"ती" - २
"ती" - १
पत्रिका आलीय हे कळल्यावर नैराश्याचा झटका वगैरे येतोय की काय असे वाटले. एका खोलीतून दुसर्या खोलीत जायचे देखील त्राण उरले नाही. जेवणावरची तर इच्छाच उडाली. असे कसे अचानक लग्न ठरलं. विचार करुन करुन डोकं फुटायची पाळी आली. असेही मी कोण होतो जे तीच्या घरचे लोक माझी परवानगी घेणार होते कींवा मला कळवणार होते. मी होतोच कोण. एक तथाकथीत सुशीक्षित बेरोजगार. काम ना धंदा. आणि असला तरी ते मला का विचारतील. मी तर गेली कित्येक वर्षे त्यांच्या कुटूंबीयांना भेटलो नव्हतो. येणे जाणे नाही, फोन नाही. मी उगाच आपला आभासी विश्वात जगत होतो. सर्व बाजूंनी विचार केल्यावर डोकं थोडं शांत झालं. तरीही चेहर्याची रया गेली ती गेलीच. नेहमीप्रमाणे आईने ओळखलेच. आणि विचारले..
"काय रे?" असा का शांत शांत?"
"कुठे काय?"
"मग रात्री जेवलाही नाहीस बरोबर. बाहेर काय भांडण वगैरे झालेय का?"
"नाही"
"ती लग्न पत्रिका आलीय, ती तरी बघ, कधी आहे लग्न, कुठे आहे, जावे लागेल"
"तूच बघ"
"अरे असं काय करतोस! माझ्या सख्ख्या चुलतभावाच्या पहील्या मुलीचे लग्न आहे. जावं तर लागणारंच"
"पहीली मुलगी?"
"अरे दोन मुली नाहीत का त्याला? पहील्या मुलीचे आहे आता लग्न"
"ओssssssssssssssssssssssह !!"
"काय रे काय झाले?"
"अरे हो त्या मामाला दोन मुली आहेत ना, त्यातल्या पहील्या मुलीचे लग्न आहे होय?" ("ती" दुसरी होती)
"हो मग, त्यात एवढं मोठ्यानं ओरडायला काय झालं?"
"काही नाही, असंच" (जीव भांड्यात पडला) "कधी आहे लग्न?"
"आहे पुढच्या महीन्यात"
"तू जाणार आहेस का?"
"हो जावे तर लागणारंच, पण लग्न गावाला आहे. का रे?"
"नाही सहजच विचारलं?"
"तू येतोयस का बरोबर?"
"ते सर्व गावीच असतात का?"
"ते म्हणजे कोण?"
"म्हणजे मामा, त्यांची मुले?"
"हो मोठा मुलगा आहे तो इकडे मुंबईत असतो आणि दोन मुली गावीच असतात. त्यातील मोठ्या मुलीचे लग्न आहे, मोठ्या मुलाचा इकडे बीजनेस आहे"
"ओह, असं आहे तर"
"तू येणार की नाही ते नाही सांगीतलेस"
"अगं माझे एक दोन ठीकाणी जॉबचे प्रयत्न चालू आहेत"
"ठीक आहे, काय ठरतंय ते सांग, मला एकटीला जाणं कठीणंच दीसतंय, बरोबर आला असतास तर बरं झालं असतं"
मनातील फुलपाखरू पुन्हा उडायला लागले, मनात ईमले बांधणे सुरु झाले. बरेच दीवसांनी तीला प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळणार होती. पण मी एवढा का उतावीळ होत होतो तीला बघण्यासाठी? गेली कित्येक वर्षे मी तीला पाहीलेही नव्हते. मनात एक चित्र होतं. प्रत्यक्षात ती मनातल्या चित्राप्रमाणे असेल का? तीचा स्वभाव तसाच असेल की आता वयपरत्वे बदलला असेल? तीला अजुन लहानपणीच्या गोष्टी आठवत असतील का? हजार प्रश्न..
सुदैवाने एका कंपनीमधुन कॉल आला की तुम्हाला दोन तीन दीवसात हजर व्हायचे आहे. पगारही फ्रेशरच्या मानाने बरा होता. पायगुण समजावा का? पायगुण? कोणाचा? अजुन कशात नाही काय...
कामावर रुजु झालो, काम आवडीचे होते. आईची भूण भूण सुरुच होती. येतोयस का? मनात तर जायचे होते. पण नवीन नोकरी, कसे जमणार? एकदा बॉस एकटा असताना भीत भीत विचारले की “कामावर रुजु व्ह्यायच्या आधी मी एक १५ दीवसाची फॅमीली ट्रीप आखली होती. एक तर ती ट्रीप कॅन्सल करावी लागणार कींवा मला जाता येणार नाही. कारण कामावर रुजू होउन फक्त २०/२२ दीवस झाले आहेत. सुट्टी मागणं बरोबर वाटत नाही.” बॉस बोलला की “बिंधास्त जा, नंतर बघू.” मला हा आश्चर्याचा धक्का होता. फुलपाखरू अजुन भरार्या मारायला लागले. छातीतील धडधड वाढायला लागली. काय करणार होतो मी गावी जाउन? फक्त तीला बघण्यासाठी चाललोय? काय करायचे नुसते बघून? परत चिडवाचिडवी सुरु होईल का? झाली तर तिला सहन होईल का? का तिने तिचा तो आधीच शोधून ठेवला असेल? माझ्या सारख्या सामान्य व्यक्तिमत्वाच्या मुलाला ती भाव तरी देईल का?
