Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजघराणं on Sat, 07/18/2015 - 02:16
लेखनविषय (Tags)
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम

मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे . धर्म चिकित्सेशिवाय प्रगती अशक्य आहे. हि चिकित्सा तटस्थ भूमिकेतून आहे - त्यामुळे ती चींतनिय आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच शब्दात त्यांची इस्लाम धर्म विषयक मते या लेखात पाहूया . आणि मुस्लिम समाजाच्या हितासाठी - प्रगतीसाठी घटनाकारांनि काय उपाय सांगितले ते हि पाहूया. [(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ]

इस्लाम मध्ये समता आहे का ?

पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया या आपल्या सुप्रसिद्ध ग्रंथात बाबासाहेबांनी या विषयावर एक पुर्ण प्रकरण लिहिले आहे. त्या प्रकरणाचे नाव आहे सोशल स्टेग्नेशन . या प्रकराणाच्या पहिल्या पानावरचे त्यांचे वाक्य असे आहे . "केवळ हिंदुत सामजिक वैगुण्ये आहेत आणि मुस्लिमात नाहीत हा भ्रम आहे . असा कोणता सामजिक दुर्गुण आहे जो हिंदुत आहे आणि मुस्लिमात नाही ? " ( ८ -२२५) बालविवाह इत्यादी सामाजिक दुर्गुण हिंदु आणि मुस्लिम अशा दोघातहि आहेत हे त्यांनी सांख्यिकी आधाराने दाखवले आहे. इस्लाम धर्मातील विषमता , गुलामी आणि जातिव्यवस्था याबद्दल बाबासाहेब लिहितात : " इस्लाम बंधुत्वाचि भाषा करतो. सर्वाना वाटते कि जणु इस्लाम मध्ये गुलामी नाही …. आज गुलामी जगभरातून गेली असली तरी जेंव्हा गुलामी होती तेंव्हा तिच्या समर्थनाचा प्रारंभ इस्लाम धर्म आणि इस्लामिक देशातून झाला होता . " ( … support was derived from Islam and Islamic Countries) ( ८- २२८) इस्लाम धर्मात गुलामी आणि विषमतेची मुळे आहेत यावर चर्चा करताना आंबेडकर म्हणतात , " गुलामांना माणुसकीने वागवा असे प्रेषित कुराणात म्हणतो पण त्याना मुक्त करा असे म्हणत नाही . इस्लाम धर्मानुसार गुलामाना मुक्त करण्याचे बंधन मुस्लीमावर नाहि. गुलामाला चांगले वागवत (!) गुलाम ठेवणे हा उल्लेख आंबेडकरांनी जाणीवपूर्वक केला आहे. धर्मातली विषमता हि वेगवेगळी रूपे घेत टिकून राहते - इस्लाम धर्मात गुलामी असल्याने ती विषमतेच्या रूपाने टिकून राहिली आहे , हे दाखवून देत बाबासाहेबांनी मुस्लिमातील जातींचे भलेमोठे कोष्टक पानभर दिले आहे . (८-२२९) मुस्लिम समाजात त्रैवर्णिक व्यवस्था असून अश्रफ , अजलफ आणि अर्जल अशी त्या वर्गांची नावे आहेत . मुस्लीमातल्या अर्जल वर्गाला बाबासाहेबांनी डीग्रेडेड क्लास - पददलित म्हणुन संबोधले आहे . सेन्सस सुप्रिटेंडंट चे दाखले देत बाबासाहेब म्हणतात " मुस्लिमात जातीबाहेर लग्नाला प्रतिबंध आहे , व्यवसायावर जाती निर्धारण आहे. " (८-२२९,३०) त्यापुढे जाउन आंबेडकर लिहितात :
नक्कीच , हिंदुप्रमाणे मुस्लिमातहि सर्व वाइट चाली आहेत आणि काही हिंदुहुन अधिक वाइटहि आहेत . अधिकच्या वाइट चालीपैकी एक म्हणजे बुरखा : डॉ आंबेडकर (८-२३०)
2 . मुस्लिम स्त्री हा एक दयनीय प्राणि आहे . इस्लामी धार्मिक जुलमाचे ते प्रतिक आहे अशी बाबासाहेबांची मांडणी दिसते. व्यक्तिस्वातंत्र्याचा बळी जेंव्हा धर्म घेतो तेंव्हा - त्याची चिकित्सा करताना - डॉ. आंबेडकरांच्या लेखणीला वेगळीच धार येत असे . धर्म चिकित्सा करताना बाबासाहेब निर्भिडपणे - सर्व धर्मांची चिकित्सा करत असत . हा गुण दुर्दैवाने आज लोप पावला आहे . आज भारतात इस्लाम चिकित्सा केली जात नाही हे सत्य आहे. तटस्थ , द्वेष रहित पण धारधार चिकित्सेची प्रेरणा बाबासाहेबांपासुन घेतली पाहिजे . डॉ आंबेडकर बुरख्याबद्दल लिहितात : -
" रस्त्या वर चालणार्या बुरखाधारी स्त्रिया हे भारतातील एक भीषण आणि गलिच्छ दृश्य आहे . (most hideous site ) बुरख्याचे आरोग्यावर गंभिर दुष्परिणाम होतात . मुस्लिम स्त्रियात अनिमिया , टीबी आणि पायोरीया सारखे रोग जास्त प्रमाणात आहेत. अनेकांची शरीरे क्षतिग्रस्त , हात पाय व्याधीग्रस्त , हाडे बाहेर आलेली आणि कणे वाकलेले आहेत . पेल्व्हिक आजार आणि हृदयरोग यांचे प्रमाणही अधिक आहे. बुरखा - मुस्लिम स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक पोषण होऊ देत नाही " ( ८ - २३० , २३१) 3 पडदा पद्धतीच्या उगमाची आणि परिणामाची चर्चा करताना बाबासाहेब लिहितात - " बुरख्याची कारणे लैंगिक साशंकतेत आहेत. त्याचे मुस्लिम स्त्रिया आणि पुरुषांवर गंभिर परिणाम झाले आहेत. मुस्लिम पुरुषांचा घराबाहेरील स्त्रियांशी स्वच्छ मोकळा संपर्क बाधित झाला आहे. अशाप्रकारची बंधने पुरुषांच्याहि नितीमात्तेवर घातक परिणाम करतात. स्त्री - पुरुषांचा संपर्क तोडणारी अशी समाजव्यवस्था वाइट प्रवृत्तीस जन्म देते हे सांगायला कोण्या मानसशास्त्रज्ञाची गरज नाही . अशा धार्मिक बंधनांमुळे लैंगिक अतिवासना आणि इतर अनैसर्गिक रोगट सवयिंचा प्रादुर्भाव या समाजात होतो . बुरख्यामुळे हिंदु मुस्लिम संवादात हि बाधा येते कारण - अतिशयोक्त वाटले तरी- हिंदुचे म्हणणे खरेच आहे कि - एका बाजूचे स्त्रीपुरुष आणि दुसर्या बाजूचे फक्त पुरुष यांचा निर्भिड संवाद होणार तरी कसा ? " (८- २३०, २३१) जातीय स्तर आणि स्त्री / पुरुष अशा दोन्ही प्रकारची विषमता मुस्लिमात आहे आणि त्याचे समर्थन / प्रारंभ इस्लामी धर्मशास्त्रात आहे असा बाबासाहेबांचा निष्कर्ष दिसून येतो.

बौद्ध धर्माचा विनाश का झाला ?

सर्व धर्मांची चिकित्सा करून झाल्यावर बाबासाहेबांना बुद्धाचा मार्ग योग्य वाटला होता. बुद्ध धम्मा च्या ऐतिहासिक उदय आणि अस्ताची त्यांनी तपशीलवार मिमांसा केली आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत . माझे सर्वात शेवटचे मत प्रमाण मानावे असे त्यांनी अनेकदा आपल्या अनुयायांना निक्षुन सांगितले आहे . त्यामुळे या विषयावर त्यांनी सर्वात शेवटी दिलेले भाषण पाहूया. साहेबांच्या महानिर्वाणापुर्वि सहा महिने २३ जून १९५६ रोजी अखिल भारतीय बौद्धजन समितीच्या दिल्लीतल्या सभेत ते म्हणाले : - " मुसलमानांनि या देशावर आक्रमण करून बौद्ध विहारांचा नाश करून , बौद्ध मूर्ती फोडल्यामुळे त्याना बूत शिकन म्हणजे मूर्ती फोडणारे असे म्हटले जाते. बूत हा मुर्तिसाठीचा शब्द म्हणजे बुद्ध या शब्दाचे (अपभ्रंश ) रूप आहे. मुस्लिमांच्या बौद्ध धर्मावरील आक्रमणाबाबत मी एक पुस्तक लिहित आहे.….मुसलमानांनि बौद्ध व हिंदु धर्मावर आक्रमण केले होते . दोघांची मंदिरे उध्वस्त केली होती … . बर्याच बौद्ध भिक्कुची कत्तल झाली आणि काहींनी देशाटन केले. त्यामुळे बौद्ध अनुयायांना आपण कोणाचे अनुसरण करावे ? हेच कळेनासे झाले . बौद्ध अनुयायी अंध:कारात चाचपडत राहिले " ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ ) अगदी असेच मत १० जून १९५० च्या जनता पत्रातील लेखातही व्यक्त केले आहे . ( खंड १८ -३ पान : २१५) दुर्दैवाने घटनाकारांचे लवकरच महानिर्वाण झाले. या विषयावर ग्रंथ लिहणे जमले नाही . पण आयुष्याच्या शेवटी आंबेडकर अशा निर्णयाप्रत आलेले दिसतात कि, - मुस्लिमांकडुन विद्वान भिक्कुंचि कत्तल झाली वा त्यांना देशत्याग करावा लागला . मार्गदर्शन न मिळालेले बौद्धजन आता कोठे जातील ? तिकडे बोलघेवडे ब्राम्हण पुरोहित जन्मजात आयते तयार होत होतेच ! त्यासाठी भिक्कू प्रमाणे कठिण प्रशिक्षण - संस्काराची गरज नव्हती . इस्लामी आक्रमणामुळे वैचारिक नेतृत्व हरवलेला बौद्ध समाज पुढे ब्राम्हणी धर्माच्या तोंडप्रचारी तडाख्यात अडकला असा निष्कर्श बाबासाहेबांनी काढला आहे. आणि इस्लामी आक्रमण हे बुद्ध धर्माच्या नाशाचे एक महत्व पुर्ण कारण मानले आहे. ( खंड १८ -३ पान : ४८० , ४८१ )

