समर्थ रामदास लिखीत धवल गीताच्या अनुवादात साहाय्य हवे, आणि सुद्धा धवळे/धवले आडनावांची माहिती हवी
धवले/धवळे/ धवलगीत हि प्राचीन महाराष्ट्रातील विवाहप्रसंगी गायल्या जाणार्या लोकगीतांची लूप्त होत गेलेली एक परंपरा होती. या परंपरेचे अवशेष आता आगरी समाज आणि इतर काही छोट्या समाजगटातून शिल्लक असावेत.
धवळे गीत प्रकारात संतांनी सुद्धा लेखन केले त्यात समर्थ रामदास लिखीत एक काव्य दिसते आहे. त्याची सुरवात
आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला ।
पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥
वरील प्रमाणे आहे.
हे पूर्ण काव्य, या लिंकेवर उपलब्ध आहे; पूर्ण काव्य (मला) समजत नाहीए; ते वाचणे त्याचा अर्थ या धाग्यावर सांगणे हा या धाग्याचा मुख्य उद्देश आहे.
*** अधिक माहिती***
सदर काव्यातून समर्थ रामदास काही विशेष सांगू पाहात असावेत असा अंदाजा आहे, समर्थ रामदास या धवळेमधून काय सांगू पहात आहेत ? दुसरे कुणास शक्य झाल्यास समर्थ लिखीत या काव्याचा अनुवादकरून हवा आहे. तेही शक्य न झाल्यास जेवढ्या शब्दांचे अर्थ सांगता येतील तेवढे दिलेत तरीही चालेल. (विकिसाठी असल्यामुळे या धाग्यास प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.)
हे काव्य ट्रांसलिटरल डॉट ऑर्ग (पुर्वाश्रमीचे खाप्रे डॉट ऑर्ग) वर उपलब्ध आहे. समर्थ लिखीत मूळ स्वरूपातील लिखीत दस्तएवज कॉपीराइट फ्री असावयास हवेत. मूळ दस्तएवजात कुणी काना-मात्रा शुद्धलेखनाचे बदल केले तरी नवीन कॉपीराईटची निर्मीती होते. त्यामुळे ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवरून पूर्ण काव्य येथे कॉपीपेस्टवणे शक्य नाही. ट्रांसलिटरल डॉट ऑर्गने काना-मात्रा शुद्धलेखनापलिकडे मूळकाव्यात काही बदल केले असण्याची शक्यता नाही त्यामुळे अनुवादावर ट्रांसलिटरल डॉट ऑर्गच्या कॉपीराइटचा प्रश्न उद्भवणार नाही.
जर कुणाच्या संग्रही समर्थ लिखीत या काव्याची मूळाबर हुकूम प्रत उपलब्ध असल्यास या धाग्यासाठी (मूळाबर हुकूम) टंकून मिळाल्यास ते सुद्धा हवे आहे.
आगरी समाजाप्रमाणे एखाद्या समाजाचे अजूनही धवळे उपलब्ध असल्यास हवे आहेत, अर्थात छोट्या छोट्या समाजांच मराठी संस्थळांवर प्रतिनिधीत्व फारस नाही त्यामुळे ते या धाग्यावरून कितपत उपलब्ध होतील या बाबत साशंकता आहे. प्राचीन गुजराथ मध्ये ढोल गीते होती आणि राजस्थान मध्ये धवले आडनावाची मंडळी काही लोकगीतांचे गायन करत असावीत असे आंतरजालावरील माहिती वरून अंदाजा येतो या संबंधानेही काही अधीक माहिती मिळाल्यास हवी आहे.
राजस्थानातील लोकगीत गायनात धवले आडनावाचे (एक की अनेक ?) दिसतात. आगरी समाजात धवले म्हणण्याचे काम मुख्यत्वे स्त्रीया करतात त्यांना धवलारनी म्हणतात. तेव्हा धवले आणि धवळे आडनावाचा धवले लोकगीत परंपरेशी काही सरळ संबंध असल्याचा कोणताही संदर्भ तुर्तास उपलब्ध नाही पण धवले आणि धवळे आडनावांबद्दल काही अधिक माहिती मिळाल्यास स्वागत असेल.
धवले लोकगीतांबद्दल सध्या आंतरजालावर उपलब्ध माहितीची दखल मराठी विकिपीडियातील धवळे या लेखात घेतलेली आहे.
*हा धागालेख विकिप्रकल्पांसाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील.
