Skip to main content

याकुब मेमनच्या फाशीच्या निमित्ताने

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 25/07/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकुब मेमनचे फाशी वाचवण्याचे सर्व पर्याय संपत आल्यामुळे त्याला लवकरच फाशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली. फाशी प्रकरणाचा गाजावाजा होणे ही आजकालचीच गोष्ट वाटते कारण भारतात स्वातंत्र्यापासून अनेक लोकांना फाशीची शिक्षा झाली आहे परंतु त्याची एवढ्या प्रमाणात चर्चा झाल्याचे आठवत नाही. समाजातील काही उदार मतवादी लोकांना अतिरेकी, नक्षलवादि, अट्टल गुन्हेगार यांच्या मानवाधिकाराच्या चर्चा करून आणि त्यांच्याबद्दल समाजात नाहक सहानुभूती निर्माण करण्याची घाणेरडी सवय लागली आहे. आणि असे करून ते स्वतःची दुकाने चालवत असतात. फाशी झालेल्या गुन्हेगाराची जात, धर्म याबद्दल वक्तव्ये करून राजकीय पोळ्या भाजण्याचे प्रकार तर फारच घृणास्पद आहेत. बॉम्बस्फोटामध्ये मारले गेलेले सर्व भारतीय नागरिक होते. त्यांची जात किंवा धर्म पाहून त्यांना मारले नव्हते तर मग फाशी झालेल्या या अतिरेक्याच्या धर्माची चर्चा का? भारतात फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा असावी किंवा नाही यावर वेगळी चर्चा होऊ शकते पण याकुब मेमनने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी केलेली मदत आणि या स्फोटांमध्ये २५७ निष्पाप लोकांचे गेलेले बळी, हे भारतीय कायद्यानुसार त्याला फाशीची शिक्षा देण्यासाठी पुरेसे आहेत. याशिवाय याकुब मेमनला कायद्यानुसार स्वतःला वाचवण्याचे मिळणारे सारे पर्याय मिळाले आणि त्याने ते वापरालेसुद्धा. गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?

वाचने 50333
प्रतिक्रिया 277

प्रतिक्रिया

लेखाच्या आशयाशी सहमत. तुम्ही दिलेल्या यादीत आंतरजालावरून कॉन्स्पिरसी थेअर्‍या* पसरवणारे व दहशतवादाशी संबंधीत खटले विक्रमी* वेळात संपूनही उशिर झाला असे रडगाणे~ गाणारे यांनाही जोडायला हवे. * कसाबला फाशी झाल्यावर अतिउत्साही लोक १० प्रश्न फॉरवर्ड करत होते ज्यापैकी बहुतांश प्रश्नांची उत्तरे कॉमन सेन्सनेही मिळवता येत होती. ~ २६/११ अतिरेकी हल्ल्यांचा आव्हानात्मक व आकारमानाने खूप मोठा असणारा खटला कुठल्याही तडजोडीशिवाय विक्रमी वेळात पूर्ण झाला होता. या गोष्टीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुक झाले होते. तरी देखील 'किती तो उशिर' असे रडगाणे गाणारे मिपावरही पाहिले आहेत.

याच गुन्ह्यात एक षिनिमावाला होता ना ? तो किरकोळ सजा भोगतोय. का ? शेंदरी षेनेच्या आश्रयात गेला म्हणून ?

In reply to by dadadarekar

कायदेशीर दृष्ट्या आपले विधान अपूर्ण माहितीवर तर नाही ना ? न्यायालयांचा निर्णय कोणत्याही रंगाने बाधीत होणारा नसतो तर स्वतंत्र असतो आणि स्वतंत्र राहीला आहे. निष्पक्ष न्याययंत्रणेची कदाचित नकळत नाहक बदनामी होत नाही आहे याची खात्री करून घेतलेली बरे असेल असे वाटते.

In reply to by माहितगार

...... डोक्यावरुन गेला असेल, जरा त्याची फोड करून लिहा म्हणजे कदाचित समजेल त्याला.

In reply to by विनोद१८

साहेबांनी वृत्त पत्रात मुलाखत देऊन स्पष्ट सांगितले होते. कसा सोडवला ते नाहीतर टाडा च्या अन्वये जामीन नाही जन्मभर तुरुंगवास हेच वास्तव असते

In reply to by dadadarekar

पण त्या शिनेमावाल्याचे वडील हाताचा पंजा दाखवायचे बा सतत..त्याविषयी काही माहिती असेल तर सांगा दादा तुम्ही.. माहिती नसेल तर आज राहुलच्या आईच्या साड्या इस्त्री करायला जाल तेंव्हा विचारून घ्या हो ..

In reply to by चिनार

तो निर्दोष आहे , त्याला मुक्त करा असा आदेश वाघोबाने दिला होता ना ? तेंव्हा कोर्टाची चौकशीही झाली नव्हती ! आणि आता याकूबची बाजु कुणीतरी घेतली तर ते तेवढे देशद्रोही झाले काय ?

काश्मीर मधील श्रीनगर महाविद्यलयात, युरोपिअन फोरमच्या मदतीने ,नासिमबागच्या बाजूस एक सुंदर लायब्ररी बांधण्यात आली होती .त्या वेळी मी इंजीनिरीगच्या पहिल्या वर्षात शिकत होतो. मी व माझा पुण्यातील एक मित्र ( महमद ) त्या लायब्ररीला वारंवार भेट देत होतो .त्याचेही वडील उधमपूर मिलिटरी सेक्टर मध्ये कर्नल होते .ती लायब्ररी इतकी अप्रतिम पाच मजली बांधली होती कि त्याचे द्रुष्य आजूनही डोळ्या समोरून जात नाही .बाहेरुन सुंदर सुंदर परदेशी काचा लावण्यात आल्या होत्या. अद्यावत कपाटे, भरपूर पुस्तके ,थंडी वाजू नये म्हणून ,मध्यवर्ती हिटीग सिस्टीम .थोडक्यात अप्रतिम अशी ती लायब्ररी होती .त्याच वेळी नेमकी पाकिस्तानचे माजी प्रतंप्रधान झेड . भुत्तो यांना फाशी देण्यात आली. वास्तविक या घटनेची भारताचा कांही एक संबध नव्हता. अफवा व व्देषा पोटी निव्वळ भारताच्या पंत प्रधानांनी कांहीच प्रतिक्रिया दिली नाही, म्हणून स्थानिक विध्यार्थ्यांनी ती संपूर्ण लायब्ररी जाळून टाकली व त्या लायब्ररी वर झुल्फ्कार भूत्तो असा फलक लावण्यात आला .ह्या घटनेने माझे मन मात्र खूपच हेलावून गेले होते. शेवटी फाशीची शिक्षा हि पूर्णपणे न्यायालयीन कामकाजाचा भाग असल्याने त्या मध्ये जात पात धर्म ह्या गोष्टी आणणे चुकीचे ठरेल . हि शिक्षा न्याय घटनेला अनुसरून असलेने प्रत्येंक नागरिकाने त्याचा आदर हा केला पाहिजे.

ह्यांनी फाशीच्या शिक्षेवर शिक्का मोर्तब केले कि फाशी देण्यासाठी अजून काय कायदेशीर प्रक्रिया असतात ?? त्यात पुन्हा पुन्हा याचिका कसल्या दाखल करताहेत ? शेवटचे ऐकले त्यात मामला राज्यपालांकडे आहे असे कळले ...हा सगळा नक्की काय प्रकार आहे ??

In reply to by श्रीरंग_जोशी

श्रीरंगराव लिंक शेअर करत आहेत म्हणजे त्यात विनाकारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याविषयी गरळ ओकलेली असणार हे गृहित धरलेच होते. तरीही प्रवीण बर्दापूरकर यांची ही पोस्ट अपुर्‍या माहितीवर आधारित आहे. मे २०१५ मध्ये सुप्रीम कोर्टाने म्ह्टले होते की फाशीची शिक्षा सिक्रेटली आणि घाईघाईने (कसाब आणि अफजल गुरू केसप्रमाणे) करू नये. संबंधित गुन्हेगाराला सर्व लीगल रिकोर्स मिळाले पाहिजेत आणि नातेवाईकांना भेटता आले पाहिजे वगरे. http://timesofindia.indiatimes.com/india/Convicts-cant-be-hanged-secret… त्यामुळे फाशीची तारिख आधी जाह्रिर करणे क्रमप्राप्त होते. अशा प्रसंगी सरकारने गुपचूप सगळे उरकायला पाहिजे होते हे म्हणणे ठिक आहे पण त्यातून कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असते त्याचे काय? देवेन्द्र फडणवीसांनीही हेच म्हटले की या संदर्भात कोर्टाच्या सगळ्या गाईडलाईनचे पालन केले जाईल. बाकी फाशी कधी देणार, कशी देणार या गोष्टी पूर्वी धनंजय चॅटर्जीच्या फाशीच्या वेळीही (२००४) चघळल्या जातच होत्या. आता दिले जात आहेत तेच सगळे डिटेल त्यावेळीही दिले होते. विश्वास बसत नसेल तर http://www.rediff.com/news/2004/aug/12spec.htm हे वाचा. विशेष म्हणजे सरकारने आता फाशीची डेट आधी का जाहिर केली हे म्हणणार्‍यांपैकीच बरेच अफजल गुरूच्या केसमध्ये गुपचूप फाशी का दिले असा उलटा सवालही विचारत होतेच. त्यावेळी आणि आता यात नक्की काय फरक झाला आहे? एक फरक म्हणजे कोर्टाच्या गाईडलाईन आल्या आहेत. आणि दुसरा महत्वाचा फरक म्हणजे केंद्रातील आणि राज्यातील सरकारही बदलले आहे. आणि सध्याच्या केंद्र सरकारला काहीही बादरायण संबंध नसताना शिव्या घातल्या की श्रीरंगरावांसारख्यांना अगदी धन्य वाटते आणि इतर कुठलेही प्रश्न न विचारता त्यांच्यासारखे अशा लिंका 'वाचनीय' म्हणून पोस्ट करतात. एक तर बॉम्बस्फोट झाले १९९३ मध्ये.खटला सुरू झाला त्याच वर्षी. खटला पूर्ण झाला २००७ मध्ये. पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अपील वगरे झाले २०१३-१४ पर्यंत. प्रणव मुखर्जींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला मे २०१४ मध्ये. आता सरकार (आणि ते ही राज्य सरकार-- केंद्राचा संबंध गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपतींना अर्ज फेटाळा हे रिकमेन्ड करण्यापुरता. आणि ते ही युपीए-२ सरकारने केले असायचीच शकयता सगळ्यात जास्त) त्या शिक्षेची पूर्णपणे कायद्याच्या कक्षेतून अंमलबजावणी करत असेल तरी शिव्या घालायच्या केंद्र सरकारला. अर्थातच काहीही झाले तरी केंद्र सरकारला आणि नरेंद्र मोदींना शिव्या घालणार्‍यांकडून वेगळी अपेक्षाही नाही म्हणा. आणि ओवेसी आणि अबू आझमी च्या 'जहरी' टिकेस सरकारला सामोरे जावे लागले असे म्हणायचा शहाजोगपणा बर्दापूरकर बाळगतात.म्हणजे एक तर ओवेसी आणि अबू आझमी हे दोन महात्मे अन्य वेळी एकदम रॅशनल बोलत असतात!! वा वा. या असल्या रद्दड ब्लॉगपोस्टना फाट्यावर मारावे.

In reply to by श्रीगुरुजी

अगदी अगदी. आणि लिहायची स्टैल तर अगदी फिक्स झालीय. सुरुवातीला आम आदमीचा कळवळा आणून थोडे प्रवचन द्यायचे. आपल्या बाब्याला तोंडदेखल्या चार शिव्या देऊन घ्यायच्या अन नंतर मूळ मुद्दा ऊगाळायचा. केंद्र सरकार कसे वाईट, अनुभव कसा नाही, राज्य सरकार कसे अनुनभवी, भगवा अजेंडा कसा राबवलाय, एकूणच काँग्रेस सोडून इतर सर्वजण प्रशासनाला कसे नालायक हे लिहून जाता जाता मिडीयाला दोन शिव्या दिल्या की लेख कसा फुलप्रुफ झाल्यासारखा वाटतो. ह्यांचे टेम्प्लेटस पाठ झालेत आता.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

आता तुम्ही ट्रोलींग करता आहात, असा आरोप केला जाईल, त्यासाठी तयार रहावे.

In reply to by श्रीरंग_जोशी

>>> ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांची या विषयावरची ताजी ब्लॉगपोस्ट वाचनीय आहे. प्रवीण बर्दापूरकरांच्या त्या लेखावर मी कॉमेंट पाठविली होती. लेखात उपस्थित केलेले मुद्दे (याकूबला गुपचुप फाशी देणे, भगवेकरण, काँग्रेसचे कौतुक इ. मुद्दे) चुकीचे आहेत हे आहेत हे मी सोदाहरण लिहिले होते. सदर लेख पूर्वग्रह व कायदेशीर तरतुदींच्या अज्ञानातून जन्माला आला आहे हे मी लिहिले होते. प्रवीण बर्दापूरकरांनी माझी प्रतिक्रिया प्रकाशित केलेली नाही! एकंदरीत त्यांच्यावर लेखाच्या शेवटी उधळलेली स्तुतीपुष्पे - "परखड, चतुरस्त्र, स्वच्छ पत्रकारिता, सेक्युलर, पत्रकारितेचे समग्र आकलन असणारा इ. इ." - ही खोटी असून निधर्मांध विचारसरणी, काँग्रेसभक्त, भाजपविरोधक, पूर्वग्रहदूषित आणि कायद्याविषयी अज्ञान असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे असे दिसत आहे.

सुप्रीम कोर्टाने याकुब मेमनची फाशीची सजा कायम केल्यानंतर,राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर याकुबने महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे दयायाचिका दाखल करण्याने त्याचे मरण दोनपाच दिवस पुढे ढकलले जाईल इतकेच. मात्र प्रश्न असा आहे की सर्वोच्च यंत्रणेने एकदा शिक्षा कायम केल्यानंतर त्यासंदर्भात तुलनेने कनिष्टह यंत्रणेकडे दाद मागता येते का?याचे उत्तर आजच्या घडीला कदाचित कोणाकडेही नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल ही याचिका फेटाळतीलच याबद्दल दुमत असू नये. कारण तसे न घडल्यास संपूर्ण यंत्रणेचीच अब्रू वेशीला टांगली जाण्याची शक्यता आहे. एक मात्र निश्चीत की आपल्या व्यवस्थेतील ढिसाळपणा,अनियमितता आणि त्रूटी याकुबच्या याचिकेने अधोरेखीत झाल्या आहेत!

आता तर सलमान खानही त्याच्या बाजूने बोलायला लागलाय. २९ जुलैला अबू आ़झमी एक मोर्चा काढणार आहे. तरीही ह्या घटनांकडे धर्मनिरपेक्ष दृष्टीने पहावे काय ?

In reply to by तिमा

आता तर सलमान खानही त्याच्या बाजूने बोलायला लागलाय. जो स्वतः मनुष्यवधाचा गुन्हा करून, कारागृहात जाण्याची शिक्षा होऊ नये यासाठी खोटे बोलून, अनेक गैर/कायदेशीर उचापती करत आहे; अश्या माणसाच्या भुक्कड वकिली मताला किती महत्व द्यावे याची जाण नसलेले बरेच जण आहेत, हीच जास्त शरमेची गोष्ट आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कायद्याबद्दल आस्था निर्माण व्हावी असे वातावरण कायद्याच्या मंदिरातच नस्ते भौतेक्,,,,मिपावरचे वकिल टाकतीलच प्रकाश...पण आप्ल्याकडच्या बिंडोक पाखरांना कोण सम्जाव्णार की त्या एका गुन्हेगाराला डोक्यावर घेउन नाच्तात....चायला पाखरे असे कर्तात मग पाख्रांच्या मागावरच्या मुलांन्ना झक मारत फर्स्ट डे ची टिकिटे काढावी लाग्तात

In reply to by टवाळ कार्टा

हं बरोबरंय टका. आणि आपलंच मूर्ख पब्लिक असल्या भाईंना डोक्यावर चढवतं. साला एक हिंदी चित्रपट बघत नै मी या फाल्तू हीरोंमुळे. अगदी "खाणा"वळच चालू है यांची.

In reply to by टवाळ कार्टा

कायद्याबद्दल आस्था निर्माण व्हावी असे वातावरण कायद्याच्या मंदिरातच नस्ते भौतेक् ही जबाबदारी कायद्याची नसते... फक्त त्याचे पालन केले नाही तर निरपेक्षपणे योग्य ती शिक्षा द्यावी इतकाच कायद्याचा हेतू असतो. कायद्याबद्दल आस्था ठेवून त्याचे पालन करणे ही नागरिकांची जबाबदारी असते... आणि सुजाण नागरिक ती समजून आचरण करतात. पण आप्ल्याकडच्या बिंडोक पाखरांना कोण सम्जाव्णार की त्या एका गुन्हेगाराला डोक्यावर घेउन नाच्तात....चायला पाखरे असे कर्तात मग पाख्रांच्या मागावरच्या मुलांन्ना झक मारत फर्स्ट डे ची टिकिटे काढावी लाग्तात हे वाचून, एखाद्या महत्वाच्या मुद्द्याचे थिल्लरीकरण करू नये ही सुद्धा सुजाण नागरिकांची जबाबदारी असते, हे आठवले. बाकी चालू द्या.

In reply to by टवाळ कार्टा

मुद्दा ज्या भाषेत मांडला आहे त्या प्रकारची भाषा कोणत्याही मुद्द्याला मारकच ठरेल. तीच त्या मुद्द्याचे थिल्लरीकरण करत आहे, हे ध्यानात आले नाही का ???!!! अवांतर : मुद्दा मांडताना वापरलेली भाषा मुद्दा मांडणार्‍याची त्या मुद्द्याबद्दलची आस्था दर्शविते.

रच्याकने लेखकाच्या मिपीय वयाच्या मानाने खुपच चांगले लेखन ! कुणाचा असावा बरं डुआयडी ?

गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे. गुन्हेगार,अतिरेकी व नक्षलवादी यांना एकाच रांगेत बसवणार्‍यांचं काय करावं ते मात्र कळत नाही.

कुणाला देहदंडाची शिक्षा होणे यात जल्लोष करण्यासारखे काहीही नाही. कायदेशीर प्राणहरण ही केवळ एक दुर्दैवी अपरिहार्यता असून त्यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना ही गोष्ट सर्वांनीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे. न्यायमूर्ती प्रमोद कोडे यांनी वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीही अनुचित आहेत. न्यायाधीश निकालपत्राच्या बाहेर कोणत्याही खटल्यावर भाष्य करत नसतो. त्याचबरोबर हेही म्हणावेसे वाटते, की डाव्या/ मुस्लिमधार्जिण्या विचारवंत टोळीने यावर केलेला हलकल्लोळ हा सामान्य नागरिकाला संताप आणणारा आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे जर समाज, सरकार, न्यायपालिका, पोलीस, प्रसारमाध्यमे या सर्वांत जर मुस्लिमद्वेष भरलेला असता, तर याकूबची फाशी नक्की व्हायला इतकी वर्षे लागली नसती. प्रत्यक्ष बॉंम्ब बनवण्याचा वा ठेवण्याचा गुन्हा सिद्ध होऊनही काही आरोपींना केवळ कारावासाची शिक्षा झाली नसती.

अतिरेक्यांना फाशी देण्याची वेळ आली की होणाऱ्या राजकारणाची भूतकाळातील अनेक उदाहरणे असूनसुद्धा महाराष्ट्र सरकारने किंवा सरकारमधील काही अतिउत्साही व्यक्तींनी फाशीची तारीख आणि वेळ देखील जाहीर करून टाकली.
वरील वाक्यातच महाराष्ट्र सरकारने असे का केले ह्याचे उत्तर आहे. आधीच्या फाशीच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत त्याचे महाराष्ट्र शासन पालन करीत आहे. उलट आपण केलेल्या बेजाबदार विधानामुळे गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. कृपया ते काढून टाकावे हि विनंती.

अबू आझमी किंवा अक्बारुद्दिन ओवैसी सारखी माणसे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करू शकतात. सलमान ची लायकी काय आहे हे सर्वाना माहित आहेच. स्वतः सदोष मनुष्यवधाच्या आरोपात दोषी म्हणून जाहीर झालेला असताना त्याने एखाद्या दहशतवाद्याची पाठराखण करावी हे नैसर्गिकच आहे. पण त्याच्या या बेताल वक्तव्याला अफाट प्रसिद्धी देणारे वार्ताहर आणि वृत्तपत्रे यांची लाज वाटते. एकीकडे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होत असताना सुजाण मुसलमान लोक मुग गिळून गप्प बसतात याबद्दल वाईट वाटते. अबू आझमी सर्केह चार उंदीर कुचकुचले तर फरक पडणार नाही पण जर बहुसंख्य निधर्मी लोक गप्प बसले तर अशा लोकांचा आवाज कारण नसताना मोठा आहे असे वाटु लागते. अशा दुर्दैवी परिस्थितिचा "श्रीराम सेने" सारखे लोक हि फायदा उठवू शकतात. नेपोलियनचे वचन आठवते. "दुर्जन लोकांच्या कोलाहाला पेक्षा सज्जन लोकांचे मौन जास्त घातक असते"

जाता जाता -- अबू आझमी किंवा सलमान खान वर न्यायालयाचा अवमान केल्याचा खटला भरता येऊ शकतो असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

असा खटला ओवेसीवरदेखील भरता येइल. सरकार किंवा पोलीस सुओमोटो पद्धतीने कारवाई करु शकते का? जाणकार प्रकाश टाकतील अशी आशा

In reply to by चिनार

सलमान .... याकूबला फाशी नको. शत्रुघ्न , झेटमलानी ... याकुबला फाशी नको. एकच वाक्य सर्वानी उच्चारले आहे , शत्रुघ्न सिन्हा व झेटमलानीवर हिंदुत्ववादी का तुटुन पडले नाहीत ?

In reply to by dadadarekar

याकूबला फाशी द्यावी की नाही याबद्दल तुमचे मत काय? ते आधी सांगा मग पुढचे बोलु. माझे मत फाशी झालीच पाहिजे. विनाविलंब.

In reply to by dadadarekar

एकच वाक्य सर्वानी उच्चारले आहे , शत्रुघ्न सिन्हा व झेटमलानीवर हिंदुत्ववादी का तुटुन पडले नाहीत ?
सलमानने टीवटीवाट केला आहे. आणि कुठल्याश्या पत्रावर शत्रुघ्न सिन्हा आणि जेठमलानी यांनी सह्या केल्या आहेत अशी बातमी आहे. ते पत्र बघायला आवडेल. शत्रुघ्न सिन्हा म्हणतात त्यांनी सही केली नाही. अर्थात अश्या आशयाचे कोणतेही पत्र पाठवले असेल तर ते निषेधार्ह आहे. कारवाई व्हायलाच हवी. हिंदुत्ववादी जर त्यांच्यावर तुटुन पडत नसतील तर तुमच्या राहुल बाबांना सांगा की संसद बंद पाडायला. तेव्हढाच कारण मिळेल त्यांना ..हो पण त्याआधी जरा विषय समजावून सांगाल त्यांना ..म्हणजे मुंबई कुठे आहे ? १९९३ ची घटना...याकुब,टायगर ,दाउद..वगैरे वगैरे

In reply to by dadadarekar

हितेस्भाऊ चष्मा काढा कि. जेठमलानी किंवा शत्रुघ्न सिंह यांनी फाशी देऊ नये असे म्हटले आहे. फाशीची शिक्षा मुळात असावी कि नसावी हा विषय वेगळा आहे. त्यांनी याकुब निर्दोष आहे असे म्हटले नाही. सलमानने याकुब निर्दोष आहे असे म्हटले होते. हे ठरवणारा हा बोकड कोण?त्याल कायद्याचे काय ज्ञान आहे? स्वतः गाडी घालून लोकांना मारल्याबद्दल दोषी ठरलेला आहे. किंवा ओवैसी म्हणतात कि तो मुसलमान आहे म्हणून त्याला फाशी दिले जात आहे. याला कोणता आधार आहे? उगाच निष्पक्ष असणार्या न्यायसंस्थेला आपल्या घाणेरड्या राजकारणात ओढणारा हरामखोर माणूस आहे. जातीय दंगे भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला टाडा लावायला पाहिजे. उगाच हिंदू आणी मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे.

गुन्हेगार आणि अतिरेकी यांना निष्कारण सहानुभूती देणाऱ्या किंवा देण्याचा प्रयत्न करण्याऱ्या या सर्व राजकारणी लोकांना आणि तथाकथिक उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे असे आपणास वाटते का?
तथाकथित उदारमतवाद्यांना समाजाने अंतर्मुख होण्यास भाग पाडण्याची वेळ येउन गेलीये आणि काळ सोकावलाय असे मत आहे. पण प्रश्नकर्ता अंतर्मुख होण्यास भाग पाडायचे म्हण्जे काय करायचे याबद्दल काहीच बोलत नाहीये, त्यामुळे हे मत इथे अयोग्य ठरू शकते.

In reply to by वॉल्टर व्हाईट

राजकारणी लोक आणि तथाकथिक उदारमतवादी हीसुद्धा माणसेच आहेत. समाजातून मिळणाऱ्या पाठीम्ब्यापेक्षा चुकीच्या गोष्टींना न होणारा विरोध हा मुद्दा आहे. समाजात, राजकारणात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीतून नफा किंवा फायदा कमावण्याची वृत्ती बळावली आहे. एक तर हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी असे करतात किंवा इतर कोणाच्या सांगण्यावरून फुटकळ आर्थिक मोबदल्यासाठी करतात. हा इंटरनेटचा जमाना आहे. न्यायालयेसुद्धा सक्रिय आहेत. या सगळ्याचा उपयोग करून या लोकांना जे ते करत आहेत ते करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. आपण सगळे मिपाच्या माध्यमातून याविषयी चर्चा करतोय हीसुद्धा चांगली सुरुवातच नव्हे का?

भारतातील ४० निधर्मांधांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून याकूब मेमनची फाशी रद्द करावी अशी विनंती केली आहे. या पत्रावर खालील मंडळींच्या सह्या आहेत. - शत्रुघ्न सिन्हा, महेश भट्ट, नसरूद्दीन शाह, सीताराम येचुरी, कराट दांपत्य, जॉन दयाल, तुषार गांधी, मणी शंकर अय्यर, राम जेठमलानी, डी. राजा, अनेक निवृत्त न्यायाधीश, इरफान हबीब, अरूणा रॉय, . . . इ. शत्रुघ्न सिन्हाने या पत्रावर आपली स्वाक्षरी नसल्याचे सांगितले आहे. या यादीत महेश भट्ट, नसरूद्दीन शाह, कम्युनिस्ट नेते, मण्या अय्यर इ. नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत. यांना पाकिस्तानविषयी वाटणारा कळवळा आणि अतिरेक्यांविषयी वाटणारे प्रेम जगजाहीर आहे. या यादीत अरूंधती रॉय व डॉगविजयचे नाव कसे नाही याविषयी आश्चर्य वाटत आहे. तर दुसरीकडे "सर्वोच्च न्यायालयाने बनावट पुरावे आणि पोलिसांनी छळ करून मिळविलेला कबुलीजबाब यावर विसंबून याकूबला शिक्षा दिली" असे तारे आचरट शिरोमणी काटजू यांनी उधळले आहेत. एकंदरीत याकूबच्या फाशीमुळे निधर्मांधांना सुगीचे दिवस आले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

>>> भारतातील ४० निधर्मांधांनी हा आकडा चुकला आहे. प्रत्यक्षात २००+ निधर्मांधांनी सह्या केल्या आहेत.

कोण सलमान खान आणि कोण हे तथाकथित निर्धर्मांध? A wednesday चित्रपट बघून नासिर आवडला होता. फाशी देऊ नये म्हणून सह्या काय करतात हे येड*वे

कोंग्रेज ने दहशतवादाची समझोता नाही अशी आता भूमिका घेतली आहे चेपू वर त्यांच्या पोस्ट ला मी चक्क लाईकले . राजीव च्या मारेकऱ्यांना माफी देण्याचा अर्ज देतांना कुठे गेली होती अक्कल असे प्रश्न नाही विचारायचे मात्र रॉ च्या माजी प्रमुख कै रमण ह्यांनी याकुब ला भारतात आणले होते त्याच्या फाशीच्या निर्णयाच्या विरुद्ध याचिका दाखल केली होती ह्या बदल्यात याकुब ने बरीच माहिती दिली होती, असे कळते याकुब चे चुकले कुठे की भारतात येण्याआधी त्याने भारतीय सरकार कडून लिखित स्वरुपात आपल्याला फाशी देणार नाही असे लिहून घ्यायचे होते किंवा तसा गोपनीय करार करायचा होता. अबू सालेम ला युरोपियन देशातून हस्तांतर केले तेव्हा त्यांच्या कायद्यानुसार भारताला सालेम ला फाशी देणार नाही असे लिखित स्वरुपात द्यावे लागले. दाउद ने जेठमलानी तर्फे अटी घातल्या होत्या माझ्या मते अजित दोवेल ह्यांनी आधी छोटा राजन च्या मदतीने दाउद चा काटा काढण्याचा प्रयत्न केला होता आता तर त्यांच्या हातात ताकद आहे तेव्हा दाउद ला संपवणे हा मोदी सरकार चा अजेंडा होताच तेव्हा छोटा राजन अधिक प्रमाणात सक्रिय करण्यात आला असावा माझ्या वाचण्यात छोटा राजन व्हिएतनाम मध्ये चीन च्या विरोधात स्थानिक माफियांच्या सोबत कारवाया करत आहे तेव्हा त्याला संपविण्यासाठी कांगारूच्या देशात डी कंपनीने नुकताच प्रयत्न केला. त्याला उत्तर म्हणून याकुब ला फासावर चढवण्याचा निर्णय घेतला गेला , फाशीची शिक्षा मिळालेले अनेक जण प्रतिक्षायादीत आहेत . आहेत ,कोणाला कधी फाशी द्यायची ह्यांचे सरकारचे स्वतःचे निकष असतात. अफजल ते कसाब ह्यांना फासावर देतांना सुद्धा मतांचे राजकारण होते ह्या सगळ्यावर एकच उपाय म्हणजे आपल्या घटनेत बदल दहशतवादी कार्याबाबत फाशी झालेल्या व्यक्तीस सर्वोच्च न्यायालयाने फाशी वर शिक्कामोर्तब केले की महिन्याचा आता फाशी द्यावे त्यांना दयेचा अर्ज वगैरे सुविधा असू नये

मात्र रॉ च्या माजी प्रमुख कै रमण ह्यांनी याकुब ला भारतात आणले होते त्याच्या फाशीच्या निर्णयाच्या विरुद्ध याचिका दाखल केली होती ह्या बदल्यात याकुब ने बरीच माहिती दिली होती, असे कळते
खरे आहे.
Mr Raman's argument was that while for Indians the country is bigger than anything else, a country can command respect only by honouring its commitments.
रॉ व आय.बी.ने(आय.एस.आय व ईतर पाकिस्तानी यंत्रणांशी) वाटाघाटी करूनच याकुबला भारतात आणले असावे.अन्यथा टायगर मेमेन व ईतर दुबई/पाकमध्ये राहिले तसाच तो ही राहिला असता. काठमांडूला याकुब कोणत्यातरी समारंभासाठी आला होता व नंतर दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसला...व नंतर त्याला अटक झाली.. अशी बातमी होती तेव्हा. http://www.rediff.com/news/column/exclusive-b-ramans-unpublished-2007-a…

तरी म्हनल ह्या विषयावर अजून कसा धागा आला नाही म्हणून स्थानिक विध्यार्थ्यांनी ती संपूर्ण लायब्ररी जाळून टाकली>>> ह्यात नवीन काय आहे ? त्या लोकांची वृत्तीच आहे ती स्वतःला काही उदात्त निर्माण करता येत नाही म्हणून दुसर्यांविषयी इर्षा वाटून त्यांच्या अश्या उदात्त वास्तू , पुस्तके , उपकरणं नष्ट करायची . नालंदा, तक्षशीला विद्यापीठ , सुंदर सुंदर मंदिरं , अश्याच अनेक वास्तू त्यात समाविष्ट आहेत . फाशी गुपचूप द्यावी ह्यावर आक्षेप घेण्याचं कारण काय ? संबंधित गुन्हेगाराला सर्व लीगल रिकोर्स मिळाले पाहिजेत आणि नातेवाईकांना भेटता आले पाहिजे वगरे.>> हे गुन्हेगार बॉम्ब स्फोट करतात तेव्हा तेव्हा हीच प्रोसिजर follow करतात का ?मग त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी पाळायची काही गरज नाही . आणि त्या कागदावर सह्या करणार्यांना म्हणावं ठीक आहे याकुब ची फाशी रद्द केली जाईल. जे लोक मेलेत त्यांना जिवंत करून द्या. ह्याच्या घरातलं कोणी मेलं नसेल म्हणून हि थेरं सुच्तायेत या यादीत महेश भट्ट, नसरूद्दीन शाह, कम्युनिस्ट नेते, मण्या अय्यर इ. नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत. >> आयुष्यभर चंदेरी आभासी दुनियेत राहायचं . ह्यांची कला म्हणजे काय तर खोटी खोटी डायलॉगबाजी कारण , ढुंगण हलवत नाचणं , खोटं खोटं हसणं आणि खोटं खोटं रडणं . त्यांची अक्कल ती काय ? कलाकार आहेत म्हणजे सगळ्या क्षेत्रातले तज्ञ झाले का हे ?

माझे तर मत आहे मोदी आनंदाने करमणूक बघत असतील आता. या फालतु लोकांचे देशद्रोही चेहरे समोर यायला लागलेत. मोदींना कधी बोलावे आणि कधी शांत बसावे बरोबर कळते. ते बोलतात तेव्हा सुद्धा असल्या लोकांची ठासली जाते (आणि मग प्रेस्टिट्युट्स मोदींनी कसा संयम बाळगला पाहिजे वगैरे केकाटतात) आणि ते शांत बसतात तेव्हा ही थर्डक्लास लोकच स्वतः किती रद्दी आहेत हे लोकांना दाखवुन देतात. अजुन घोष बाई नाही रेकल्या?

In reply to by मृत्युन्जय

व्यापमं च्या निमित्ताने जे चालले आहे, हे देखिल त्यांच्या करमणूकीचे साधन आहे काय ? (अवांतर होत आहे, पण राहवल नाही हा भाबडा प्रतिसाद बघुन.)

In reply to by चैदजा

खरे सांगायचे तर हो. उगाच का हे प्रकरण एवढ्या चव्हाट्यावर आलय? शिवराज चौहान एकेकाळी मोदींचे प्रतिस्पर्धी होते हे विसरलात?

In reply to by मृत्युन्जय

एवढ्या खालच्या पातळीवर 'पक्षान्तर्गत' राजकारण गेलं नसावं. मध्यप्रदेशात भाजपाचं नुकसान म्हणजे मोक्याच्या 30 जागा तरी नुकसान. मोदी नाहीत करायचे असं असा अंदाज. बाकी विरोधी नेत्यांना धोबीपछाड़ देण्यात मोदींचा हातखंडा आहे. मुलासकट उखडून टाकतात (ळ नव्हे ल च)

आजच पंजाबात दहशतवादी हल्ला झाला आहे आणि इथे आपण एका दहशतवाद्याला दया दाखवावी का म्हणून चर्चा करत आहोत. डिजगस्टींग. सोडा अजून दहशतवाद्यांना. बोलवा दहशतवाद्यांना हल्ले करायला. आजच्या हल्ल्यातील एक दहशतवादी स्त्री आहे म्हणे. समजा ती मेली नाही आणि पकडली तर परत आपले मानवाधिकार वाले स्त्री ला फाशी कशी देणार म्हणून आकांडतांडव करणार. कसाबही अंडरएज आहे म्हणून त्याला सोडा असे त्याला दिलेला महामूर्ख वकिल बरळला होता.म्हणजे काय-- तर त्यांनी अंडरएज मुले पाठवावीत, स्त्रिया पाठवाव्यात, इथल्या लोकांना मारावे आणि तरीही आपला कायदा काहीही करणार नाही. या असल्या मानवाधिकार वाल्यांना आपणच पोसतो. जिथे दिसतील तिथे आपण त्यांना थोबडावत नाही, त्यांच्या अंगावर थुंकत नाही. मग काय होत राहणार दहशतवादी हल्ले. त्याविषयीही तक्रार का करा? साला आपली लायकीच ती.

ते सर्व लाईव्ह बघणे खूप क्लेशकारक आहे. खरे तर आपणातच आस्तिन के साप दडलेत. जितका म्हणून राक्षसी आरोपी दहशतवादी असेल त्याचा यांना जास्त पुळका.