किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी !
आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे ||
भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ?
धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि ||
जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे |
पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?
मनात ढेकूण ठेवा लपवून घट्टच ढाकण दाबुनिया |
ऐकुया संगीत राहुया धुंदीत जीवन रंगीत पेल्यासम ||
फेका ती खड्ड्यात गंजली हत्यारं रंगवुनि मृत वाघनखं |
जळो इतिहास होऊदेत र्हास कुणास पत्रास समष्टीची ||
सुकून चालली झाडं, पानं, फूलं; खरडून शब्द काय मिळे ?
मनाशी वादळ, मनात कल्लोळ; सुचेना विचार काही केल्या ||
बळीयांचा जेठ येऊद्याहो थेट उराउरी भेट रासभाशी ||
|| जय गुरुदेव ||
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5476
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म्... या. एकटेच आलात?
कविता वाचली. कविचा परिचय
आँ ते गाढवाचे चित्र कुठं गेलं
In reply to कविता वाचली. कविचा परिचय by जडभरत
अरे!एका महिन्यात कसं आलं एवढं
In reply to आँ ते गाढवाचे चित्र कुठं गेलं by जडभरत
अगागागा!
+१
In reply to अगागागा! by पैसा
खविता अंमळ जड झालीय
गुर्द्येव दत्त!
किती दिवसांनी गाढव आलंय!वेलकम
मकरंद अनासपुरे मोड ऑन
कवी आणि कवितेचं नाव सोडून
निराकार गाढवाने पुनरेकवार
आणि टोपणनाव "शष्पू" =))
In reply to निराकार गाढवाने पुनरेकवार by बॅटमॅन
वडक्कम गर्दभराज !
वा सुंदर . टचकन पाणी आलं
निरवतापाची
कविता गंभीर विषयावरच आहे.