Skip to main content

फ्रीलान्सिंग आणि भारतातील कर

लेखक आनन्दा
गुरुवार, 23/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
या धाग्यावरून स्फूर्ती घेऊन माझा पण एक प्रश्न डकवत आहे मी सध्या काही काळ भारतातून भारतबाहेरील कंपन्यांसाठी फ्रीलान्स डेव्हलपर म्हणून काम करतो.. कामाचा मोबदला अर्थात डॉलरमध्ये मिळतो, पण कोणतीही चांगली सोय नसल्यामुळे सध्या पायोनीअर या सर्व्हिसच्या माध्यमातून पैसे घेतो. आता प्रश्न असा आहे की या उत्पन्नाला कोणते कोणते कर लागू होतील? याबद्दल जालावर पाहिले असता वेगवेगळी मते दिसतात. काही जण म्हणतात की ही एक्स्पोर्ट ऑफ सर्व्हिस आहे, काही म्हणतात ही नाही म्हणून. त्यामुळे संभ्रमित झालो आहे. याबद्दल कोणाला काही माहिती आहे का?

वाचने 7469
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

मी सध्या काही काळ भारतातून भारतातील कंपन्यांसाठी फ्रीलान्स डेव्हलपर म्हणून काम करतो
कृपया भारतातून भारताबाहेरील असे वाचावे.

आपण कंपनी स्थापन केली असेल तर CA सोबत बोलुन घ्या फार क्लिश्ट प्रकरण नाही. पण इंडिडेव असाल तर बँकेत (अथवा ऑनलाइन खात्यावर जसे पेपल वगैरे वगैरे) जी रक्कम जमा होइल त्यावर रिट्रन फाइल करुन चिंतामुक्त व्हा. माझ्या अंदाजा नुसार आपण ४०,०००० ते ७०,००० च्या दरम्यान वर्षाला मिळवता. रक्क्म ५ लाखाच्या वर गेली तर रिटर्न फाइल करायला अजिबात चुकु नका. चुकलात अन काही लचांड मागे लागलेच तर CA गाठा, फार त्रास अजिबात नाही. अंदरकी बात बोले तो... ४-५ लाख इनकम होउन एखादे वर्षी रिटर्न राहुन गेलं तरी फार फरक पडत नाही अ‍ॅज लाँग अ‍ॅज तो इनकम डॉलमधुन तुमच्याकडे आला आहे, सरकारला तुम्हे डॉलर भारतात आणल्याबद्दल कवतुक आहे असंच समजा अन पुन्हा ही चुक करु नका :) आणी हो... - मेक प्रॉफीट

In reply to by द-बाहुबली

माझा प्रमुख प्रश्न सर्व्हिस टॅक्स बद्दल आहे. सर्व्हिस टॅक्सचे नियम समजायला अत्यंत क्लिष्ट आहेत. (तसे सगळेच सरकारी नियम असतात म्हणा). पण माझा टर्न ओव्हर बघता मी सर्व्हिसटॅक्सच्या स्लॅबमध्ये येतो, आणि त्यामुळे मला जर "एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस" चा फायदा घ्यायचा असेल तर नेमके काय करावे लागेल असा प्रश्न माझ्यासमोर आहे.

In reply to by आनन्दा

पायोनीअरसारख्या सर्व्हिसेस तुमच्या अकाउंटला "रुपये" जमा करतात, आणि सर्व्हिस टॅक्स अ‍ॅक्ट सांगतो की तुम्हाला पैसे कन्व्हर्टिबल फॉरिन एक्स्चेंज मध्ये मिळाले पाहिजेत. याचा मेळ कसा घालायचा ते कळत नाहिये.

In reply to by आनन्दा

मित्रा, जास्त डोकं चालवू नकोस... सीए गाठ. संपूर्ण माहितीशिवाय इथे चर्चा करून उपयोग होणार नाही. आणि पेपाल आवडलं नाहीका?

In reply to by आनन्दा

जाणकारांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत. आमचं दाजीच सिए असल्याने एकुणच या प्रकरणात मी कधी लक्ष घातले नाही. पण उत्तर द्यायचा यत्न केला कारण मी सुध्दा आपल्या प्रमाणे फ्रीलांस डेवलपमेंटची कामे घेतो. जर आपण सर्व्हिसटॅक्सच्या स्लॅबमध्ये येताय असे म्हणत आहात तर आपला टर्न-ओवर सॉलीड असावा/ सॉलीडपेक्षा कमी असल्यासही इछ्चा असेल तर सुट टाळुन टेक्स भरता येतोच पण एकुणच या स्थितीमधे मी आपले शंकासमाधानास तुटपुंजा आहे. खर्‍या जाणकारांच्या उत्तरांच्या प्रतिक्षेत :) सकृतदर्शनी आपण सर्वीस प्रोवायडर मला वाटत नाही.. असो.

मला याबद्दल थोडी अधिक माहिती द्याल का ? मिही फ्री लान्सींग करू इच्छितो . तुम्ही नेमक्या कुठल्या साइट वरून प्रोजेक्ट घेता ? सुरक्षितता कशी ठेवायची वगैरे वगैरे. (इथे योग्य वाटत नसेल तर व्यनि पण करू शकता )

In reply to by पाटीलअमित

मी लौकरच माझ्या ब्लोग वर ह्याबद्दल सविस्तर लिहीन
याचा अर्थ "अधिक माहितीसाठे इच्छुकांनी व्यनि करा (अथवा माझ्या रिकाम्या ब्लॉगला भेट द्या)". ;)

In reply to by पाटीलअमित

मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे http://www.misalpav.com/node/32056 मी काहीही लिहील तर उत्तम लिहील त्यामुळे मला त्याची चिंता नाही.

In reply to by अस्वस्थामा

:)) अगदी व्यनिहित काकांच्या पावलावर पाऊल आहे! @आनन्दा: कृ० चार्टर्ड अकाउंटंटशी संपर्क साधावा. सीएकडे "हा-प्रश्न-त्याचं-उत्तर-दे-भौ" अशा प्रकारे न जाता संपूर्ण माहिती+कागदपत्रे द्यायची तयारी असावी. आयकर, सेवाकर यापुरताच सल्ला मर्यादित न राहता तुमच्या व्यवसायाला योग्य असं कायदेशीर स्वरूप, अकाउंटिंग, आर्थिक शिस्त, अशा अनेक अंगांनी सल्ला मिळेल.

In reply to by उगा काहितरीच

तुम्ही नेमक्या कुठल्या साइट वरून प्रोजेक्ट घेता ?
या इथे अधिक माहितीसाठी पहा..

आपला एप्रिल ते मार्च मधे रु दहा लाख उत्पन्न मिळाले तर सर्विस टॅक्स लागू होतो. विवाहित असाल तर काही उत्पन्न बायकोच्या नावावर घेऊ शकता.

अगदी अचूक पण लगेच उत्तरासाठी "Taxguru" कार्यक्रम शनिवारी सकाळी ७.३० ते ८.०० CNBC AWAAJ चंनेलवर असतो नंतर दोनतीनदा रिपीटही होतो.हिंदीत लखोटिया पटापट उत्तरे देतात .अगोदर इमेल करून प्रश्न विचारा अथवा थेट फोनवरूनही कार्यक्रमात विचारा. Email: tax@moneycontrol.com SMS :TG सवाल, नाम send to 51818 पत्ता: टॅक्स गुरु । CNBC आवाज एक्सप्रेस ट्रेड टॅावर । प्लॅाट नं 15-16 सेक्टर -16 ए । नोएडा- 201301