Skip to main content

देशभक्ती आणि स्वार्थत्याग

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 19/07/2015 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच एक 1930 साली बनलेला पहिल्या महायुद्धावरील चित्रपट All Quiet on the Western Front पाहिला . युद्ध सुरू असताना तरुणांना देशभक्तीने प्रेरित करून लष्करात भरती करण्यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील असते. अशाच एका प्रोफेसरच्या देशभक्तीपर प्रेरणादायक भाषणाने भारावून गेलेले काही कॉलेज-युवकांची एक बॅच सैन्यात भरती होते , परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर चित्र निराळे असते . अपुरे अन्नपाणी व तुटपुंजा शस्त्रपुरवठा आणि खडतर प्रवास .त्यात शत्रू अधिक बलवान आणि शस्त्रसंपन्न. त्यामुळे या बॅच मधील बहुतेक जण मृत्यूमुखी पडतात . शेवटी पॉल नावाचा एक सैनिक सुट्टी घेवून घरी येतो ,पण घरीदेखील आशादायक परिस्थिती नसते ! अन्नतुटवडा आणि इतर अडचणी शहरात देखील असतात .पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीची जरादेखील कल्पना नसलेले नागरिक आता जर्मनी फ्रान्सचा लवकरच पराभव करून पॅरिस वर जर्मन झेंडा फडकावील आशा भ्रमात असतात . नाइलाजाने पॉल सुट्टी लवकर संपवून युद्धभूमीवर परत जातो आणि शेवटी शहीद होतो ! देशभक्ती व इतर गोष्टी या कागदावरच्या गप्पा ठरतात ,प्रत्यक्षात फक्त मृत्यू हा एकच त्या अभागी सैनिकांच्या सुटकेचा उपाय बनून राहतो ...अशी काहीशी कथा आहे ..... चित्रपट पाहिल्यावर् मनात काही विचार आले, एक तर ही 100 वर्षापूर्वीची कथा आहे. आज परिस्थिती फार निराळी आहे. आज प्रत्येक देशाकडे किंबहूना भारताकडे समर्थ व पुरेशा संख्याबलाचे सैन्य आहे. पण न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील? आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ? यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !

वाचने 34833
प्रतिक्रिया 141

प्रतिक्रिया

इथले काय करतील हे सोडा. तुम्ही भारतात किमान परत तरी याल का ?

मंदारभाऊ, जिथे सैन्यभरती होत असते तिथे जाऊन बघा १०० जागा असतील तर किमान ७-८००० उमेदवार उभे असतात. यापैकी बरेच जण कित्येक दिवस आधीपासून सराव करत असतात. सो परिस्थिती इतकीही वाईट नाही आहे.

पाच-दहा हजार रुपयांसाठी काहीही करायला तयार होतील असे अनेक लोक असावेत इतके दैन्य आपल्या देशात अजूनही आहे त्यामुळे सैन्य भरतीला तुटवडा नाही.

In reply to by संदीप डांगे

सगळ्याच देशात असतात म्हणूनच प्रत्येक देशाकडे सैन्य आहे आणि तेच मारले जातात ढिगाने. मोठ्या बिझनेसमनचा किंवा राजकारण्याचा मुलगा युद्धात मारला गेला असं होतं का कधी? अशी कामं करायला माणसं हवीत म्हणून तर गरिबी हवी असते.

In reply to by नगरीनिरंजन

ओके. तुमच्या विधानांवरून असे समजते की १. गरीबी असते म्हणून लोक सैन्यात भरती होतात. २. सगळे श्रीमंत असते तर देशभक्ती नसती. ३. श्रीमंत देशभक्त नसतात आणि देशभक्त गरीब असतात ४. गरीबच देशभक्त असतात म्हणून सैन्यात जातात, ५. सैन्यात जाणारे श्रीमंत नसतात. एवढ्यातच एका नेत्याचे मुक्ताफळ ऐकले होते की फुकट दारू मिळते म्हणून लोक सैन्यात जातात. तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात का?

In reply to by संदीप डांगे

देशभक्त सगळेच असतात हो. विशेषतः ज्यांना जास्त फायदा आहे ते जास्त देशभक्त असतात. पण देशभक्तांना स्वार्थत्याग कम्पल्सरी नाही. तो करण्याची मजबूरी फक्त गरिबांना असते. तुमच्या विधानांवरुन असं वाटतंय की लोक देशभक्तीसाठी सैन्यात जातात. उद्या सैन्यात पगार किंवा कोणत्याही जास्तीच्या सुखसोयी मिळणार नाहीत अशी घोषणा करा आणि मग बघा किती लोक सैन्यभरतीसाठी देशभक्तीपोटी उभे राहतात ते. एकतर गरिबीच्या मजबुरीमुळे किंवा प्रतिष्ठा मिळवायला लोक सैन्यात जातात. शिवाय सैन्यात जाऊन भ्रष्टाचार करणारेही काही असतातच.

