क्षितिजाच्या कानाकोपऱ्यातून अंधार ओघळून गडदपणा वाढला की ट्राफिक हॉर्न मारतमारत घराकडे परतू लागायाचं, तरीही गेल्या काही आठवड्यांपासून झेडब्रिजवर, तो, हातामधल्या पाकिटातल्या, मधुचंद्राच्या आधी काढलेल्या फोटोकडे एकटक पाहत बसलेला असायाचा, जणूकाही आयुष्यात करण्यासारखं असं..... काही उरलंच नव्हतं त्याच्याकडे.….मनातून अगदीच रिकामटेकडा … वाऱ्यामुळे जमिनीवर उडणाऱ्या पानासारखा... दिशाहीन... निरुद्देश... फोनच्या रिंगटोनने त्याला एकदम भूतकाळातून बाहेर यायला मजबूर केलं…
"अरे तुला सकाळी बोललो त्याबद्दल विचार केला का ?…. त्यातून तुझ्याच बहिणीसाठी नवी अँक्टीवा घेतां येईलनां !" पलीकडून घरजावई मेहुणा.
"तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा" असं बोलून त्याने कॉल संपवला…
दुसर्या दिवशी ओएलएक्सवर नवी जाहिरात झळकली
विकणे:
फक्त दोन वर्षे एकहाती वापरेली स्कुटी
आणि नवाकोरा पाळणा …
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म
ह्म्म्म
आवडलीच.
हेमींग्वेच्या लघुकथेची आठवण झाली..
For sale: baby shoes, never worn.+१
In reply to ह्म्म्म by विशाल कुलकर्णी
मलाही त्या कथेची आठवण झाली, पण गजोधरांची शशक जास्त आत घुसली. उगाचच वाचली असं वाटातंय आता. :(
+१११११११
In reply to +१ by तुषार काळभोर
+१११११११
बापरे
चटका लावणारी कथा. :-(
आशय पोहोचला.
.
कळायला थोडा वेळ लागला पण
कळायला थोडा वेळ लागला पण आवडली
कळायला झेड ब्रिज ओलांडून बादल
कळायला झेड ब्रिज ओलांडून बादल बरखा बिजलीपर्यंत जावं लागलं.
शॉट लागला रे बाबा
कळायला वेळ लागला पण कळल्यावर डोक्यातून जात नाही अहे.
देवा वाचव रे .
शॉट लागला रे बाबा
विदेशी वाचाळ
हा ना यार
In reply to शॉट लागला रे बाबा by विदेशी वचाळ
यैल्ला आपुनबी साला लिखाके सेंटी हो गयेला, उपरसे साला बाहर बारीश, माहौल बन गयेला था भीडू सुबैच्च ….
गजोधर भाऊ (भैय्या) शतशब्दकथा
गजोधर भाऊ (भैय्या) शतशब्दकथा भारी लिहिता तुम्ही.
अब रुलाएगा तू पगले. :-(
अब रुलाएगा तू पगले. :-(
नि:शब्द
..........
!!!
कथा फारच टोचली!
:(
:(
फॉर सेल: बेबी शुज, नेव्हर
फॉर सेल: बेबी शुज, नेव्हर युझ्ड वाल्या गोष्टीची प्रकर्षाने आठवण झाली :(
शतशब्दकथा
→आर → पार →
.
.
: (
: (
नाही कळली
परत परत वाचून देखील नाही कळली. कोणी सांगेल का सस्पेन्स?
.
In reply to नाही कळली by संचित
त्याची बायको व पोर मेले.
बायकोच्या स्कूटीच्या व पोराच्या सामानाच्या विक्रीच्या पैशावर रिकामटेकड्याचा डोळा आहे.
....
आता याचा सिक्वल..... त्याचा दुसरा विवाह होऊ दिला जाणार नाही. तो आता भीष्माचार्य उर्फ कटप्पा होणार !
.....
च्यायला का लिहीता रे असलं! :(
च्यायला का लिहीता रे असलं! :(
म्हणजे ??
म्हणजे ??
नक्की काय झालं तेच कळाले नाही ...
असो .
काय राव ! उगाच वाचली! अतिशय
काय राव ! उगाच वाचली! अतिशय कमी शब्दात रंगवली... दंडवत स्विकारा मालक !
_/\_
:(
:(
आईग्गं!!!
टोचली
अगदी आरपार.......
कथा आवडली
कथा आवडली
उदास केलंत
कथा छानच. मोजक्या शब्दांत किती कारुण्य!
पोहचली...
मस्त तरी कशी म्हणावे.. :(
वाचून कसे
वाचून कसे तरी च झाले.
मस्त आहे असे तरी कसे म्हणणार ......
:(
.
बळच इमोशनल करायचा प्रयत्न
बळच इमोशनल करायचा प्रयत्न
Activa आणि पाळणा विकणे आहे वरून , येथे पेणचे पापड ,सोललेले वाल आणि परकर मिळतील ची आठवण झाली
असो, पुढील जिलबीच्या प्रतीक्षेत :)
त्ये पोर कशाला मारता बे
त्ये पोर कशाला मारता बे.... पु. लं च्या रावसाहेब मधून...
:(
निःशब्द
निःशब्द
हुरहुर लावणारी कथा
हुरहुर लावणारी कथा
:(
:(
भोगणार्याला कळत!!
भोगणार्याला कळत!!
म्या बी एकदा तिसर्या म्हयन्यात दुपटी वाळवली होती. बाहेर निघालीच नाहीत.
छान लिहिलंय!
छान लिहिलंय.
:(
:(
कथा खूप उशिरा कळली, पण कळली तेव्हा खूप चटका लावून गेली.
अग आइ ग खरच् सोलिद कथा..
अग आइ ग खरच् सोलिद कथा..