✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"ती" - २

ख
खटपट्या यांनी
Tue, 07/21/2015 - 10:37  ·  लेख
लेख
"ती" - १ पत्रिका आलीय हे कळल्यावर नैराश्याचा झटका वगैरे येतोय की काय असे वाटले. एका खोलीतून दुसर्या खोलीत जायचे देखील त्राण उरले नाही. जेवणावरची तर इच्छाच उडाली. असे कसे अचानक लग्न ठरलं. विचार करुन करुन डोकं फुटायची पाळी आली. असेही मी कोण होतो जे तीच्या घरचे लोक माझी परवानगी घेणार होते कींवा मला कळवणार होते. मी होतोच कोण. एक तथाकथीत सुशीक्षित बेरोजगार. काम ना धंदा. आणि असला तरी ते मला का विचारतील. मी तर गेली कित्येक वर्षे त्यांच्या कुटूंबीयांना भेटलो नव्हतो. येणे जाणे नाही, फोन नाही. मी उगाच आपला आभासी विश्वात जगत होतो. सर्व बाजूंनी विचार केल्यावर डोकं थोडं शांत झालं. तरीही चेहर्याची रया गेली ती गेलीच. नेहमीप्रमाणे आईने ओळखलेच. आणि विचारले.. "काय रे?" असा का शांत शांत?" "कुठे काय?" "मग रात्री जेवलाही नाहीस बरोबर. बाहेर काय भांडण वगैरे झालेय का?" "नाही" "ती लग्न पत्रिका आलीय, ती तरी बघ, कधी आहे लग्न, कुठे आहे, जावे लागेल" "तूच बघ" "अरे असं काय करतोस! माझ्या सख्ख्या चुलतभावाच्या पहील्या मुलीचे लग्न आहे. जावं तर लागणारंच" "पहीली मुलगी?" "अरे दोन मुली नाहीत का त्याला? पहील्या मुलीचे आहे आता लग्न" "ओssssssssssssssssssssssह !!" "काय रे काय झाले?" "अरे हो त्या मामाला दोन मुली आहेत ना, त्यातल्या पहील्या मुलीचे लग्न आहे होय?" ("ती" दुसरी होती) "हो मग, त्यात एवढं मोठ्यानं ओरडायला काय झालं?" "काही नाही, असंच" (जीव भांड्यात पडला) "कधी आहे लग्न?" "आहे पुढच्या महीन्यात" "तू जाणार आहेस का?" "हो जावे तर लागणारंच, पण लग्न गावाला आहे. का रे?" "नाही सहजच विचारलं?" "तू येतोयस का बरोबर?" "ते सर्व गावीच असतात का?" "ते म्हणजे कोण?" "म्हणजे मामा, त्यांची मुले?" "हो मोठा मुलगा आहे तो इकडे मुंबईत असतो आणि दोन मुली गावीच असतात. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न आहे, मोठ्या मुलाचा इकडे बीजनेस आहे" "ओह, असं आहे तर" "तू येणार की नाही ते नाही सांगीतलेस" "अगं माझे एक दोन ठीकाणी जॉबचे प्रयत्न चालू आहेत" "ठीक आहे, काय ठरतंय ते सांग, मला एकटीला जाणं कठीणंच दीसतंय, बरोबर आला असतास तर बरं झालं असतं" मनातील फुलपाखरू पुन्हा उडायला लागले, मनात ईमले बांधणे सुरु झाले. बरेच दीवसांनी तीला प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळणार होती. पण मी एवढा का उतावीळ होत होतो तीला बघण्यासाठी? गेली कित्येक वर्षे मी तीला पाहीलेही नव्हते. मनात एक चित्र होतं. प्रत्यक्षात ती मनातल्या चित्राप्रमाणे असेल का? तीचा स्वभाव तसाच असेल की आता वयपरत्वे बदलला असेल? तीला अजुन लहानपणीच्या गोष्टी आठवत असतील का? हजार प्रश्न.. सुदैवाने एका कंपनीमधुन कॉल आला की तुम्हाला दोन तीन दीवसात हजर व्हायचे आहे. पगारही फ्रेशरच्या मानाने बरा होता. पायगुण समजावा का? पायगुण? कोणाचा? अजुन कशात नाही काय... कामावर रुजु झालो, काम आवडीचे होते. आईची भूण भूण सुरुच होती. येतोयस का? मनात तर जायचे होते. पण नवीन नोकरी, कसे जमणार? एकदा