महाराष्ट्रातील कुठ्ल्याही शहरातील उपहार गृहात गेला, तर महाराष्ट्रीयन कोणताही पदार्थ कमी प्रमाणात मिळेल.त्या मानाने उत्तरे कडून आलेले सामोसे,छोले भटोरे,कचोरी किंव्हा दक्षिणे कडील इडली,डोसा,उताप्पा वगैरे हे पदार्थ सहज उपलब्ध होतील. थोडक्यात आटके पार झेंडा लावलेल्या, महाराष्ट्रातील पराक्रमी पुरुषांची अनेक किस्से, आपणाला नावा सहित सांगता येतील, मात्र महाराष्ट्राचे इतर वेळी खाण्याचे स्पेशल पदार्थ म्हणावे तितके सांगता येणार नाहीत कींव्हा सहज उपलब्ध होणार नाहित.इतर वेळी खाण्यासाठी आसणारे महाराष्ट्रीयन पदार्थ फ़ारच कमी आहेत क़िव्हा काळाच्या ओघात ते आपण सोडून दिले असणार . सद्या दोन आगदी महत्वाचे पदार्थ म्हणाल तर कांदापोहे व उप्पीट किव्हा उपमा .अर्थात ही सर्व सामान्य मराठी माणसाच्या घरातील गोष्ट आहे.
संध्याकाळी कामा वरून दमून घरी परत आल्यावर सौ ला आपण विचारले आज" खायला काय केले आहे ?" तर तिचे उत्तर ठरलेले असते "कांदे पोहे "नाहीतर उप्पीट. ज़र या पदार्थांचे आठवड्याचे वेळापत्रक केले तर आलटून पालटून हेच पदार्थ कायम असतील . म्हणजे असे ,एक दिवस कांदेपोहे ,दुसऱ्या दिवशी बटाटे पोहे ,तिसऱ्या दिवशी दडपे पोहे ,चौथे दिवशी उप्पीट ,पाचवे दिवशी मोठ्या रव्याचे उप्पीट ,सहावे दिवशी हिरवे मटार व पुदिना घातलेले पातळ उप्पीट ,सातवे दिवशी पातळ पोह्याचा चिवडा,शेवटी सगळ्यांची चव मात्र एकच. सौ . ची भिशी पार्टी असेल, त्या दिवशी त्या तुम्हाला प्रेमाने विचारतील "अहो मी आज ना फार दमून आले आहे ,तुम्हाला खायला "दही पोहे" करून देवू का ? म्हणजे नशिबी शेवटी पोहेच. क़ंटाळुन नातेवाइका कडे किंवा मित्रा कडे जावे तर तो म्हणतो" थांब हं!! तू आला आहेस तर हिला कांहीतरी खायला करायला सांगतो !! ,पण ती खायला काय करणार, हे आपल्याला आधिच माहित असते ,कांदे पोहे तरी नाहीतर उप्पीट . लोक हो, हे कांदेपोहे व उप्पीट खाऊन मी इतका वैतागलो आहे ,काय सांगू ? मी तर ह्या कांदे पोह्याचे नाव "सुजके पोहे "असे चिडून ठेवले आहे .पाण्यात घातल्यावर बघा ना ! कसे रुसतात आणि टमकन फुगतात. एखाद्या मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम असेल तर ह्या कार्यक्रमाला सद्यां लोक "कांदेपोह्याचा कार्यक्रम " असे म्हणतात. य़ा शब्दाला आता सरकारी व समाज मान्यता मिळाली आहे .समजा एखाद्या मुलीचा दाखवण्याचा कार्यक्रम झाला व त्या वेळी मेनू म्हणून त्यांनी पोह्या शिवाय इतर दुसरा पदार्थ केला ,तर तो कार्यक्रम ग्राह्य धरत नाहीत म्हणे. य़ाला पळवाट म्हणून किव्हा रीतीरिवाज म्हणून सत्यनारायणाच्या प्रसादा प्रमाणे चमचा चमचा भर जमलेल्या पाहुण्याच्या हातावर "कांदे पोहे "ठेवावे लागतात म्हणे. जेष्ठ मंडळी देखिल मुलिला एकमेव प्रश्र्न विचारतात" मुली तुला कांदे पोहे करता येतात ना "?
एका मराठी चित्रपट निर्मात्याने ,आपल्या चित्रपटाचे नाव ठेवले होते "कांदेपोहे". या चित्रपटाचा जो नायक असतो, त्याला लहानपणी कांदेपोहे खूप आवडत असतात .त्याची आई त्याला लहानपणी खूप कांदेपोहे करून खायला देत असते .तो लहानपणीच अचानक हरवतो .शेवटी त्याची आई त्याला कांदेपोहे खाण्याच्या सवई वरून, त्याच्या मोठेपणी बरोबर हुडकून काढते , अशी कांहीतरी चित्रपटाची कथा होती . मात्र इच्छा असो कि नसो, किंव्हा कांदेपोहे आवडो किंव्हा न आवडो, प्रत्येक मराठी माणूस कांदेपोहे भरपूर खात आसल्या मुळे कथेवर प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले .त्या निर्मात्याने त्या चित्रपटाचे नाव कांदे पोहे बदलून "खिचडी " आसे ठेवले . आवधूत गुप्ते यांनी "कांदे पोह्यावर "नवीन गाणे देखिल गायले आहे"जिवन म्हणजे कडईतील कांदेपोहे ......"आसे कांही तरी त्याचे बोल आहेत.
देवआंनद यांच्या " हम दोनो " या जुन्या चित्रपटातील माझे एक आवडते गाणे आहे .ते असे "कभी खुदपे,कभी हलातसे ,रोना आया,बात निकली तो हर बातपे रोना आया. पण मी या पोह्यांना कंटाळून माझ्या भावना आशा व्यक्त करतो "कभी दडपे ,कभी सुजके, रोना आया. बात बदली तो ,हर बारमे उपमा खाया .
खरोखरच कांदेपोहे ,उप्पीट हे पदार्थ महाराष्ट्रातील आहेत का ? हे जाणून घेण्या साठी मी माझ्या एका इतिहास तज्ञ माणसाचा सल्ला घेतला .त्याच्या मते पोह्याचा प्रथम उल्लेख कृष्ण -सुदामा भेटीच्या वेळी आढळतो .सुदमा हा बहुतेक महाराष्ट्रातील असावा. मराठी फौजा ह्या बारा महिन्यातील आठ महिने युध्दा साठी बाहेर जात असत, अशा वेळी उरलेल्या चार महिन्यात भात हे एकमेव पिक ते घेत असणार .त्या मुळे भाताचे पोहे हा प्रकार अस्थित्वात आला असावा."पण वीज निर्मिती त्या काळी नसल्याने ,पोहे कसे करणार " असा प्रश्र्न मी उपस्थित केला .तेंव्हा तो म्हणाला "त्या काळी मोठ मोठ्या दगडी उखळात ,मुसळांनी सडून पोहे बनवले जात असत . कोणी एका सरदाराने आपल्या पोहे बनवणाऱ्या माणसास भातकुटे जास्त ठेवल्या वरून त्याच्या कमरेत दोन मुसळे मारण्याची शिक्षा , दिल्याची घटना कुठल्या एका बखरीत लिहली आसल्याचे त्याने मला सांगितले .तसेंच आपल्या फौजा दक्षिणेवरही चाल करून जात असत ,त्या वेळी कांही मांडलिक राजे महाराष्ट्रातील सरदाराना खुश करण्या साठी उपमा खाण्यास देत असत . तो त्यांना इतका आवडला कि त्यांच्या प्रत्येक तहात ,त्यांनी एक उपमा बनवणारी टोळी सोबत महाराष्ट्रात पाठवण्याचे कलम त्यांच्या तहनाम्यात घातले होते . आशा प्रकारे उप्पिटाचा प्रसार महाराष्ट्रात झाला व ते घरोघरी पोहचले .थोड्क्यात कांदेपोह्याची उत्पत्ती हि महाराष्ट्रातच झाली व उप्पीट हे दक्षिणे कडून आले असावे .सद्या तरी प्राप्त इतिहास इतकाच आहे .
ह्या कांदे पोहे आणि उपम्यावरून माझ्यात व सौ मध्ये अनेक वेळेस वाद झाले . तिने कांही तरी नवीन शिकावे म्हणून नव नवीन पदार्थ शिकवणाऱ्या संस्था ,मासिके यांचे भरपूर पत्ते देखील मी तिला दिले.पण हा पोह्यांचा ठेका ती सोडायला तयार नाही."जर कांही नविन करायचे आसेल तर तुम्हीच करा.परवा आम्ह्च्य शेजारच्या काकुनी ,आमटीचे डोसे फारच छान केले होते . मला खास आमंत्रण देऊन ,खायला दिले होते . हे जेंव्हा मी माझ्या पत्नीस सांगितले , तसे तीचा पारा खुपच चढला ."ठाऊक आहे मला !! ती उतरलेली रात्रीची आमटी असणार !! " हे ऐकल्या वर मला उगीचच पोटात ढवळू लागले . शेवटी चिडून " मीच तुला आता कांदेपोहे व उपमा सोडुन कांही तरी नविन करून दाखवतो" असा पवित्रा मी घेतला .मी तिला विचारले देखील "तू मला नुसते सांग मी कोणता पदार्थ करू, ते जर मला नाही जमले, तर जन्मभर तू सांगशील ते मी ऐकेन .शेवटी आम्हाला देखील कांही पुरषार्थ आहे कि नाही" .? " त्यावर आमचे चिरंजीव वय वर्ष दहा मध्येच म्हणाले " बाबा गुलाबजामून करा ,मला खूप आवडतात !! अरे बापरे रे , मी मनात म्हणालो इतके दिवस फक्त मी त्यांची चवच सांगत आलो पण आता ते करायचे म्हणजे महासंकट, त्यात ते साखरेच्या पाकातील गोड गोड गुलाब जामुन संध्याकाळी कोण खाणार ? ".ठिक आहे ठीक आहे" असे म्हणत मी त्यांचे आव्हान स्वीकारले . "आता बघाच, असे सुंदर गुलाबजामून करतो कि सगळयांनी म्हणायला पाहिजे चक दे गुलाबजामून !!!"
या जलद गुलाबजामून करण्याची पॅकेट्स बाजारात मिळतात व ते कसे करायचे याची कृती पण त्या वर लिहली असते , हे मला ठाऊक होते . मग गुलाबजामून करायला काय आवघड आहे ?बाजारातून असे एक पॅकेट मी आधिच विकत आणले . त्यावर गुलाबजामून बनवण्याची कृती मी दोन तीन वेळेस वाचली. ही जलद गुलाबजामून करण्याची कृती कुणास कळू नये म्हणून मी सर्वांना एक अट घातली होती ,मी स्वयंपाक करीत असताना कोणीही किचन मध्ये आत येऊ नये !
तो गुलाब जामुन करण्याचा दिवस उजाडला .पॅकेट वरिल कृती वाचून गुलाब ज़ा्मुन करणे म्हणजे पुस्तकातील ," पाण्यात पोहावे कसे " हा लेख वाचून पाण्यात पोहाण्यास उडी मारण्या सारखे होते. त्या पॅकेटवर लिहलेल्या प्रत्येक गोष्टी मी काळजी पूर्वक वाचून ,त्या प्रमाणे कृती करीत होतो क़ोणताही धोका मला घ्यायचा नव्हता .तरी पण ह्या गोष्टीची सवय नसल्याने थोडा घाबरून जात होतो .त्यात आमचे चिरंजीव एखाद्या माकडा प्रमाणे खिडकीत चडून माझ्यावर बारीक लक्ष ठेवून होते . मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो " बाळ निकू !! मी तुझ्या वाढदिवस फार छान गिफ्ट आणून देणार आहे .पण माझे एक काम कर ना !! शेजारच्या स्वीट मार्ट मध्ये जाऊन मला एक किलो गुलाबजामून आणून देशील ?.त्यावर तो उत्तरला " ओ बाबा !! नो चीटिंग ,करून दाखवा !! करून दाखवा !! नाहितर आईला सांगेन."
" माकडा ,तू पण आईच्या बाजूचाच,करून दाखवा म्हणे!!" मी, म्हणतात ना "कठीण समय येता, कोण कामास येतो ?
शेवटी नाईलाजाने मी मस्त गुलाबजामून बनवले व ते एका पातेल्यात घालून फ्रीज मध्ये ठेवले . सर्व मंड्ळिना स्वंयपाक घरात बोलवले . मी तर सर्व त्या गुलाबजामुन पॅकेटवर लिहल्या प्रमाणे व्यवस्थित केले होते . तरी पण मला उगीचच या गोष्टीचा दबाव जाणवत होता. सौ . ने मी ठेवलेले फ्रीज मधील चक्कदे गुलाबजामून बाहेर काढले व फारच चमत्कारी चेहरा करून त्याचे निरक्षण केले. तीने ते एका चमच्याने घेण्याचा प्रयत्न केला .पहातो तो काय !! माझे साखरेचा पाक करताना काय चुकले कुणास ठाऊक ,ते चक्कदे गुलाबजामून इतके कडक झाले होते, कि चमच्याने त्यावर मारल्यावर ठक ss ठक ss असा आवाज येत होता." आहो हे चक्कदे गुलाबजामून नाहीत ,हि तर गुलाबजामून चिक्की झाली आहे .बघा !! चांगले दात असणारयानीच खावा बरे !!" सौ म्हणाल्या . हे पाहिल्यावर मी फारच खजील झालो . माझ्या इनस्ट्रुमेंट बॉक्स मधील स्क्रू ड्रायवर व हातोडी मी बाहेर काढली व ठोकून ठोकून गुलाबजामून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला .लोक हो किती जरी आपण म्हंटले तरी "जेनुकाम तेनु ठाय,बिजा करे तो गोता खाय" .त्यात दुसऱ्या एका गोष्टीची माझ्या मनाला चुटपूट लागून राहिली होती, जर हा पदार्थ, मला परत करून दाखवा, असे कोणी सांगितले असते तर मला ते जमले नसते ,नाहीतर मी हा पदार्थ "गुलाबजमुंची चिक्की " म्हणून मासिकात नवीन पाककृती म्हणून दिली असती , शेवटी संकट हि शोधाची जननी आहे .
माझ्या ह्या फसलेल्या प्रयोगा मुळे मी कामावरून परत आल्यावर सौ.ला मदत करण्याचे ठरवले आहे .पण माझी मदत म्हणजे तिला तिच्या कामात लुडबुड वाटते. ती म्हणते "तुम्ही कांहीही मला मदत करण्याची गरज नाही .तुम्ही फक्त शांत बसा, उलट तुम्हाला माझ्या कडून कांही करून हवे आहे का ? त्या वरून मी लगेचच म्हणालो " होय माझ्या साठी फक्कड कांदेपोहे बनव बघू !! जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आसे म्हणतात ना , ते आगदी खरे आहे.-संजीय वाशीकर
वाचने
4061
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या आधीच्या लेखाशी तुलना
थो..........डा???????
गुलाबजाम चा उतारा ः जमलाआहे.
+१
तुला अचानक कांदे पोहे
In reply to +१ by अन्या दातार
Sanjay TU-Wach