Skip to main content

एक वर्षानंतर . . .

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 25/05/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

वाचने 311863
प्रतिक्रिया 1265

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

जी गोष्ट फक्त जाहीरच करायची आहे, ति न जाहीर केली तर इतकी मोठी शिक्षा कशासाठी ? हा नियम लागू कधीपासुन होणार ? असा असा कायदा आला हे अमेरिके बसलेल्याना कसे समजणार ?

In reply to by श्रीगुरुजी

काय आहे गुरुजी झोपलेल्या माणसाला जागे करता येते. झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला नाही. भाजप चा मुख्य मतदार वर्ग या सगळ्या प्रकाराने दूर होणार हे नक्की. कितीही भ्रष्टाचार / मुस्लिम तुष्टीकरण / शह्जदे गिरी असली तरी कोन्ग्रेस बरी असे आता वाटायला लागले आहे.

In reply to by अभिजित - १

मी व्यवस्थित मुद्दे मांडून तुम्ही सुरवातीला दिलेल्या प्रतिसादातील फोलपणा दाखवून दिला आहे. 'नावडतीचे मीठ अळणी' या उक्तीप्रमाणे मोदींची प्रत्येक कृती काही जणांना खटकते. त्याला कोणाचाच इलाज नाही. भाजपचा मुख्य मतदार वर्ग कोणत्या कारणांमुळे भाजपला मतदान करतो आणि नक्की कोणत्या कारणांमुळे तो भविष्यात भाजपपासून दूर होऊ शकेल याची तुम्हाला अजिबात कल्पना नाही. प्रतिसादातील फोलपणा दाखवून देऊनसुद्धा तुम्हाला काँग्रेस बरी वाटत असेल तर वाटू दे. 'झोपलेल्या माणसाला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला नाही' हे पुन्हा एकदा तुमच्या प्रतिसादावरून दृग्गोचर झालं हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

धर्म नावाच्या अफूची नशा चार वर्षानी उतरेल तेंव्हा लोक आपोआपच जागे होतील. आपणदेखील तोवर सुखनिद्रा घ्यावी. शुभरात्री.

समतोल विवेचन ? :) :) :) विचारलेल्या प्रश्नावर काहीही ठोस उत्तर न देता भरताड माहिती देऊन समोरच्या माणसाला भंजाळून टाकण्यात गुरु आहेत. वद्रा , पप्पू , ममा मादाम या सर्व लोकांनी जो काही पैसा खाल्ला देशाचा तो या ४ वर्षात परत मिळणार का देशाला ? बहुतेक नक्की नाही. कारण त्याची तर काही सुरुवात पण झालेली दिसत नाही. पण जनतेच्या खिशात हात घालायला पुढे. मग तुमच्यात आणि त्यांच्या त फरक काय ?

In reply to by अभिजित - १

वद्रा , पप्पू , ममा मादाम या सर्व लोकांनी जो काही पैसा खाल्ला देशाचा तो या ४ वर्षात परत मिळणार का देशाला ? बहुतेक नक्की नाही. कारण त्याची तर काही सुरुवात पण झालेली दिसत नाही. पण जनतेच्या खिशात हात घालायला पुढे. मग तुमच्यात आणि त्यांच्या त फरक काय ?
जर असाच जावून घ्यायचा असेल तर ठीक आहे. पण जर कोर्टाचा वापर करून हे करायचं असेल तर केस, पुरावे, सिद्धता वगैरे गोष्टी येणारच. बोला कशा करायच्या? कि सगळी कोर्टंच बरखास्त करूया?

In reply to by अभिजित - १

>>>> विचारलेल्या प्रश्नावर काहीही ठोस उत्तर न देता भरताड माहिती देऊन समोरच्या माणसाला भंजाळून टाकण्यात गुरु आहेत. कमाल आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या कोणत्या मुद्द्यावर ठोस उत्तर न देता नुसती भरताड माहिती दिली आहे? तुमचा आरोप क्र. १) अमेरिकेतील ४०१-के योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर भारतात कर भरावा लागणार. माझे स्पष्टीकरण - या गुंतवणुकीवर भारतात कर भरावा लागणार नसून किती गुंतवणूक केली आहे ते जाहीर करावे लागणार. तुम्ही जी लिंक दिली आहे त्यात हे स्पष्ट शब्दात लिहिले आहे. तुम्ही स्वतः लिंकमधील बातमी काळजीपूर्वक आणि संपूर्ण वाचली असती तर मला हे स्पष्टीकरण द्यावेच लागले नसते. दुर्दैवाने आपण दिलेली बातमी न वाचताच तुम्ही दोषारोप केलेत. या स्पष्टीकरणाव्यतिरिक्त अजून कोणते ठोस उत्तर तुम्हाला हवे आहे. तुमचा आरोप क्र. २) मध्यमवर्गीय सहकारी बँकेत ज्या मुदत ठेवी ठेवतात ते सहकारी बँकेचे भागधारक असूनसुद्धा त्या मुदत ठेवींवरील व्याज सरकार हडप करणार व भागधारकांचे लाभ काढून घेणार. माझे स्पष्टीकरण - तुम्ही सहकारी बँकेचे भागधारक असला किंवा नसला तरी मुदत ठेवींवरील व्याज हे कायमच करपात्र होते. त्यावर वर्ष संपल्यावर कर द्यावा लागतोच. जर वर्षातील व्याज १०००० रूपयांपेक्षा जास्त असेल तर बँक उद्गम कर कपात करते (टॅक्स अ‍ॅडव्हान्समध्येच कापून घेणे). सहकारी बँकांनी स्वतःला बिनव्याजी भांडवल मिळविण्यासाठी एक युक्ती केली. तुम्ही जर आमच्या बॅकेचे शेअर्स घेतले तर आम्ही उद्गम कर कपात करणार नाही अशी योजना आणून मध्यमवर्गियांच्या गळ्यात स्वतःचे शेअर्स मारले. जरी टॅक्स अ‍ॅड्व्हान्समध्ये कापला गेला नाही तरी पूर्ण टॅक्स वर्ष संपल्यानंतर व्याजासहीत भरावाच लागतो. टॅक्सचा काही भाग अ‍ॅड्व्हान्समध्ये भरला तर वर्षाच्या शेवटी फक्त टॅक्सचा उर्वरीत भाग भरावा लागतो. परंतु सहकारी बँकेचा भागधारक झाल्याने टॅक्समध्ये १ रूपयाची सुद्धा सूट मिळत नाही. मोदी सरकारने फक्त १ बदल केला. तो म्हणजे तुम्ही सहकारी बँकेचे भागधारक असला तरी तुमचा अ‍ॅडव्हान्स टॅक्स कापला जाईल असा तो बदल होता. या बदलामुळे तुम्हाला द्याव्या लागणार्‍या करामध्ये १ रूपयाची सुद्धा वाढ होणार नाही. त्यामुळे मुदत ठेवींवरील व्याजावर सरकारने डोळा ठेवला आहे हा आरोप निव्वळ अज्ञानातून आलेला आहे. तसेच, जर तुम्हाला उद्गम कर कपात टाळायची असेल तर बँकेकडे १५-जी/१५-एच हा अर्ज भरून देणे ही सोय अजूनही कायम आहे. त्यामुळे 'कायदा बदलला आणि भागधारकांचे लाभ काढून घेतले' हा आरोपही निव्वळ अज्ञानातून आलेला आहे. सहकारी बँका उद्गम कर कपात टाळण्याचे प्रलोभन दाखवून आपले शेअर्स ग्राहकांच्या गळ्यात मारत होत्या. या नवीन नियमामुळे हा प्रकार बंद होईल हा ग्राहकांचा फायदाच आहे. तुमचा आरोप क्र. ३) कुप्रसिद्ध हसन अली व विजय मल्ल्याचे मोदी काहीही वाकडे करू शकलेले नाहीत. माझे स्पष्टीकरण - हसन अली व विजय मल्ल्याचे प्रकरण अनेक वर्षांपूर्वी बाहेर आले ते युपीएच्या काळात. त्या काळातही अनेक वर्षे मिळूनसुद्धा तुमची आवडती काँग्रेस त्यांचे काहीही करू शकली नाही. मोदी येऊन तर फक्त १३ महिने झालेत. तरीही त्यांच्यावर दोषारोप. आधीच लिहिल्याप्रमाणे दोघांवरही न्यायालयात खटले सुरू आहेत. न्यायालयीन प्रक्रीया सुरू असताना इतरांना हस्तक्षेप करण्यास वाव नसतो. मल्याची काही मालमत्ता आधीच बँकानी लिलाव करून विकून काही प्रमाणात वसूली केली आहे. मल्या अनेक कंपन्यांचा अध्यक्ष/संचालक असला तरी किंगफिशरचे कर्ज फेडण्यासाठी त्या इतर कंपन्यांचा निधी वापरता येत नाही. किंगफिशरच्या थकीत कर्जासाठी मल्या एकटा दोषी नाही. सर्व संचालक मंडळ दोषी आहे. हे कर्ज फेडणे ही त्याची एकट्याची जबाबदारी नाही. ही जबाबदारी सर्व संचालकांची पर्यायाने कंपनीची आहे. तो कितीही राजेशाही थाटात रहात असला तरी या कर्जासाठी त्याची जबाबदारी अत्यंत मर्यादीत आहे. ही बेसिक गोष्ट तुम्हाला समजावी अशी अपेक्षा आहे. याबाबतीत आजचीच नवीन न्यायालयीन घडामोड वाचा. विजय मल्ल्या यांना पुन्हा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली http://www.loksatta.com/desh-videsh-news/sc-dismisses-vijay-mallyas-app… हसन अलीच्या बाबतीत १४ मे २०१४ ची (मोदी सत्तेवर येण्याआधी) ही बातमी वाचा. http://www.dnaindia.com/india/report-hasan-ali-khan-case-may-end-in-a-w… he high-profile case of alleged tax evasion and money laundering against Pune-based stud farm owner Hasan Ali Khan is turning out to be a damp squib as the government is said to have come to a conclusion that probe agencies do not have enough evidence to nail him on the charge of having stashed away a huge amount of black money abroad. म्हणजे युपीएच्याच काळात हसन अलीच्या केसमध्ये काहीही दम नाही असे दिसून आले होते. असे असताना आता मोदी त्याचे काय वाकडे करू शकणार? 'कुप्रसिद्ध हसन अली व विजय मल्ल्याचे मोदी काहीही वाकडे करू शकलेले नाहीत' हा आरोपसुद्दा निव्वळ अज्ञानातून आलेला आहे. तुमचा आरोप क्र. ४) परदेशातून काळा पैसा आणण्याबाबत मोदींना खोटे आश्वासन दिले. माझे स्पष्टीकरण - परदेशातील काळा पैसा, १५ लाख इ. वर याच धाग्यात अनेक प्रतिसादातून वस्तुस्थिती मांडलेली आहे. तेच तेच पुन्हा लिहिण्याची इच्छा नाही. ते प्रतिसाद वाचल्यास पूर्ण माहिती मिळेल. २-३ नवीन घडामोडी झालेल्या आहेत. (१) संसदेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनात काळा पैसा साठविणार्‍यांना १० वर्षे तुरूंगवासाची कठोर शिक्षा देणारे विधेयक संसदेत मंजूर झाले आहे. (२) त्याचप्रमाणे परदेशात कोणत्याही स्वरूपात पैसे ठेवणार्‍यांना (परदेशातील बँक खात्यात, अमेरिकेतील ४०१-के योजनेत, सिंगापूरमधील सीपीएफ मध्ये इ.) त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. (३) परदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक एसआयटी स्थापन झालेली असून काळा पैसा परत आणण्याच्या योजना ही एसआयटी नक्की करणार आहे. त्यामुळे 'परदेशातून काळा पैसा आणण्याबाबत मोदींना खोटे आश्वासन दिले' हा आरोप देखील निव्वळ अज्ञानातून आले आहे. तात्पर्य - तुमचे वाचन कमी पडत आहे व कदाचित त्यामुळे किंवा मोदींबद्दलच्या आकसाने तुम्ही मोदींवर निव्वळ अज्ञानातून आरोप करीत आहात. इतके सविस्तर लिहून व सर्व वस्तुस्थिती दाखवून देउन सुद्धा तुमचा हेका कायम असेल तर मात्र माझा नाइलाज आहे. >>> वद्रा , पप्पू , ममा मादाम या सर्व लोकांनी जो काही पैसा खाल्ला देशाचा तो या ४ वर्षात परत मिळणार का देशाला ? पुन्हा एकदा कमाल आहे. अहो, हेच लोक तुम्हाला हवे आहेत. तुमचेच आधीच्या प्रतिसादातील वाक्य पहा. "कितीही भ्रष्टाचार / मुस्लिम तुष्टीकरण / शह्जदे गिरी असली तरी कोन्ग्रेस बरी असे आता वाटायला लागले आहे."

In reply to by श्रीगुरुजी

१. ४०१ K मधली माहिती जर का सादर केली नाही तर सरळ १० लाख रु दंड आणि तुरुंगवास ? हि इतकी कठोर शिक्षा का ? नक्की काय कारण / logic आहे याच्या मागे ? हे म्हणजे सिग्नल तोडल्या वर सरळ फाशी दिल्या सारखे आहे. २. माझे ओळखीत ७५ वर्षाचे गृहस्थ एका सहकारी बँक चे भागधारक आहेत . त्यांची २५ FD cert आहेत अंदाजे. त्याच्यावर ते नियमित पणे कर भारतात. बँक चे इंटरेस्ट cert दर आर्थिक वर्षाच्या शेवटी घेऊन. फक्त भागधारक असल्याने त्यांना आत्तापर्यंत कधीही १५ H भरावा लागत नव्हता. आता या नवीन नियमा मुले त्यांना 15 फोरम ( ५ x ३ ) भरावे लागतात. कारण २५ FD एका form मध्ये मावत नाहीत. त्यांनी सरकारचे काय घोडे मारले म्हणून त्यांना हा त्रास सरकार देत आहे ? ३. हसन आली - म्हणजे थोडक्यात मोदी सरकार आता काही करू इच्छित नाही तर. आनंद आहे. १ लाख कोटी रु असेच हसत सोडून द्यायला खरेच ५६ इंची छाती लागते. विजय मल्ल्या हे त्यांच्या खान्ग्रेसी हित संबध मुळे मस्त मजेत बाहेर आहेत असे जनतेला वाटत होते. तसे काहीच नाही तर . म्हणजे कोन्ग्रेस खरेच स्वच्छ आहे तर. कमीत कमी त्यांनी सहारा श्री रॉय यांना आत टाकले हे खूप मोठे काम केले. मोदी मात्र अजून १ वर्ष झाले तरी भ्रष्ट्चारा विरुद्ध काही ठोस काम करू शकले नाहीत. बाकी शरद पवार त्यांचे राजकीय सल्लागार आहेत म्हटल्यावर अजून काय अपेक्ष ठेवणार ? . >>> वद्रा , पप्पू , ममा मादाम या सर्व लोकांनी जो काही पैसा खाल्ला देशाचा तो या ४ वर्षात परत मिळणार का देशाला ? पुन्हा एकदा कमाल आहे. अहो, हेच लोक तुम्हाला हवे आहेत. तुमचेच आधीच्या प्रतिसादातील वाक्य पहा. माझे उत्तर - मला काय वाटते ते सोडा. अक्खी निवडणूक या लोक विरुद्ध हवा तापवून मते फिरवली. आणि आता याच्या विरुद्ध काही करायची वेळ आल्यावर गप्प ?? आता मी थांबतो इथे. जनतेचे खरे feedback वरती पाठवत चला. नाहीतर पुढची निवडणूक कठीण आहे हे नक्की. दिल्ली , नवी मुंबई मध्ये ते दिसलेच आहे. माझी पण भाजप ला मत द्यायची इच्छा आहे. आज पर्यंत नेहमीच देत आलो आहे. पण भाजपचा कारभार सुधारला नाही तर कठीण आहे त्यांचे.

In reply to by अभिजित - १

अभिजित साहेबांचे बरोबर आहे..राहुल गांधींना पंतप्रधान करा. त्यांचं खेळून झालं की केजरीवाल यांना पंतप्रधान करा. त्यांचे व्हाईट हाउस समोर धरणे देण्याचे स्वप्न पूर्ण झाले की रामदास आठवले यांना पंतप्रधानपद द्या. संसदेचे सर्कशीत रुपांतर झाले की मायावती, जयललिता आणि ममता दीदी यांना आळीपाळीने त्या पदाचे मानकरी होऊ द्या. मग ठाकरे बंधूंना एकदा अटकेपार झेंडे गाडू द्या. शेवटी पवार साहेबांना पंतप्रधान पद द्या एकदाचे. त्यांनी अक्ख्या देशाचा सातबारा सुप्रियाच्या नावे करून टाकला की आपण मोकळे !! एवढे लायक उमेदवार असताना त्या गुज्जूभाई मोदींना कशाला पंतप्रधानपदी बसवले आहे कळत नाही राव ?

In reply to by अभिजित - १

बँकेतल्या ठेवींवर कर - जास्त कर भरायला लागतो हा अडचण आहे का जास्त फॉर्मस भरायला लागतात हा आहे? उत्तर वर दिलेच आहे की कर जास्त भरायला लागत नाही. काळा पैसा - तुमची समजूत अशी आहे का की एक बोईंग भरून पैसे Switzerland मधून घेवून यावे. कुठल्याही गोष्टीला एक procedure असते, जी चालू केलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच tax heaven देशांनी आपल्याला account holders ची माहिती देण्याचे काबुल केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रत्येकाला परदेशातील मालमत्ता जाहीर करायला सांगण्यात आले आहे. जर का शिक्षा केली नाही तर ज्यांना tax चुकवायचा आहे ते कुठली न कुठली क्लृप्ती काढून पैसे लपवतील. हे फक्त भारतातच चालू आहे हा आपला गैरसमज आहे. अमेरिकेत सुद्धा प्रत्येकाला त्याच्या परदेशातील assets declare करायला सांगितले आहे. जास्त माहितीसाठी FATCA असा google search करा हसन अली आणि विजय मल्ल्या - केसेस कोर्टात आहेत, बँका जप्तीचे काम आहेत. यात मोदींनी काय करणे अपेक्षित आहे? कॉंग्रेसने पैसा खाल्लेला ४ वर्षात परत मिळणार का? - हे तरी मान्य करताय म्हणजे की पैसा खाल्लेला आहे. तो परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. सगळ्या गोष्टी public करायच्या नसतात. हा काही हिंदी सिनेमा नाही की हिरो जातो villain च्या घरी आणि त्याच्या बाथरुमच्या छतातून आणि बेडरूमच्या भिंतीतून सगळे पैसे शोधून काढतो. मोदी आणि मंडळी जे काही करत आहेत त्याचा लेखाजोखा मांडला जाईलच. चिनार यांनी म्हणल्याप्रमाणे RG वा AK इ. पर्याय आहेतच ४ वर्षांनंतर, पण उगाच टीका करायची म्हणून कशाला करताय? अवांतर: बाहेरील संपत्ती जाहीर करण्यासाठीच्या नियमाला फाटका (FATCA) हा किती विरोधाभास आहे :)

In reply to by ट्रेड मार्क

>>> जास्त कर भरायला लागतो हा अडचण आहे का जास्त फॉर्मस भरायला लागतात हा आहे? यांच्या काकांच्या एकाच सहकारी बँकेत २५ मुदत ठेवी आहेत. आर्थिक वर्ष संपल्यावर कर परतीचा अर्ज भरताना ते या ठेवींवरील व्याजावरील कर भरतात. म्हणजेच ठेवींवरील मिळणारे एकूण व्याज स्टँडर्ड डिडक्शनपेक्षा जास्त आहे. जेव्हा तुमचे संभाव्य वार्षिक उत्पन्न हे करसवलतीच्या मर्यादेपेक्षा जास्त असते तेव्हा बँकेने उद्गम कर कपात करू नये यासाठी १५-जी/१५-एच हा अर्ज देणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे काका जर हे अर्ज देत असतील तर ते आयकर विभागाच्या कायद्याविरूद्ध आहे. >>> अमेरिकेत सुद्धा प्रत्येकाला त्याच्या परदेशातील assets declare करायला सांगितले आहे. चांगले. परदेशात ठेवला जाणारा काळा पैसा रोखण्यासाठी मोदी सरकारने उचललेले हे एक चांगले पाऊल आहे. >>> केसेस कोर्टात आहेत, बँका जप्तीचे काम आहेत. यात मोदींनी काय करणे अपेक्षित आहे? मोदींनी हसन अली व मल्याच्या मानेला धरून तुरूंगात नेऊन बसवावे अशी बहुतेक अपेक्षा असेल. >>> हे तरी मान्य करताय म्हणजे की पैसा खाल्लेला आहे. तो परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. बरोबर

In reply to by अभिजित - १

>>> ४०१ K मधली माहिती जर का सादर केली नाही तर सरळ १० लाख रु दंड आणि तुरुंगवास ? हि इतकी कठोर शिक्षा का ? नक्की काय कारण / logic आहे याच्या मागे ? हे म्हणजे सिग्नल तोडल्या वर सरळ फाशी दिल्या सारखे आहे. माहिती देण्यामध्ये नक्की काय समस्या आहे आणि का विरोध आहे? जरा खालील वाक्ये नीट वाचा. "The core of the black money law is that if a person has an offshore asset (say a bank account or subscription to such plans) and that is not reported in India even after moving back to India, such foreign asset will not be treated as 'undisclosed asset' as long as the source of that asset can be explained," जर परदेशातील संपत्तीच्या स्त्रोताचे स्पष्टीकरण देता येणे शक्य असेल, तर, भारतात परतल्यानंतरसुद्धा जर परदेशातील गुंतवणुकीची माहिती दिली नाही तरीसुद्धा अशी गुंतवणुक "उघड न केलेली संपत्ती" मानली जाणार नाही व त्यामुळे ती व्यक्ती अर्थातच शिक्षेस पात्र नाही. या वाक्याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. वैध मार्गाने परदेशात गुंतवणुक केली असेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. जरी ४०१-के योजनेतील माहिती दिली नाही तरी जोपर्यंत त्या योजनेत कायदेशीर मार्गाने श्वेत उत्पन्न गुंतविले असेल तरी ते सरकारला मान्य आहे. त्यामुळे ४०१ K मधली माहिती जर का सादर केली नाही तर सरळ १० लाख रु दंड आणि तुरुंगवास ही समजूत चुकीची आहे. हा नवीन कायदा काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठीच आहे. श्वेत मार्गाने संपत्ती मिळविणार्‍यांना अजिबात घाबरायचे कारण नाही. >>> माझे ओळखीत ७५ वर्षाचे गृहस्थ एका सहकारी बँक चे भागधारक आहेत . त्यांची २५ FD cert आहेत अंदाजे. त्याच्यावर ते नियमित पणे कर भारतात. बँक चे इंटरेस्ट cert दर आर्थिक वर्षाच्या शेवटी घेऊन. फक्त भागधारक असल्याने त्यांना आत्तापर्यंत कधीही १५ H भरावा लागत नव्हता. आता या नवीन नियमा मुले त्यांना 15 फोरम ( ५ x ३ ) भरावे लागतात. कारण २५ FD एका form मध्ये मावत नाहीत. त्यांनी सरकारचे काय घोडे मारले म्हणून त्यांना हा त्रास सरकार देत आहे ? टीडीएस व अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणे हा जुना नियम आहे. सर्व नोकरदार व्यक्ती, उद्योगपती, व्यावसायिक, कलाकार अशा सर्वांसाठी टीडीएस व अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणे सक्तीचे आहे. या कायद्यातून एक पळवाट निघाली होती. एखाद्या सहकारी बँकेचा १०० रूपयांचा १ शेअर घेतला तरी तुम्ही बँकेचे भागधारक होता व बँकेच्या भागधारकांसाठी टीडीएस सक्तीचा नव्हता. अशा भागधारकांनी बँकेत कितीही रक्कमेच्या मुदत ठेवी ठेवल्या व त्यावर कितीही जास्त व्याज येत असले तरी बँक अशांचा टीडीएस कापत नव्हती. भागधारक नसलेल्या एखाद्याला एका सहकारी बँकेत वार्षिक फक्त १०००० रूपये व्याज मिळणार असले तरी बँक त्यातून १० टक्के उद्गम कर कपात करायची. पण भागधारक असलेल्या एखाद्याला त्याच बँकेत १ लाखाहून अधिक व्याज मिळणार असले तरी केवळ १०० रूपयांच्या एका शेअरमुळे बँक त्याचा टीडीएस कापत नव्हती. नवीन कायद्यामुळे ही पळवाट बुजलेली आहे. आयकर विभाग यापुढील काळात करभरणा व्यवस्थेतील अशा सर्व पळवाटा बुजवून करसंकलन वाढविणार आहे. यात सरकारने कोणाचे घोडे मारायचा प्रश्नच उद्भवत नाही. कायद्यात सुधारणा केल्यामुळे कायद्यातील विषमता दूर झाली आहे (फक्त ठराविक लोकांनाच टीडीएस पासून मुक्ती व इतरांवर सक्ती ही विषमता) व त्यामुळे काळा पैसा निर्माण होण्यावर आपोआपच प्रतिबंध येणार आहे. १५-एच/१५-जी अर्ज बहुसंख्य गुंतवणुकदार भरतात. तुमचे काका असे कोण लागून गेले आहेत की त्यांना हे अर्ज भरण्यापासून मुक्ती हवी? जर ते वर्षाच्या शेवटी नियमित कर भरतात, तर त्यातला काही भाग आधीच भरायला विरोध का? इतर सर्व नागरिक हे करीत असताना एखाद्या २-३ शाखा असलेल्या सहकारी बँकेचा १०० रूपयांचा एक शेअर घेतला म्हणजे लगेच त्यांना उद्गम कर कपातीपासून सुटका द्यायची का? >>>> हसन आली - म्हणजे थोडक्यात मोदी सरकार आता काही करू इच्छित नाही तर. आनंद आहे. १ लाख कोटी रु असेच हसत सोडून द्यायला खरेच ५६ इंची छाती लागते. पुन्हा एकदा चुकीचा निष्कर्ष. हसन अलीवरील खटला न्यायालयात सुरू आहे. गेल्या ५-६ वर्षात तपास यंत्रणांना हसन अली विरोधात पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. आता त्याला मोदी काय करणार? का त्यांनी बनावट पुरावे तयार करावे अशी तुमची इच्छा आहे? १ लाख कोटी हा आकडा कोठून आला? १ लाख कोटी सोडून दिले हा जावईशोध कोणी लावला? जरा अभ्यास वाढवा. असले हास्यास्पद निष्कर्ष काढण्यापेक्षा थोडासा शोध घेतला असता तर असे हसू झाले नसते. लेटेस्ट बातमी वाचा. http://www.hindustantimes.com/mumbai/mumbai-sessions-court-stays-hasan-… The case against Pune-based stud farm owner Hasan Ali, who allegedly evaded taxes to the tune of Rs 74,000 crore, may be crumbling. A sessions court on Monday stayed Ali’s trial, which was pending before a magistrate’s court. >>>> विजय मल्ल्या हे त्यांच्या खान्ग्रेसी हित संबध मुळे मस्त मजेत बाहेर आहेत असे जनतेला वाटत होते. तसे काहीच नाही तर . म्हणजे कोन्ग्रेस खरेच स्वच्छ आहे तर. कमीत कमी त्यांनी सहारा श्री रॉय यांना आत टाकले हे खूप मोठे काम केले. मोदी मात्र अजून १ वर्ष झाले तरी भ्रष्ट्चारा विरुद्ध काही ठोस काम करू शकले नाहीत. बाकी शरद पवार त्यांचे राजकीय सल्लागार आहेत म्हटल्यावर अजून काय अपेक्ष ठेवणार ? पुन्हा एकदा अत्यंत हास्यास्पद निष्कर्ष. तुम्हाला पब्लिक लिमिटेड कंपनी व अशा कंपन्यांची कर्जे व कर्जाची जबाबदारी इ. विषयी अजिबात माहिती नाही. तस्मात अभ्यास वाढवा. >>> अक्खी निवडणूक या लोक विरुद्ध हवा तापवून मते फिरवली. आणि आता याच्या विरुद्ध काही करायची वेळ आल्यावर गप्प ?? आजतगायत सोनिया व राहुल विरूद्ध एकही भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आलेले नाही. वड्राला राजस्थान व हरयानामध्ये जवळपास फुकटात दिलेल्या जमिनी राज्य सरकारने परत घेतल्या आहेत. हरयाना सरकारने वड्राला दिलेल्या जमिनींची चौकशी सुरू केली आहे. तस्मात मोदी सरकारने यांच्याविरूद्ध काही केले नाही हा (पुन्हा एकदा) खोटा आरोप आहे. >>> जनतेचे खरे feedback वरती पाठवत चला. नाहीतर पुढची निवडणूक कठीण आहे हे नक्की. दिल्ली , नवी मुंबई मध्ये ते दिसलेच आहे. माझी पण भाजप ला मत द्यायची इच्छा आहे. आज पर्यंत नेहमीच देत आलो आहे. पण भाजपचा कारभार सुधारला नाही तर कठीण आहे त्यांचे. मी असला फीडबॅक भाजप किंवा इतर कोणालाही पाठवित नाही कारण भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षाचा माझा काहीही संबंध नाही आणि मला तसे करण्याची अजिबात गरज वाटत नाही. त्याचप्रमाणे भाजपला असला हास्यास्पद फीडबॅक समजून घेण्याची अजिबात गरज नाही. खराखुरा फीडबॅक मिळविण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःची सक्षम यंत्रणा आहे. भाजपला निवडणुक कठीण आहे का सोपी याची काळजी भाजपपेक्षा तुम्हालाच जास्त दिसते. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा राष्ट्रीय निवडणुकांशी संबंध लावणे यातून फक्त राजकीय अज्ञान दिसते. असो.

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48092983&section=top-st… केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सोनी, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य प्रभात झा, त्यांचे दोन पुत्र अत्यन आणि तृष्मूल झा तसेच मध्य प्रदेशचे राज्यसभा सदस्य अनिल दवे यांच्या विमानप्रवासांचा आणि अन्य खर्च 'व्यापमं' घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुधीर शर्मा याने केल्याचा दावा काँग्रेसने बुधवारी पुराव्यांनिशी केला.

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48129717&section=top-st… भारतात लोकोपयोगी योजनांचा धडाका लावत, कार्यक्षम सरकार म्हणून जनतेसमोर छबी मांडताना प्रत्यक्षात राजकीय पडद्याआड कोणत्या घडामोडी घडतात, हे अमेरिकन सरकारने उघड केले आहे. गोव्यातील पाणी व मलनि:सारण प्रकल्प आखणीचे कंत्राट मिळवण्यासाठी लुइस बर्जर या प्रतिष्ठित कंपनीने एक मंत्री तसेच सरकारी अधिकाऱ्यांना सुमारे ६ कोटी ३५ लाख रुपयांची लाच दिल्याचे खुद्द अमेरिकन कायदा मंत्रालयाने जाहीर केले आहे

In reply to by dadadarekar

अहो पोस्ट करण्यापूवी वाजत जा हो जरा. हे प्रकरण काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. पर्रिकरांनीच म्हटले आहे की या लोकांनी गोव्याला लुटले आहे. वाचा जरा--http://timesofindia.indiatimes.com/india/Bribes-by-US-firm-give-BJP-amm…

In reply to by dadadarekar

हो गुव्हाटीपण आहे. आणि तुमच्या दुर्दैवाने आसामात भाजप कधीच सत्तेत नव्हता. :)

http://indianexpress.com/article/cities/lucknow/ram-temple-in-ayodhyahi… अरारा..... Hindu  organisation Akhil Bharatiya Hindu Mahasabha (ABHM) has accused Vishwa Hindu Parishad (VHP) and its associate units of pocketing more than Rs 1,400 crore in cash and “quintals of gold bricks”, which were collected from across the world as donations for construction of Ram temple in Ayodhya. The charge has been vehemently denied by the VHP.

In reply to by dadadarekar

चौदा वर्षे वनवास भोगलेल्या देवाच्या भक्तानी चौदाशे कोटी हडपले, बजरंगी भाईजान याना चौदावे रत्न दाखवो हीच प्रार्थना.

मोदींच्या पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतर प्रथम वर्षातील दौर्‍यावर काही विघ्नसंतोषी मंडळींनी टीका केली. त्यांच्या परदेश दौर्‍याचे महत्त्व समजण्यास अपात्र असणार्‍यांनी मोदींचा अनिवासी भारतीय असा उल्लेख केला. मोदी परदेशातून परत आले की मोदी भारतभेटीवर आलेत अशी कुत्सित टीका केली गेली. परंतु त्यांनी भेट दिलेल्या देशातून गेल्या वर्षभरात भारतामध्ये जवळपास २० अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणुक झालेली आहे. India received $19.78 billion FDI from nations visited by Narendra Modi in FY15 http://economictimes.indiatimes.com/news/economy/finance/india-received…

In reply to by श्रीगुरुजी

मोदींच्या परदेश दौर्‍याचे अजून एक चांगले फलित - http://www.dnaindia.com/india/report-uae-begins-crackdown-on-dawood-ibr… UAE begins crackdown on Dawood Ibrahim's properties

In reply to by श्रीगुरुजी

सत्य हे आहे कि आज पण दाउद भारतातून हप्ता गोळा करतोच आहे. तो आधी थांबवा . त्याचे इथले नेटवर्क तोडून टाका. पण तितकी इच्छा शक्ती / ताकद पाहिजे. UAE ला लिस्ट देऊन काय उपयोग ? UAE काय त्या सगळ्या मालमत्ता विकून त्याचे पैसे भारताला परत देणार काय ? हि जी लिंक तुम्ही दिली आहे ना ती नुसती एक पोकळ बातमी आहे. ह्याच्यावर पुढे काहीही होणार नाही हेच सत्य आहे.

In reply to by dadadarekar

Foreign direct investment into India grew 8 per cent year-on-year to $24.3 billion in 2013-14, according to the Department of Industrial Policy and Promotion (DIPP) data. In 2012-13, FDI totalled $22.4 billion. Foreign investment inflows more than doubled to $3.53 billion in March this year from $1.52 in the same month last year. The highest FDI came in services ($2.22 billion), followed by automobiles ($1.51 billion), telecommunications ($1.3 billion), pharmaceuticals ($1.27 billion) and construction development ($1.22 billion) in 2013-14. ...................* ................. तुमचा धागा म्हंजे कमळाबाईची जाहिरात आहे हे आता तरी मान्य कराल का ? ....................*.................. लोकं हसत्यात तुमास्नी !

In reply to by dadadarekar

जरा बातमी उघडून तरी बघायची. वाचा जरा… फक्त लिंक वर क्लिक तर करायचं असतं. India received $19.78 billion foreign direct investment (FDI) from 12 countries visited by Prime Minister Narendra Modi in financial year 2014-15, Parliament was informed today. The total outflow and inflow of foreign investment in general for 2014-15 fiscal was $6.42 billion and $75.71 billion, respectively, Commerce and Industry Minister Nirmala Sitharaman said in a written reply to Rajya Sabha. In 2014-15, FDI in India increased by 27 per cent to $30.93 billion

In reply to by ट्रेड मार्क

+१ हेच काल लिहावंसं वाटलं होतं. परंतु लिहिणं जाणूनबुजून टाळलं.

In reply to by श्रीगुरुजी

.... तरीही कमीच हो ! इतके तर मनमोहन न बोलताच आणि न फिरताच आणत हो. मोदीनी इतका गाजावाजा करून आणि इतकी पायपीट करुन त्यामानाने कमीच आणले नै ?

In reply to by श्रीगुरुजी

ट्रेडमार्क, आता लक्षात आलं असेल मी लिहिणं का टाळलं ते.

सेना भाजप्यानी मुम्बैत साडेतेन हजार रु चे ट्याबलेट्स साडेसहा हजारला खरेदी केले. मुम्बैत क्वीन्स नेकलेस वरेल दिव्यंच्या गोंधळात लाको रु च नुकसान होणार ? गुर्जी यवरही लिहिणार की तेही टाळणार ?

In reply to by dadadarekar

गुरूजींचा लेख केंद्रातील सरकारविषयी आहे. तुमच्या गोट्या हरवल्या का परत? (Lost your pebbles, sir?)

In reply to by प्रदीप

संघराज्य आहे म्हणजे केंद्र शासनाच्या शिस्तीतच राज्य सरकारने काम करायचे असते. राज्य व केंद्र दोन्हीत एकच पक्ष असेल तर राज्य हे केंद्राचाच पोटसंच उर्फ सबसेट असल्यासारखे असते. मोदी सत्तेवर असताना त्यांच्याच पक्षाचे लोक राज्य सरकारात भ्रष्टाचार करतात . मग मोदींचे शासन भ्रष्टाचारमुक्त आहे हे सत्य की थोतांड ? हवे तर एक वर्षानंतर -- महाराष्ट्र राज्य असा धागा काढावा.

संघराज्य आहे म्हणजे केंद्र शासनाच्या शिस्तीतच राज्य सरकारने काम करायचे असते. ह्जरत मंदार कुमठे ताम्हनकर आपले हे मौलिक विचार दिल्लि सरकार (सर्कस) ला सुद्धा लागु होतात का?

http://www.thehindu.com/news/national/economy-shifting-gears-results-of… Economy shifting gears, results of CII survey show More sectors clock ‘excellent’ growth during first quarter. At a time when government data give mixed signals of an economic recovery, a survey by the Confederation of Indian Industry’s Associations’ Council (CII ASCON) sees early signs of a revival. Of the 93 sectors surveyed, the proportion that recorded “excellent” growth (faster than 20 per cent) during the April-June quarter of 2015-16 was higher, at 16.1 per cent, than the 7.1 per cent in the corresponding quarter of the last fiscal.

आरक्षणासाठी पटेल समाजाची गुज्रातेत हिंसक आंदोलने.

भारत हा विशाल देश आहे अश्या गोष्टि इथे होतच राहणार. वो जाने दो मियां अबी तुम किधर को लापता हुये हो वो तुम्हारे नुक्क्ड का खय्यात तुम्हे ढुढंरेला है मियां सारे मोहल्ले को बताता फिर रहा है कि एक सतरंजी मे १० चड्डीया बना लिये तुम और उसको सीलाई के नाम पे पाकिस्तान से आया हुआ ५०० का नकली नोट थमाके चले गये.

In reply to by dadadarekar

हितेसराव/ दादा द रेकर हाज ला जाताना तुमची मालमत्ता आमच्या नावावर करून पुण्य मिळवणार होतात काय झाले? आम्ही वाट पाहत आहोत? अब उस वादेसे मुकर जाने केलीये मक्का के लिये पैसा इकठ्ठा करने का बहाना ? ला हौल वला कुव्वत

In reply to by सुबोध खरे

आमची मालमत्ता तुम्हाला देऊ , असे मी कधीही म्हटलेले नाही.

In reply to by dadadarekar

आमची प्रॉपर्टी एकच .. 'अल्ला ! ' इतकी सुंदर प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला का द्यायची ?

In reply to by dadadarekar

ऐसा कहना हराम है मियां. आप अल्लाह कि प्रॉपर्टी हो सकते हो. ये काफरोंकी सोचकी काली छाया अभी भी तुमपर मंडरा रही है. थोडा सब्र करो. बनोगे एक दिन तुम पाक बंदे बनोगे.

अरे म्हणुन का कोणी सतरंजी चोरुन त्याच्या चड्ड्या शिवते का ? आणि शिलाई काय तर नकली ५०० रु ची नोट. आता राहिला प्रश्ण कांद्याबद्द्ल तर ईतक्यात सतरंजि बरोबर तोहि चोरिला जायला लागलाय :) तीसर्‍या (नवीची नवी) मुबंईतुन ७०० किलो चोरिला गेलाय, शंका आहे ह्यात सुद्धा चड्डी गँगचा हात असणारेय.

In reply to by होबासराव

पूर्वी यांचा औरंगजेब टोप्या शिवायचा म्हणे आणि आता काहीतरी वेगळंच शिवणकाम सुरू आहे!

सतरंजी चोर भाजपा शासन नमले ... भूसंपादनाच्या नावाने सतरंज्या ढापून उद्योगपतीना त्याच्या चड्ड्या शिवणारे भाजप स्र्कार नमले. ..... भूसंपादन विधेयकातील वादग्रस्त तरतुदींना होत असलेला तीव्र विरोध, विरोधी पक्षांचे प्राबल्य असलेल्या राज्यसभेत अडलेले या विधेयकाचे गाडे आणि बिहार विधानसभेच्या निवडणुका अशा सगळ्या पार्श्वभूमीवर या विधेयकावर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अखेर माघार घेतल्याचे रविवारी स्पष्ट झाले. भूसंपादन विधेयकातील अनेक तरतुदींना देशभरातून विरोध होत असतानाही ते रेटून नेण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत होते. राज्यसभेत विधेयक मंजूर होणे अशक्य असल्याने सरकारने तीन वेळा त्याबाबत वटहुकूमही काढला. त्यातील तिसऱ्या वटहुकुमाची मुदत आज, सोमवारी संपत आहे. त्याआधी, रविवारी 'मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'याबाबत सरकार पुन्हा वटहुकूम काढणार नाही', असे स्पष्ट केले

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त विविध माध्यमांतून शाळांमध्ये विद्यार्थ्यांना भाषण ऐकविण्याची सक्ती केली आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येलाच शिक्षक दिन साजरा होणार असून, पंतप्रधानांनीही शिक्षकांची 'मन की बात' जाणून घेण्याची आवश्यकता आहे. यंदा शिक्षक दिन शनिवारी असल्यामुळे शुक्रवारी, ४ सप्टेंबरला सकाळी १० ते ११.४५ या वेळेत पंतप्रधान मोदींचे भाषण होणार आहे. याचे प्रक्षेपण विविध माध्यमांमार्फत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळांनी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या असून, त्यानुसार काही दिवसांत तो अहवालही सरकारला पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत

खुप छान आनि खरे लिहिले आहात तुम्हि. तुमच्याबरोबर १०० % सहमत. आणखी १ वर्षानी मोदि सरकारला नक्किच १० पैकी १० गुन नक्किच मिळ्तील.

केंद्र सरकार बदल करू पाहत असलेल्या कामगार धोरणाला विरोध करण्यासाठी बुधवारी देण्यात आलेल्या संपाच्या हाकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोळसा उत्पादने, बँकिंग, वाहतूक सेवेला सर्वाधिक फटका बसला. पश्चिम बंगालमध्ये संपाचा सर्वाधिक फटका बसला असून, संतप्त जमावामुळे हिंसाचारही उफाळून आला. येथे २०० आंदोलकांना अटक करण्यात आली. केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करण्याची भूमिका घेतली आहे; तसेच सरकारी कंपन्यांचे खासगीकरण केले जात आहे. त्याच्या निषेधार्थ देशभरातील दहा कामगार संघटनांनी हा संप पुकारला होता. यात १५ कोटी कामगार सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. या संपात भाजपसंलग्न भारतीय मजदूर संघासह अन्य काही कामगार संघटनांनी भाग घेतला नाही. तर बँक, सरकारी आस्थापने, वाहतूक संघटनांनी भाग घेतला होता. कोल इंडियाला या संपाचा सर्वाधिक फटका बसला. देशभरातून सुमारे चार लाख कर्मचारी संपात सहभागी झाले होते

यात १५ कोटी कामगार सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे.
देशभरातून सुमारे चार लाख कर्मचारी संपात सहभागी झाले होते

(१) १९७३ पासून प्रलंबित असलेला OROP (One Rank One Pension) हा प्रश्न काही प्रमाणात सुटलेला आहे. सैनिकांच्या सर्व १००% मागण्या मान्य झाल्या नसल्यातरी निदान काही मागण्या मान्य झाल्यामुळे गेली ४२ वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नावर बर्‍याच प्रमाणात तोडगा निघालेला आहे. अर्थात काँग्रेसने लगेच टीका सुरू केली आहे. त्याची कारणे २. (अ) जे मोदींना जमू शकले ते आपण का करू शकलो नाही या भावनेतून आलेले वैफल्य आणि (ब) OROP म्हणजे "Only Rahul Only Priyanka" अशी समस्त कॉंग्रेसजनांची असलेली समजूत. (२) गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला मालेगाव बाम्बस्फोटाचा खटला ५ सप्टेंबर २०१५ या दिवशी सुरू झाला. घटना घडल्यावर तब्बल ७ वर्षानंतर हा खटला सुरू झाला. या खटल्यात सुरवातीला काही स्थानिक मुस्लिमांना अटक केली होती. त्यांना काही काळानंतर जामिनावर सोडण्यात आले. नंतर ऑक्टोबर २००८ मध्ये साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहित, स्वामी असीमानंद इ. सह १०-१२ जणांना अटक करून त्यांच्यावर मकोका लावण्यात आला व त्यामुळे ते सर्वजण विनाजामीन आजतगायत तुरूंगात आहेत. मे २०१४ पर्यंत सत्तेवर असलेल्या काँग्रेसने इतक्या वर्षात आरोपपत्र सुद्धा दाखल न करता हा खटला सुरूच होऊन दिला नाही आणि त्यामुळे वरील आरोपी आयुष्यभर विनाजामीन, विनाखटला तुरूंगातच राहतील अशी व्यवस्था झाली. सुदैवाने हा खटला आता सुरू झाला आहे. या खटल्याचा लवकरात लवकर निकाल लागावा अशी इच्छा आहे. जर हे आरोपी दोषी आढळले तर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. परंतु जर ते निर्दोष आढळले तर त्यांची तातडीने मुक्तता करावी. परंतु काहीतरी तांत्रिक खुसपटे काढून खटला लांबवू नये.

In reply to by नाव आडनाव

नाही. असले फुलफॉर्म खिल्ली उडविण्यासाठी केले जातात. व्यंगचित्रातून जो संदेश असतो, साधारणपणे तसेच यातून होते.

मला स्वताला मोदि सरकारने जे काहि केले आहे ते ठिकठाक वाटते. OROP जो खुप काळ प्रलम्बित होता तो सोडवला. १२ रुपये वालि विमा योजना उत्तम आहे. कोळसा खानिन्च वाटप पार्दर्शिपनाने केले. मागिन रेल्वे बजेट हे समतोल साध्नार होत. फुकाच्या घोशना नाहि होत्या. स्मार्ट सिटि योजना सध्यातरि देशासठि फायदेशिर वाटत आहे. नमोच्या परदेश वारि या मेक इन इन्डिआ साठि परकिय गुन्तव्नुक आनतिल असे वाटते.मेक इन इन्डिआ साठि ज्या प्रकारे नमो प्रयत्न करत आहेत ते प्रशन्सेच्या पात्र आहेत. दुसरिकडे, रस्त्यचि नावे बदलने, हे खाउ नका, ते विकु नका अश्या बन्दि आणन बन्द कराय्ला हव. अश्याने त्यन्चि Pro development वालि प्रतिमा खराब होउ शकते.

In reply to by सुजित पवार

अगदी बरोबर

http://m.economictimes.com/news/politics-and-nation/patel-agitation-may… Patel community settled in US want a refund of $3 million out of $5 million raised during Modi's earlier visit to US. "$3 million was given by Patels for that grand event in Madison Square and remained unused and now we want the money back, so that it can be channelised for the movement ,मोदींच्या कार्यक्रमावर खर्च केलेल पैस पटेल समाजाने परत माग्तले.

In reply to by dadadarekar

देशात अशांतता पसरते आहे त्याचा का मोदींना कुठेतरी कोणीतरी बोलतय याचा? एखाद्या व्यक्तीचा एवढा द्वेष करताना आपण देशविरोधी पण होतोय याचा बऱ्याच लोकांना विसर पडत चालला आहे बहुतेक. त्याहून वरचढ म्हणजे परदेशी स्थायिक झालेले लोक पण आरक्षण मागतात किंवा पाठींबा देतात?

In reply to by dadadarekar

हार्दिक पटेल आणी मंडळी आरक्षणासाठी भांडतायेत. इथे व इतरत्र आरक्षण आपल्या देशाच्या दृष्टीने किती धोकादायक आहे त्याची बरीच चर्चा झाली आहे. आणि आनंद तुम्हाला याचा होतोय का की आता अनिवासी भारतीय सुद्धा यात सामील झाले? आणी का तर त्यांनी मोदींना पैसे परत मागितले म्हणून? आरक्षणाला पाठींबा देताय का तुम्ही? म्हणून मी देशविरोधी म्हणतोय…

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्याच्या उद्देशानं मुंबई महापालिकेच्या शाळेतील आठवीत शिकणाऱ्या २२ हजार विद्यार्थ्यांना टॅब देण्याची, शिवसेनेनं मोठा गाजावाजा करत सुरू केलेली योजना 'फ्लॉप' ठरण्याचीच शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वितरित केलेले २० टॅब्लेट विलेपार्ल्यातील एका शाळेनं दुसऱ्याच दिवशी 'ई-क्लास'कडे परत करून टाकलेत. विद्यार्थ्यांना टॅब वापरता येत नाहीत आणि त्यांना ते शिकवण्यासाठी शिक्षकांना कुठलंही प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्याचा गैरवापरच होऊ शकतो, असं स्पष्टपणे सांगत त्यांनी सेनेच्या 'डिजिटल एज्युकेशन' मोहिमेला धक्का दिला आहे. दुसरीकडे, टॅबमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणं, व्हिडिओचा सुमार दर्जा, शैक्षणिक अॅपचा अभाव आणि मुलांकडे अगोदरच असलेल्या पुस्तकांच्या पानांच्या स्कॅन कॉपींचा भरणा, यामुळे हे 'एज्यु-टॅब' फारसे परिणामकारक नसल्याचं विश्लेषण टेक तज्ज्ञांनी केलंय. त्यामुळे शिवसेनेच्या डिजिटल 'प्रबोधना'बद्दलही शंका निर्माण झाली आहे