बॉस एकटा असताना भीत भीत विचारले की “कामावर रुजु व्ह्यायच्या आधी मी एक १५ दीवसाची फॅमीली ट्रीप आखली होती. एक तर ती ट्रीप कॅन्सल करावी लागणार कींवा मला जाता येणार नाही. कारण कामावर रुजू होउन फक्त २०/२२ दीवस झाले आहेत. सुट्टी मागणं बरोबर वाटत नाही.” बॉस बोलला की “बिंधास्त जा, नंतर बघू.” मला हा आश्चर्याचा धक्का होता. फुलपाखरू अजुन भरार्या मारायला लागले. छातीतील धडधड वाढायला लागली. काय करणार होतो मी गावी जाउन? फक्त तीला बघण्यासाठी चाललोय? काय करायचे नुसते बघून? परत चिडवाचिडवी सुरु होईल का? झाली तर तिला सहन होईल का? का तिने तिचा तो आधीच शोधून ठेवला असेल? माझ्या सारख्या सामान्य व्यक्तिमत्वाच्या मुलाला ती भाव तरी देईल का? मुंबई ते गाव अशी बस करण्यात आली होती ज्यांना जायचे त्यांनी त्यांची नावे तिच्या भावाकडे दयायची होती. परत आईची भूणभूण सुरु, "अरे काय ठरवलं आहेस? जायचं की नाही लग्नाला? त्यांना नावं द्यायची आहेत!" "हा बहुतेक येईन मी." "आता तू आला नाहीस तरी चालेल, कारण बरेच लोक आहेत माझ्याबरोबर?" "मग नको येऊ का मी?" "अरे तुझ्यावर आहे" "ठीक आहे, दे माझे नाव." "तूच दे ना" "ठीक आहे, सांगतो फोन करून" नंबर मिळवून फोन लावला "हेलो, विजय आहे का?"(विजय तीचा भाऊ) "नाही, विजय बाहेर गेलाय. आपण कोण?" "मी संदीप, आपण कोण?" "मी नेहा, विजयची धाकटी बहीण" (छातीतली धडधड प्रामाणाबाहेर वाढली.) "काही निरोप द्यायचाय का?" "हो मला आणि आईला गावी लग्नाला यायचे आहे, म्हणून नावे द्यायची होती" "अच्छा, संदीप म्हणजे कोण? आपलं पूर्ण नाव काय?" "अगं मी मालती आत्याचा मुलगा संदीप! ओळखलेस?" "अरे हाssss" (नशीब आठवणीत आहे). ओके तुम्ही येताय दोघे? ठीक आहे. सांगते मी दादाला." "ओके, बाकी तू कशी आहेस?" "मी मजेत आहे, सॉरी हा मी आवाज ओळखला नाही, बरेच वर्षांनी बोलतोय ना आपण!" "हो, पण तू मुंबईत कधी आलीस? "अरे मी गेली पाच वर्षे इकडेच आहे, एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळालेय मला" "ओह, मला माहितीच नाही." (माहिती असती तरी असे काय करणार होतो म्हणा. हिंमत होती कुठे जाउन भेटायची आणि बोलायची) "अच्छा, मी सांगते दादाला, ओके?" जो फोन कधी संपूच नये असे वाटत होते तो ती संपवायला बघत होती. किंवा ती कामात असणार. "ठीक आहे" :( "ठीक आहे मग ठेऊ?" "हो ठीक आहे ठेव" लगेच फोन ठेवायची घाई का केली तीने? का मला असे वाटले? लग्न घरातील बाकीची कामे असतील तिला. का मुद्दामून तुटक वागली? खरंच तुटक वागली का मला असं वाटतंय? नऊ दहा वर्षानंतर भेटणाऱ्या अनोळखी मुलाबरोबर जेवढे बोलायला पाहिजे तेवढे बोलली की ती. पण मी अनोळखी थोडाच आहे? गेली नऊ दहा वर्षे न बोललेला मुलगा अनोळखीच. असो. कुठे रहाते ते विचारलेच नाही. दुसऱ्या दिवशी आई म्हणाली, "अरे नेहाचा फोन आला होता, बस कुठे थांबणार आहे, किती वाजता यायचे आहे याबद्दल माहिती देण्यासाठी फोन होता. तू कुठे आहेस म्हणून विचारात होती." (हायला माझ्याबद्दल का विचारले असेल) "माझ्या बद्दल विचारले?" "हो, तू ओळखतोस तिला?" "छे, कुठे नाही गं, त्यादिवशी फोनवर बोलणे झाले तेवढेच तेही ९/१० वर्षांनी" "फोन करून बघ" परत धडधड सुरु "ती" - ३

Book traversal links for "ती" - २

  • ‹ "ती"
  • Up
  • "ती" - ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10553 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

दिल गार्डन गार्डन हो गया ;)

टवाळ कार्टा
Tue, 07/21/2015 - 10:45 नवीन
दिल गार्डन गार्डन हो गया ;)
  • Log in or register to post comments

:)

खटपट्या
Tue, 07/21/2015 - 11:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ही

नाखु
Tue, 07/21/2015 - 12:38 नवीन
खटपट भारी है!!!
  • Log in or register to post comments

हिंदोळ्याचे हेलकावे! :-)

एस
Tue, 07/21/2015 - 13:29 नवीन
हिंदोळ्याचे हेलकावे! :-) मस्त चालू आहे. आमच्याही हृदयाची धडधड वाढली बघा. पुभाप्र!
  • Log in or register to post comments

मी व्यनी केलाय तो पाहिला का?

टवाळ कार्टा
Tue, 07/21/2015 - 13:33 नवीन
मी व्यनी केलाय तो पाहिला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

फारच मस्तं झालाय हा भाग पण.

पद्मावति
Tue, 07/21/2015 - 13:39 नवीन
फारच मस्तं झालाय हा भाग पण. पुढच्या भागात काय होणार याची भयंकर उत्सुकता लागली आहे.
  • Log in or register to post comments

लवकर टाका हो पुढचा भाग आणि हो

क्रेझी
Tue, 07/21/2015 - 14:13 नवीन
लवकर टाका हो पुढचा भाग आणि हो थोडा मोठा पण..फार पटकन वाचून होतो पण मस्त वाटतंय वाचतांना :)
  • Log in or register to post comments

टाकतो, काल तीसरा भाग जवळ जवळ

खटपट्या
Wed, 07/22/2015 - 13:11 नवीन
टाकतो, काल तीसरा भाग जवळ जवळ पूर्ण करत आणला होता. पण मिपा कोलमडलं होतं. आता तो टाईप केलेला भाग घरी राहीला आहे. स्वतःला व्यनी करायची आयडीया आमलात आणली पाहीजे. सर्व प्रतिसादकांचे आभार्स..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेझी

आत्ता बरं वाटलं. खाली क्रमःश

संजय पाटिल
Wed, 07/22/2015 - 16:28 नवीन
आत्ता बरं वाटलं. खाली क्रमःश न्हवते त्यामुळे म्हंटले असे कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

वाचतेय.

रातराणी
Tue, 07/21/2015 - 23:15 नवीन
वाचतेय.
  • Log in or register to post comments

अहाहा!

पैसा
Wed, 07/22/2015 - 12:44 नवीन
मस्त सुरू आहे!
  • Log in or register to post comments

आहाहा!

मास्टरमाईन्ड
Wed, 07/22/2015 - 13:09 नवीन
परत धडधड सुरु
खरंच दिल गार्डन गार्डन हो गया (ट.का. यांच्या प्रतिसादामधून साभार कॉपी)
  • Log in or register to post comments

good one

एक एकटा एकटाच
Wed, 07/22/2015 - 18:18 नवीन
छान चाललीय येउ दया भराभरा
  • Log in or register to post comments

वाचतोय...

उगा काहितरीच
Wed, 07/22/2015 - 18:28 नवीन
वाचतोय...
  • Log in or register to post comments

पुभालटा,गार्डन वगैरे वगैरे!!

अजया
Wed, 07/22/2015 - 18:38 नवीन
पुभालटा,गार्डन वगैरे वगैरे!!
  • Log in or register to post comments

मस्त, मस्त. उगाच ट्रॅजेडी द

यशोधरा
Wed, 07/22/2015 - 19:32 नवीन
मस्त, मस्त. उगाच ट्रॅजेडी द एंड वगैरे करायचा नै हां. पैलेच सांगून ठेवत आहे.
  • Log in or register to post comments

छान झालाय हा भागही

स्वाती२
Wed, 07/22/2015 - 20:04 नवीन
छान झालाय हा भागही
  • Log in or register to post comments

खूप मस्त

सविता००१
Wed, 07/22/2015 - 20:11 नवीन
छानच झालाय हा भाग. मस्त वाटतंय वाचताना
  • Log in or register to post comments

छान चालु आहे!

जुइ
Wed, 07/22/2015 - 22:56 नवीन
मजा येत आहे वाचताना.
  • Log in or register to post comments

गार्डन वगैरे मागेच झालं आता

प्यारे१
Wed, 07/22/2015 - 22:58 नवीन
गार्डन वगैरे मागेच झालं आता पुढचा भाग कधी?
  • Log in or register to post comments

मस्त चालूय .. साथिया,

तुमचा अभिषेक
Wed, 07/22/2015 - 23:32 नवीन
मस्त चालूय .. साथिया, हमापकेकौन वगैरे आठवू लागलेत
  • Log in or register to post comments

उत्कंठावर्धक

श्रीरंग_जोशी
Wed, 07/22/2015 - 23:33 नवीन
उत्कंठावर्धक झालाय हा भाग. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

+१००

सुबोध खरे
गुरुवार, 07/23/2015 - 10:27 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

लगे रहो भाय

अर्धवटराव
गुरुवार, 07/23/2015 - 06:06 नवीन
:) पुढे काय झालं?
  • Log in or register to post comments

छान कथा

तळ्यात मळ्यात
गुरुवार, 07/23/2015 - 06:44 नवीन
दोन्ही भाग एकदम वाचून काढले. आता तिसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

कसला भारी पंच तो...

बोका-ए-आझम
गुरुवार, 07/23/2015 - 09:52 नवीन
कहूं क्या मै आगे ' नेहा ' लागे जी ना लागे टूटा तारा था ये मन मेरा बन गया चांद होके तेरा - कवी बोकोबा ' धडधड '.
  • Log in or register to post comments

सर्वसाधारण विषय आहे.

अरवीन्द नरहर जोशि.
गुरुवार, 07/23/2015 - 22:54 नवीन
सर्वसाधारण विषय आहे.
  • Log in or register to post comments

धड धड धड धड...... :))

स्पंदना
Fri, 07/24/2015 - 13:54 नवीन
धड धड धड धड...... :))
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा