✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ओळख - उचलगिरी करणाऱ्यांची

व
विवेकपटाईत यांनी
Sat, 07/04/2015 - 10:03  ·  लेख
लेख
मराठी सृष्टीवर ‘तुमच्या मनातल्या लेखकाला जागे करा” हे आव्हान स्वीकारून मी मराठी लेखन करायला सुरुवात केली. आधी ‘मराठीसृष्टी’ किंवा ;मी मराठी’ वर लेख टाकल्या नंतर नंतर आपल्या ब्लॉगवर टाकीत असे. कालांतरानंतर ‘मी मराठी’ वेबसाईट बंद पडली. ‘प्रेम म्हणजे काय’ हा लेख प्रथम मराठी सृष्टीवर (१३.७.२०१०) टाकला होता आणि नंतर आपल्या ब्लॉग वर. ऐसीअक्षरे सुरवात म्हणून मला स्वत:ला आवडलेला हा लेख ऐसी अक्षरे वर ८.१२.२०१३ टाकला. श्री राजेश घासकडवी यांनी मला जाब विचारला आणि माझी दांडीच उडाली. मी कधीही आपल्या लेखांचे प्रिंट घेतले नव्हते. (कार्यालयात इंटरनेटवर बंदी असल्या मुळे). सुदैवाने मराठीसृष्टी सुरु होती. लेख सापडला. मूळ लेखकालाच आपण चोर नाही हे सिद्ध करण्याची पाळी आली. पण मी शहाणा झालो. आता पहिले आपल्या ब्लॉग वर आणि नंतर मिसळपाव आणि ऐसी अक्षरे वर टाकतो. (दोन तीन ठिकाणी लेख टाकल्यामुळे कुणी चोरी करणार नाही असे वाटले). तसा प्रेम म्हणजे काय हा कमीत कमी ७-८ लोकांनी आपल्या नावानी टाकला असेल. यातल्या ४ लोकांनी किमान खेद तरी व्यक्त केला. असो. अंतर्जालावर दुसर्यांचे लेखन आपल्या नावाने काही लोक बेहिचक जसेच्या तसे आपल्या नावाने खपवितात. यातले काही पकडल्या गेल्या वर किमान खेद तरी व्यक्त करतात किंवा पुढे असे करणार नाही याचे आश्वासन तरी देतात. पण काही त्यांना जाब विचारल्यावर त्याचे उत्तर ही देत नाहीत. मूळ लेखकाला कळले आहे तरी बेशर्मीने सारखे तोच कित्ता गिरवीत राहतात. एकच उपाय सर्वांनी आपले लेख एकदा तरी तपासून बघितले पाहिजे. अश्यांची माहिती अंतर्जालावर लिहिणार्यांना कळली पाहिजे. कमीत कमी थोडी लाज वाटून ते असे करणे सोडण्याची शक्यता. शिवाजी राव शिंदे : हे मराठी अड्डावर नियमित लिहित राहतात. बहुतेक पुण्यात राहतात यांनी केलेला पराक्रम १. तपश्चर्येचे फळ (२.६.२०१५) शिवाजी राव शिंदे यांनी २३.६.२०१५ ला आपल्या नावानी 1. http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:1136352 मराठी बाणा / मोडेन पण वाकणार नाही (१९.३.२०११) 2. शिवाजी राव शिंदे यांनी २४.७.२०११ ला आपल्या नावानी http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:611726 वसंत पंचमी एक आनंदोत्सव(२५.१.२०१५): 3. शिवाजी राव शिंदे यांनी २६ जनवरी २०१५ला http://marathiadda.com/m/blogpost?id=2437740%3ABlogPost%3A1122770 4. रस्त्यावर वाहन चालविणारे (6.9.2014) शिवाजी राव शिंदे यांनी दुसर्याच दिवशी अर्थात ७.९.२०१४ http://marathiadda.com/profiles/blogs/ 2437740:BlogPost:1097323?xg_source=activity 5. वरुण राजाला साकडं: (१.९.२०१४) शिवाजी राव शिंदे यांनी ३.९.२०१४http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:1096709 किरण खंडागळे(मराठी कविता आणि बरच काही), हे ठाण्यात राहतात. पुन: एकलव्य : नियतीचा खेळ (१६.६.२०१३) यांनी १०.८.२०१३ http://marathikavee.blogspot.in/2013/08/blog-post_9124.html प्रेम आणि गालावरचे खड्डे (२८.७.२०१३) यांनी http://marathikavee.blogspot.in/2013/08/blog-post_26.html प्रेम म्हणजे काय: (१३.७.२०१०) http://marathikavee.blogspot.in/2013/02/blog-post_6744.html तुझ माझ मराठी (रणजीत मांगे) यांनी तर कमाल केली. १. रामायण कथा सीता: (६.४.२०१५) तुझ माझ मराठी (फेसबुक वर त्याच दिवशी अर्थात ६.४.२०१५) २. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।: (७.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर यांनी त्याच दिवशी ७.१२.२०१४ला. ३. म्हातारी ग मैना: (१.२.२०१५) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी. ४. बंदुकीची गोळी आणि ती: (२७.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी ५. झुंज - अंधाराच्या राक्षसांशी(६.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी ६. बळी (२४.११.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी आणखीन प्रयत्न करणे सोडून दिले. पुरोगामी विचारांचे एकमत नावाच्या ई-वर्तमान पत्र यांनी नाव न देता प्रेम म्हणजे काय हा लेख ७.१.२०१५ छापला. संदेश पाठविल्यावर उत्तर ही मिळाले नाही. http://www.dainikekmat.com/Yuva-53--151.html#.VZYY21Ipr7E. शिवाय अनिल काळगे (तुझी आठवण), युवराज मोहिते, गोविंद पवार, नितीन ठाकूर (या चौघांनी खेद व्यक्त केला). प्रसाद म्हैसे, आणि अनेक फेसबुक माझा एकटेपणा (योगेश), I miss you इत्यादी. या शिवाय माझे इतर लेख उदा: एखाद दुसर्याने उचलगिरी केलेली आहे. एफ डी आई सुंदरी, भ्रष्टाचार / काचेचे घर, मराठी बाणा / मोडेन पण वाकणार नाही: समलैंगिकता - सृष्टीच्या विनाशाचा मार्ग. पण सध्या त्यांचे नाव देत नाही आहे. कदाचित हा लेख वाचून ते पुढे असे करणार नाही ही अपेक्षा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
16659 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

नवीन च दिसतय हे !

आनंदराव
Sat, 07/04/2015 - 10:13 नवीन
नवीन च दिसतय हे ! अशा उचलेगिरी करणर्‍यांवर तुम्ही कारवाई केली का? तेही लिहा.
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Sat, 07/04/2015 - 10:29 नवीन
हे फार जुने आहे. मायबोली उचलेगिरी .. http://www.maayboli.com/node/25685
  • Log in or register to post comments

मला ही माझ्या ज्योतिषाकडे

प्रकाश घाटपांडे
Sat, 07/04/2015 - 10:45 नवीन
मला ही माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी या पुस्तकाची चक्क उचलेगिरी माझ्याशी संपर्क न करता व संदर्भ न देता केलेली आढळली; हे पुस्तक मी उपक्रमवर लेखमाला स्वरुपात २००७ ला टाकले होते. http://mr.upakram.org/node/1065 ओंकार पुरंदरे नावाच्या माणसाचा पुरंदरचा वाघ सरदार अशा नावाचा ब्लॊग आहे http://purandarchawaghsardar.blogspot.in/2010/07/blog-post_7882.html
  • Log in or register to post comments

मिसळपाव शिवाय इतर साईटवर मी

खटपट्या
Sat, 07/04/2015 - 11:28 नवीन
मिसळपाव शिवाय इतर साईटवर मी जास्त जात नाही. त्यामुळे माझा एखादा लेख जर कोणी ढापला असेल तर कसे कळाणार ?
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Sat, 07/04/2015 - 12:03 नवीन
तुमच्या लेखातील एक वाक्य क्वापी करुन गुगल सर्च मध्ये पेस्ट करा व सर्च करा... तो लेख कुठे कुठे आहे ते समजेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आपल्या लेखातला एखाद्या

विवेकपटाईत
Sat, 07/04/2015 - 16:35 नवीन
आपल्या लेखातला एखाद्या वाक्याला इंटरनेट वर टाका, ते वाक्य जेवढ्या लेखांत असेल कळेल. अश्या रीतीने २-३ वाक्य टाकल्या वर कळू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

काय थर्ड क्लास लोक आहेत साले

मृत्युन्जय
Sat, 07/04/2015 - 11:43 नवीन
काय थर्ड क्लास लोक आहेत साले.सहज बघितले तर माझेही लेख चोरी केले गेले आहेतः https://marathikida.wordpress.com/2015/06/10/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE/comment-page-1/#comment-1 मराठी किडा वर कोणीतरी माझ्या हम तो तेरे आशिक है ची चोरी केलेली दिसते आहे http://misalpav.com/node/31285 आता बाकीच्या लेखांबद्दल शोधणे आले.
  • Log in or register to post comments

आणि रजनीकांत रडला - धूम ३ हा

मृत्युन्जय
Sat, 07/04/2015 - 11:58 नवीन
आणि रजनीकांत रडला - धूम ३ हा माझा लेख चेपुवर चोरला आहे . खाली लिंक दिलेली आहे https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=440299226099515&id=197392430390197 या चोरांचे काय करावे कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

फेसबुकवर

पैसा
Sat, 07/04/2015 - 12:16 नवीन
जेवढ्याना शक्य होईल तेवढ्यांनी त्याच्या वॉलवर बोंबाबोंब करून मूळ लेखाची लिंक द्यायची आणि शिव्या पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

उचल्यांबद्दल तिडीक वाटते!

एस
Sat, 07/04/2015 - 12:25 नवीन
उचलेगिरी करणार्‍यांवर नेमका आजच धागा यावा हा काय विलक्षण योगायोग आहे!
  • Log in or register to post comments

किंवा कदाचित हा योगायोग नसेल.

असंका
Sat, 07/04/2015 - 14:45 नवीन
किंवा कदाचित हा योगायोग नसेल....? (लेखाचा विस्तार बघता योगायोगच असावा म्हणा...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

योगायोग कसा?

एकुलता एक डॉन
Sat, 07/04/2015 - 15:58 नवीन
उचलेगिरी करणार्‍यांवर नेमका आजच धागा यावा हा काय विलक्षण योगायोग आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

कसला योगायोग?

dadadarekar
Sat, 07/04/2015 - 16:08 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

हब्यास दरेकर हब्यास...

आदूबाळ
Sat, 07/04/2015 - 19:56 नवीन
हब्यास दरेकर हब्यास...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

काय आहे की,

एस
Sat, 07/04/2015 - 21:16 नवीन
सर्व लाजलज्जा, शरम गुंडाळून अशी माणसे उजळ माथ्याने समाजात वावरायला मोकळी होतात याची जबरदस्त चीड येते. दुर्दैवाने बहुतांश लोकांना त्यांच्या पराक्रमाची माहिती नसते. निदान नंतरतरी हे असे करण्यास धजावणार नाहीत एवढी अपेक्षा ठेवणे वावगे ठरू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ते जाउ द्या

एकुलता एक डॉन
Sat, 07/04/2015 - 21:33 नवीन
ते जाउ द्या योगा योग कसा हे तुम्हि विचारुन पण साण्गत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

ज्यांच्याकडे रोख आहे त्यांना

एस
Sun, 07/05/2015 - 00:35 नवीन
ज्यांच्याकडे रोख आहे त्यांना समजले तरी पुरेसे आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन

समजले समजले समजले .

dadadarekar
Sun, 07/05/2015 - 13:34 नवीन
एखादे भूत जहाजावर कब्जा करते तसे वांगमयचोर दुसर्‍याच्या कलाकृतीवर कब्जा करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

:-))

असंका
Mon, 07/06/2015 - 09:48 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

रच्याकने, करणारे सगळं उघड उघड

असंका
Mon, 07/06/2015 - 09:52 नवीन
रच्याकने, करणारे सगळं उघड उघड करतात , आणि ज्यांनी काहीच केलेलं नाही ते मात्र आडून आडून बोलत रहातात... ही कसली भिती म्हणायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

सौजन्य.

आदूबाळ
Tue, 07/07/2015 - 17:49 नवीन
सौजन्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

सहमत आहे!

रुपी
Sat, 07/04/2015 - 19:38 नवीन
सहमत आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

स्वॅप्स यान्च्या प्रतिसादाला

एकुलता एक डॉन
Sat, 07/04/2015 - 16:34 नवीन
स्वॅप्स यान्च्या प्रतिसादाला प्रश्न आहे हा
  • Log in or register to post comments

काल ३ जुलै होती. गेल्या वर्षी

विवेकपटाईत
Sat, 07/04/2015 - 16:47 नवीन
काल ३ जुलै होती. गेल्या वर्षी याच दिवशी डॉक्टरांनी हृदयावर शास्त्र चालविले होते. का, मला सकाळी थोडे ठीक वाटत नव्हते. सुट्टी केलील. गेल्या (प्रधानमंत्री कार्यालयातून गच्छन्ति झाल्या मुळे, आता सुट्टीकरताना जास्त विचार करावा लागत नाही). टाईम पास म्हणून आपल्या ब्लॉग मधल्या जुन्या लेखांतील स्पेलिंगच्या चुका दुरुस्ती करणे सुरु केले. सहज म्हणून ४० कथा आणि लेखांच्या ओळी इंटरनेटवर टाकून पहिल्या. डोक चक्रावून गेले. २० एक लेखांची उचलगिरी झालेली होती. मनात आल आपण यांच्या विरुद्ध काही करू शकत नाही. इंटरनेटवर लिहिण्याचा मोबदला मिळत नाही. कार्यवाही करण्यासाठी पैसा कोण खर्च करेल. शिवाजीराव शिंदे सारखे याचाच फायदा उचलतात. ४-५ लेखांबाबत आधीच माहिती होती. उदा: प्रेम म्हणजे काय. काहीना जाब विचारला होता. काहींनी खेद व्यक्त केला. काहींनी उत्तर देण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यांचेच नावे मी दिली आहे. काहींनी फक्त एकच लेख किंवा कथेची उचलगिरी केली आहे. तूर्त त्यांचे नावे दिली नाहीत. जवळपास १५-१६ लोकांनी उचलगिरी केली आहे.
  • Log in or register to post comments

चिडचिड

मधुरा देशपांडे
Sat, 07/04/2015 - 16:51 नवीन
प्रचंड मनस्ताप, चिडचिड होते असे काही दिसले की. लेख चोरतात, फोटो चोरतात. हाईट म्हणजे प्रवासवर्णन पण चोरतात. म्हणजे कुठे फिरायला गेलो की स्वतःच्या डोळ्यांनी बघायचे नाही, तेही ढापायचे. फेसबुकवर एक पेज सापडले मागच्याच महिन्यात, अंतर्नाद नावाचे, माझ्या ब्लॉगवरुन प्रवासवर्णनातील कित्त्येक वाक्य जशीच्या तशी घेतली होती, काहीही बदल न करता आणि काही ठिकाणी फक्त शब्द इकडचे तिकडे केले होते. माझ्या लेखातली एका परिच्छेदातली चार वाक्य तिकडे एकाच लेखात फक्त चार परिच्छेदात. जिथे मी जर्मनी लिहिले होते कारण आमचा प्रवास जर्मनीतुन सुरु झाला, ते बदलुन नेदरलँड्स केले होते. तिथे जेव्हा याबद्दल लिहुन आले, तेव्हा जनाची नाही पण निदान मनाची वाटली असावी, पुढच्या तासाभरात पेज उडवले गेले होते. त्यापुर्वी मी स्नॅपशॉट्स घेऊन ठेवले होते त्यामुळे माझ्याकडे काहीतरी पुरावा आहे. तिथेच इतरही काही ठिकाणांबद्दल लिहिले होते, तेही दुसर्‍या कुठल्या ब्लॉगवरुन ढापलेले नसेल हे कशावरुन? कारण त्या केस मध्ये फक्त मी ज्यावर आक्षेप घेतला तेवढ्या पोस्ट्स उडवता आल्या असत्या. हे पेजही सहज दिसले म्हणुन, अजुन कुणी काय काय ढापले असेल माहिती नाही. ब्लॉग वरुन टेक्स्ट कॉपी करता येणार नाहीत अशी स्क्रिप्ट आहे, ज्याचा त्यातल्या त्यात उपयोग होऊ शकतो. हे काम माझेही राहिले आहेच कधीचे, आता करायलाच हवे. पण हे करुनही चोरणारे महाभाग आहेतच. :(
  • Log in or register to post comments

तुमच्या इमेजेस ना वाटरमार्क

काळा पहाड
Tue, 07/07/2015 - 13:32 नवीन
तुमच्या इमेजेस ना वाटरमार्क टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

आंतरजालीय आणि वृत्तपत्रीय

माहितगार
Sat, 07/04/2015 - 17:00 नवीन
आंतरजालीय आणि वृत्तपत्रीय मराठी लेखकांची एखादी स्वतंत्र कॉपीराइट फालोअप सोसायटीची आवश्यकता आहे जी जागरूकताही निर्माण करेल, लेखकांच्या कॉपीराईट बद्दल फालोअप घेऊन त्यांना उत्पन्नही मिळवून देईल आणि ज्यांना त्यांचा मजकुर मुक्त स्वरूपात उपलब्ध करावयाचा आहे त्यांनाही साहाय्य करेल. अर्थात लेखकांनीसुद्धा प्रतीलेख दोन परिच्छेद अथवा ४००० बाइट या पैकी जे कमी असेल तो मजकुर मूळ लेख आणि लेखकाचा संदर्भ देऊन वापरू देण्याबद्दल विचार करावा असे वाटते. ज्यामूळे लेखकांचे लेखन अधीक लोकांपर्यंतही पोहोचेल आणि समाजपयोगीही होण्यास मदत होऊ शकेल.
  • Log in or register to post comments

फार वाइट !

चुकलामाकला
Sat, 07/04/2015 - 17:01 नवीन
मी देखिल माझ्या कविता बघितल्या . "विसरलो नाही मी तळव्यावरची जांभळी खूण - गुर्जी " ही कविता तर अगणित ठिकणी फेसबुक्वर पोस्ट झाली आहे . राधा ही कथा देखिल!
  • Log in or register to post comments

च्यायला खरे आहे

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 07/04/2015 - 17:10 नवीन
च्यायला खरे आहे. माझे लेख किंवा कविता कोण चोरणार असा जबरदस्त कॉन्फिडन्स असल्या मुळे हा उद्योग कधी केला नव्हता.पण तुमचा लेख वाचल्यावर उत्सुकता म्हणून मी पण थोडे गुगलून पाहिले. आणि माझ्या हाताला हे लागले... माझी वेडा बाबा ही कविता इकडे जशीच्या तशी डकवली आहे. (हे चेपु पान माझे नाही) आणि त्यांना त्यांच्या मुलाला सचिन तेंडुलकरच करायचय हि कविता मी इकडे पाडल्याच्या दुसर्‍याच दिवशी इकडे कॉपी पेस्टवण्यात आली. कोणीतरी दिपक ढमढेरे नावाचा मनुष्य दिसतो आहे इकडे. साला काय वेळ आली आहे लोकांवर... माझ्या सारख्या फुटकळ सुपारीबाज कवीच्या कविता पण चोरतात? मग त्या मिका, गणेशा आणि विशालच्या कवितांचे काय होत असेल? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

:-) :-) :-)

सतीश कुडतरकर
Tue, 07/07/2015 - 14:46 नवीन
माझ्या सारख्या फुटकळ सुपारीबाज कवीच्या कविता पण चोरतात? :-) :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आणि वैनी कथा सुद्धा!

चुकलामाकला
Sat, 07/04/2015 - 17:12 नवीन
https://www.facebook.com/photo.php?fbid=727924624020895&set=a.123190794494284.39831.100004100910472&type=1
  • Log in or register to post comments

लोकांच्या निर्लज्जपणाची कमाल

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 07/04/2015 - 18:34 नवीन
लोकांच्या निर्लज्जपणाची कमाल आहे !!!
  • Log in or register to post comments

+111.

प्यारे१
Sat, 07/04/2015 - 20:16 नवीन
+111. पण हे आवरायला उपाय नेमका काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आजकाल तर व्हॉट्सॲप च्या

उगा काहितरीच
Sat, 07/04/2015 - 20:01 नवीन
आजकाल तर व्हॉट्सॲप च्या सुळसूळाटामुळे अशी चोरी पकडने अवघड झाले . (आणि एक आम्ही साधी कॉमेंट टाकायची दुसरीकडे तर तिनतिनदा विचारतो )
  • Log in or register to post comments

माझे मत

चित्रगुप्त
Sat, 07/04/2015 - 22:32 नवीन
माझे याबद्दलचे मत जरा वेगळे आहे. अर्थातच असे कॉपी-पेस्ट करणे हे अनैतिक आणि चुकीचे आहे, आणि त्यावर योग्य ती उपाययोजना झाली पाहिजे हेही खरेच, तरीपण असे म्हणावेसे वाटते, की आपले लेखन चोरी होत असलेले बघून प्रचंड मनस्ताप, चिडचिड वगैरे करून घेऊ नये. सर्जनशील व्यक्तीचे काम त्याला सुचत जाणार्‍या नवनवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देणे हे असते, आणि त्यातच तिने आपली शक्ती, परिश्रम आणि वेळ घालवणे चांगले. नवीन तंत्रज्ञानामुळे जशी सर्जनशील व्यक्तीना आपली निर्मिती जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी लाभली आहे, तशी ती चौर्य करणारांना पण लाभत आहे. परंतु सृजनक्रियेतला मूळ निखळ आनंद, ती धुंदी, चौर्यकर्मात कुठून लाभणार ? त्यामुळे आपले साहित्य चोरी होत आहे, त्याचे श्रेय दुसरेच कोणी घेत आहे, हे विचार आपल्या सृजनशीलतेला मारक तर ठरत नाहीत ना, हे आत्मपरिक्षण करणे आवश्यक आहे. तसे जर घडत असेल, तर एकतर आपल्यापुरते लिहीत राहून स्वतः प्रकाशित करणे बंद करावे, किंवा चौर्य वगैरेंची चिंता सोडून आपल्या सृजनशीलतेत मस्त, व्यग्र रहावे. ज्यांना शक्य असेल, त्यांनी हवेतर असे चौर्य हुडकणे, त्यावर कारवाई करणे वगैरेंसाठी वेगळा माणूस नेमावा, पण स्वतः व्यथित होऊन आपल्या सृजनशीलतेवर त्याचा विपरित परिणाम होऊ देऊ नये. आपल्याला अजून कितीसे आयुष्य जगायचे आहे ? ते मनस्तापात घालवायचे, की निर्मितीच्या आनंदात ?
  • Log in or register to post comments

सहमत

dadadarekar
Sat, 07/04/2015 - 23:35 नवीन
आअपण मजेत रहावे. पापपुण्य वगैरे चित्रगुप्तावर सोडुन द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आणि समजा उदा तुमच्यावरच कोणी

एस
Sun, 07/05/2015 - 00:33 नवीन
आणि समजा उदा तुमच्यावरच कोणी चौर्याचा आरोप केला किंवा लोकांचा तसा समज झाला तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आपल्याला अजून कितीसे आयुष्य

मधुरा देशपांडे
Sun, 07/05/2015 - 03:24 नवीन
आपल्याला अजून कितीसे आयुष्य जगायचे आहे ? ते मनस्तापात घालवायचे, की निर्मितीच्या आनंदात ?
काहीतरी गैरसमज होतोय असे वाटते. आपला एक लेख चोरलेला दिसला आणि त्रास झाला म्हणुन लगेच त्यासाठी कुढत बसत नाहीये, आणि त्यातुन नवीन लेखन होणारच नाही असेही नाही. रोज रोज कुणी माझे लेखन दिसतेय का कुठे चोरलेले म्हणुन शोधत नाही. बरेचदा हे प्रकार अपघाताने दिसतात, कधी कुणा मित्र-मैत्रिणीकडुन कळतं आणि मग शोध घेतला तर अजुन काही दिसतं एवढंच. चोरीच्या भितीने कुणी लिहिणे बंद करेन असे वाटत नाही. पण जिथे शक्य आहे, तिथे उपाययोजना करायला हव्यात, आणि असे प्रकार दिसले तर निषेधही नोंदवायलाच हवा. आणि हाच मला या धाग्याचा उद्देश दिसतो आहे, की असे प्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. निर्मितीचा आनंद आणि मनस्ताप यात चोरणारे मुळ लेखकाचा आनंद हिरावुन घेऊ शकत नाही हे खरे आहे, पण या प्रत्येक लेखामागे त्या त्या लेखकांचे कौशल्य आहे, अनुभव आहेत, ते लेखस्वरुपात यावे म्हणुन त्यांनी वेळ दिला आहे, या मेहनतीचे काय. उदा. म्हणुन गुर्जींचा जो एक लेख चोरला गेला, त्यासाठी केवळ तेवढे दोन-चार तासांचे टंकनश्रम लागले नसतील, त्याआधीचा त्यांचा कित्त्येक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव देखील होता. मग कुणी जेव्हा एका सेकंदात ते स्वतःचे म्हणुन दाखवतात, कौतुक करवुन घेतात तेव्हा राग येतो. शिवाय उद्या मुळ लेखकालाच तुम्ही चोरी केली असे म्हटले जाते ते वेगळेच, असे आरोप झाले तर त्रागा होणारच. म्हणुन व्यथित होऊन कुणी लेखन सोडले आहे असे नाही. आणि अजुन होतं काय, इथल्याच नाही, इतरही अगदी नावाजलेल्या लेखकांच्या केवळ ब्लॉग/मिपा शिवायही, पुस्तकांमधुन पण लेखन चोरी होते आणि राजरोसपणे ते स्वतःचे म्हणुन खपवले जाते.तेव्हा ते शक्य तिथे इतरांच्या निदर्शनास आणुन दिल्याने जर काही प्रमाणात आळा बसला तर ते चांगलेच. एवढे करुनही पुन्हा पुन्हा हे प्रकार होतातच, त्याबद्दल काही बोलायला नकोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@मधुरा देशपांडे

माहितगार
Mon, 07/06/2015 - 00:48 नवीन
@मधुरा देशपांडे, मी आपल्या उपरोक्त प्रतिसादातील एक वाक्य या विषयावरच्या पटाइत यांच्याच धाग्यावर, पण ऐसी अक्षरेवरील एका प्रतिसादास उत्तर म्हणून आपल्या संदर्भासहीत उधृत केले आहे. कॉपीराइटच्याच विषयावर चर्चा चालू आहे तेव्हा आपणास कल्पना द्यावी असे स्वाभावीकपणे वाटले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

गुगलवर सहज शोध घेतला.

श्रीगुरुजी
Sat, 07/04/2015 - 23:17 नवीन
गुगलवर सहज शोध घेतला. मी २८/०२/२०१३ या दिवशी "राशीमेलन" हा विविध राशींची गुणवैशिष्ट्ये सांगणारा लेख मिपावर लिहिला होता. त्याची लिंक - http://www.misalpav.com/node/24104 आताच सापडलं. फेसबुकवर (https://www.facebook.com/ubalenitu/posts/1619879334918700 या लिंकवर) कोणीतरी नितू अनिल उबाळे नामक व्यक्तीने संपूर्ण लेख जसाच्या तसा आपल्या पेजवर ६/६/२०१५ या दिवशी टाकला आहे. लेखाच्या शेवटी "निवृत्ती उबाळे.9860395985 कृष्णमूर्ति ज्योतिष मार्गदर्शक , कणकवली" असा पत्ता दिला आहे. काय म्हणावे या वाङ्मयचौर्याला?
  • Log in or register to post comments

माझ्या लेखातील १ शब्द सुद्धा

श्रीगुरुजी
Sat, 07/04/2015 - 23:23 नवीन
माझ्या लेखातील १ शब्द सुद्धा न बदलता या चोरट्याने हा लेख स्वतःच्या नावावर टाकला आहे. हा चोरटा म्हणे इतरांचे भविष्य सांगतो. याच्याविरूद्ध कोठे तक्रार करता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

१. ज्यांनी तिथे प्रतिसाद

काळा पहाड
Tue, 07/07/2015 - 13:23 नवीन
१. ज्यांनी तिथे प्रतिसाद दिलाय त्याच्या पोस्ट वर त्यांच्या फेसबुक पोस्ट वर तुमची मिपा ची लिंक डकवा. आणि तिथे हे पण लिहा की उबाळे चोर आहे. २. शिवाय उबळेच्य फेसबुक पोस्ट वर तर लिहाच. तो उडवेपर्यन्त तरी लोक वाचतील. ३. उबाळेच्या मोबाईल वर रात्री अपरात्री एस टी डी बूथ मधून फोन करा. ४. त्याचा मोबाईल तुमचा म्हणून शेअर करा, विशेष करून टेलिमर्केटिङ्ग वाल्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माझा लेख त्याने स्वतःचा

श्रीगुरुजी
Tue, 07/07/2015 - 14:38 नवीन
माझा लेख त्याने स्वतःचा म्हणून टाकला आहे. त्या लेखावर एकूण १५-१६ जणांनी कौतुकाच्या कॉमेंट्स दिल्यात, ९७ जणांनी लाईक केलंय आणि १६ जणांनी लेख शेअर केलेला आहे. मी त्याच्या मित्रयादीत नसल्याने त्या लेखावर किंवा त्याच्या इतर कोणत्याच लेखावर कॉमेंट्स टाकू शकत नाही. त्यामुळे त्याला व लेख लाईक केलेल्या काही जणांना फेसबुकच्या माध्यमातून प्रायव्हेट मेसेज पाठविला आहे. परंतु त्यापैकी कोणाच्याही मित्रयादीत मी नसल्याने माझ्या मेसजचे नोटिफिकेशन त्यांना मिळत नाही व माझा मेसेज इनबॉक्स ऐवजी 'आदर मेसेजेस' मध्ये जाऊन पडलेत. फेसबुक 'आदर मेसेजेस' साठी लाल रंगात नोटिफिकेशन देत नसल्याने ते मेसेजेस लगेच वाचले जाण्याची शक्यता फार कमी आहे. तरीसुद्धा त्यापैकी ४ जणांनी माझा मेसेज वाचून मला रिप्लाय केलेला आहे. शेवटी रविवारी त्याच्याशी व्हाटस््अ‍ॅप वरून संवाद साधला. सुरवातीपासून तो मराठीत बोला म्हणून मागे लागला. माझ्या चतुर भ्रमणध्वनीवर मराठी टंकलेखनाची सोय नसल्याने मी इंग्लिश मध्ये लिहीत होतो. माझ्या मिपावरील लेखाची व त्याने फेसबुकवर टाकलेल्या लेखाची लिंक देऊनसुद्धा फेबुवरील लेख सापडत नाही असा त्याने बराच वेळ आव आणला. बोलताना मध्येच म्हणाला की काही चांगले लेख दिसले तर ते मी शेअर करतो. परंतु लेखाबरोबर लेखकाचे नाव देण्याऐवजी स्वतःचे नाव का दिले व लेख टाकण्यापूर्वी लेखकाची परवानगी का घेतली नाही व लेखकाच्या नकळत गुपचूप लेख का टाकला असे विचारल्यावर तो म्हणाला की मिपावरील लेखावर लेखकाचे नाव नसते. मी त्याला लेखकाचे नाव कोठे असते हे सांगितल्यावर तो म्हणाला की काही किरकोळ लेखन मी कधीकधी फेबुवर टाकतो. शेवटी पुन्हा एकदा दोन्ही लेखांच्या लिंक दिल्यावर त्याला लेख सापडला व तो लेख फेबुवरून डिलीट केला आहे असे त्याने २ मिनिटांनी सांगितले. परंतु तो लेख डीलीट केलेला नसून अजूनही त्याच्या पेजवर आहे. असो. मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे मी केले. याव्यतिरिक्त फार काही करता येईल असे वाटत नाही. त्याने टाकलेला लेख डीलीट करणे मला शक्य नाही. आपली चोरी पकडली गेली आहे हे त्याच्या व त्याच्या मित्रयादीतील काही जणांना समजले आहे इतके पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

फेसबुक कडे काही सुविधा आहे का ?

माहितगार
Tue, 07/07/2015 - 17:35 नवीन
मिपा इत्यादी मराठी संकेतस्थळांची संपादक मंडळी प्रताधिकारीत मजकुर हटवण्यात मदत करतात तशी फेसबुक कडे काही सुविधा आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माझ्या मते आहे

श्रीरंग_जोशी
Tue, 07/07/2015 - 17:48 नवीन
फेसबुकवर जिथेही आपले किंवा आपल्या ओळखीच्यांचे लेखन कुणी स्वतःच्या नावावर खपवत आहे असे दिसले तर त्या पोस्टच्या उजव्या कोपर्‍यातील ^ (याच्या उलट) चिन्हावर क्लिक करून Report post हा पर्याय निवडावा. नंतर पुढच्या दोन सूचनांचे पालन करावे.
  • Select I don't like this post
  • Select I think it shouldn't be on Facebook and follow the on-screen instructions
  • पुढच्या पायरीमध्ये तुम्हाला असे का वाटते हा प्रश्न येतो तेव्हा हे वाङ्मयचौर्य आहे हे तिथे लिहिता येईल. फेसबुक कशी व किती वेळात कारवाई करेल याबाबत मी अनभिज्ञ आहे. या लेखाच्या आशयाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

आपण

वॉल्टर व्हाईट
Tue, 07/07/2015 - 23:27 नवीन
इथे फेसबुक वापरणार्या सगळ्यांनी मिळुन जर रिपोर्ट केले तर कारवाई होईल असे वाटते. अर्थात या अश्या कारवाया ह्युमन एडमिन करत नसून मशीन करते असे ऐकून आहे. (त्यामुळे किती जण रिपोर्ट करतात हे महत्वाचे आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सहमत

श्रीरंग_जोशी
Tue, 07/07/2015 - 23:38 नवीन
यापूर्वी मी स्पॅम वाटतील अशा फेसबुक पोस्ट्स रिपोर्ट केल्या आहेत. काही वेळा एक दोन दिवसांनी त्या हटवल्या गेल्याचे नोटीफिकेशन फेसबुककडून आले तर काही वेळा त्यांच्या पॉलिसिजचे उल्लंघन झालेले नाहीये म्हणून न हटवल्याचेही नोटिफिकेशन आले आहे. आजवर मी वाङमयचौर्य मात्र रिपोर्ट केलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वॉल्टर व्हाईट

मला आत्ता WhatsApp वर हा

दमामि
गुरुवार, 07/09/2015 - 15:01 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मला आत्ता WhatsApp वर हा

दमामि
गुरुवार, 07/09/2015 - 15:02 नवीन
मला आत्ता WhatsApp वर हा फाॅरवर्ड आलाय. तुमचाच लेख चोरलाय का? आई च्या विविध राशींची विविध राशीच्या आईचा स्वभाव व त्यांच्यात राशी स्वामीनुसार असणारे गुण-दोष वेगवेगळे असतात. पण, आपल्या मुलांसाठी ती सदैव झटून, त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याचा प्रयत्न करतेच. राशीस्वामीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती ती स्वीकारते पण... मुलामुलींचे कल्याण व्हावे, ते सुखी व्हावे यासाठीच ती नेहमी प्रयत्नशील असते. खरोखरच आईच्या महानतेचं, त्यागाचं वर्णन करणे कठीणच आहे. पाहूया विविध राशींची आई कशी असते ते! मेष राशीची आईः अतिशय बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी असणारी मेष राशीची आई प्रेमळ, मायाळू उदारही असते. मात्र, तिचे हे गुण तिच्या मुलांच्या अनुभवाला तसे कमीच येतात. त्यांच्या वाट्याला येतो तो शिस्तीचा बडगा! आपल्या मुलांनी हुशार असावे, नाव कमवावे, त्यांचे कौतुक व्हावे, अशी तिची जबरदस्त महत्त्वाकांक्षा असते आणि त्याकरता रात्रंदिवस कष्ट घेण्यासाठी ती मागेपुढे पाहात नाही. मुलांवर मेहनत घेते. त्यांना काय हवे नको ते सर्व पाहते, आणि तिच्या मनाप्रमाणे न घडल्यास ‘जमदग्नी’चा अवतारही धारण करते.वाद झाल्यास माघार घेणे, हे तर तिच्या रक्तातच नसते. पण मोठमोठ्याने आरडाओरड करून बोलल्याशिवाय ती शांत होत नाही. मुलांचा अभ्यास घेताना, त्यांना समजावून सांगताना तिचा मानसिक तोल किती वेळ टिकून राहील याचा भरवसा नसतो आणि एकदा मानसिक तोल ढळला की, मग मात्र त्या पोरांची खैर नसते. मुलांच्या बाबतीत एकदा जर तिने काही ठरवले, तर त्यात यश मिळविण्यासाठी ती आपली बुद्धी, श्रम, पैसा पणाला लावेल परंतु ती त्यासाठी कोणाकडेही हाजीहाजी मात्र करत नाही. ती स्वतःच्या आवडीनिवडी मुलांवर लादण्याचा प्रयत्न करते. इतर मुलांशी तुलना करते, तशी मुलांसाठी त्यांच्या भल्यासाठीच ती सर्व करते, मुले नाराज झालीत तर त्यांची समजूत घालतेे, त्यांच्या भावना जपणे हे तिच्या अखत्यारित बसत नाही. घरातील तिच्या वर्चस्वामुळे आपल्या स्वातंत्र्याला थोडी बाधा आल्याचे मुलांना वाटते. मुलींनी स्वतंत्र व्हावे, धीट असावे, गृहकृत्यदक्ष असावे, मुलांनी विविध स्पर्धेत भाग घ्यावा, धडाडीने वागावे असे तिला वाटते. मुलांचे लाड करणे हे तिच्या स्वभावात बसत नाही. मुलांना गरजेपेक्षा जास्त स्वातंत्र्य देणे तिला पटत नाही. त्यामुळे मुले थोडी नाराज असतात. तशी ती आदर्श आई ठरू शकेल. तशी मेष स्त्री/आई साधी असते. त्यामुळे मुलांच्या हौशींनाही मर्यादा असतेे. या सर्वांचा परिणाम म्हणजे मोठेपणी मुला-मुलींमध्ये आणि या आईत दरी उत्पन्न होण्याची शक्यता असते. मुलांनी अशा कर्तव्यनिष्ठुर पण कष्टाळू आईचे व तिने घेतलेल्या श्रमांचे जरूर स्मरण ठेवावे. वृषभ राशीची आईः ही आई मुलांच्या बाबतीत थोडी हळवी असते. शांत व प्रेमळ असल्याने मुलांवर ओरडणे त्यांना मारणे हे तिला जमत नाही. मुलांनी हौसमौज करावी, आनंदात राहावे, कपडालत्ता चांगला वापरावा, आकर्षक दिसावे. नीटनेटके राहावे, असे तिला नेहमीच वाटते. मुलांसाठी बाजारात आलेल्या नवीन नवीन गोष्टी, वस्तू ती आणते. अभ्यास, कला, क्रीडा याबाबतीत मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करून त्यांना त्यासाठी ही आई सहकार्य करते. त्यांच्या मित्रमैत्रिणींचे अगत्याने स्वागत करणे तिला आवडते. चार माणसात मुलांचा पाणउतारा न करता, त्यांच्या समस्या सोडवण्यास ती मदत करते. त्या स्त्रीची मुले शांत स्वभावाची, मर्यादशील व विनयी निपजतात. आईवर त्यांचे प्रेम असते. मुलांनी कोणाच्या वाटेला जाऊ नये, वादविवाद टाळावेत, आपापसात प्रेमाने वागावे व वडीलधार्‍याला मान द्यावा, यासाठी ती प्रयत्नशील असते. हिची मुले थोडी भित्रीच होतात, त्यांच्यात धाडस, समयसूचकता समस्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य येत नाही. आर्थिक परिस्थिती बिघडल्यास ही आई मुलांना खंबीरपणे वाढवू शकत नाही. मिथुन राशीची आईः ही एक प्रेमळ आई असते. आपल्या मुलांवर तिचे कटाक्षाने लक्ष असते. आपली मुले इतरांच्या मानाने कुठेच मागे पडू नयेत म्हणून ती सतत प्रयत्न करते. कष्टाला कमी पडत नाही. चारचौघात वागण्यात, चालीरितीत मुले कुठे कमी पडू नयेत. यासाठी वळण लावण्याचा प्रयत्न करते. ही आई उत्तम गृहिणी असल्यामुळे मुलांची खाण्यापिण्याची चंगळ असते. सणसमारंभ, लग्नकार्य, वाढदिवस इत्यादीत मुलांसह भाग घेते. त्यामुळे मुलांना पुढील आयुष्यात एकटेपणा जाणवत नाही. पण अनिश्‍चितता आणि काहीसा धरसोडपणा या तिच्या अवगुणांचा मुलांवर परिणाम होतोच. यामुळे मुलांना योग्य सल्ला देणे तिला जमत नाही. कारण तिचे सारखे विचार बदलत जातात, याबाबत तिने तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा, ही आई परोपकारी, दयाळू, वर्तणुकीने शालीन असल्यामुळे, या गुणांचा वारसा मुलांना पुढील आयुष्यात पदोपदी उपयुक्त ठरतो. कर्क राशीची आईः ही आई मुलांच्या बाबतीत अतिशय भावनाप्रधान असते. मुलांना काही लागले, थोडे जरी बरे नसले तर तिचे कुठेही लक्ष लागत नाही. आपल्या परिवारापासून, मुलांपासून ती दूर राहूच शकत नाही. प्रत्येक मुलाच्या बाबतीत त्याला काय हवे, काय नको याची तिला पूर्ण कल्पना असते. स्वतःच्या