In reply to by नगरीनिरंजन

म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, विजापूर असो का दिल्ली त्यांची सैन्यास पगार देण्याची कपॅसिटी बहुतांश कालावधीत अधीक असणार तरीही सैन्य लढत होत. शिवाजी महाराज हयात नव्हते एक युवा छत्रपती क्रुरपणे बळी गेला, दुसरा छत्रपती दूर कुठल्याशा कोपर्‍यात होता त्याच्या पत्नीला साथ देतही सैन्य लढत होत. त्यांनीही पैसे मागीतले असतील इमाने वतने आणि पेशवाई जहागिरीच्या अपेक्षा ठेवल्या असतील पण त्याच अपेक्षा औरंगजेब कितीतरी वेगाने पुर्‍या करू शकला असता पण अत्यंत कठीण परिस्थितीत सैन्य लढत होत, कारण बहुधा त्यांच्यावर जीव लावणाराही तसाच होता. ! बॉस चांगला असेल तर पगार न पुरताही माणसं मन लावून काम करतात (किमान माझा बॉसम्हणून अनुभव या बाबत चांगला आहे) लोक विशीष्ट हेतुसाठी पेटून उठत नाहीत अस नाही त्यांना जागवणारा पोशींदा कसा आहे यावर बरेच काही अवलंबून असावे.

In reply to by माहितगार

सौदीत डॉक्टरला पगार जास्त मिळतो म्हणून प्रत्येक डॉक्टर सौदीच्या विंटरव्ह्यूला गेला तर प्रत्येकजण लेक्ट होइइल का ? सगाळ्ञाणा दील्ली गाठणे कसे जमेल ? गाठली तरी प्रत्येकाला नोकरी मिळेल का ?

In reply to by dadadarekar

सगाळ्ञाणा दील्ली गाठणे कसे जमेल ?
आधी दिल्ली असो वा विजापूर दरबारचे मांडलीक महाराष्ट्रात पडीक होतेच आणि नंतर दिल्लीचा बादशहा स्वतःच महाराष्ट्रातच येऊन बसला होताना. छत्रपती शिवाजीपण आर्थीक मोबदला देत असतील पण आदीलशाही असोवा मुघल त्यांच्या राज्याचे कारभाराचे प्रमाण पहाता शिवाजी महाराजांच्या अमला खालील क्षेत्र फारच कमी होते अधिक आर्थीक मोबदला देण्याची कुवत आदीलशाही अथवा मुघलांकडे असेल त्याच्याशी कितीही केले तरी शिवाजी महाराज कितपत मॅचकरू शकत होते माहित नाही. अर्थात हा हवेतला तर्क झाला या बद्दल ऐतिहासीक दस्तएवजातून अगदी माहिती मिळणार नाही असे नसावे पण त्या दिशेने इतिहास संशोधकांनी दस्तएवज अभ्यासले आहेत का नाही याची कल्पना नाही.

In reply to by माहितगार

औरंगजेबाकडे सुद्धा कर्तबगार, हुशार आणि शूर लोक असणारच. तेव्हा एखाद्यानं तिकडे जाण्यासाठी अर्ज केला तर त्याला तिकडे लगेच मॅनेजर च्या जागेवर घेतील असं नसणारच. तिथे पण काँपिटिशन असणार. तेव्हा "कारण बहुधा त्यांच्यावर जीव लावणाराही तसाच होता" हे बरंचसं खरं असणार पण पूर्णपणे नसावं. शिवाजी महाराजांनी सुरत आणि बाकी शहरे जी लुटली होती ती खजिना जमा करण्यासाठी कारण सैन्य पोटावर चालतं. महाराजांचे सैनिक हे पूर्ण वेळ सैनिक नव्हते. ते शेतकरी आणि बारा बलुतेदार होते (अर्थात तेव्हाची बहुतेक सैन्ये अपवाद वगळता अशीच होती). पण काही थोडं खडं सैन्य असावंच लागे. त्यांचा पगार देण्यासाठी चौथाई वसूल करावी लागे. बाकीचे सुलतान संपूर्णपणे लुटालूट करणारे हे सुद्धा चित्र फारसं खरं नसावं असं मला वाटतं कारण काही अपवाद वगळता जनतेनं किंवा सैन्यानं सुलतानांविरुद्ध उठाव केलेला दिसत नाही.

In reply to by माहितगार

छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैनिकांना कधीही अर्धपोटी वगैरे ठेवत नसत. सैन्याची व्यवस्थित काळजी घेतल्यामुळेच त्यांना यश मिळाले. त्यांनी पैसे-चारापाणी वगैरे न देता नुस्त्या हिंदवी स्वराज्याच्या गफ्फा मारल्या नाहीत. त्यांना माहीत होते की युद्ध आणि राजकारण ही काय चीज आहे ते. म्हणूनच ते इतक्या बलवान मुघल साम्राज्याशी यशस्वीरीत्या टक्कर घेऊ शकले. बाकी संभाजीराजांनंतरच्या कालखंडात तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तेव्हाही इतर अनेक फॅक्टर होतेच. रादर राजारामकाळापासूनच सरदार नवीन मुलूख आपल्या नावे करून मागू लागले-तिथे अंमल बसण्याअगोदरच. तेव्हा आर्थिक फॅक्टर हा एकमेव नसला तरी नेहमी बर्‍यापैकी महत्त्वाचा फॅक्टर असतो असे म्हटले तरी चालेल.