*अनुषंगिक नसलेले आवांतर टाळण्यासाठी आभार
याद्या
14777
प्रतिक्रिया
46
वर्गीकरण
मिसळपाव
माहितगार बुवा तुम्ही काय
तुम्हाला समजलेला अर्थ आम्हालाही सांगा.
In reply to माहितगार बुवा तुम्ही काय by जडभरत
नाही तुमचा काहीतरी गैरसमज
विवाहाच्या प्रसंगी गायली
महादेवाचा अवतार आणि विवाह
In reply to विवाहाच्या प्रसंगी गायली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला नै वाटत..
In reply to महादेवाचा अवतार आणि विवाह by जडभरत
मोल्सवर्थात आणि आंतरजालावर
In reply to मला नै वाटत.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरसकटीकरण नको. कुठल्या
In reply to मोल्सवर्थात आणि आंतरजालावर by माहितगार
आपण म्हणता तसे काँटेक्स्ट
In reply to सरसकटीकरण नको. कुठल्या by प्यारे१
समर्थांना भारत भ्रमणामुळे
In reply to आपण म्हणता तसे काँटेक्स्ट by माहितगार
गंमत समजून घेता येण्यासाठी..
In reply to विवाहाच्या प्रसंगी गायली by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे साहेब संत वचनांचा
देव आणि भक्त, द्वैत आणि
In reply to बिरुटे साहेब संत वचनांचा by जडभरत
खालील अर्थ हवे आहेत
काही अर्थ
In reply to खालील अर्थ हवे आहेत by माहितगार
+1
In reply to काही अर्थ by पैसा
उपयुक्त आणि माहितीपूर्ण
In reply to काही अर्थ by पैसा
खूप छान पैसातै.
In reply to काही अर्थ by पैसा
समजण्यास बरेच सोपे झाले.
In reply to काही अर्थ by पैसा
आतापर्यंत रामदासस्वामींच्या
In reply to समजण्यास बरेच सोपे झाले. by माहितगार
समर्थांचीही मराठी चार
In reply to आतापर्यंत रामदासस्वामींच्या by प्यारे१
एकविस चा संदर्भ ?
In reply to काही अर्थ by पैसा
कदाचित
In reply to एकविस चा संदर्भ ? by माहितगार
अप्रतिम प्रतिसाद पैसा तै
In reply to काही अर्थ by पैसा
+१ पैसा तैंच्या मदतीने एका
In reply to अप्रतिम प्रतिसाद पैसा तै by प्रसाद गोडबोले
'गाते बाजेचे घेतले' यातील
In reply to खालील अर्थ हवे आहेत by माहितगार
'लवथव' हा शब्द समर्थांच्याच
In reply to खालील अर्थ हवे आहेत by माहितगार
अजून काही
In reply to 'लवथव' हा शब्द समर्थांच्याच by माहितगार
आपण म्हणता तसा अर्थ असण्याची
In reply to अजून काही by पैसा
'बहुसाल' आणि 'रक्तबिंदी' हे
एक शक्यता
In reply to 'बहुसाल' आणि 'रक्तबिंदी' हे by माहितगार
पैसातै आपणांस खरंच मनापासून
In reply to एक शक्यता by पैसा
प्रथम दर्शनीतरी हे एक
In reply to एक शक्यता by पैसा
द्वैतातील अद्वैत दाखवणे
In reply to प्रथम दर्शनीतरी हे एक by माहितगार
शिवरुपी धर्म हा विरक्त आहे
In reply to प्रथम दर्शनीतरी हे एक by माहितगार
पैसा, मस्तच..... आणि धन्यवाद.
सुरेख आणि रोचक माहिती !
In reply to पैसा, मस्तच..... आणि धन्यवाद. by जयंत कुलकर्णी
वा!
In reply to पैसा, मस्तच..... आणि धन्यवाद. by जयंत कुलकर्णी
विवाह आणि वयाचे अंतर ?
अनुवाद.....
खूप छान!
In reply to अनुवाद..... by नरेंद्र गोळे
सुरेख लिहिलंय! +१
In reply to खूप छान! by पैसा
ओहो
In reply to सुरेख लिहिलंय! +१ by माहितगार
मस्तच जमलंय भाऊ! खूप आभार
In reply to अनुवाद..... by नरेंद्र गोळे
व्वा !
In reply to अनुवाद..... by नरेंद्र गोळे
तेथे नामनाम आले