स्वभावात थोडा चंचलपणा असूनही मुलांच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेताना ती गंभीर, निश्‍चयी आणि धोरणी बनते. मुलांवर कडक शिस्तीची बंधने न घालता ती त्यांना थोडे फार स्वातंत्र्य देते, पण त्यांच्या प्रत्येक कृतीवर तिचे लक्ष असते. मुलांची, सतत काळजी, काल्पनिक विचाराने अस्वस्थ होणे हा स्वभाव तिच्या प्रकृतीला त्रासदायक ठरतो. मुलांची लग्न झाल्यावर त्यांच्यावरील अतीव प्रेमासाठी ती काहीशी बेचैन होते. तिच्या उतारवयात मुले या सर्व गोष्टींची परतफेड करून आनंद देतात. हेच तिच्या आईच्या भूमिकेला पडलेले उत्तम गुण होत. सिंह राशीची आईः सर्वांत हुशार मूल आपलं असावं. बुद्धिमान मूल आपले असावे, सुंदर मूल आपले असावे, जिथे जाल तिथे आपलेच मूल उठून दिसावे, ही तिची जबरदस्त तळमळ असते. त्यामुळे त्यांना घडवण्यात ती आपलं सर्वस्वपणाला लावते. सगळ्यात अद्ययावत, आधुनिक असे जे शिक्षण ते आपल्या मुलांना मिळावे, ही तिची तळमळ. मुलांनी धीट बनावे, वडिलधार्‍यांचा मान ठेवावा, समाजोपयोगी कार्य करावे, कोणीही नावे ठेवू नयेत, असे सांभाळून वागावे, अशी तिची शिकवण असते. तिला पाळणाघर ही संकल्पना मुळीच पटत नाही. प्रत्येक मुलाच्या बाबतीत ती स्वतः निर्णय घेते. कोणाचेही नियंत्रण किंवा सल्ला तिला चालत नाही. परंतु योग्य सल्ल्याचा ती आदरच करते. लबाडीने वागणे, लोकांना फसविणे, फुकटचा बडेजाव, लोकांची हाजीहाजी मुलांनी करू नये यासाठी ती प्रयत्न करते. मुलांनी मित्रांचा गोतावळा जमवून चकाट्या पिटणे, पार्ट्या करणे हे तिला आवडत नाही. स्वतःची इच्छा, दृढ निश्‍चयच, प्रयत्न, परमेश्‍वरातील दृढ श्रद्धा व योग्यता याच्या जोरावर ती मुलाला अव्वल स्थान मिळवून देतेच. कन्या राशीची आईः खरे पाहता या स्त्रियांना मुलांची विशेष आवड नसते. मुलांच्या खस्ता काढणे त्यांना नको वाटते. यांच्या अपत्यात मुलांपेक्षा, मुलीच जास्त असतात. त्यांनाही मुलीच जास्त आवडतात. काल्पनिक संकटांची काळजी करण्याची सवय असल्याने मुलांच्याही बाबतीत नको ते विचार त्या करतात. यामुळे मुलांना आपल्यापासून दूर करणे म्हणजे त्यांना एक शिक्षाच वाटते. या स्वभावामुळे मुलांच्या प्रगतीत मात्र बाधा येते. मुलांनी अभ्यासात हुशार असावे, लोकांनी त्यांचे कौतुक करावे, याकरता या राशीच्या स्त्रिया नक्कीच भरपूर कष्ट घेतात. मुलांना कणखर व स्वतंत्र त्यांनी बनवावेे, त्यांचा आत्मविश्‍वास वाढवावा, नाहीतर त्यांना सतत दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिण्याची सवय लागेल असे ज्योतिषांना वाटतं. तुळ राशीची आईः तुळेच्या स्त्रियांना मुलांची आवड थोडी कमीच असते. कष्टाची , त्रासाची कामे करणे या शुक्राच्या तुळेला जरा आवडतच नाही. लहान मुलांना सांभाळणे, त्यांचे कपडे बदलणे, त्यांचे दूध खाणे-पिणे त्यांचे औषधपाणी, त्यांच्यासाठी जागरण करणे या गोष्टीचा या माउलीला थोडा कंटाळाच येतो. ही कामे आर्थिक सुबत्ता असल्यास, त्या दुसर्‍याकडूनच करून घेतात. मुलांना सांभाळायला बाई, शिकवणी लावण्याकडे यांचा कल असतो. ही कामे स्वतः न करता स्वतः आरामात राहून त्या दुसर्‍यांकडून करवून घेतात. यासर्व गोष्टींमुळे मध्यम किंवा गरीब परिस्थिती असल्यास मुलांना स्वतःची प्रगती स्वतःच करावी लागते, त्यांनी आईकडून खूप अपेक्षा करू नये. हाती पैसा भरपूर असल्यास या राशीच्या आया मुलांचे अव्वाच्या सव्वा हट्ट पुरवतात. मुले जे मागतील ते देऊन स्वतःचे समाधान करून घेतात. या सर्वांमुळे त्यांची मुले बिघडण्याची शक्यता असते. सुसंस्कृत, आकर्षक, हुशार, रसिक, दिलदार, बोलक्या, दुसर्‍यांना सहकार्य करणार्‍या अशा अनेक चांगल्या गुणांनी युक्त असणार्‍या या स्त्रियांनी मुलांच्या संगोपनाबाबतीतले हे राशीगुण लक्षात घेऊन त्यावर मात करणेच श्रेयस्कर! वृश्‍चिक राशीची आईः मंगळाच्या अधिपत्याखालील या राशीच्या स्त्रियांमध्ये सहनशीलता, विनय, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माया हे संततीच्या बाबतीत आवश्यक असणारे स्त्रीसुलभ गुण अभावानेच असल्याने किंवा अशा गुणांचा विकास होऊ शकत नसल्याने त्यांच्याकडून संततीच्या बाबतीत या गुणांची अपेक्षा न करणे उत्तमच. घमेंड, गर्व, द्वेषभाव या त्यांच्या स्वभावामुळे सध्या जगात चालू असलेल्या स्पर्धेत मुलांनी मागे राहू नये, असे त्यांना मनापासून वाटते. त्यासाठी त्या निश्‍चितच प्रयत्नशील राहतात. त्यासाठी त्या कडक धोरण स्वीकारण्याची शक्यता असते. वागण्यात जिव्हाळा नसला तरी, खाण्यापिण्यात त्या काही कमी पडू देत नाहीत. नोकरी, व्यवसायामुळे मुलांना तशीही आईची ओढ कमीच होते. ते यामुळे आईशी मनमोकळा संवाद साधू शकत नाही. बाहेरच्या गोष्टी आईला सांगितल्या जात नाही. यांचा मूड कधी जाईल, कधी या चिडतील याचा भरवसा नसतो. स्वभावही चिडखोर असल्याने मुले काहीशी बिथरून जातात. मुलांना शिस्त लावणे, शहाणपणाच्या चार गोष्टी त्यांना सांगणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्या आवडी-निवडी, भवितव्याचा विचार करणे या गोष्टींसाठी कामांमुळे त्यांना फार वेळ देणे शक्य नसते. आईच्या स्वभावाचा, तिच्या वागणुकीचा अंदाज असल्याने मुले स्वतःच जबाबदारीने वागून यश मिळवतात; नाहीतर भरकटले जातात. धनु राशीची आईः संततीच्या बाबतीत धनु राशीच्या स्त्रिया या अत्यंत दक्ष असतात. आपली मुले सर्व दृष्टीने