Skip to main content

जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका)

लेखक ganeshpavale यांनी शुक्रवार, 24/07/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
[पुरुषी मनाला विचार करायला लावणार. बाहेर समाजात वावरणारी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो, जिला त्रास सहन करावा लागतो, ती तुमची आई, बहिण, बायको, मामी, मावशी कोणीही असू शकते. तेंव्हा स्त्रीचा आदर करा.] शोकांतिका ********************* दुनियेचे जीवघेणे इशारे आणि लचके तोडण्यास सरसावलेले हात चौफेर वखवखलेली नजर आणि अंग चोरून चालणारी ती… दुनियेच्या खोचक कमेंट सहन करत कानाडोळा करून, रस्ता कापणारी थोडी घाबरलेली, मनात असंख्य विचारांचं काहूर घेवून एकटी घराबाहेर पडलेली ती.... बाभळीच्या काट्यात गुरफटलेली कावरी - बावरी होवून घुसमटलेली अनंत यातनांचा महासागर पार करून नियतीच्या लाटेवर स्वार झालेली ती..... आज बळी पडली आपलं सार काही गमावून निपचित डोळे मिटून, रक्ताच्या थारोळ्यात तिचा निर्जीव उघडा देह आस्थाव्यस्त पडलेला. आज सार काही सुन्न होत. आज तिला कोणी वखवखलेल्या नजरेने पाहत न्हवत कोणी अश्लील इशारे करत न्हवत, कोणी हसून खोचक बोलत न्हवत निष्प्राण देह शांत शांत वाटत होता. आजूबाजूला गर्दी असली तरी... तिला कशा... कशाचीच भीती न्हवती.… जणू काही आज तिच्यासाठी आनंदाचा दिवस होता. (शोकांतिका) © कवी - गणेश पावले ९६१९९४३६३७
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4607
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

:( खूप सुन्न करणारी रचना.
निष्प्राण देह शांत शांत वाटत होता. आजूबाजूला गर्दी असली तरी... तिला कशा... कशाचीच भीती न्हवती.…
खूप वाईट वाटतंय... काय प्रतिसाद देऊ कळतंच नाही..

खरेच केवढा विरोधाभास! मरणानेच तिला आनंद मिळावा ना. .

दुर्दैवी वास्तव

काय बोलणार?

मुळातच नैतीक मुल्ये कुचकामी-च असतात, परिस्थीती माणसाला काहिच्या काही बनवु शकते. पोलीओ सारखी एखादि लसच निघायला हवी मानवाकडून विपरीत परिस्थीतीमधेही नैतीक मुल्ये न विसरली जाण्यासाठीची... बाकी काय बोलणार. चार-दोन निवडक स्त्रिया सोडल्या तर इतकी वाइट अवस्था समस्त स्त्रिजमातीवरच आहे इथे कि बोलता सोय नाही... :(

:(

एक सामाजीक विकृती फार प्रभावी मांडलीय.

नि:शब्द करणारी वास्तव कविता.. शेवटचं कडवं वाचल्यावर भटसाहेबांच्या ओळी आठवल्या.. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

In reply to by सुधांशुनूलकर

अहो ही तर बोलते होण्याची वेळ आहे एक फार छान ओळ कुठेतरी वाचली होती. देवाच्या अवतराची वाट पाहू नका स्वताःतील देव जाग्र्ुत करा...

मलाही याच ओळी आठवल्या :(

लिहितानाच डोक्याचा भूग्गा झाला होता…. या विषयावर लिहाव कि नाही लिहाव यासाठी खुपदा विचार केला… आणि मग शेवटी मनातली सल उतरवली शब्दात… या अत्याचारी जातीचा खूपच तिरस्कार आलाय. रोजच नवीन नवीन बातम्या मनाचा थरकाप उडवतात

लिहितानाच डोक्याचा भूग्गा झाला होता…. या विषयावर लिहाव कि नाही लिहाव यासाठी खुपदा विचार केला… आणि मग शेवटी मनातली सल उतरवली शब्दात… या अत्याचारी जातीचा खूपच तिरस्कार आलाय. रोजच नवीन नवीन बातम्या मनाचा थरकाप उडवतात

सुन्न