In reply to by बॅटमॅन

साक्षात शिवाजीराजना a काही महिने व त्यांच्या नातवाला काहे दशके सांभाळणारा औरंग्या स्वतःच्या सैनिकांना मात्र उपाशी ठेवत असेल का ?

In reply to by टवाळ कार्टा

तसं नाही टवाळ भाऊ, तो प्रश्न दादांना होता. त्यांना तुम्ही "तुमचे" (म्हणजे दादांचे) फॅन असल्याचं सांगूनही ते परत विचारत आहेत कोणाचे - दादा दरेकरांचे की औरंग्याचे. रच्याकने औरंगजेबाचा फॅन कोणी असू शकतं हे मी पहिल्यांदाच बघतोय.

In reply to by नाव आडनाव

औरंगजेब तर भारताचा शेवटचा अनभिषीक्त सम्राट होता...जगातल्या त्यावेळच्या पहिल्या १० शक्तीशाली सम्राटांत त्याची गणना व्हायची म्हणे...त्याच्यानंतर कोणी केलेय का अस्सा दरारा जगभर? रच्याकने अफजूलखानाचे सुध्धा फ्यान्स आहेतच की...तो औरंगजेबापेक्षा थोड्डासाच कमी पराक्रमी होता

In reply to by टवाळ कार्टा

औरंगजेब तर भारताचा शेवटचा अनभिषीक्त सम्राट होता...जगातल्या त्यावेळच्या पहिल्या १० शक्तीशाली सम्राटांत त्याची गणना व्हायची असे असून सुद्धा औरंगजेबाने कोणताही महत्वाचा शोध लावला नाही किंना संशोधन केले नाही. याचा तीव्र निषेध

In reply to by कपिलमुनी

हो ना ! आणि मुख्य म्हणजे त्याच्या पदरी असलेल्या एकाही सरदाराने सुद्धा कोणताही महत्वाचा शोध लावला नाही !! =)) (इतकी महत्वाची गोष्ट आमच्या अगोदरच का ध्यानात आली नाही बरे ?! अतिशय चिंतनीय गोष्ट !)

In reply to by टवाळ कार्टा

रच्याकने अफजूलखानाचे सुध्धा फ्यान्स आहेतच की...तो औरंगजेबापेक्षा थोड्डासाच कमी पराक्रमी होता
अफझलखान औरंगजेबापेक्षा जास्त पराक्रमी होता. अफझलखान महाराजांवर चालून आला त्याच्यापूर्वी दोन वर्षांआधी त्याने औरंगजेबाला वेढ्यात पकडले होते. औरंगजेब ताब्यात मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी अफजलखानाच्या हाताखालील खान महंमदने दिल्लीच्या शाहजहानशी पंगा का घ्या म्हणून अफजलखानाच्या संमतीविना परस्पर औरंगजेबाला सोडून दिले. त्यावर अफझलखान पिसाळला. खान महंमदला ताबडतोब विजापूरला बोलविले गेले.तो दरबारात शिरत असतानाच त्याच्यावर तलवारीचे वार करून त्याचे तुकडे करण्यात आले. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये हे सगळे दिले आहे. (राजा शिवछत्रपती दहा-पंधरा वेळेला वाचलेला) पुव

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपतीमध्ये हे सगळे दिले आहे.
आता याला सुध्धा खात्रीलायक पुरावा म्हणायचे का?

In reply to by टवाळ कार्टा

टकाशेट, राजा शिवछत्रपती म्हणजे गीता नव्हे हे जरी खरे असले तरी पूर्ण फेकाफेकीही आजिबात नव्हे. बेसिक फॅक्टशी त्यांनी इमानदारी बह्वंशी ठेवलेली आहे. ओव्हर द टॉप वर्णने सोडून बेसिक फॅक्टचेकिंग केलं तर खूप विधानांमागे कैतरी आधार हा मिळेलच यात संशय नाही.

In reply to by बॅटमॅन

ओव्हर द टॉप वर्णने सोडून बेसिक फॅक्टचेकिंग केलं तर खूप विधानांमागे कैतरी आधार हा मिळेलच यात संशय नाही.
याबद्दल पूर्णतः खात्री वाटत नाही, तेव्हा असहमती. लहानपणी "राजा शिवछत्रपती" आणि "श्रीमान योगी" बर्‍याचदा वाचलेत आणि त्यावेळी त्यांनाच इतिहास म्हणून समजतपण होतो. इथे असं वाटतं की "ओव्हर द टॉप वर्णने" ही लेखकाला जे ऐतिहासिक घटनांमधून अभिप्रेत होतं तेच वर्णन करतात. म्हणजे असं की गाभा जरी छटाक असेल तरी किलोभर इतर गोष्टी अ‍ॅडवलेल्या असल्याने त्याला पूर्णतः इतिहास म्हणणे अथवा "कैतरी आधार हा मिळेलच" असा विश्वास टाकणे तितके सहजपणे शक्य आहे असं वाटत नै. (बाकी इतिहासाची आवड निर्माण व्हायला हीच पुस्तकं कारणीभूत ठरली हे मात्र तितकंच खरंय.. :) )

In reply to by अस्वस्थामा

स्पेसिफिक उदाहरण देतो, देवगिरीच्या लुटीचे वर्णन हे फेरिस्ता व अन्य मध्ययुगीन इतिहासकारांच्या ग्रंथांतून आहे तसे घेतलेले आहे. ते अतिरंजित आहे असे संशोधकांचे मत असले तरी पूर्ण कपोलकल्पितही नाही. मेन म्हणजे पुरंदर्‍यांनी ते पदरचे घातलेले नाही. बाकी फक्त फॅक्च्युअल मिष्टेक्स पाहिल्यात तर त्या कमीच भरतील असे वाटते. अर्थात
इथे असं वाटतं की "ओव्हर द टॉप वर्णने" ही लेखकाला जे ऐतिहासिक घटनांमधून अभिप्रेत होतं तेच वर्णन करतात. म्हणजे असं की गाभा जरी छटाक असेल तरी किलोभर इतर गोष्टी अ‍ॅडवलेल्या असल्याने त्याला पूर्णतः इतिहास म्हणणे अथवा "कैतरी आधार हा मिळेलच" असा विश्वास टाकणे तितके सहजपणे शक्य आहे असं वाटत नै.
याच्याशी सहमत आहे हेवेसांनल.

In reply to by बॅटमॅन

ओव्हर द टॉप वर्णने सोडून बेसिक फॅक्टचेकिंग केलं तर खूप विधानांमागे कैतरी आधार हा मिळेलच यात संशय नाही.
आधार मिळेल म्हणजे? तो आधार शक्य तिथे स्वतः पुरंदर्‍यांनी लिहिलेला आहे. उदाहरणार्थ अमुक अमुक या तारखेला लिहिलेल्या पत्राचा हिंदवी तर्जुमा हे शब्द अनेक ठिकाणी पुरंदर्‍यांनी वापरले आहेत.या सगळ्या कागदपत्रांचा त्यांनी स्वतः अभ्यास केलेला आहे. त्याविषयी शंका नाहीच. खटकण्यासारखी गोष्ट (कोणाला वाटलीच तर) ही की त्यांची लिहायची स्टाईल ही रिसर्चरची नाही तर शाहिराची आहे. म्हणजे पावनखिंडीतल्या प्रसंगाचे वर्णन करताना--'स्वातंत्रदेवी तुझ्या लेकरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शेकडो वर्षे वारकरी पंढरपूरला जात आले आहेत.आज धारकर्‍यांनी गगनाला गवसणी घातली. आता तरी प्रसन्न हो' किंवा महाराज आग्र्याहून परतल्यानंतर 'औरंगजेबाचा एका ढाण्या वाघाने जिव्हारी लावणारा चितपट पराभव केला' असे लिहिले आहे. ही वाक्ये रिसर्चरला शोभेशी नक्कीच नाहीत.पण पुरंदर्‍यांनीही स्वतःला शिवशाहिर असेच म्ह्टले आहे. रिसर्चर असल्याचा दावा त्यांनी केलेला नाही.तरीही याचा अर्थ पुरंदर्‍यांनी काहीही अभ्यास न करता थापा मारल्या आहेत असे कोणीच म्हणू शकणार नाही.

In reply to by dadadarekar

तुम्ही औरंगजेबाचे फ्यान....आम्ही (म्हणजे मीच) तुम्चा फ्यॅन (णाणा-मैंचा फ्यॅन अजुन हैच)...म्हणजेच मी औरंगजेबाचा फ्यॅन :) आप्ल्याला (म्हणजे परत मीच) चिकाटी आव्डली तुम्ची :) इतकी चिकाटी जर मला हापिसातल्या कामात उपयोगात आण्ता आली तर माझे आठवड्याचे काम एका दिव्सात संपेल :)

In reply to by dadadarekar

नाहीच की. पण सैनिकांकडून यश मिळणे आणि त्यांना पगार ठीकठाक वेळेवर देणे याची लिंक असतेच असे कोणी सांगितले तुम्हांला? :) औरंग्याला यश नाय मिळाले त्याची कारणे वेगळी आहेत.

In reply to by नगरीनिरंजन

उद्या सैन्यात पगार किंवा कोणत्याही जास्तीच्या सुखसोयी मिळणार नाहीत अशी घोषणा करा आणि मग बघा किती लोक सैन्यभरतीसाठी देशभक्तीपोटी उभे राहतात ते. पगार सगळ्याच नोकरदार लोकांना मिळतो की. त्या पगारासाठी छातीवर गोळी खाण्याची तयारी असणार्‍या लोकांचा असा उपहासात्मक उल्लेख खटकला. सौरभ कालियाला त्या तोकड्या पगाराची फार मोठी रक्कम चुकवावी लागली.

In reply to by मृत्युन्जय

एक्झॅक्टली. कालिया, उन्नीकृष्णन इत्यादी साध्या घरातल्या मुलांनी जीव गमावला. त्याची भरपाई नुसते सैनिकांचे पवाडे गाऊन होईल काय? देश, आपली संपत्ती, भूभाग वगैरे भ्रामक कल्पनांचा नाश करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सोडून या कल्पनांच्या वेडापायी आणखी लोकांचे जीव जावे म्हणून प्रयत्न केले पाहिजेत का? प्रत्यक्षात संपत्ती कोणाची, सत्ता कोणाची काही समजण्याची तसदी कोणी घेणार आहे की नाही? एसीत बसून युद्धखोरांना व सैनिकांना नावे ठेवणारे लोक सैनिकांचे पोकळ कौतुक करुन त्यांच्या जीवावर उठणार्‍या लोकांपेक्षा बरेच म्हणायचे.

In reply to by नगरीनिरंजन

देश, संपत्ती वगैरे भ्रामक कल्पनांच्या जंजाळातुन लोकांना मुक्त करण्याचे प्रयत्न करणार्‍यांना देखील त्यांचं कार्य अबाधीत चालु रहावं म्हणुन सन्यस्त खड्ग  धारकाची गरज पडते. युद्धखोरी सैन्याला जन्म देते, सैन्य युद्धखोरी पसरवत नाहि. मानवी गुणावगुणांच्या मर्यादा सैनीकी पेशामधे शोधण्याचं कार्य त्याच सैनीकांच्या भरोशावर निवांत जीवन जगत असताना करता येतं. व्यवहारी जगाचे सर्व भलेबुरे नियम सैन्यालाही लागु होतात पण म्हणुन त्याची उदात्तता कमी होत नाहि.

In reply to by अर्धवटराव

युद्धखोरी सैन्याला जन्म देते हे मान्य. पण युद्धखोरीला कोण जन्म देतं? सैनिकांचा उदोउदो करणार्‍या देशभक्तांची उपभोग लालसा. त्यापायी मग स्वतःच्या जंगलांसाठी व जमिनींसाठी तुट्पुंज्या शस्त्रांसह लढणार्‍या आदिवासींना देशद्रोही ठरवलं जातं आणि त्यांना किड्यामुंग्यांसारखं टिपणार्‍या महाबलाढ्य सैन्याला देशभक्त. अशा समाजाने आपल्या सैन्याला सन्यस्त खड्ग म्हणणे हा विनोद आहे. बाकी आपण युद्ध केलं नाही तर बाजूचा करेल हा भ्रम प्रत्येकाच्या मनात असेल तर युद्ध अटळच आहे.

In reply to by नगरीनिरंजन

विकासाचा समतोल सांभाळु न शकणार्‍या व्यवस्था आणि त्याला जाब विचारणयास असमर्थ नागर समाजाने आपलं पाप लश्कराच्या माथी मारणं हा तर महाभयानक विनोद झाला मग. वड्याचं तेल वांग्यावर काढलेलं बघितलय.. अगदीच... असो.
बाकी आपण युद्ध केलं नाही तर बाजूचा करेल हा भ्रम प्रत्येकाच्या मनात असेल तर युद्ध अटळच आहे.
असल्या भ्रमातुन बाहेर पडुन नि:शस्त्र व्हायची अवदसा आपल्या देशाला कधिही आठवु नये.

In reply to by नगरीनिरंजन

जंत्री मोठी आहे. पण काय करतात यापेक्शा ते गांधीज् विथ गन्स सारख्या लांछनास्पद खेळाची मजा उपभोगत नाहित हे महत्वाचं.

In reply to by नगरीनिरंजन

आधी तुम्ही म्हणत होतात की हे लोक फक्त पगारासाठी काम करतात. आता तुम्ही वेगळा स्टँड घेत आहात. युद्ध कुणालाही नको आहे. तुम्हाला नाही तसे मलाही नाही आणी सीमेवर लढणार्‍या लोकांना तर नाहिच नाही. पण म्हणुन सैन्याची गरज संपत नाही. ज्या कित्येक देशांकडे स्वतःचे सैन्य नाही त्यांना इतर देशांपासुन धोकादेखील नाही. मी कितीही कबुतरे उडवली तरीही माझा शेजारी जर माझ्यावर शिकारी कुत्रे सोडणार असेल तर मला देखील स्वसंरक्षण करणे भाग आहे आणि कधीतरी त्याच्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी सशस्त्र सैनिकांची देखील मला गरज आहेच. ६२ सालपर्यंत कबुतरे उडवण्याने आपला काही फायदा झाला नाही (उलट प्रचंड नुकसान झाले) हे तर जगजाहीर आहेच की. या ज्या सैनिकांबद्दल आपण बोलतो आहोत ते ऐदी, ऐषारामी, गुलछबु दारुबाज आणि विलासी जीवन जगणारे तरुण नाहित. ते अतिशय कष्टाचे आणि धोक्याचे जीवन जगत आहेत. आणि ते जे काम करत आहेत त्यासाठी त्यांना योग्य मोबदला मिळणे देखील गरजेचे आहेच. ६२ च्या युद्धात गंजलेल्या संगिनी घेउन लढलेले सैनिक केवळ त्या संगिनी पोटात खुपसुन चार लोकांना मारणे एवढेच करु शकले. त्यांना गोळ्या पुरवणे ही देखील आपलीच गरज आहे. एक लक्षात घ्या की आपली गरज म्हणुन त्यांना सीमेवर उभे रहायला लागत आहे. देश, आपली संपत्ती, भूभाग या संकल्पना भ्रामक आहेत हे देखील विनोदीच विधान झाले. उद्या तुमच्या घरात घुसुन तुमचे घर साफ करणार्‍या दरोडेखोरांबाबत देखील आपण हीच भूमिका घ्याल का? आणि मी लाख हा दृष्टीकोन ठेवीन हो. पण समोरच्याने नाही ठेवला तर मग काय उपयोग? अवघे विश्वची माझे घर हे सगळे ठीक आहे पण मग अमेरिका मला तिच्या भूभागावर सहजी पाय ठेउ देइल काय्? त्यांना सगळे सोपसकार पाहिजेत. सैन्य पदरी न बाळगणार्‍या देशांनादेखील पाहिजेत. मग त्या संकल्पना भ्रामक कश्या ठरतात? अजुन आख्खी दुनिया संतपदाला नाही ना पोचलेली? आणि कधी पोचणारही नाही. मग या संकल्पना भ्रामक ठरत नाहित हो.

In reply to by मृत्युन्जय

शब्दाशब्दाशी सहमत. कसे असते की राष्ट्रवाद भ्रामक कसा, देश ही संकल्पना कशी चुकीची असे काही बोलले की आपली लिबरल, उदारमतवादी अशी क्रेडेन्शिअल्स सिध्द करता येतात ना.त्यातलाच हा भाग. यांना लाख म्हणायचे असेल की देश ही कल्पना चुकीची आहे पण शेजारच्या देशातले अतिरेकी इथे मारायला येतात ते इथल्या भारतीयांना आणि हिंदूंनाच. अशा वेळी अशा एसीमधले बसून कळफलक बडविणारे लोक लढायला जात नाहीत.लढायला जातात ते उन्नीकृष्णन सारखे लोक. ते लोक आहेत म्हणून या असल्या फुकट*ट लोकांना कळफलक बडवायला मिळतो. अशा लोकांना दिसतील तिथे चोपायला हवे.

In reply to by मृत्युन्जय

+१०० थोडक्यात पण सारासार विवेकावर आणि सत्य वस्तुस्थितीवर आधारलेला प्रतिसाद. सैन्याविरुद्ध बोलणार्‍या लोकांना सद्या पाकीस्तानने आपल्या सीमेवर चाललेल्या गोळीबारात दोन दिवस रहायला लागले तर (कदाचित) मतबदल होईल. अन्यथा, "जगातले सगळे कसे सत्वशील माणसे बनली पाहिजेत/आहेत." असा विचार सैन्याच्या संरक्षणात सुखाने आपल्या ऑफिसात किंवा घरात बसूनच सुचू शकतो.

In reply to by नगरीनिरंजन

मोठ्या बिझनेसमनचा किंवा राजकारण्याचा मुलगा युद्धात मारला गेला असं होतं का कधी?
बिझनेसमनचे माहित नाहिउ पण राजकारण्यांची मुले/नातेवाईक मारली गेली आहेत युद्ध्द्दात. १. इस्राइलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा भाऊ युगांडातील प्लेन हायजॅक ऑपरेशन मध्ये मारला गेला. स्वतः नेतान्याहू सैन्यात होते तेच पुढे पंतप्रधान झाले. यितजॅक रबीन पण सैन्यात होते.ते पुढे पंतप्रधान झाले. २. मिन्नेसोटा राज्याच्या इराक युद्धाला विरोधी सिनेटर बेकी लॉरी यांचा मुलगा इराक युद्धात मारला गेला. ही गोष्ट २००५ मधील. त्यावेळी मी मिनिअ‍ॅपोलिसवरून डुलुथला जात होतो आणि आय-३५ वरून चुकून मिन्नेसोटा राज्य हायवे-२३ ला लागलो. हा रस्ताही शेवटी डुलुथलाच जात असल्यामुळे यू-टर्न घेऊन परत यायच्या भानगडीत पडलो नाही. त्यावेळी बेकी लॉरी यांच्या केरीक या गावावरून गेलो होतो. ते गाव म्हणजे भारतातील गावातील एक चौक असावा इतके मोठे आहे.तरी तिथे त्या दिवशी अनयुज्यली जास्त गर्दी होती आणि ट्रॅफिकही लागला.नंतर कारण कळले. ३. साऊथ डाकोटाचे सिनेटर टिम जॉनसन यांचा मुलगा इराक आणि अफगाणिस्तानातही लढायला होता.त्याच्या सुदैवाने तो मारला गेला नाही आणि अजूनही तो सैन्यात आहे. ४. बुश सरकारमधील कायदामंत्री जॉन अ‍ॅशक्रॉफ्ट यांचा मुलगाही सैन्यात होता आणि तो इराक वॉरमध्ये होता. मला वाटते की जॉन मॅककेन यांचा मुलगाही सैन्यात आहे आणि तो इराक वॉरमध्ये होता. जॉन मॅककेन हे तर २००८ मध्ये अध्यक्षपदासाठीचे उमेदवार होते. आणि ही सगळी उध्दारणे अमेरिका-इसराएलमधील श्रीमंत देशातील आहेत. त्यामुळे गरिबी असल्यामुळे लोक सैन्यात जातात आणि मरायला गरीब पुढे असतात आणि श्रीमंत-इन्फ्युएन्शिअल लोक मागे असतात हा हायपोथिसिस ९५% कॉफिडन्स लेव्हलवर रिजेक्ट करता येईल असे वाटते :)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

९५% कॉन्फिडन्स लेव्हल? या आकडेवारीला नॉर्मल डिस्ट्रिब्युशन लावले कसे? :-) असो. एखादे भारतातलेही उदाहरण येऊ द्या.

In reply to by नगरीनिरंजन

९५% कॉन्फिडन्स लेव्हलला नॉर्मल डिस्झ्ट्रीब्युशनच लागते असे थोडीच आहे? स्टुडन्त टी, काय-स्क्वेअर, एफ सगळ्यांना ९५% कॉन्फिडन्स लेव्हल चालते :) तुमचाच मुद्दा-- गरीबांपुढे पर्याय नसतो म्हणून ते सैन्यात मरायला जातात याविरूध्द श्रीमंत देशातील उदाहरणे दिली आहेत. (एम.एस.सी स्टॅटिस्टिक्स)

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

माझा मुद्दा: जोपर्यंत देशात गरीब जनता आहे सैन्य भरतीला प्रॉब्लेम येणार नाही. तुमचा अर्थः फक्त गरीब लोकच सैन्यात जातात. :-)

In reply to by नगरीनिरंजन

नाही ननि तुमचा मुद्दा असा नव्हताच. हे तुमचेच वाक्य आहे ना?:
एकतर गरिबीच्या मजबुरीमुळे किंवा प्रतिष्ठा मिळवायला लोक सैन्यात जातात.

In reply to by नगरीनिरंजन

अजिबात गाळत नाही आहे. पण तुमचा मुद्दा "जोपर्यंत देशात गरीब जनता आहे सैन्य भरतीला प्रॉब्लेम येणार नाही." असा नव्हता हे सांगायचे होते, शिवाय उत्तम सांपत्तिक परिस्थिती आणि करण्यासारखी इतर अनेक प्रतिष्टेची कामे सोडुन सैन्यात गेलेले ढिगाने लोक माहिती आहेत (त्यातला एक शाळेतला जवळचा मित्र जो शाळेत असल्यापासुन सैन्यात जाण्याच्या ध्यासाने पछाडलेला होता आणि त्यात केवळ देशसेवा हाच उद्देश होता) . त्यामुळे केवळ पैसा आणी प्रतिष्ठेसाठी लोक सैन्यात जातात हा मुद्दा संपुर्णतः अमान्य.

In reply to by मृत्युन्जय

या मुद्द्या च्या अनुषंगाने डॉ खरे, सोन्याबापू आणि रणजीत चितळे यांची मते जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

९५% कॉन्फिडन्स लेव्हल? या आकडेवारीला नॉर्मल डिस्ट्रिब्युशन लावले कसे? :-) असो. एखादे भारतातलेही उदाहरण येऊ द्या.

कुठल्याही माणसाला पोटासाठी कुठलातरी व्यवस्या करणे भागच असते. प्रश्न आहे तो एखादा व्यवसाय स्वीकारल्यावर तुम्ही तो किती निष्ठेने पार पाडताय तो. भारतीय सैनिक अजून तरी तो निष्ठेने पार पाडतो आहे असेच म्हणावे लागेल... अर्थात जर जरुर पडली तर मात्र प्रत्येक तरुण सैन्यात भरती होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही... जर भरती झाले नाहीत तर दुसरे मार्ग सरकारकडे असतातच....

देशभक्ती आणि स्वार्थत्याग हे शब्द फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीसाठी राखीव आहेत. इतर दिवशी त्यांचा उच्च्चार करण्याचे कारणच काय ? युद्ध जिंकायचे असल्यास एसएमएस स्पर्धा घ्यावी किंवा फेसबुकच्या 'वुई लव्ह इंडीया' पेजेसला जास्तीत जास्त लाईक्स द्यावात. देशभक्तीपर मेसेज व्हॉटअपवर फॉरवर्ड करावेत, वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलवर तज्ञांच्या कंठाळी चर्चा आयोजीत कराव्यात. लैच खाज असेल तर शत्रुराष्ट्राच्या शासनाची संकेतस्थळे हॅक करुन त्यावर आपला राष्ट्रध्वज फडकावावा. प्रत्यक्ष लढाई कशाला करायची ?

मला एक मौल्यवान शंका आहे. सैन्यभरती हा आजचाच इशू नाही. पूर्वीही राजे महाराजे सुल्तान छत्रपती सैन्यभरती करायचे व त्यात सैनिक मरायचे. अनेक महाराजांचे / सुलतानांच आजचे वारस अतीश्रीमंत , जमीनदार व पतदार आहेत. पण त्यांच्यासाठी लढलेले व मेलेले जे लोक होते , त्यांचे वारस आज काय्करतात ? इतिहासात शहीद झालेल्यांचे आजचे वारस यावर एखादा धागा काढून माहिती गोळा होऊ शकेल का ? संकटे व संपत्ती यांचे विभाजन इतिहासात अतीविषम प्रमाणात झाले आहे का ?

संकट काळ हा खरच देशभक्ती जागवणारा काळ असतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. देशाची झालेली आर्थिक प्रगती आणि लोकांची वाढलेली क्रयशक्ती यामुळे भारतीय तरुण भौतिक सुखवादी झाले आहेत असा भास निर्माण झाला असेल कदाचित. पण त्याच्या रक्तात असणारे भारतीयत्व आणि देशाभिमान याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही. कोणतीही युद्धजन्य परीस्थिनी नसतानाही चांगल्या घरातील सुखवस्तू आयुष्य सोडून सैन्यात भारती होणारे तरुण मी पुण्या मुंबई मध्ये पहिले आहेत. जर का कधी युद्धाची वेळ आलीच तर भारतीय लष्कराला सैनिकांची कमतरता पडेल असे मला वाटत नाही.

In reply to by विद्यार्थी

ज्जे बात. आवडला प्रतिसाद! काही लोकांना सतत नकारात्मक बघायची सवय झाली आहे. हा त्यांचा स्वतःचा दोष नाही. वृत्तमाध्यमांनी त्या पद्धतीने विचार करायची सवय लावली आहे. ही वृत्तपत्रे अगदी त्या लोकांसारखी आहेत ज्यांना पाण्यावर चालणारा कुत्रा दाखवला तर म्हणतात अरेरे ह्या कुत्र्याला पोहता येत नाही बघा. जगात काही चांगलं घडतच नाही, सतत वाईटच घडत असतं असा कुणाचाही समज होईल अशा पद्धतीने वृत्तपत्रे आपल्याकडे बातम्या देत असतात. त्यामागे खूप गुंतागुंतीचे अर्थ-राजकारण आहे. ते एक असो. सुज्ञ माणसाने फार सावध राहिलं पाहिजे. सैनिकांबद्दल बोलण्याआधी थोडी माहिती तरी घ्यावी. लष्करात लोक भाकरीसाठीच जातात, गरिब असतात म्हणून जातात हा सैनिकांचा सरळ सरळ अपमान आहे. सैन्यभरतीसाठी तयार व्हायला सकाळी ४ वाजता उठून व्यायाम व इतर मेहनत करणारे बघितले आहेत. त्यांच्यात जोष असतो, उर्जा असते. काहितरी करून दाखवायची धमक असते. ही मुले म्हटलं तर सहज गुन्हेगारीकडे वळू शकतात आणि कुणाचाच बाप त्यांना मग रोखू शकणार नाही. ते योग्य मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, आपल्या आयुष्याला काही तरी महान अर्थ देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना गरीब म्हणून हिणवणे मला तरी खूप जास्त खटकले आहे. जगात आपणच फार तीर मारतोय अशी संकल्पना असणार्‍या लोकांनी सैनिकांबद्दल बोलतांना तरी तारतम्य बाळगावे अशी अपेक्षा आहे. बाकी भ्रष्टाचार करतच नाही असा कुणी सापडणे भारतात तरी शक्य नाही.

पानसिंग तोमर चित्रपटातील दृश्य डाकु पानसिंग:- मैंने पदक जीता तब मुझे किसी ने नही पुछा. डाकु बना तो .................. हि प्रतिष्ठा ????????????????? उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्रीचे वंशज आज भाडयाच्या घरात राहतात ( वाचलेली बातमी) माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव गांधी (माजी भारतीय पंतप्रधान) राजकारणात येण्याआधी एक पायलट म्हणून नोकरी करत होते ? () घरत

१. सैन्यात भरती होणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. त्यातील धोके, फायदे, तोटे ह्याचा विचार करूनच उमेदवार सैन्यात भरती होतो. त्यामुळे त्याचे सैन्यात भरती होणे हे काहीतरी भलतेच भव्यदिव्य आहे असा समज करून घ्यायचे कारण नाही. कितीही गमजा केल्या तरी सैन्याला आपले काम, प्रशिक्षण, शस्त्र वगैरेकरता अफाट पैसे लागतात. आणि ते पैसे करदाते देतात. देशातील प्रत्येक नागरिक सैन्यात भरती झाला तर देशाचे दिवाळे निघेल. २. एखादा प्रतिभावान माणूस, कल्पक तंत्रज्ञ, संशोधक, उद्योजक, समाजसेवक हा सैन्यात भरती न होता कितीतरी जास्त देशसेवा करू शकतो. सैन्यात ह्या गुणांना वाव बहुधा नसतोच. अण्णा ह्जारे सैन्यात कोण होते? एक साधे सैनिक. बाहेर पडल्यावर कितीतरी मोठे समाजसेवक बनले आहेत. ३. सैन्यात वशिलेबाजी, हुजरेगिरी भरपूर चालते. वरिष्ठांच्या मर्जीत नसणारे लोक वर्षानुवर्षे सडतात असे अनेकदा पाहिले आहे. ४. आधुनिक काळात युद्ध हे पूर्वीसारखे लढले जाणार नाही. अत्यंत विध्वंसक शस्त्रे शेकडो मैल अंतरावरून डागता येतात. त्यामुळे हातघाईच्या लढाईचे प्रमाण कमी कमी होत जाणार. तेव्हा तळहातावर शीर घेऊन वगैरे डायलॉग कालबाह्य होऊ घातले आहे. एकंदरीत सैन्य व सैनिकांचे उदात्तीकरण कमी केलेले बरे. प्रतिभावान, उद्योजग, कुशल तंत्रज्ञ, नि:स्वार्थी समाजसेवक ह्यांची समाजाला जास्त गरज आहे असे वाटते.