गुणी व्हावी यासाठी सतत धडपडणार्‍या या स्त्रिया मुलांना शिस्तीत वाढवतात. मुलांच्या तब्येती चांगल्या राहाव्या, ती निर्व्यसनी असावीत, आज्ञाधारक असावीत, त्यांनी थोरामोठ्यांचा मान ठेवावा, ती अभ्यासाप्रमाणे इतर विषयातही हुशार असावीत, असा त्यांचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे मुलेही अशीच निपजतात. सत्कर्माची आवड, ईश्‍वरावर श्रद्धा असते. भूतदया, परोपकार, दुसर्‍याला मदत करणे, प्रसंगी धावून जाणे या गोष्टी यांच्यात संस्कारित झालेल्या दिसून येतात. या स्त्रियांचे आपल्या मुलांच्या प्रत्येक कृृतीवर लक्ष असते. त्यांचे खाणपिणे, आवडीनिवडी पुरवतात. या स्त्रिया मुलांच्या बाबतीत अत्यंत हळव्या असतात. मुलांकडून थोडाही अपमान झाल्यास त्यांना त्रास होतो, त्यांना हा अपमान सहन होत नाही. मुलांवर प्रेमाने का होईना पण हुकमत चालू असते. गुरुची रास असलेली धनूराशीची आई, स्वतःत थोडा बदल केल्यास एक आदर्श आई होऊ शकते, यात शंका नाही. मकर राशीची आईः प्रेमळ स्वभाव हा गुण त्यांच्या कोषात सापडणे कठीणच! त्यामुळे त्यांची मुलांशी विशेष जवळीक असणे शक्यच नाही, परंतु शिस्तीच्या बाबतीत मात्र त्या जागरूक असतात. मुलांची फारशी दयामाया न करता त्या त्यांच्या वागण्यावर लगाम ठेवतात. त्यांचे भलते सलते लाड त्या खपवून घेत नाहीत. खाण्यापिण्याचेही विशेष चोचले पुरवत नाहीत. पण जे आवश्यक असेल ते करण्याचा प्रयत्न जरूर करतात. त्यांचा काटकसरीपणा, कंजूषपणा याचा परिणाम थोडाफार मुलांवर होतोच. प्रेमाच्या पोटी किंवा निष्कारण काळजीच्या पोटी त्यांना सतत आपल्याजवळ जखडून ठेवणे, हा प्रकार त्यांच्याजवळ नसतो. शनीच्या अमलाखालील या स्त्रिया न्याय निष्ठूर असल्याने मुलांच्या दोषावर पांघरूण घालत नाहीत, परंतु मुलांच्या बाबतीत कर्तव्यात मुळीच कसूर होऊ देत नाहीत. हेच यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कुंभ राशीची आईः कुंभेची स्त्री स्वतंत्र विचारांची असते. मठ्ठ वा मंद माणसाबरोबर तिला बोलणे सुद्धा आवडत नाही. तिची प्रत्येक गोष्ट ही बुद्धीशी निगडित असते. आईच्या भूमिकेला त्या उत्तम न्याय देतात यात शंकाच नाही. स्वतः सुविद्य व सुविचारी असल्याने आपल्या पाल्याला त्या तसेच घडवण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यात त्या यशस्वी होतातही. मुलांवर चिडणे, आरडाओरड करणे, मारणे या गोष्टी त्यांच्या स्वभावात नसतात. तरीही मुले त्यांच्या धाकात राहतात. मुलांवर यांचे पूर्ण लक्ष असते. मुलांचे खाणे-पिणे, त्यांची प्रकृती, त्यांच्या गरजा, याबाबत जास्त गाजावाजा न करता, त्या त्यांचे कर्तव्य प्रेमाने व दक्षतेने पूर्ण करतात. बोलण्यापेक्षा आणि उपदेश करण्यापेक्षा आपल्या वर्तणुकीने त्या मुलांवर संस्कार घडवतात. त्यांच्या स्वभावातील उत्तमोत्तम गुण, मुलांच्यात उतरतात. खोटे बोलणे, चहाड्या करणे, अफरातफर करणे, एखाद्याची निंदा करणे, थापा मारणे या गोष्टी घरात कधीही न घडल्याने मुले या सर्वांपासून अलिप्त राहतात. या स्त्रियांना संतती कमी असते. त्यामुळे मुलांवर लक्ष देणे त्यांना सहज शक्य आणि सोपे होते. मीन राशीची आईः ‘आई’ या भूमिकेबद्दल मीनेच्या स्त्रियांना फार गुण मिळण्याची शक्यता कमीच म्हणायला हवी. यांच्या संततीमध्ये अंतर फार कमी दिसून येते. साहजिकच लागोपाठ गर्भारपण, बाळंतपणामुळे त्यांना स्वस्थता लाभत नाही. याच्या जोडीला स्वभावातील आळशीपणाही असतोच. या सगळ्यांचा परिणाम मुलांच्या वाढीवर, प्रगतीवर होतो. त्यांना शिस्त लावणे, त्यांच्यावर उत्तमोत्तम संस्कार करणे, त्यांचा अभ्यास घेणे, त्यांना जपणे या गोष्टी त्यांच्याकडून अभावानेच घडतात. पदरचे मोडून इतरांना मदत करणे, आल्या-गेल्याचा पाहुणचार करणे, शांत राहून सगळ्यांशी व्यवहार करणे, या आपल्या स्वभावातील चांगल्या गोष्टींचे संस्कार मुलांवर आपोआप होतील, त्यांना तसेच वळण लागेल असे त्यांना वाटते. मुलांना घडवण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागते हे त्यांच्या लक्षात येत नाही. यातून मुलांकडे नकळत दुर्लक्ष होते. परिणाम व्हायचा तो होतोच! मुलांना चुकीचे वळण लागून ते बिघडण्याची भीती असते. अशी मुलं व्यसनी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कोणाबरोबर चुरस, स्पर्धा हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांच्या मुलांमध्येही तशी ईर्ष्याही दिसून येत नाही. मुलांवर त्यांचे अतिशय प्रेम असते, त्यांच्यासाठी करण्यात येणार्‍या त्यागाची कमतरता असते. आईपण निभवताना त्या स्त्रीमधील राशीच्या गुणदोषांचा परिणाम होतोच. खरे आहे, ‘स्त्री ही क्षणाचीच पत्नी असून अनेक काळाची माता आहे’ ते! निवृत्ती उबाळे. 9860395985 कृष्णमूर्ती ज्योतिष मार्गदर्शक , कणकवली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

वर दिलेला लेख (विविध राशींची

श्रीगुरुजी
Sat, 07/11/2015 - 14:18 नवीन
वर दिलेला लेख (विविध राशींची आई) माझा लेख नाही. माझा लेख वेगळा होता (सर्वात पहिल्या प्रतिसादात लिंक दिलेली आहे). वरील लेखाच्या शेवटी ज्याचे नाव आहे (निवृत्ती उबाळे) त्यानेच माझ्या नकळत माझा लेख ढापून त्याखाली स्वतःचे नाव टाकून फेबुवर टाकला होता. वरील लेख देखील कोणाचातरी ढापलेला असण्याची दाट शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा