Skip to main content

ओळख - उचलगिरी करणाऱ्यांची

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 04/07/2015 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी सृष्टीवर ‘तुमच्या मनातल्या लेखकाला जागे करा” हे आव्हान स्वीकारून मी मराठी लेखन करायला सुरुवात केली. आधी ‘मराठीसृष्टी’ किंवा ;मी मराठी’ वर लेख टाकल्या नंतर नंतर आपल्या ब्लॉगवर टाकीत असे. कालांतरानंतर ‘मी मराठी’ वेबसाईट बंद पडली. ‘प्रेम म्हणजे काय’ हा लेख प्रथम मराठी सृष्टीवर (१३.७.२०१०) टाकला होता आणि नंतर आपल्या ब्लॉग वर. ऐसीअक्षरे सुरवात म्हणून मला स्वत:ला आवडलेला हा लेख ऐसी अक्षरे वर ८.१२.२०१३ टाकला. श्री राजेश घासकडवी यांनी मला जाब विचारला आणि माझी दांडीच उडाली. मी कधीही आपल्या लेखांचे प्रिंट घेतले नव्हते. (कार्यालयात इंटरनेटवर बंदी असल्या मुळे). सुदैवाने मराठीसृष्टी सुरु होती. लेख सापडला. मूळ लेखकालाच आपण चोर नाही हे सिद्ध करण्याची पाळी आली. पण मी शहाणा झालो. आता पहिले आपल्या ब्लॉग वर आणि नंतर मिसळपाव आणि ऐसी अक्षरे वर टाकतो. (दोन तीन ठिकाणी लेख टाकल्यामुळे कुणी चोरी करणार नाही असे वाटले). तसा प्रेम म्हणजे काय हा कमीत कमी ७-८ लोकांनी आपल्या नावानी टाकला असेल. यातल्या ४ लोकांनी किमान खेद तरी व्यक्त केला. असो. अंतर्जालावर दुसर्यांचे लेखन आपल्या नावाने काही लोक बेहिचक जसेच्या तसे आपल्या नावाने खपवितात. यातले काही पकडल्या गेल्या वर किमान खेद तरी व्यक्त करतात किंवा पुढे असे करणार नाही याचे आश्वासन तरी देतात. पण काही त्यांना जाब विचारल्यावर त्याचे उत्तर ही देत नाहीत. मूळ लेखकाला कळले आहे तरी बेशर्मीने सारखे तोच कित्ता गिरवीत राहतात. एकच उपाय सर्वांनी आपले लेख एकदा तरी तपासून बघितले पाहिजे. अश्यांची माहिती अंतर्जालावर लिहिणार्यांना कळली पाहिजे. कमीत कमी थोडी लाज वाटून ते असे करणे सोडण्याची शक्यता. शिवाजी राव शिंदे : हे मराठी अड्डावर नियमित लिहित राहतात. बहुतेक पुण्यात राहतात यांनी केलेला पराक्रम १. तपश्चर्येचे फळ (२.६.२०१५) शिवाजी राव शिंदे यांनी २३.६.२०१५ ला आपल्या नावानी 1. http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:1136352 मराठी बाणा / मोडेन पण वाकणार नाही (१९.३.२०११) 2. शिवाजी राव शिंदे यांनी २४.७.२०११ ला आपल्या नावानी http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:611726 वसंत पंचमी एक आनंदोत्सव(२५.१.२०१५): 3. शिवाजी राव शिंदे यांनी २६ जनवरी २०१५ला http://marathiadda.com/m/blogpost?id=2437740%3ABlogPost%3A1122770 4. रस्त्यावर वाहन चालविणारे (6.9.2014) शिवाजी राव शिंदे यांनी दुसर्याच दिवशी अर्थात ७.९.२०१४ http://marathiadda.com/profiles/blogs/ 2437740:BlogPost:1097323?xg_source=activity 5. वरुण राजाला साकडं: (१.९.२०१४) शिवाजी राव शिंदे यांनी ३.९.२०१४http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:1096709 किरण खंडागळे(मराठी कविता आणि बरच काही), हे ठाण्यात राहतात. पुन: एकलव्य : नियतीचा खेळ (१६.६.२०१३) यांनी १०.८.२०१३ http://marathikavee.blogspot.in/2013/08/blog-post_9124.html प्रेम आणि गालावरचे खड्डे (२८.७.२०१३) यांनी http://marathikavee.blogspot.in/2013/08/blog-post_26.html प्रेम म्हणजे काय: (१३.७.२०१०) http://marathikavee.blogspot.in/2013/02/blog-post_6744.html तुझ माझ मराठी (रणजीत मांगे) यांनी तर कमाल केली. १. रामायण कथा सीता: (६.४.२०१५) तुझ माझ मराठी (फेसबुक वर त्याच दिवशी अर्थात ६.४.२०१५) २. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।: (७.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर यांनी त्याच दिवशी ७.१२.२०१४ला. ३. म्हातारी ग मैना: (१.२.२०१५) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी. ४. बंदुकीची गोळी आणि ती: (२७.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी ५. झुंज - अंधाराच्या राक्षसांशी(६.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी ६. बळी (२४.११.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी आणखीन प्रयत्न करणे सोडून दिले. पुरोगामी विचारांचे एकमत नावाच्या ई-वर्तमान पत्र यांनी नाव न देता प्रेम म्हणजे काय हा लेख ७.१.२०१५ छापला. संदेश पाठविल्यावर उत्तर ही मिळाले नाही. http://www.dainikekmat.com/Yuva-53--151.html#.VZYY21Ipr7E. शिवाय अनिल काळगे (तुझी आठवण), युवराज मोहिते, गोविंद पवार, नितीन ठाकूर (या चौघांनी खेद व्यक्त केला). प्रसाद म्हैसे, आणि अनेक फेसबुक माझा एकटेपणा (योगेश), I miss you इत्यादी. या शिवाय माझे इतर लेख उदा: एखाद दुसर्याने उचलगिरी केलेली आहे. एफ डी आई सुंदरी, भ्रष्टाचार / काचेचे घर, मराठी बाणा / मोडेन पण वाकणार नाही: समलैंगिकता - सृष्टीच्या विनाशाचा मार्ग. पण सध्या त्यांचे नाव देत नाही आहे. कदाचित हा लेख वाचून ते पुढे असे करणार नाही ही अपेक्षा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16779
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

In reply to by श्रीरंग_जोशी

सर्वसाधारण उचलेगिरी करणारी मंडळी सर्वसाधारणपणे तांत्रिक गोष्टींना वळसा घालण्याच्या फंदात पडत नाहीत. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन तांत्रिक बंधन सुविधांना वळसा घालून केले तर जास्तीच्या कठोर शिक्षेची तरतुद भारतीय प्रताधिकार कायद्यात आहे. २०१२च्या अमेंडमेंटने कॉपीराइट उल्लंघन होऊ नये म्हणून काही टेक्नॉलॉजीकल पद्धती वापरली असेल आणि कुणी ती ब्रेक केल्यास अधीक शिक्षा देणारे भारतीय प्रताधिकार कायद्यात एक नवे उप कलम घातले आहे ते असे : 65A. (1) Any person who circumvents an effective technological measure applied for the purpose of protecting any of the rights conferred by this Act, with the intention of infringing such rights, shall be punishable with....पुढे वाचा Indian_Copyright_Law

In reply to by माहितगार

कायद्यातील ही तरतूद चांगलीच गोष्ट आहे. परंतु ज्यांचे लेखन चोरीला जात आहे ते अधिकृत तक्रार करत नसल्याने अशा चोरांचे फावते.

In reply to by श्रीरंग_जोशी

मी आधीच्या प्रतिसादातून सुचवल्या प्रमाणे एखाद्या सोसायटीच्या माध्यमातून फालोअप देणे हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग टेक्नीकली मिसळपाव संकेतस्थळाचे मालक हे येथील लेखनाचे प्रकाशकही आहेत. लेखकांनी त्यांच्याशी रेव्हेन्यू शेअरींग करार केल्यास प्रकाशक स्वतःही प्रताधिकार विषयक फालोअप देऊ शकतील. मी आत्ताच मिपा मालकांना रेव्हेन्यू शेअरींग आणि मार्केटींग बद्दल एक टिप व्यनि केली आहे.

आपण प्रकाशित करत असलेले साहित्य खरोखर काही उपयोगी, महत्वाचे आहे, असे वाटत असेल तर चौर्याद्वारे का होईना, ते जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे, असे मानून उत्तमोत्तम निर्मिती घडवण्याकडे आपले लक्ष केंद्रित करणे श्रेयस्कर. बाकी ज्यांना कायदेशीर कारवाई वगैरेची जात्याच खुमखुमी असते, त्यांनी तो छंद अवश्य जोपासावा. अवांतरः इथे मला माझ्या चुलत मामांची आठवण आली. ते त्याकाळी इंदुरातले नामांकित डॉक्टर असून खुद्द महाराज तुकोजीराव होळकर त्यांना बोलवायचे. पण यांना मनापासून आवड कसली, तर काहीतरी खुसपट काढून लोकांवर कोर्टात केस करायची. त्यांना कोर्टात जाणे मनापासून आवडायचे, आणि डॉक्टरीत आपला वेळ फुकट जातो असे वाटायचे. त्यांनी आपल्या मुलाला जबरदस्तीने वकील केले, त्याने एक दिवसही वकिली केली नाही. त्याला भाषा शिकण्याची आवड होती, त्याप्रमाणे जगातील अनेक भाषा शिकून त्यात पुस्तके लिहीली.

In reply to by चित्रगुप्त

संवेदनशीलतेचा आणि सर्जनाचा संबंध असतो. सर्जनशील व्यक्ती संवेदनशील असतात आणि त्यांच्या संवेदनशीलतेस कंगोरे अनेक असू शकतात !