✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मेंदू

D — drsunilahirrao, Mon, 07/06/2015 - 16:48
जे नको ते नेमका वाचाळतो मेंदू रोज वारुणीमधे बुचकाळतो मेंदू बंद कर पारायणे गीताकुराणाची देवधर्माने अता भंजाळतो मेंदू दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे कोणते संकेत हे सांभाळतो मेंदू भेटलो होतो कधीकाळी जिथे आपण त्याठिकाणी आजही रेंगाळतो मेंदू तू जरा आता नवी होऊन ये दुनिये त्याच त्या जगण्यास हा कंटाळतो मेंदू जीवघेणे तू असे हासू नये राणी तीव्र तेजाबापरी वाफाळतो मेंदू डॉ.सुनील अहिरराव

प्रतिक्रिया द्या
4858 वाचन

💬 प्रतिसाद (16)

डॉक्टर मस्त आहे कविता!जीवघेणे

जडभरत
Mon, 07/06/2015 - 16:57 नवीन
डॉक्टर मस्त आहे कविता! जीवघेणे तू असे हासू नये राणी तीव्र तेजाबापरी वाफाळतो मेंदू ही ओळ खास आवडली. मस्तच वेगळा प्रयत्न पण मस्त
  • Log in or register to post comments

ग़ज़ल छान आहे !

वेल्लाभट
Mon, 07/06/2015 - 18:05 नवीन
ग़ज़ल छान आहे ! सुरेखच. फक्त तेजाब (तेज़ाब) या शब्दाचा मराठीतला उपयोग रुचला नाही. उर्दू हिंदी शब्द मराठीत वापरलेले मला स्वतःला भावत नाहीत. अर्थात हे वैयक्तिक मत झालं. पुनरुच्चार करतो; ग़ज़ल अप्रतिमच जमली आहे. दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे कोणते संकेत हे सांभाळतो मेंदू हे खलास !
  • Log in or register to post comments

पण मला तेजाब हा शब्द भारीच

जडभरत
Mon, 07/06/2015 - 18:08 नवीन
पण मला तेजाब हा शब्द भारीच वाटतो. त्याच्या मराठी तेज या शद्बाशी साधर्म्याने काहीतरी आग, प्रखरता, तीव्रता असं डोळ्यासमोर उभं राअहतं.
  • Log in or register to post comments

जडभरत आणि वेल्लाभट खूप खूप

drsunilahirrao
Mon, 07/06/2015 - 18:51 नवीन
जडभरत आणि वेल्लाभट खूप खूप धन्यवाद सर! 'तेजाब' शब्द सहजतेने आला त्यामुळे बदलावासा वाटला नाही. अम्ल वगैरे वापरता आले असते. पण ते त्यामानाने कदाचित सौम्य वाटले असते.अर्थ सारखा असला तरी तेजाबाची प्रखरता अम्लाठिकाणी जाणवत नाही
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/06/2015 - 18:54 नवीन
अजून येऊ द्या डॉक्टरसाहेब गझला. भेटलो होतो कधीकाळी जिथे आपण त्याठिकाणी आजही रेंगाळतो मेंदू क्लास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर!

drsunilahirrao
Mon, 07/06/2015 - 19:04 नवीन
धन्यवाद सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त! आवडली :)

रातराणी
Tue, 07/07/2015 - 01:20 नवीन
मस्त! आवडली :)
  • Log in or register to post comments

मस्त आवडली

एक एकटा एकटाच
Tue, 07/07/2015 - 10:12 नवीन
मस्त आवडली
  • Log in or register to post comments

मस्तच!

पथिक
Tue, 07/07/2015 - 14:14 नवीन
मस्तच! 'तेजाब' हा शब्दच इथे योग्य वाटतो.
  • Log in or register to post comments

मी तेजाब योग्य वाटतो की

वेल्लाभट
Tue, 07/07/2015 - 15:37 नवीन
मी तेजाब योग्य वाटतो की त्याऐवजी दुसरा शब्द असावा असं नव्हतं म्हटलं, एकंदरित उर्दू शब्द किंवा हिंदी शब्द मराठीत वापरलेले (मला स्वतःला) रुचत नाहीत इतकंच म्हणालो. तुम्हाला तो आवडत किंवा योग्य वाटत असेल तर ऑफकोर्स यू कॅन यूज इट.
  • Log in or register to post comments

वा! आवडली!

दमामि
Tue, 07/07/2015 - 17:04 नवीन
वा! आवडली!
  • Log in or register to post comments

पथिक, रातराणी, एक एकटा एकटाच

drsunilahirrao
Mon, 07/13/2015 - 23:27 नवीन
पथिक, रातराणी, एक एकटा एकटाच,दमामि खूप खूप धन्यवाद
  • Log in or register to post comments

मस्त ! :)

मदनबाण
Tue, 07/14/2015 - 12:17 नवीन
मस्त ! :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- जायकवाडी आटलं, पाणीसाठा अवघ्या 0.34 टक्क्यांवर
  • Log in or register to post comments

आवडली कविता!

अनुप ढेरे
Tue, 07/14/2015 - 12:26 नवीन
आवडली कविता!
  • Log in or register to post comments

कविता

तिमा
Tue, 07/14/2015 - 12:38 नवीन
कविता आवडली. वर तेजाबा संबंधी बरीच चर्चा झाली आहे म्हणून लिहितो. तेजाब हे कधीच वाफाळणारे नसते.(सल्फ्युरिक अ‍ॅसिड) ३५ टक्क्याचे हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड किंवा ९८ टक्क्यांचे नत्राम्ल (नायट्रिक अ‍ॅसिड) मात्र वाफाळणारे असते.
  • Log in or register to post comments

@मदनबाण,अनुप ढेरे,तिमा

drsunilahirrao
गुरुवार, 07/16/2015 - 09:49 नवीन
@मदनबाण,अनुप ढेरे,तिमा खूप धन्यवाद. तिमाजी, आपण दिलेल्या माहितीबद्दल विशेष आभार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा