Skip to main content

बेच दे !…… (शतशब्दकथा )

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 21/07/2015 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजाच्या कानाकोपऱ्यातून अंधार ओघळून गडदपणा वाढला की ट्राफिक हॉर्न मारतमारत घराकडे परतू लागायाचं, तरीही गेल्या काही आठवड्यांपासून झेडब्रिजवर, तो, हातामधल्या पाकिटातल्या, मधुचंद्राच्या आधी काढलेल्या फोटोकडे एकटक पाहत बसलेला असायाचा, जणूकाही आयुष्यात करण्यासारखं असं..... काही उरलंच नव्हतं त्याच्याकडे.….मनातून अगदीच रिकामटेकडा … वाऱ्यामुळे जमिनीवर उडणाऱ्या पानासारखा... दिशाहीन... निरुद्देश... फोनच्या रिंगटोनने त्याला एकदम भूतकाळातून बाहेर यायला मजबूर केलं… "अरे तुला सकाळी बोललो त्याबद्दल विचार केला का ?…. त्यातून तुझ्याच बहिणीसाठी नवी अँक्टीवा घेतां येईलनां !" पलीकडून घरजावई मेहुणा. "तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा" असं बोलून त्याने कॉल संपवला… दुसर्या दिवशी ओएलएक्सवर नवी जाहिरात झळकली विकणे: फक्त दोन वर्षे एकहाती वापरेली स्कुटी आणि नवाकोरा पाळणा …
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6929
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

ह्म्म्म आवडलीच. हेमींग्वेच्या लघुकथेची आठवण झाली.. For sale: baby shoes, never worn.

In reply to by विशाल कुलकर्णी

मलाही त्या कथेची आठवण झाली, पण गजोधरांची शशक जास्त आत घुसली. उगाचच वाचली असं वाटातंय आता. :(

कळायला वेळ लागला पण कळल्यावर डोक्यातून जात नाही अहे. देवा वाचव रे . शॉट लागला रे बाबा विदेशी वाचाळ

In reply to by विदेशी वचाळ

यैल्ला आपुनबी साला लिखाके सेंटी हो गयेला, उपरसे साला बाहर बारीश, माहौल बन गयेला था भीडू सुबैच्च ….

In reply to by संचित

त्याची बायको व पोर मेले. बायकोच्या स्कूटीच्या व पोराच्या सामानाच्या विक्रीच्या पैशावर रिकामटेकड्याचा डोळा आहे. .... आता याचा सिक्वल..... त्याचा दुसरा विवाह होऊ दिला जाणार नाही. तो आता भीष्माचार्य उर्फ कटप्पा होणार ! .....

बळच इमोशनल करायचा प्रयत्न Activa आणि पाळणा विकणे आहे वरून , येथे पेणचे पापड ,सोललेले वाल आणि परकर मिळतील ची आठवण झाली असो, पुढील जिलबीच्या प्रतीक्षेत :)

:( कथा खूप उशिरा कळली, पण कळली तेव्हा खूप चटका लावून गेली.