मुंबई ते गाव अशी बस करण्यात आली होती ज्यांना जायचे त्यांनी त्यांची नावे तिच्या भावाकडे दयायची होती. परत आईची भूणभूण सुरु,
"अरे काय ठरवलं आहेस? जायचं की नाही लग्नाला? त्यांना नावं द्यायची आहेत!"
"हा बहुतेक येईन मी."
"आता तू आला नाहीस तरी चालेल, कारण बरेच लोक आहेत माझ्याबरोबर?"
"मग नको येऊ का मी?"
"अरे तुझ्यावर आहे"
"ठीक आहे, दे माझे नाव."
"तूच दे ना"
"ठीक आहे, सांगतो फोन करून"
नंबर मिळवून फोन लावला
"हेलो, विजय आहे का?"(विजय तीचा भाऊ)
"नाही, विजय बाहेर गेलाय. आपण कोण?"
"मी संदीप, आपण कोण?"
"मी नेहा, विजयची धाकटी बहीण" (छातीतली धडधड प्रामाणाबाहेर वाढली.)
"काही निरोप द्यायचाय का?"
"हो मला आणि आईला गावी लग्नाला यायचे आहे, म्हणून नावे द्यायची होती"
"अच्छा, संदीप म्हणजे कोण? आपलं पूर्ण नाव काय?"
"अगं मी मालती आत्याचा मुलगा संदीप! ओळखलेस?"
"अरे हाssss" (नशीब आठवणीत आहे). ओके तुम्ही येताय दोघे? ठीक आहे. सांगते मी दादाला."
"ओके, बाकी तू कशी आहेस?"
"मी मजेत आहे, सॉरी हा मी आवाज ओळखला नाही, बरेच वर्षांनी बोलतोय ना आपण!"
"हो, पण तू मुंबईत कधी आलीस?
"अरे मी गेली पाच वर्षे इकडेच आहे, एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळालेय मला"
"ओह, मला माहितीच नाही." (माहिती असती तरी असे काय करणार होतो म्हणा. हिंमत होती कुठे जाउन भेटायची आणि बोलायची)
"अच्छा, मी सांगते दादाला, ओके?"
जो फोन कधी संपूच नये असे वाटत होते तो ती संपवायला बघत होती. किंवा ती कामात असणार.
"ठीक आहे" :(
"ठीक आहे मग ठेऊ?"
"हो ठीक आहे ठेव"
लगेच फोन ठेवायची घाई का केली तीने? का मला असे वाटले? लग्न घरातील बाकीची कामे असतील तिला. का मुद्दामून तुटक वागली? खरंच तुटक वागली का मला असं वाटतंय? नऊ दहा वर्षानंतर भेटणाऱ्या अनोळखी मुलाबरोबर जेवढे बोलायला पाहिजे तेवढे बोलली की ती. पण मी अनोळखी थोडाच आहे? गेली नऊ दहा वर्षे न बोललेला मुलगा अनोळखीच. असो. कुठे रहाते ते विचारलेच नाही.
दुसऱ्या दिवशी आई म्हणाली, "अरे नेहाचा फोन आला होता, बस कुठे थांबणार आहे, किती वाजता यायचे आहे याबद्दल माहिती देण्यासाठी फोन होता. तू कुठे आहेस म्हणून विचारात होती." (हायला माझ्याबद्दल का विचारले असेल)
"माझ्या बद्दल विचारले?"
"हो, तू ओळखतोस तिला?"
"छे, कुठे नाही गं, त्यादिवशी फोनवर बोलणे झाले तेवढेच तेही ९/१० वर्षांनी"
"फोन करून बघ"
परत धडधड सुरु
"ती" - ३
Book traversal links for "ती" - २
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दिल गार्डन गार्डन हो गया ;)
:)
ही
हिंदोळ्याचे हेलकावे! :-)
मी व्यनी केलाय तो पाहिला का?
फारच मस्तं झालाय हा भाग पण.
लवकर टाका हो पुढचा भाग आणि हो
टाकतो, काल तीसरा भाग जवळ जवळ
आत्ता बरं वाटलं. खाली क्रमःश
वाचतेय.
अहाहा!
आहाहा!
good one
वाचतोय...
पुभालटा,गार्डन वगैरे वगैरे!!
मस्त, मस्त. उगाच ट्रॅजेडी द
छान झालाय हा भागही
खूप मस्त
छान चालु आहे!
गार्डन वगैरे मागेच झालं आता
मस्त चालूय .. साथिया,
उत्कंठावर्धक
+१००
लगे रहो भाय
छान कथा
कसला भारी पंच तो...
सर्वसाधारण विषय आहे.
धड धड धड धड...... :))