मुस्लिम इतिहासाचे आंबेडकरी आकलन :

मुसलमान भारतात का आले ? त्यांच्या येण्या मागची कारणे - राज्य स्थापनेचे हेतू आणि भविष्यातील धार्मिक योजना याचे मुद्देसूद विवेचन घटनाकारांनि केलेले आहे. बाबासाहेब लिहितात : - भारतातील मुस्लिम प्रवेश हे केवळ जमीन आणि लुटमार यासाठी नाहीत . आर्थिक - राजकीय कारणाप्रमाणे भारतात इस्लामचा प्रसार करणे हे धार्मिक कारणही आक्रमणा मागे महत्वाचे आहे. ( ८-५५). बाबासाहेबांनी मुस्लिम आक्रमणाचा धार्मिक हेतू सिद्ध करण्यासाठी अनेक मुस्लिम इतिहासकारांचि अवतरणे उधृत केलेली आहेत. उदा : तैमुर बादशाहाची बाबासाहेबांनी उधृत केलेली वाक्ये आहेत :
" माझ्या हिंदुस्थान वरील आक्रमणाचा हेतू काफ़िरांविरुद्धचि मोहीम चालवून त्यांना अल्लाच्या धर्मात आणणे हा आहे. प्रेषित मुहम्मदाच्या आज्ञेनुसार काफिरी श्रद्धांचे भंजन करून , सर्वदेवता समभावाचे उच्चाटन करून , देवळे आणि मुर्त्या यांच्यापासून हिंदुस्थान मुक्त केला तर मला गाझी आणि मुजाहिद म्हटले जाइल ." (८-५६) भारतात मध्ययुगात हिंदु मुस्लिम एकता वगैरे अजिबात अस्तित्वात नव्हती. अगदी १८५७ चे बंड हा मुस्लिमांनी केलेला ब्रिटिश विरोधी जिहाद होता. सहाशे वर्ष मुसलमान या देशाचे मालक म्हणुन वावरत होते . ब्रिटिश राज्यात त्यांना हिंदुच्या समान नागरी दर्जा मिळाला हे मुस्लिमांच्या दृष्टीने अपमानास्पद होते. म्हणुन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला . १८५७ साली भारताला दार उल इस्लाम करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला तो जिहाद होता. असे आंबेडकरांचे मत होते (८-४९, २९५)

मुस्लिम हल्ल्यांमागच्या धार्मिक हेतूचे विवेचन करताना बाबासाहेब लिहितात "इस्लामी धर्माने जगाची वाटणी दोनच भागात केली आहे …. दार उल हरब म्हणजे शत्रूभूमिचे रुपांतर - दार उल इस्लाम मध्ये करण्यासाठी … जिहाद करणे हे मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. " येथे बाबासाहेबांनी अनेक जिहादी युद्धांचे संदर्भ दिले आहेत. (८-२९५, २९६)

मुस्लिम आक्रमण - राज्य स्थापना - कर पद्धती यामागचे हेतू हि धार्मिक होते असे बाबासाहेबांचे मत आहे . हे मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकर कटाक्षाने मुस्लिम इतिहासकार किंवा बादशहा यांचेच संवाद आपल्या पुस्तकात पुन्हा उधृत करताना दिसतात . झिजीया कर लादण्यामागचा हेतू स्पष्ट करण्यासाठी त्यांनी अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याच्या काझी चा संवाद संपुर्ण पणे उधृत केला आहे . हा संवाद पुरेसा बोलका आहे .

" अल्लाह सांगतो कि हिंदुना हीन गुलामीत (धीम्मी ) ठेवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे . कारण ते आपल्या प्रेषीतांचे कडवे शत्रू आहेत. आणि प्रेषीतांनिच आपल्याला आज्ञा केली आहे कि , हिंदुना इस्लामी बनवा नाहीतर ठार मारा , बंधक बनवा , त्यांची मालमत्ता लुटा . …. आपण सज्जन हनिफी मुस्लिम असल्यामुळे त्यांना झिजीया घेऊन सोडतो तरी.… हनिफी सोडुन इतर पंथात झीजियाचा पर्याय नाही. हिंदुपुढे दोनच पर्याय आहेत - " इस्लाम किंवा मृत्यू " (८-६३) या उधृता नंतर निष्कर्ष काढताना आंबेडकर म्हणतात : मुहम्मद गझनी पासून अहमदशहा अब्दाली पर्यंतचि ७६२ वर्षांची कालकथा हि अशी आहे. (८-६३)

पाकिस्तान का बनले ?

डॉ. आंबेडकर फाळणीचे पुरस्कर्ते होते. हिंदु आणि मुस्लिम यांचे सहजीवन अवघड आहे . भारत अखंड राहिला तर धार्मिक संघर्ष इतके जास्त होतील कि हिंदुंचा सामजिक सुधार अशक्य होऊन बसेल त्यामुळे फाळणी करावी असे त्यांचे मत होते . पाकिस्तान बाबतीतले इस्लामी धर्म शास्त्र उलगडून सांगताना ते म्हणतात : "मुस्लिमांच्या दृष्टीने हिंदु काफिर आहेत .काफ़िरांचि लायकी मान सन्मानाची नाही . इस्लाम नुसार काफिर जन्मानेच नीच (low born ) आणि दर्जाहीन (without status) असतात. काफिर शासित देशाला दार उल हरब असे म्हणतात. हे सर्व पाहता मुसलमान लोक हिंदु सरकारचे आदेश पाळणार नाहीत हे सिद्ध करायला आणखी पुराव्यांची गरज नाही . "( ८ - ३०१) पाकिस्तानवरील पुस्तकाचे एक प्रकरण राष्ट्रीय फ़्रस्ट्रेशन नावाचे आहे . त्यातील ३२८ -३३० या पानांवर बाबासाहेबांनी हिंदु मुस्लिम प्रश्नाची चिकित्सा केलेली आहे . बाबासाहेब लिहितात " ब्रिटिशांच्या फोडा आणि झोडा या नीतीमुळे हिंदु मुस्लिम संबंध बिघडले हे खरे नाही . ब्रिटिशांच्या पूर्वीपासून भांडणे होतीच. (८-३२८) हिंदु आणि मुस्लिमातील राजकीय भांडण हा ऐतिहासिक, धार्मिक , सांस्कृतिक आणि सामजिक घटक परस्पर विरोधी ( Antipathy) असल्याचा परिणाम आहे. (8-229) . अकबर आणि कबीर या सुधारकांच्या कार्याचा इष्ट परिणाम झालेला नाही . " (८-३३०) याचे अधिक विश्लेषण करताना आंबेडकर लिहितात : -

" इस्लामी बंधुत्व हे सर्व मानवांसाठी नाही. ते फक्त मुस्लिमांपुरतेच मर्यादित आहे. मुस्लिम बंधुसंघा ( Corporation) साठी सर्व प्रेम व फायदे आहेत . जे मुस्लिम बंधुसंघाबाहेर आहेत त्यांकरता घृणा आणि शत्रुत्व याशिवाय काहीही नाही ..... भारताला आपली मातृभूमी आणि हिंदुना बांधव मानण्याची परवानगी - इस्लाम धर्म सच्च्या मुस्लिमाला देत नाही . " (८-३३०)

अशा धार्मिक कारणांमुळे हिंदु मुस्लिम ऐक्य अशक्य आहे म्हणुन बाबासाहेबांनी फाळणीला पाठींबा दिला होता. फ़ाळणिपुर्वि १ ९ ४ ० साली आंबेडकर म्हणाले होते - " जर फाळणी झाली नाही तर भारत हे एक, परिणामशुन्य राज्य बनेल- जणु जिवंत प्रेत, न पुरलेला मृतदेह " (८-३४०) फाळणी झाल्यानंतर १ ९ ५ ५ साली - बाबासाहेब म्हणाले होते. --
" पाकिस्तान पासून भारत वेगळा झाला याचा मला आनंद झाला होता . तसे पाहता मीच पाकिस्तानचा तत्वज्ञ होतो. मी फाळणीचे समर्थन केले ते यासाठी कि , केवळ फाळणीमुळे हिंदु स्वतंत्रच नव्हे तर मुक्त होऊ शकणार होते . जर भारत अखंड राहिला असता तर हिंदुना मुस्लिमांच्या दयेवर जगावे लागणार होते. जर फाळणी झाली नसती तर अखंड भारतात एका देशाचे पण दोन राष्ट्रांचे सरकार अस्तित्वात आले असते आणि या दोन राष्ट्रांपैकी मुसलमान हि निश्चितपणे शासनकर्ति जमात बनली असती . " (१-१४६) त्यावेळच्या अखंड भारतातले मुस्लिम लोकसंख्येचे ३५% हे प्रमाण लक्षात घेतले तर आंबेडकरांच्या लेखनाची खोली लक्षात येते आणि तत्कालीन कोन्ग्रेस किंवा हिंदुसभेला हि गोष्ट कशी कळली नाही ? याचेही आश्चर्य वाटते . त्यापुढे जाउन बाबासाहेब असेही म्हणतात कि - " जेंव्हा फाळणी झाली तेंव्हा मला वाटले कि परमेश्वराने या देशावरील शाप काढुन घेतला असून हा देश एकसंघ , महान व वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे " (१-१४६)

इशारा : हिंदु अधिक आक्रमक होत जातील

बाबासाहेबांनी ७५ वर्षा पुर्वी दिलेला इशारा आज महत्वाचा ठरताना दिसतो आहे . बाबासाहेब लिहितात :-
"मुसलमान राजकारणात गुंडगर्दि आणत आहेत .या दंगली त्याचे पुरावे आहेत. मुसलमान मुद्दाम सुटेडन जर्मन नाझिंचे अनुकरण करत आहेत. (झेक बाबतचे) . जोपर्यंत एकटे मुस्लिम आक्रमक होते तोवर हिंदु मार खात होते. भूतकाळ गेला आणि आज हे सत्य राहिले नाही . हिंदु लोक प्रतिकार शिकाले आहेत (learned to retaliate ) आणि मुस्लिमाना भोसकण्यात त्याना लाज वाटत नाही . गुंडगर्दिचा विरोध सवाई गुंडगिरीने करणे हा हिंदुचा नवा चष्मा बिभत्स आहे. ( ugly spectacle ) (८-२६९) 9

" मुस्लिम अतिरेक हा (native endowment) अंगभुत आहे, हिंदुपेक्षा जुना आहे आणि त्यांच्या संस्कृतीचे अंग आहे.. हिंदुचा अतिरेक हा आजकाल नव्याने प्रतिक्रिया म्हणुन तयार होतो आहे. आज या बाबतीत मुसलमान पुढे असले तरी हे असेच जर चालू राहिले तर…. कदाचित भविष्यात हिंदु त्याना मागे टाकतील . " (८-२४९)

हे दोन समाज अशाच प्रमाणे धर्मावरून भांडत राहिले तर, भारताचे काय होईल याचे चित्र बाबासाहेब आपल्यासमोर १९४० साली उभे करतात . आज फाळणी होऊन गेली आहे. काही वर्षाच्या शांततेत भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश च्या तुलनेत दैदिप्यमान प्रगती केलेली दिसते. मात्र हिंदु मुस्लिम संघर्ष राजकीय आणि धार्मिक स्वरूपात सुरूच आहे . त्यामागच्या राजकारणाची आंबेडकरांनी केलेली चिकित्सा अवश्य पाहिली पाहिजे .

धार्मिक राजकारणाचा आंबेडकरी अन्वयार्थ

हिंदु मुस्लिम राजकारणाच्या फियास्कोसाठी आंबेडकर हिंदु महासभा आणि कॉंन्ग्रेस या दोघांना जवाबदार ठरवतात . बाबासाहेब लिहितात "भाबड्या मनाच्या हिंदु सभेच्या देशभक्तांना वाटते कि हिंदुनि हिंसक पावित्रे घेतले कि मुसलमान सरळ होतील…. खरे तर हिंदु महासभा संवादाच्या प्रगतीच्या मार्गातला अडथळा आहे कारण त्याना एकता नकोच आहे. उदाहरणार्थ : ( ३५ % मुस्लिम असलेल्या अखंड हिंदुस्थानाच्या वास्तवात ) " हिंदुस्थान हिंदुचा ! " अशी घोषणा हिंदु सभेच्या अध्यक्षांचि आहे . वास्तव स्थिती पाहता हि घोषणा अतिशय अहंकारी आणि अक्षरश : अर्थहिन आहे . " (८-२७०)

कोंग्रेसच्या मुस्लिम अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या युरोप प्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . : डॉ आंबेडकर

कॉंग्रेसचेहि मुस्लिम / इस्लाम बाबतीतले धोरण पूर्णपणे चुकलेले आहे असा आंबेडकरांचा आरोप आहे. कोंग्रेसच्या धार्मिक राजकारणाला आंबेडकरांनी मुस्लिमांचा अनुनय / लांगुलचालन (Appeasement ) असे विशेषण वापरले आहे. अशी विशेषणे पाकिस्तान वरील पुस्तकात कोन्ग्रेस साठी शेकडो वेळा वापरली आहेत . एकट्या पान २७० वर लांगुलचालन (Appeasement ) हा शब्द सहा वेळा आलेला आहे. आंबेडकर लिहितात : -

" कॉंंग्रेसला अपिसमेंट आणि सेटलमेंट यातला फरक सुद्धा कळत नाही. अपिसमेंट - अनुनय म्हणजे लांगुलचालन! आक्रमकाचे हृदय जिंकण्या साठी त्यांनी केलेल्या खून, बलात्कार आणि निष्पापांच्या लूटमारी कडे दुर्लक्ष करणे हि कोङ्ग्रेसि अपिसमेंट ची नीती आहे. त्याला कोणत्याही मर्यादा नाहीत .. सेटलमेंट म्हणजे दोन्ही बाजू समाधानी होतील अशी मर्यादित तडजोड होय. मुस्लिमाना धार्मिक आधारावर सवलती दिल्यास त्यांची आक्रमकता वाढीस लागलेली दिसते या सवलतिंचा अर्थ हिंदुचा भ्याडपणा (defeatism) असे मुस्लिम मनास वाटते. कोंग्रेसच्या अपिसमेंट मुळे हिटलरचे चोचले पुरवणार्या दोस्त राश्ट्रांप्रमाणे हिंदूची परिस्थिती अवघड होऊन बसेल . "

(८ - २७०) सवाई गुंडगिरिचि आक्रमकता किवा लांगुलचालन यापैकी कोणत्याही मार्गाने हिंदु मुस्लिम प्रश्न सुटणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे.

समस्येवरील दोन उपाय

वकिली कायदे आणि सेटलमेंट करून हिंदु मुस्लिम प्रश्न हाताळावा लागतो - अपिसमेंट अथवा गुंडगिरी करून नाही - याची प्रचीती अजून भारतीय राजकारणाला झालेली नाही. फाळणी घडून भूतकाळात जमा झाली . आजच्या भारतातील हिंदु आणि मुस्लिमाना सहजीवन अपरिहार्य आहे . जुन्या मानसिकता जुने प्रश्न आजही तसेच्या तसे जिवंत आहेत . मुस्लिमांचा धार्मिक उन्माद , आक्रमकता, हिंदूची सवाई गुंडगिरी वा सवाई लांगुलचालन आजही तसेच आहे . १) सेक्युलारीझम : यावर बाबासाहेबांनी सुचवलेला उपाय सेक्युलारीझम हा आहे . सेक्युलारीझम हा सर्व धर्म समभावाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे . त्यात धर्माचे स्थान फक्त पारलौकिक श्राद्धेपुरते मर्यादित असते. इहलोकात कसे वागावे ? किती विवाह करावेत ? बुरखा घालावा का ? याचे कोणतेच धार्मिक स्वातंत्र्य मिळत नाही . सर्व गोष्टी कायदा आणि शासनाच्या अखत्यारीत येतात . बाबासाहेबांची घटना आणि त्यातील कलमे सेक्युलर आहेत . त्यात कोणत्याहि धर्मास फाजील स्वातंत्र्य नाही . मात्र दुर्दैव असे कि याच घटनेत अनुसृत्य असणारा समान नागरी कायदा अजूनही होत नाही . कोंग्रेसच्या नाही - भाजपाच्या राज्यातही नाही .. शासन सेक्युलर रहात नाही . तलाक पिडीत मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी समान नागरी कायदा केला जात नाही . २) धर्म सुधारणा : मुस्लिम समाजात समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा करण्याची प्रोसेसच अस्तित्वात नाही. धर्म चिकित्सा हा विषय त्याज्य मानला गेला आहे . जी काही लाहान सहान सुधारक मंडळे आहेत ती कुराणाच्या परीभाषेबाहेर जात नाहीत . बुद्धीवादाचे समर्थन करण्यासाठी हदीस मधली पैगंबर वचने शोधली जातात. त्यामुळे मुस्लिमांचे प्रचंड नुकसान होणार आहे. विज्ञान निष्ठा आणि बुद्धिवाद याचा मुस्लिम समाजात प्रसार करणे बाबासाहेब आवश्यक मानतात. त्यासाठी त्यांनी रेनन ला उधृत केले आहे :

" इस्लाम विज्ञानाला सततच शत्रू समजत आला आहे. हे त्या धर्माचे एकनिष्ठ एकमेव सातत्य आहे . पण हे सातत्य धोकादायक आहे. इस्लामच्या दुर्दैवाने इस्लामला यश मिळत आले. विज्ञानाचा - बुद्धीवादाचा वध करून खरे तर इस्लामने स्वत:चाच वध केला आहे. जगाचे शाप घेतले आहेत आणि हीनत्व पत्करले आहे "

( ८ - २३५) मुस्लिमांनी विज्ञान निष्ठेचा, बुद्धिवादाचा , आणि धर्म चिकित्सेचा स्वीकार केल्याशिवाय त्यांचे भले होणार नाही इतरांचेही भले होणार नाही असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे .

समारोप

हिंदुच्या भल्यासाठी त्यांची धर्म चिकित्सा आणि प्रबोधन अत्यावश्यक आहे. पण मुस्लिमाना यापासून वंचित ठेवण्याचे काही कारण नाही. इस्लामची चिकित्सा केली तर हिंदुत्व वाद्यांना फायदा होतो या भ्रमातून आता बाहेर पडायला हवे. आणि इस्लाम हा मुक्तिदाता, समतेचा, शांततेचा धर्म आहे या कम्युनिस्टांनि पसरवलेल्या अंधश्रद्धेतुन हि मुक्त झाले पाहिजे. कम्युनिस्टांचे प्लेन आणि डोकी अभ्यासू असली तरी पुरोगामी वा संविधानिक निश्चित नाहीत. आपण आपले मेंदु कम्युनिस्टांकडे गहाण टाकण्याची गरज नाही. या विषयावर बाबासाहेबांचे विचार अभ्यासले पाहिजेत. बाबासाहेबांनी इस्लामची कठोर चिकित्सा केली. त्या धर्मात समता नाही - सहिष्णुता नाही - आधुनिकता नाही - असा आंबेडकरांचा निष्कर्ष आहे. मुस्लिम बांधवांना धार्मिक दलदलीतून बाहेर काढणे हे आंबेडकरांचा अनुयायी म्हणुन मला माझे कर्तव्य वाटते. विज्ञान आणि विवेक याच्या प्रचारा शिवाय हे अशक्य आहे. इस्लाम धर्म चिकित्सा अटळ आहे. आपल्याला चिकित्सक बुद्ध्यांक वाढवावा लागणार आहे. बाबासाहेबांच्या Thoughts on Pakistan च्या मुळ आवृत्तीतल्या पहिल्या पानावरचे कोटेशन होते :
"“More brain, O Lord, more brain! or we shall mar Utterly this fair garden we might win.” ―George Meredith
मेंदू दे देवा, मेंदु दे - बुद्धी दे देवा, बुद्धी दे अन्यथा मरेल विजयाची - सुनिश्चित आशा !

- डॉ. अभिराम दिक्षित

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------- [(८ - ३२०) हा संदर्भ ८ व्या खंडातील ३२० वे पान असा वाचावा .प्रस्तुत लेखनासाठी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या समग्र आंबेडकर वाङ्ग्मयातिल खंड आधार म्हणुन वापरले आहेत . या प्रकाशन समितीत रा सु गवई , आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचा समावेश आहे. बरेचसे मुळ खंड इंग्रजीत असल्याने भाषांतर करताना अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे (English) मध्ये कंसात दिले आहेत. ] संदर्भ ग्रंथांचे तपशील : (1) - Volume 1. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 1. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) (८ )- Volume 8. Dr. Babasaheb Ambedkar, writings and speeches, Volume 8. Education Dept.,Govt.of Maharashtra.(1989) (१८-३) डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८ भाग ३ (मराठी ). उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन (२००२) ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
  • 35428 views

प्रतिक्रिया

Submitted by खटासि खट on Sun, 07/19/2015 - 01:03

Permalink

२ मे १९५० ला दिल्ली येथे

२ मे १९५० ला दिल्ली येथे बुद्धाची २४४९ वी जयंती बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी बौद्ध धम्मामुळेच भारत महान असे उद्गार त्यांनी काढले. याच अर्थाची भाषणे या काळात दिसतात. पण सदरच्या भाषणात बाबासाहेब विचारतात हिंदू धर्म इतर धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे, याचे उत्तर हिंदू लोक देऊ शकतील का ? अस्पृश्यांचे जीवन बरबाद करण्याची ताकद आहे म्हणून श्रेष्ठ की अस्पृश्य गुणवान असला तरी त्यास सामाजिक दर्जा मिळत नाही म्हणून श्रेष्ठ ? अस्पृश्याने पवित्र उद्गार काढले तर त्याची जीभ छाटली जावी हे रास्त आहे काय ? अस्पृश्य मनुष्य गुरू होऊ शकत नाही म्हणून हा धर्म श्रेष्ठ की तप्त शिसे अस्पृश्यांच्या आणि शूद्रांच्या कानात ओतले जावे असे सांगतो म्हणून हा धर्म श्रेष्ठ ? असे सांगणारा धर्म धर्म या संज्ञेस पात्र ठरतो काय ? या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिलीच पाहीजेत. तर मिलिंद महाविद्यालयामधे हिंदू कोडबिलावरून मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी ते बिल का हवे आणि त्या बिलावरून मी कसा राक्षस ठरवलो गेलो आहे, धर्मबुडवा आणि हिंदू धर्माचा मारेकरी ठरवलो गेलो आहे हे थोडक्यात सांगितले. वर्तमानपत्रातून नाही नाही ते आरोप केले जात असले तरी त्याची पर्वा करण्य़ाची गरज नाही असे सांगताना त्यांनी त्या लिखाणाची थट्टाही केली. त्यांचं म्हणणं होतं की खंडप्राय पसरलेल्या या देशात एकही प्रथा समान नसलेल्या धर्माप्रमाणे कायदे स्वतंत्र भारतात लागू होऊ शकत नाहीत,. मध्य प्रांतात असलेल्या चालींप्रमाणे मान्य रूढींप्रमाणे कायदा दक्षिणेत चालणार नाही. म्हणून सर्वांना एकच एक लागू होईल अशा कायद्याची गरज होती. बंगालमधे एका तालेवार जमातीमधे एका सभ्य गृहस्थाला पाचशे बायका होत्या. त्याने बायकांचे नाव आणि पत्ता लक्षात ठेवण्यासाठी एक रजिस्टर ठेवले होते. ज्या गावी तो जाई तिथल्या बायकोचा पत्ता घेऊन तिच्या घरी मुक्काम करी. अशी प्रथाच त्या भागात होती, तर एकापेक्षा जास्त बायका नसाव्यात अशी प्रथा अनेक ठिकाणी आढळते. त्यामुळे त्यातला सुवर्नमध्य साधत धर्माची चिकित्सा करत सर्वांना काळाशी सुसंगत होईल आणि विवेकाला धरून राहील असा कायदा बनवला आहे. त्यामुळे अन्याय कुनावरच होत नाही. उलट ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना न्याय मिळेल. त्यासाठी धर्माच्या अनेक दुर्लक्षित पण महत्वाच्या ग्रंथांचा सहारा मी घेतला आहे , अशा प्रकारे धर्मचित्सेचा फायदाच होऊन धर्माचे अधिष्ठान एकच एक कायद्यासाठी मिळेल. ब्रिटीश काळामधे सतीच्या प्रथेविरुद्ध कायदा झाला तरी त्याचे श्रेय राजा राममोहन राय यांनाच गेले पाहीजे. कारण त्यानंतर ब्रिटीशांनी कुठलीही सामाजिक सुधारणा केली नाही. शिक्षणाचा अधिकार मात्र दिला. स्त्री ला जिवंतपणी मृत नव-याला मांडीवर घेऊन जाळण्याला कशी काय परवानगी दिली जाऊ शकते ? त्यामुळे धर्मातील अशी कलमे काढून टाकली गेलीच पाहिजेत. विधवा स्त्री असो वा विवाहीत, तिला कसले स्थानच नाही. त्यामुळे स्त्रियांच्या हक्कांचा विचार केला गेला आहे.... याउप्पर सर्व साहीत्य सर्वांसाठी उपलब्ध असल्याने आपले आपण मिळवणे कठीण नाहीच. सदर लेखामुळे सध्या वाचनाची व्याप्ती काय असावी अशी एक मर्यादा घालून दिली जातेय, त्यामुळे का होईना पिन पॉईण्टेड वाचन होईल. हे योग्य की अयोग्य हे मात्र मी सांगू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्टीचे संदर्भ जाणून न घेता वाचन जरी केले तरी बाबासाहेबांच्याच भाषेत गाढवावर लादलेले ग्रंथांचे ओझे होईल फक्त. यापेक्षा आंजा वर लिखाण करणे अशक्य ही मर्यादा ओळखून थांबतो.
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Sun, 07/19/2015 - 01:05

Permalink

लेख वाचनीय आहे.

लेख वाचनीय आहे. पण थोडं 'सोयिस्कर' विवेचन आहे असं प्रथमदर्शनी मत झालं. डॉ. आंबेडकर यांचं 'हिंदू' धर्माविषयीचं विवेचनही वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 07/19/2015 - 01:14

Permalink

ज्या समाजातून पूजनीय डॉ.

ज्या समाजातून पूजनीय डॉ. बाबासाहेब आले त्या समाजावर अनेकानेक वर्षं झालेला अन्याय आणि लोकांना दिली गेलेली अमानुषपणाची वागणूक यामुळे हिन्दू धर्माबद्दल तिरस्कार निर्माण होणे स्वाभाविक असेल तरीही पुन्हा हिन्दू धर्माचा वापर स्वार्थासाठी करणाऱ्या लोकांमुळे अशा गोष्टी झाल्या आहेत. हिन्दुत्वाचं तत्त्वज्ञान कुणालाही नीच लेखत नाही. घटनेनं सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत पण काही ठराविक लोकच त्या अधिकारांचा वापर मनासारखा करतो तर यात घटना चुकीची कशी ठरते हे समजू शकणार नाही तसंच अम्मलबजावणी मधल्या तपशीलांचा आणि त्यातल्या न्यूनत्वाचा दोष तत्त्वांवर लादला जाऊ नये
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Sun, 07/19/2015 - 10:40

Permalink

कुठल्या ना कुठल्या धर्मात

कुठल्या ना कुठल्या धर्मात राहिलं पाहिजे ही भुमिका का होती? हिंदू धर्म त्यागून 'कुठलाही धर्म नाही' या स्टेटमध्ये राहता येतं का भारतात?
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/19/2015 - 10:55

In reply to कुठल्या ना कुठल्या धर्मात by अनुप ढेरे

Permalink

भारतात तसे अलाउड नाही.

न धर्मी व्यक्ती हे स्टेटस कायद्याला अमान्य आहे. याबाबत अनेक कोर्ट केसेस झाल्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by खटासि खट on Sun, 07/19/2015 - 11:05

In reply to भारतात तसे अलाउड नाही. by dadadarekar

Permalink

असं कोर्टाचं म्हणणं आहे.

असं कोर्टाचं म्हणणं आहे. त्या निर्णयांवर संसदेत चर्चा होऊ शकते. धर्मच का स्विकारला, निधर्मी का नाही याचीही उत्तरं बाबासाहेबांनी दिलेली आहेत. आहे तो धर्म सोडून निधर्मी होणं हे ही धर्मांतरच. जे काही आहे ते वाचनासाठी उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 07/19/2015 - 12:39

In reply to भारतात तसे अलाउड नाही. by dadadarekar

Permalink

संदर्भ हवा

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/19/2015 - 12:49

In reply to संदर्भ हवा by माहितगार

Permalink

दिलेली विकि लिंक वाचलीत का ? त्यातच आहे.

Atheism and irreligion are not officially recognized in India. Apostasy is allowed under the right to freedom of religion in the Constitution, and the Special Marriage Act, 1954 allows the marriage of people with no religious beliefs, as well as non-religious and non-ritualistic marriages. However, there are no specific laws catering to atheists and they are considered as belonging to the religion of their birth for administrative purposes
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 07/19/2015 - 13:12

In reply to दिलेली विकि लिंक वाचलीत का ? त्यातच आहे. by dadadarekar

Permalink

तो पर्यंत सदंर्भ हवा हि विनंती शिल्लक आहे.

एखादी गोष्टीचा कायद्यात विशीष्टपणे उल्लेख नाही आणि कायद्यास अमान्य आहे या दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत. तुम्ही म्हणता तो विकिउल्लेख Atheism and irreligion यांचा कायद्यात विशीष्टपणे उल्लेख नाही असा आहे म्हणजे ते कायद्यास अमान्य आहे असा त्याचा अर्थ भारतीय घटनेतून काढता येऊ शकणार नाही एवढी भारतीय घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयक कलमे मजबूत आहेत (हे माझे व्यक्तीगत मत).
न धर्मी व्यक्ती हे स्टेटस कायद्याला अमान्य आहे. याबाबत अनेक कोर्ट केसेस झाल्या आहेत.
आपण दिलेली विकिसंदर्भ टाइम्स ऑफ इंडीयाचा हा संदर्भ देतो. पण टाइम्स ऑफ इंडीयाच्या बातमीत न धर्मी स्टेटस अमान्य करणार्‍या कोणत्याही कायद्याचा उल्लेख दिसत नाही. न धर्मी स्टेटस कायद्यास अमान्य आहे असे आपण म्हणता तर त्या कायद्याचा संबंधीत कलमा सहीत संदर्भ द्यावा. आज भारतातील बहूतेक कायदे आणि हायकोर्ट लेव्हलच्या वरच्या कोर्टांच्या जुन्या नव्या सगळ्या केसेस आंतरजालावर उपलब्ध आहेत. 'अनेक कोर्ट केसेस झाल्या आहेत' असे आपण म्हणता तर त्या नेमक्या कोणत्या कोर्ट केसेस आहेत त्यांचे संदर्भ द्यावेत. आपण वकील असाल तर आपण आपले तथाकथीत संदर्भ देऊ शकालच नपक्षी indiacode.nic.in/ येथे भारतीय कायद्यांची माहिती मिळते. http://judis.nic.in/ या वेबसाईटवर जजमेंट शोधता येतात. indiankanoon.org हे खासगी संकेतस्थळही बरे आहे. स्वतःच्या म्हणण्याच्या पुष्ठीसाठी आपल्याला कुठे शोधावे असा प्रश्न शिल्लक राहणार नाही अशी अपेक्षा. आपण म्हणता त्या कायद्यांचे आणि हायकोर्ट लेव्हल अथवा सुप्रीम कोर्टाच्या केसेसचे दाखले नमुद करावेत. तो पर्यंत सदंर्भ हवा हि विनंती शिल्लक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/19/2015 - 13:40

In reply to तो पर्यंत सदंर्भ हवा हि विनंती शिल्लक आहे. by माहितगार

Permalink

पेप्रात कुठेतरी वाचली होती अशी एक केस.

मी वकील ( होऊ शकलो ) नाही. ( अ‍ॅडमिशन अपघातानंतर कॅन्सल केल्री. ) तुम्ही अशा केसेस शक्य असल्यास शोधा किंवा वकिइल / कोर्ट गाठा.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 07/19/2015 - 13:49

In reply to पेप्रात कुठेतरी वाचली होती अशी एक केस. by dadadarekar

Permalink

'न धर्मी व्यक्ती हे स्टेटस

'न धर्मी व्यक्ती हे स्टेटस कायद्याला अमान्य आहे. याबाबत अनेक कोर्ट केसेस झाल्या आहेत.' स्टेटमेंट तुमच आहे, बरे तुम्ही एखादी केस झाली असण्याची शकयता आहे अथवा माझ्या वाचनात आल्याचे अंधूक आठवते असे काहीही म्हटलेले नाही, तेव्हा संदर्भ देण्याची पहिली (नैतीक) जबाबदारी आपली नाही का ? (बर मी तर कुठे शोधायचे ते आंतरजालीय दुवेही दिलेत) इतरांनी सुद्धा थोडीही शोधाशोध न करता ऐनचर्चेत आपल्याला 'पेप्रात कुठेतरी वाचली होती' असं सागीतलत तर आपली रिअ‍ॅक्शन काय असेल ?
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/19/2015 - 14:20

In reply to 'न धर्मी व्यक्ती हे स्टेटस by माहितगार

Permalink

संदर्भाची भिक्षा मागणारा तो भिक्कारडा ध्वज मिरवण्यापेक्षा

विकिपेडिया आर्टिकल नीट वाचा. त्यात महत्वाच्या कोर्ट केसेसचे संदर्भ दिलेले आहेत. मी वाचलेल्या केसमध्ये विवाहीत पुरुषाषाने नंतर धर्म सोडला व अता मी हिंदु नसल्याने / मला धर्मच नसल्याने बायकोस पोटगी देणार नाही असा दावा केला होता... पण कोर्टाने तो युक्तीवाद नाकारून पोटगी वारसाहक्क इ इ हे मूळच्या धमानुसार लागू होतील असा कोर्टाने निकाल दिलेला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 07/19/2015 - 14:36

In reply to संदर्भाची भिक्षा मागणारा तो भिक्कारडा ध्वज मिरवण्यापेक्षा by dadadarekar

