Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] ग्रीन कार्ड

लेखक तुडतुडी यांनी मंगळवार, 28/07/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
३ वर्षे खचून performanse दिल्यावर कंपनीने त्याला ऑनसाईट पाठवायचं ठरवलं . अप्लिकेशन करून झालं . लॉटरी मध्ये नाव निघालं . त्याला केवढा आनंद झाला . इंटरव्ह्यू छान झाला . 'पारपत्रावर वर विसा चिकटवून कंपनीत पाठवला जाईल' असं एम्बसी कडून उत्तर मिळाल्यावर तो खुश झाला. उडण्याचा दिवस जवळ येवू लागला तसा त्याचा उत्साह वाढत होता. खरेदी वगेरे करून झाली . आई बाबांनी काय काय घ्यायला लावलं त्याला . अहो आई बाबा आता US मधलं सगळं काही तिकडे मिळतं . असं म्हणून ओझं कमी केलं . आवश्यक ते सोपस्कार पार पडले . बोर्डिंग पास मिळाला . विमानात बसल्या बसल्या तो विचार करू लागला . आत्ता ३ वर्षे validity आहे विसा ची . २१५२ पर्यंत म्हणजे अजून २ वर्षे वाढवून मिळाली तर भारताचं ग्रीन कार्ड नक्की मिळेल
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6791
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

In reply to by जडभरत

अहो पण तुडतुडी तै भयकथा सोडून इकडे कुठे शिरलात? ह्या टैपचं लिहणारे अनेक जण आहेत. भयकथा लिहीणारे बरेच कमी. तुम्ही आपलं लोकांना घाब्रवैचं काम करा.

स्वप्नरंजन बरंय पण भविष्यात सगळे देश सारखे आणि देशांच्या सीमा पुसट झाल्या तर जास्त आवडेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हो. :-) ते माझ्या आवडीचं स्वप्नरंजन आहे एवढंच.

///अहो आई बाबा आता US मधलं सगळं काही तिकडे मिळतं //// याच्या जागी अहो आई बाबा आता इथलं सगळं काही तिकडे मिळतं '' असे केलेत तर अजून चांगले होईल...अर्थात माझे मत..

In reply to by जयंत कुलकर्णी

फक्त बदल "अहो आई बाबा आता इथे मिळणारं सगळं काही तिकडेही मिळतं " असा केल्यास शब्दसंख्या कायम राहील... शशक मध्ये हे फार महत्वाचे ! मस्त कथा !

आशावादी शतशब्दंकथा. .. ( ही स्पर्धेसाठी आहे का? तसे असल्यास मला वाटते तसा उल्लेख करावा . ) स्पर्धेसाठी असल्यास माझ्याकडून +१

In reply to by मनीषा

स्पर्धा १ ऑगस्ट पासून सुरु होत असल्याने ही शतशब्दकथा स्पर्धेसाठी नसावी असे वाटते.

पण काही पक्ष ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरून "बांगड्यांना" देत आहेत .....

In reply to by माम्लेदारचा पन्खा

"बांगड्यांना" हा शब्द काळजाला भिडला =))

In reply to by माम्लेदारचा पन्खा

"बांगड्यांना" = बांग देणारे... जबराट शब्दसंग्रह

In reply to by होबासराव

बहुतेक बांग्लादेशी म्हणायचे होते इथे

सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद जडभरत अहो कुणीतरी सांगितलं कि तशी भयकथा आधी चाफा ह्यांनी लिहिली आहे . म्हणून ती अप्रकाशित करण्यात आलीये . मी संपादक मंडळाला ढीगभर मेसेजेस केलेत कि मला चाफा च्या मूळ कथेची लिंक द्या . पण अजून दिली नाहीये .हे बरोबर आहे का ? माझ्याकडे पुढची भयकथा तयार आहे . पण ती लिंक मिळाल्याशिवाय मी ती लिहिणार नाही . हि कथा स्पर्धेसाठी नाहीये . स्पर्धेसाठी दुसरी कथा लिहिणारे

In reply to by तुडतुडी

मी ती मूळ कथा वाचली. तिथेच कुणीतरी संदर्भ दिलेला होता, टकाच्या प्रतिसादाच्याखालीच होता. पण दोन्हींच्या सादरीकरणात खूप फरक होता. तुमची कथा खूप वेगळी होती. मालमसाला पण वेगळा होता. डिलिट करण्याची काही गरज नव्हती, माझ्या मते तरी. असो.

१.डॉ च्या बदल्यात रूपये मिळाले की काळ्याबाजारातून घ्यावे लागले ? २. काय भाव होता ? 3.भारताचे पंतप्रधान कोण होते त्या वेळी ? कें अरविंद तृतीय ?