आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे. साधी राहणी व उच्च विचार यामुळे खरेच हा गांधींचा एकमेव पाईक आहे असे आम्हाला वाटे. गांधीवादी विचार मांडणारे, लिहिणारे खूप बोलबच्चन बघितले होते पण त्यांच्या प्रत्यक्ष कृतीत व दैनंदिन जीवनात ते यापासून कोसो दूर होते. त्याकाळात लोकमतमध्ये कधीकधी गांधीवादावर गप्पा ठोकून देणारे माझ्या परिचयातले एक पत्रकारही त्यातलेच. येता जाता स्वतःच्या पोराला धोपटणारे हे महाशय त्यावेळी गांधींची अहिंसावादी तत्वे बासनात गुंडाळून टाकीत. अशा लोकांबद्दल बोलताना आमचा जीवन जोशी म्हणे की अशा लोकांनी गांधीवादाला/वाद्यांना बदनाम केले आहे.
एक दिवस त्याची सुद्धा परिक्षा घेऊन आला.
आम्ही वर्गमित्र ग्रंथालयासमोरच्या कट्टयावर गप्पा मारत होतो. कशावरुन तरी विषय गांधीवादावर/अहिंसेवर येवून ठेपला. चाणक्यनिती, शिवरायांच्या मुत्सद्दीपणाची उदाहरणे, सावरकरांचे विचार या नेहमीच्या विषयांवर कीस पाडत त्यावेळच्या ज्वलंत बाबरी प्रकरणापर्यंत गाडी आली. हजार वर्षे गुलामीत राहिलेल्या हिंदूंना एकत्र आणून एक तरी प्रतिकात्मक मंदिर उभे केल्याने हिंदूंचा एकंदर आत्मविश्वास वाढेल, त्याला हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटणार नाही वगैरे आमचे मुद्दे. पण त्याच्या मते जर राम मंदिराचा विषय येवढा महत्वाचा असता तर नेमाने रामायण पठण व उपदेश करणार्या गांधीजींनीच नसता का ऐरणीवर घेतला?
प्रश्नोत्तरांची सरबत्ती दोन्ही बाजूंनी चालू होती. बघ्यांची गर्दीही वाढली होती. तसा आम्हा दोघांचा अवाजही वैयक्तीक गप्पांच्या थरातून व्यासपिठी उंचीवर पोचला होता. मी ठोश्यास ठोसा या मुद्द्यावर ठाम होतो तर हा एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करण्याच्या तत्वावर. एक उदाहरण म्हणून मी काल तात्यांनी विचारलेले प्रश्न त्याला विचारले. त्याचे म्हणनेही असेच की "कोणाच्या अश्लील बोलण्याने बहिनीचा अपमान होत नाही", "त्याला मारण्या येवढी ताकत कमवावी म्हणजे तो त्या भितीने असला गुन्हाच करणार नाही", "त्याचे मतपरिवर्तन करायला हवे" वगैरे. त्या उत्तरांनी मी ही जरा रागात आल्याचा आव आणला व म्हटले, "भडव्या, स्वतःच्या बहिनीला अपमानित करणार्याला तिथल्या तिथे न चोपणारे षंढ असतात अहिंसक नव्हे" व असे जोराने ओरडत जाऊन शक्य तेवढ्या त्वेशाने त्याच्या श्रीमुखात भडकवली.
एक क्षणभर सगळेच शांत झाले. दोन संयंमी मित्रांच्या मध्ये हे काय झाले हे कोणाला समजायच्या आत... एका क्षणात तोही तेवढ्याच त्वेशाने पुढे आला व त्यानेही माझ्या गालात अशी काही थप्पड लावली की पार डोक्यातून मुंग्या आल्या. बस्स.
मी शांत झालो. म्हणालो "जोश्या, अहिंसा फक्त पुस्तकात असते. जिवनात शक्य नसते... अगदी तुम्हा गांधी वाद्यांच्या सुद्धा... हे सिद्ध करुन दिल्याबद्दल आभार! अन त्यासाठी तुझ्यावर हात उगारावा लागल्याबद्दल माफ कर मित्रा."
मात्र त्यानंतर त्याच्या डोळ्यात आलेले पराभवाचे अश्रू पाहून मनाला चुटपुट लागून राहिली. सुदैवाने आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. पुढे मुंबईत आम्ही खोलीमित्र म्हणून राहिलो व कालांतराने कंपनीत सहकारी म्हणून सुद्धा. नंतर लग्न, संसार यानंतर आमच्या गाठीभेटी कमी झाल्या पण आजही आमची मैत्री मात्र कायम आहे.
पण हो, त्यानंतर आमच्या जोश्याने गांधीवादावर बोललेले कोणी पाहिले नाही बरं. :)
वाचने
7047
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
"भडव्या,
भ्याड
In reply to "भडव्या, by विसोबा खेचर
तरीही..
In reply to भ्याड by भास्कर केन्डे
न
In reply to तरीही.. by प्राजु
"न" राहिला
In reply to न by भास्कर केन्डे
कोकणी
In reply to "न" राहिला by विसोबा खेचर
फ्रॉइडीयन स्लीप
In reply to "भडव्या, by विसोबा खेचर
हेच म्हणणार होतो.
बाकी काय
होती पण
In reply to बाकी काय by विसोबा खेचर
हे राम !!
हाहाहा
In reply to हे राम !! by टारझन
:))
In reply to हे राम !! by टारझन
:))
गांधी'वाद' नव्हे अहिसा आणि सत्य यांचा आग्रह
विपर्यास
In reply to गांधी'वाद' नव्हे अहिसा आणि सत्य यांचा आग्रह by आनंद घारे
मी समाचार
In reply to विपर्यास by भास्कर केन्डे
गाढवाची गोष्ट
In reply to मी समाचार by कोलबेर
+१ भास्करराव
In reply to गाढवाची गोष्ट by भास्कर केन्डे
दोनदा आला
In reply to विपर्यास by भास्कर केन्डे
खुलासा
In reply to विपर्यास by भास्कर केन्डे
एका गालावर
In reply to गांधी'वाद' नव्हे अहिसा आणि सत्य यांचा आग्रह by आनंद घारे
आदर
गा॑धीवाद
एका गालावर
देवाचा पुत्र
In reply to एका गालावर by विजुभाऊ
चांगलं आहे