Permalink

एनी वे हा घ्या माझ्याबाजूने एक सुयोग्य संदर्भ

दादा इंग्रजी विकिपीडियावरील Legal awareness या लेखाच्या इतिहासात जाऊन त्या लेखाची माहितगार नावाने किती संपादने आहात पहाल का ? विकिपीडियाची डिसक्लेमर्स आणि विकिपीडियाच्या मर्यादांचे विकिपीडियाने सांगीतलेले वाचन आपण केले आहे का ? आपण ज्या वाचलेल्या केसचा दुवा देत आहात त्यात त्याने पोटगीदेण्याच्या जबाबदारीपासून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला म्हणून कोर्टाने निकाल दिला असेल आणि वृत्तपत्रीय बातम्यांवरून कोर्टाने नेमका काय निकाल दिला याचे वाचन कसे शक्य होणार बरे ती वृत्तपत्रीय बातमीचा नेमका संदर्भही तुमच्या हाताशी नाही. एनी वे हा घ्या माझ्याबाजूने एक सुयोग्य संदर्भ Dr. Ranjeet Suryakant Mohite vs The Union Of India on 23 September, 2014 - Bench: A.S. Oka (बॉम्बे हायकोर्ट) वेळ वाचवायचा असेल तर त्यातील निकालाच्या ७व्या मुद्यापासून वाचन चालू करू शकता. ..... 7. 7. Clause (1) of Article 25 of the Constitution of India is in two parts. The first part confers fundamental right to freedom of conscience. The second part confers a right on a citizen to freely profess, practice or propagate any religion. We have already discussed the concepts of conscience and religion. The term religion cannot be necessarily theistic. Apart from the freedom of conscience, there is a fundamental right to freedom of speech and expression. Articles 19 and 25 confer a freedom of conscience on a citizen which is a fundamental right guaranteed by the Constitution of India. As far as the freedom of speech and expression is concerned, it guarantees the freedom to an individual from compulsion as to what he shall think and what he shall say. India is a secular democratic republic. The State has no religion. There is a complete freedom for every individual to decide whether he wants to adopt or profess any religion or not. He may not believe in any religion. If he is professing a particular religion, he can give up the religion and claim that he does not belong to any religion. There is no law which compels a citizen or any individual to have a religion. The freedom of conscience conferred by the Constitution includes a right not ash 8 pil-139.10 to profess, practice or propagate any religion. The right of freedom of conscience conferred on a citizen includes a right to openly say that he does not believe in any religion and, therefore, he does not want to practice, profess or propagate any religion. If the parents of a citizen practice any particular religion, he has a freedom of conscience to say that he will not practice any religion. There is a freedom to act as per his conscience in such matters. 8. Freedom of conscience under Article 25 of the Constitution encompasses in itself a freedom to an individual to take a view that he does not belong to any religion. The freedom conferred by Article 25 of the Constitution also includes a right of an individual to claim that he is an 'Atheist'. As the freedom of conscience confers a fundamental right to entertain a religious belief, it also confers a right on an individual to express an opinion that he does not belong to any religion. 9. No authority which is a State within the meaning of Article 12 of the Constitution of India or any of its agency or instrumentality can infringe the fundamental right to freedom of conscience. Any individual in exercise of right of freedom of conscience is entitled to carry an opinion and express an opinion that he does not follow any religion or any religious tenet. He has right to say that he does not believe in any religion. Therefore, if he is called upon by any agency or ash 9 pil-139.10 instrumentality of the State to disclose his religion, he can always state that he does not practice any religion or he does not belong to any religion. He cannot to be compelled to state that he professes a particular religion. 10. The prayer made in this Petition is to direct the Respondents to recognize "No Religion" as a form of religion. When an individual says that he does not practice or profess any religion, he does not belong to any religion or any religious sect. The other part of the Prayer Clause (A) seeks a writ of mandamus directing the Respondents not to insist on writing/mentioning/specifying/quoting religion in any of its forms or declarations which are to be filled in by a citizen. No individual can be compelled to state that he belongs to a particular religion, though he does not practice or profess the said religion. He has a fundamental right to state that he does not profess or practice any religion and, therefore, what follows is the second part of the Prayer Clause (A) which will have to be granted. Therefore, the Government Printing Press cannot deny request of a citizen to declare in the gazette that he does not belong to any religion. 11. Therefore, the Petition must succeed and we pass the following order: 10 pil-139.10 ORDER : (a) We issue a writ of mandamus directing the Respondents not to compel any individual to declare or specify his religion in any form or any declaration; (b) We declare that by virtue of Article 25 of the Constitution of India, every individual has right to claim that he does not belong to any religion and that he does not practice or profess any religion; (c) The order of the Government Printing Press is set aside to that extent; (d) The Petition is allowed on above terms. ( A.S.CHANDURKAR, J ) ( A.S. OKA, J ) उत्तरदायकत्वास नकार
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Sun, 07/19/2015 - 15:19

In reply to एनी वे हा घ्या माझ्याबाजूने एक सुयोग्य संदर्भ by माहितगार

Permalink

अप्रतीम माहिती महितगारजी.

अप्रतीम माहिती महितगारजी. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 07/19/2015 - 15:32

In reply to अप्रतीम माहिती महितगारजी. by अनुप ढेरे

Permalink

अनुपजी आपल्या वरच्या या

अनुपजी आपल्या वरच्या या प्रतिसादात आपल्याला 'कुठल्या ना कुठल्या धर्मात राहिलं पाहिजे ही भुमिका का होती?' असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेबाबत म्हणावयाच होत का ? आणि "न धर्मी व्यक्ती हे स्टेटस कायद्याला अमान्य आहे." म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला असं दादा दरेकरांना म्हणावयाचे होते का ? चार्वाक प्रकरण भारतीय दर्शनात एवढ प्रचंड प्राचीन आणि चर्चीत आहे की निधर्मीयतेवर भारतात टिका होईल पण कोणताही सच्चा हिंदू निधर्मी राहण्याचा अधिकार नाकारू शकणार नाही. आणि आतातर हा (राइट टू कन्सायन्स) अधिकार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संकेतांचा भाग आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागताना न धर्मी व्यक्ती होण्याचा निर्णय का घेतला नाही हा आपला प्र्शन असेल आणि न धर्मी राहता येत ह्याचा संदर्भ तर मी वर दिला आहे, आता आपण दादा दरेकरां प्रतिसादा करता वेळ देऊ. (दादांचा तुमच्या शंकेस प्रतिसाद नाही आला तर बाकी मंडळी आहेतच तुमच्या शंकांची उत्तरे देण्यासाठी)
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Sun, 07/19/2015 - 15:59

In reply to अनुपजी आपल्या वरच्या या by माहितगार

Permalink

अनुपजी आपल्या वरच्या या

अनुपजी आपल्या वरच्या या प्रतिसादात आपल्याला 'कुठल्या ना कुठल्या धर्मात राहिलं पाहिजे ही भुमिका का होती?' असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेबाबत म्हणावयाच होत का ? आणि "न धर्मी व्यक्ती हे स्टेटस कायद्याला अमान्य आहे." म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला असं दादा दरेकरांना म्हणावयाचे होते का ?
हो. कोणताच धर्म नको अशी भुमिका बाबासाहेबांनी का नाही घेतली अशी शंका आली. पण एका प्रतिसादात त्यांनी याची कारणं दिली आहेत असा उल्लेख आहे. सो ते वाचलं पाहिजे. कायद्याला मान्य नाही हा युक्तिवाद लंगडा वाटतच होता. तुमच्या माहितीने ते कन्फर्म झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/19/2015 - 17:31

In reply to अनुपजी आपल्या वरच्या या by अनुप ढेरे

Permalink

.

बाबासाहेबांच धर्मपरिवर्तन हा मुद्द वेगळा होता. बाबासाहेबाना समता व बंधुता यांचा शोध घ्यायचा होता. त्याना बौद्ध धर्मात उत्तर मिळाले. आजचा कायदा नdharmee स्टेटस मानतो का हा एक वेगळा मुद्दा होता. याचे उत्तर हो व नाही यांच्या सीमेवर आहे. तुमचे नधर्मी स्टेटस जोवर वाइट हेतूने नाही तोवर ते कोर्ट मान्य करते. उदा. मी कोर्टात नधमी असे जाहीर करुन गीता नाकारू शकतो. शाळेत नधर्मी असे जाहीर करुन धार्मिक प्रार्थनेतून बाहेर पडु शकतो. एखाद्या फॉर्मवर कोणत्याच धर्माचा नाही इ इ इ . पण मूळ एखाद्या धर्मातील वाइइट हेतूने निधर्मी स्टेटस घेत असेल तर कायदा त्याला विरोध करेल. उदा... एखाद्या हिंदूने जाहीर केले की मी आता हिंदु धर्म सोडला व आता मी एकपत्नी कायदा पाळणार नाही . तर त्यावेळी कायदा त्याचे बखोट धरून त्याला त्याच्या मूळच्या धर्मात बंद करेल. अशा कॉम्प्लिकेशन्समध्ये कोर्ट केसेसचे जजमेंट्स हे केस टू केस भिन्न भिन्न असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 07/19/2015 - 18:03

In reply to . by dadadarekar

Permalink

प्रश्नाचे उत्तर या पेक्षा अधीक असण्याची शक्यता ?

अशा कॉम्प्लिकेशन्समध्ये कोर्ट केसेसचे जजमेंट्स हे केस टू केस भिन्न भिन्न असतील.
हे ठिक.
पण मूळ एखाद्या धर्मातील वाइइट हेतूने निधर्मी स्टेटस घेत असेल तर कायदा त्याला विरोध करेल. उदा... एखाद्या हिंदूने जाहीर केले की मी आता हिंदु धर्म सोडला व आता मी एकपत्नी कायदा पाळणार नाही . तर त्यावेळी कायदा त्याचे बखोट धरून त्याला त्याच्या मूळच्या धर्मात बंद करेल.
इथे कायद्याची परिभाषा नेमकेपणाने समजाऊन घेण्यात गल्लत होत असावी. कमीत कमी क्लिष्टतेने समजून घ्यायचे तर (जिथ पर्यंत माझे वाचन आहे) जेव्हा दोन वेगवेगळ्या कायदे विषयक प्रावधाने परस्पर विरोधी असण्याची शक्यता संभवते सर्वसाधारण न्यायालयीन भूमीका ह्या कायद्याची अंमल बजावणी स्वतंत्रपणे करू आणि त्या कायद्याखाली वेगळी केस लावा त्याची अंमलबजावणी स्वतंत्रपणे करू अशी असते. त्यामुळे कुणी धर्म बदलला न धर्मीपणा कोणत्याही कारणाने जाहीर केला तरी इरिस्पेक्टीव्ह ऑफ हिज हेतू मूळच्या धर्मास बांधील ठेवणार नाही अशा न्यायालयीन कृतीने त्याच्या घटनात्मक स्वातंत्र्यावर बंधन येईल असे न्यायालय काहीही करणार नाही. त्याच वेळी दुसर्‍या कायद्यान्वये त्याच्या पुर्वाश्रमीपासून लागू असलेल्या जबाबदार्‍या त्यास टाळता येणार नाही इतपत दक्षता कायदा घेईल. सर्वसाधारणपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कॉपीराईट बद्दल माझे वाचन अधीक आहे . समजा क्ष व्यक्तीला काही बाजू मांडावयाची आहे त्याच्या प्रसिद्धीच्या स्वांतत्र्याबद्दल त्याने केस टाकली तर न्यायालय आधी त्याच्या प्रसिद्धी स्वातंत्र्याचे रक्षण करेल. विरुद्धबाजूने कॉपीराईट, गोपनीयता, बदनामी विषयक अथवा अन्य कायद्याने वेगळी केस लावली तर कोर्ट सर्वसामान्यतः सरमिसळ न करता प्रत्येक केसचा निकाल स्वतंत्रपणे देईल. (चुभूदेघे उत्तरदायकत्वास नकार लागू)
बाबासाहेबांच धर्मपरिवर्तन हा मुद्द वेगळा होता. बाबासाहेबाना समता व बंधुता यांचा शोध घ्यायचा होता. त्याना बौद्ध धर्मात उत्तर मिळाले.
समता व बंधुता यांचा शोध न धर्मी राहुनही घेतला जाऊ शकतो यापेक्षा बाबासाहेबांचा अभ्यास नक्कीच खूप अधीक असावा, अनुप ढेरे यांच्या प्रश्नाचे उत्तर या पेक्षा अधीक असण्याची शक्यता आहे. अर्थात (मी जरासा लिहूनही थकलो आहे) हि जबाबदारी मी आता इतर जाणकारांवर सोपवून आजच्या पुरता तरी या चर्चेतून निरोप घेतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 07/19/2015 - 18:25

In reply to प्रश्नाचे उत्तर या पेक्षा अधीक असण्याची शक्यता ? by माहितगार

Permalink

प्रतिसाद आवडले

पण आमचे दादूस फ़क्त काड्या टाकून मजा घेत आहेत. ते स्वत:ला पण सीरियसली घेत नाहीत. तुम्ही जास्त त्रास घेऊ नका.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 07/19/2015 - 18:35

In reply to प्रतिसाद आवडले by पैसा

Permalink

:) धन्स

:) धन्स
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 07/19/2015 - 18:59

In reply to प्रतिसाद आवडले by पैसा

Permalink

प्रतिसाद आवडले

प्रतिसाद आवडले पैसा - Sun, 19/07/2015 - 13:55 नवीन पण आमचे दादूस फ़क्त काड्या टाकून मजा घेत आहेत. ते स्वत:ला पण सीरियसली घेत नाहीत. तुम्ही जास्त त्रास घेऊ नका. ब्वार्र! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 07/21/2015 - 23:01

In reply to प्रतिसाद आवडले by पैसा

Permalink

+१

मूळ लेख आवडला. पण आमचे दादूस फ़क्त काड्या टाकून मजा घेत आहेत. ते स्वत:ला पण सीरियसली घेत नाहीत. तुम्ही जास्त त्रास घेऊ नका. अगदी अगदी. धोतर कितीही आकर्षक वाटले तरी सारखा हात लावू नये! ;) जोक अपार्टः वर एक मुद्दा आला नाही असे वाचताना वाटले. आला असला पण माझे वाचायचे राहीले असेल तर क्षमस्व. पण, भारतात नागरी (दिवाणी) कायदा हा धर्माधारीत आहे. त्यामुळे तो प्रत्येक प्रमुख धर्मानुसार वेगळा आहे. पण जे भारतीय उपखंडात तयार झालेले धर्म-पंथ आहेत त्या सगळ्यांची संस्कॄती समान असल्याने ते हिंदू बिल मधे समाविष्ट केलेले आहेत. त्यात निधर्मीपण येतात. कारण बर्‍याच वेळेस निधर्मी असले तरी बाकी सांस्कॄतिक दॄष्ट्या ते हिंदूच असतात. एक केवळ उदाहरणादाखलः कुंकू लावणे हे बर्‍यापैकी हिंदू सांस्कृतिक लक्षण समजता येईल. आता कम्युनिस्ट वॄंदा कारत या निधर्मी असल्यातरी सध्याच्या "माडर्न" युवतींपेक्षा ठळक कुंकू लावतात. त्या कधी गंमत म्हणून हिजाब अथवा बुरख्यात दिसणार नाहीत... तेच मेधा पाटकरांबाबत पण म्हणता येईल. थोडक्यात हिंदू धर्म हा रहाणीमानाने अनेकदा समान असतो, जरी कुठल्या देवाला पुजता अथवा पुजत नाही, (दुर्दैवाने) जाती (अजूनही) पाळता का पाळत नाहीत तरी देखील... म्हणून ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू, पार्सी सोडल्यास जर कोणी धर्माने हिंदू, बौध्द, जैन, शिख अथवा निधर्मी असला तरी त्याला दिवाणी कायद्यासाठी हिंदूच मानला जातो. वास्तवीक सेक्यूलर लोकशाहीत कायदा हा धर्मविरहीत मानला पाहीजे. पण ते आपल्याकडे घडलेले नाही. परीणामी आपण नुसतेच सिक्यूलर होऊन राहीलो आहोत....
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 07/20/2015 - 10:10

In reply to . by dadadarekar

Permalink

या साठीच समान नागरी कायदा

या साठीच समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे.(कुणाचाही धर्माच्या नावाने सवता सुभा नसावा.)आणि तो गोव्यात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 07/19/2015 - 15:44

In reply to संदर्भाची भिक्षा मागणारा तो भिक्कारडा ध्वज मिरवण्यापेक्षा by dadadarekar

Permalink

असो

संदर्भाची भिक्षा मागणारा तो भिक्कारडा ध्वज
हा ह्हा आमच्या खालील ध्वज परिणामकारक असल्याची ही पावती का ? (ह. घ्या) Image removed. केवळ दादांबाबत नाही तर कोणत्याही डिबेट मध्ये अबकड वादाचे झेंडे घेऊन फिरणार्‍या मंडळींना स्वतःच्याच वादाची माहिती पुरेशी ठरणारी नसते हेही ठिक; पण कुणी आपल्या भूमिकेस उपयूक्त माहिती देते आहे हेही लक्षात येत नाही; तरी टोकाच्या भूमिका दामटवण्याचा प्रयत्न चालू असतो. असो
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 07/19/2015 - 13:42

In reply to दिलेली विकि लिंक वाचलीत का ? त्यातच आहे. by dadadarekar

Permalink

माझ्या बाजूने पहीला संदर्भ

दादा तुमच्या कडचे संदर्भ कितीवेळात येतील मैत नाही. पण माझ्या बाजूने पहीला संदर्भ कोर्टात कोणत्याही शपथविधी देवधर्माचे नाव न घेता पार पाडणार्‍या एका भारतीयाचा वृत्तांत.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/19/2015 - 14:25

In reply to माझ्या बाजूने पहीला संदर्भ by माहितगार

Permalink

त्यात काय विशेष !

मीही कोर्टात पोस्ट मॉर्टेमच्या साक्षी देताना ' खरे सांगेन खोटे सांगणार नाही ' इतकीच साक्ष दिली होती. कॉणतेही पुस्तक नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/19/2015 - 14:27

In reply to त्यात काय विशेष ! by dadadarekar

Permalink

इतकीच शपथ घेतली होती.

..
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sun, 07/19/2015 - 15:03

In reply to इतकीच शपथ घेतली होती. by dadadarekar

Permalink

असे नाही का ?

भारतात तुम्हाला (म्हणजे भारतीयांना) ईश्वर किंवा धर्मग्रंथाच्या नावाने साक्ष घेण्याचे बंधन नाही कारण कोणतातरी धर्म असलाच पाहीजे असे बंधन नाही म्हणूनच तुम्ही (म्हणजे भारतीयांना) ईश्वर अथवा धर्मग्रंथाची सोबत न घेता सुद्धा शपथ घेऊ शकता. एनी वे मी सप्टेंबर २०१४चा बाँबे हायकोर्टाचा निकाल संदर्भार्थ आता वर दिलाच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 07/19/2015 - 11:40

Permalink

https://en.m.wikipedia.org

https://en.m.wikipedia.org/wiki/Irreligion_in_India हितैस भाउ वाचून घ्याया
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 07/19/2015 - 12:15

In reply to https://en.m.wikipedia.org by सुबोध खरे

Permalink

लेख आवडला...

लेख आवडला... @डॉक... पाषाणावर अभिषेक ! हे वाक्य / म्हण लक्षात ठेवा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गोरी का साजन, साजन की गोरी... :- आखिरी रास्ता
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 07/19/2015 - 12:28

Permalink

पालथ्या घड्यावर पाणी म्हणायचे

पालथ्या घड्यावर पाणी म्हणायचे का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 07/19/2015 - 12:35

In reply to पालथ्या घड्यावर पाणी म्हणायचे by सुबोध खरे

Permalink

हो... हे सुधा योग्यच आहे !

हो... हे सुधा योग्यच आहे ! १० जुलै ला शुक्रवारचा नमाज अदा केल्यावर मुस्लिम बांधवांचे "देशकार्य" जाता जाता :- 43 British women and girls in Syria, say police

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गोरी का साजन, साजन की गोरी... :- आखिरी रास्ता
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 07/19/2015 - 12:55

In reply to हो... हे सुधा योग्यच आहे ! by मदनबाण

Permalink

असल्या लोकांना रणगाड्यांखाली

असल्या लोकांना रणगाड्यांखाली चिरडले पाहिजे
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 07/19/2015 - 13:18

In reply to असल्या लोकांना रणगाड्यांखाली by टवाळ कार्टा

Permalink

असल्या लोकांना रणगाड्यांखाली

असल्या लोकांना रणगाड्यांखाली चिरडले पाहिजे हॅहॅहॅ... अहो ते आपले काश्मिरी बंधु आहेत ना ? भले त्यांनी पाकिस्तानचे झेंडे,आयसीसचे झेंडे फडकवले तरी चालेल,पण त्यांच्या "भावना" सुद्धा दुखावल्या जाता कामा नये. बाकी, यासिन मलिक सगळ्यांनाच ठावूक आहे नाही ? तो मुसलमान आहे ना ? दारु तर इस्लाम मधे "हराम" आहे ना ? मुस्लिम स्त्रीयांना उंचा सन्मान मिळतो ना ? मग याच यासिन मलिकचे दारु पिउन चालले उधोग पहा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गोरी का साजन, साजन की गोरी... :- आखिरी रास्ता
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Sun, 07/19/2015 - 14:04

In reply to हो... हे सुधा योग्यच आहे ! by मदनबाण

Permalink

पाकिस्तानचे झेंडे फडकावणे

पाकिस्तानचे झेंडे फडकावणे (काश्मिर किंवा मिरज दंगलीत), मुंबईतल्या अमर जवान ज्योतीला लाथ मारणे - अश्या लोकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो का? त्यात किती शिक्षा असते? कायदा माहित असणार्‍यांनी कृपया माहिती सांगा. केंद्रात आणि काश्मिरात भाजपा आहे (खरंतर कॉन्ग्रेस सोडून कोणी पण असेल तर) कारवाई होउ शकते. काँग्रेसला "भावनांची" काळजी असते / असायची, त्यामुळे त्यांनी मुंबईत "एवढा महिना जाउ द्या. नंतर कारवाई करू" असं सांगितलं आणि नंतर त्या कारवाईची कधी बातमी आलीच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 07/19/2015 - 19:35

In reply to पाकिस्तानचे झेंडे फडकावणे by नाव आडनाव

Permalink

मिरज दंगलीत इस्लामिक धार्मिक

मिरज दंगलीत इस्लामिक धार्मिक झेंडा फडकावला गेला होता, पाकिस्तानी झेंडा नव्हे. दोन्ही झेंडे बरेच सारखे असले तरी पूर्ण सारखे नव्हेत. जर पाकिस्तानी झेंडा फडकावला गेला असता तर कत्तलीच झाल्या असत्या.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Sun, 07/19/2015 - 20:59

In reply to मिरज दंगलीत इस्लामिक धार्मिक by बॅटमॅन

Permalink

हेच लिहिणार होतो.

पण मग इथले भगवे झेंडे माझ्यावर तुटून पडले असते. म्हणून लिवलं नाही. अनुमोदन
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sun, 07/19/2015 - 13:33

Permalink

मुस्लिम-बॅशींगचा अजून एक धागा

मुस्लिम-बॅशींगचा अजून एक धागा. अ लार्ज कप ऑफ . . . . . पॉपकॉर्न्स प्लीज....
  • Log in or register to post comments

Submitted by नमकिन on Sun, 07/19/2015 - 21:27

Permalink

कम्युनिस्ट

शिवाजी कोण होता या पुस्तिकेत कॅा. गोविन्द पानसरे यांचा रोख व बाबासाहेबांचा विचार भिन्न दिसला. पानसरे म्हणतात धर्म दुय्यम तर राज्य /सत्ता प्रथम.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल मेंढे on Tue, 07/21/2015 - 16:19

Permalink

डॉ. अभिराम दिक्षीत

आपण डॉ. अभिराम दिक्षीत असाल तर आनंद आहे.. अन्यथा हा लेख डॉ. अभिराम दिक्षीत यांच्या ब्लॉगवरून ढापलेला आहे असे म्हणावे लागेल.ही लींक बघा
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 07/22/2015 - 12:03

In reply to डॉ. अभिराम दिक्षीत by अमोल मेंढे

Permalink

हे तेच आहेत.

हे तेच आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रुस्तम on Wed, 07/22/2015 - 14:00

In reply to डॉ. अभिराम दिक्षीत by अमोल मेंढे

Permalink

भाऊ

लेखात नाव लिवलय की... - डॉ. अभिराम दिक्षित
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल मेंढे on Tue, 07/21/2015 - 16:24

Permalink

माफ करा

डॉ. माफ करा मी राजघराणं या आयडी चे डीटेल्स न बघता प्रतिसाद दिला.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Wed, 07/22/2015 - 12:45

Permalink

...

मेननच्या फाशीवर धागा कढा.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 07/22/2015 - 14:13

In reply to ... by dadadarekar

Permalink

अतिरेकी हितेश, तुम्हाला मेमन

अतिरेकी हितेश, तुम्हाला मेमन म्हणायचंय का?
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 07/22/2015 - 14:27

In reply to अतिरेकी हितेश, तुम्हाला मेमन by काळा पहाड

Permalink

अतिरेकी हितेश

अतिरेकी हितेश
वैयक्तिक हल्याचं कारण?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Wed, 07/22/2015 - 14:54

In reply to अतिरेकी हितेश by अनुप ढेरे

Permalink

अतिरेकी म्हणजे काय?

अतिरेकी म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 07/22/2015 - 15:38

In reply to अतिरेकी म्हणजे काय? by संदीप डांगे

Permalink

मला इथे तात्विक वाद घालायचा

मला इथे तात्विक वाद घालायचा नाही. वरील शेरा हा त्या सदस्याच्या इस्लाम प्रेमावरून आलेला आहे. आणि त्यावरून एखाद्याला अतिरेकी/दहशतवादी म्हणणं हे वैयक्तिक शेरेबाजीचं उदाहरण आहे. काळा पहाड हे अनेकदा असे वैयक्तिक शेरे मारताना दिसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 07/22/2015 - 15:54

In reply to मला इथे तात्विक वाद घालायचा by अनुप ढेरे

Permalink

अतिरेकी मेमनच्या फाशीबद्दल

अतिरेकी मेमनच्या फाशीबद्दल ज्याला वाद घालावा वाटतो, अशा माणसाला अतिरेकी म्हणण्याबद्दल मला काही चुकीचं वाटत नाही. उगीच शब्दांचे घोळ घालायला मी काही सेक्युलर नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by dadadarekar on Wed, 07/22/2015 - 17:06

In reply to अतिरेकी मेमनच्या फाशीबद्दल by काळा पहाड

Permalink

धागा फक्त वादासाठी नसतो.

त्या केसचे माहिती मिळावे यासाठी होत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com