | स्पा

बिटरुट सरांशी सहमत.

नविनच माहीती समजतेय
पु.भा.प्र

विजुभाऊ's picture

8 Sep 2014 - 9:35 am | विजुभाऊ

फार कशाला, होमिओपाथी ही उघडउघड फसवणुक आहे हे जाहीर झाले असले तरी सुशिक्षित माणसेही त्या दवाखान्यात रांगा लावतातच की !

अरे बापरे ...हे असे कॉही ऑहे हॉय? ऑम्हाला कॉल्पनाच नॉही.
जगात सर्वत्र होमीओपॅथी शास्त्रशुद्ध अभ्यास घेणारी ची कॉलेजेस आहेत. त्यांच्या पदव्या मान्य आहेत. जगभर ही अशी तुमच्या म्हणण्यानुसार १७९६ सालापासून गेली दोनशे वर्षे आपली सर्वांची फसवणूक होत असते.
अर्थात नश्वर असणारा देह असणे हीच एक मोठ्ठी फसवणूक आहे. त्यात कोठेच न सापडणारे मन ही तर त्याहून ऑधीक मोठ्ठी फसवणूक.
लग्न प्रेम शिक्षण नोकरी असल्या किरकोळ गोष्टीं आणि फसवणूक याबद्दल तर बॉलायलाच नको मॉग.

अनिस आणि होम्यौपाथीला लेखात ओढण्यामागे केवळ टी आर पी एव्हाढाच हेतू असावा.
आपण तर गप्प राहणार. नो टी आर पी :)

तंत्रमार्गाची माहिती आवडली. नाथपंथ हा पण तंत्रमार्गात येतो असे ऐकून आहे त्याबद्दल अधिक माहिती दिल्यास उत्तम.
पुढच्या भागाबद्दल उत्सुक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2014 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाथपंथावाले या विषयात लै पारंगत. शरदसरांनी नाथपंथांच्या तंत्र मंत्रावर लेखनी चालवावीच.

-दिलीप बिरुटे

एस's picture

8 Sep 2014 - 12:50 pm | एस

आम्ही तिसर्‍या भागावर अभिव्यक्त होऊ. ;-)

लेखमालिकेतील गंभीर व माहितीपूर्ण भागाच्या प्रतीक्षेत.

होमिओपथीवर का तंत्र मंत्राचा आरोप झालाय येथे?
मी स्वतः होमिओपथी घेतली आहे अन मला त्याचा पॉझीटीव्ह अनुभव आहे.

बाकि तंत्र या विषयावर पुरातन काळापासुनचे काही वाचायला मिळणार याचा आनंद आहे.

प्रसाद गोडबोले's picture

8 Sep 2014 - 1:32 pm | प्रसाद गोडबोले

तंत्र मार्गावरील माहीती फार आवडली ! मला अभिनव गुप्त चे तंत्र मार्गावरील पुस्तक हवे आहे , इन्टरनेटवर काही सारांश उपलब्ध्द आहे पण डीटेल मधे काही नाही !
तसेच बौधातील वज्रयान पंथामधे तंत्र मार्गाचा अवलंग केलेआ अढळुन येतो असे ऐकुन आहे त्या विषयी वाचायला आवडेल !

पुढे मागे आसाममधील कामाक्षी देवीच्या मंदीरात जायची इच्छा आहे जिथे अनेक तांत्रिक मत आचरणारे साधु पाहण्यात येतात असे ऐकुन आहे ...

असो

पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !!