ती संध्याकाळ मंतरलेली…।
या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे.
१) "मालवून टाक दीप" हे गाणे तसे लहानपणापासून कधीमधी ऐकायला येत असे. परंतु त्याचा खोल अर्थ केंव्हा कळला ते असे.
आमचे लग्न ठरले होते १९९२. तेंव्हा (होणारी) बायकोचे माहेर पनवेलला. ते खरेदी साठी दागिने बनवण्यासाठी पुण्याला येत असत. असे दोन वेळेस ते ५- ५ दिवस पुण्यात आलेले होते. माझी नोकरी चालू होतीच ए एफ एम सी मध्ये आणि एम डी पण चालू होते. तेंव्हा सोलापूर रोड ला मला दीड खोलीचे क्वार्टर्स मिळालेले होते. चार वाजता मी डिपार्टमेंट मधून सुटत असे. चहा घेऊन तयार होऊन सेंट बिंट मारून तयार होत असे. संध्याकाळ झाली कि बरोबर ५ च्या ठोक्याला मी तिच्या मामांकडे पर्वती पायथ्या जवळ तिला घ्यायला जात असे. पाच ते साडे आठ अशी आमची फिरायची वेळ होती. दिवसा ते खरेदी साठी जात असत.
एक दिवस संभाजी पार्क, एक दिवस क्याम्पात, एक दिवस वैशालीत असे आम्ही जात होतो. चौथ्या दिवशी तिला मी माझी ब्रम्ह्चार्याची मठी दाखवायला ए एफ एम सी मध्ये घेऊन आलो.निघताना सासुबाई नी काहीतरी खाऊन जा सांगितले. मी त्यांना म्हणालो आम्ही बाहेरच खाऊ. खोलीत माझ्याकडे दोन महिन्याचा पूर्ण पगार टाकून आणलेली फिलिप्स ची सुंदर म्युझिक सिस्टीम आणि दोन मोठे उंच असे उच्च दर्ज्याचे लाकडी स्पीकर्स खोलीच्या दोन कोपर्यात लावलेले होते.तिला पण संगीताची आवड असल्याने तिने माझा संगीताच्या टेप्स चा संग्रह पाहिला( १००च्या आसपास कॅसेटस होत्या) पेरू गेटाजवळ असलेल्या फ्रेंड्स म्युझिक सर्कल मधून मुद्दाम टेप करून घेतलेली जुनी मराठी आणि हिंदी गाणी हे पाहून ती हरखूनच गेली.सुदैवाने आमची गाण्यांची आवड तंतोतंत जुळली.
सप्टेम्बरचे दिवस असल्याने साधारण सहा साडे सहाला अंधार पडायला सुरुवात झाली. मग मी म्युझिक सिस्टीमवर गाणी लावली आणि आम्ही माझ्या बेडवर बसलो. एकमेकांच्या जवळ आलो तेंव्हा हे गाणे लागले. आ करून लता दीदींचा पहिला आलाप ऐकला आणि अंगावर शिरशिरी आली. अशा म्युझिक सिस्टीम वर संध्याकाळची वेळ हवेत पुण्याचा सुखद गारवा आणि मिठीत तुमची नव्या नवतीची चि. सौ. कां. पुढे जवळ जवळ दोन तास आम्ही वेगवेगळी गाणीच ऐकत होतो.लता दीदींची स्वरसम्राज्ञी कि कॅसेट यात कशी काळ नागिणी, मावळत्या दिनकरा इ गाणी अशा ताईंची अष्टपैलू गायिका मधील जिवलगा, समईच्या शुभ्र कळ्या,तरुण आहे रात्र अजुनी, येरे घना, गेले द्यायचे ते राहून अशी एका पाठोपाठ गाणी लागत होती. हे एक ऐकून जाऊया असे करत करत सव्वा आठ वाजले. खायची प्यायची शुद्ध नव्हतीच. सव्वा आठला मला लक्षात आले कि तिला मामांकडे सोडायचे आहे. मग तसेच निघालो आणि साडेआठ ला त्यांच्या घरी पोहोचलो.घरी सोडले इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आणि निघालो मी तिला सोडून निघणार तो सासूबाईनि विचारले काहि खाल्लेत का? मी सरळ सांगितले काहीही खाल्लेले नाही. आता जाऊन जेवणार. त्यांनी जेवायचा आग्रह केला. नाही तरी मेस मध्ये कोणाला जेवायचे होते? पण संकोच असतो ना ? मग तेथे त्यांच्याकडेच जेवलो आणि हवेत तरंगत परत आलो. आजही मालवून टाक दीप गाणे लागले कि मला सप्टेंबरातील ती संध्याकाळ तशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहते.
२) यानंतर परत एकदा बर्याच वर्षांनी गोव्याला सरकारी घरात आम्ही (सन २००० च्या) पावसाळ्यात सरकारी घर बदलले अगोदर दोन बेड रूम चे घर होते ते आता मोठे तीन बेडरुमचे घर मिळाले. तेथे मुलांना त्यांची बेडरूम त्यांच्या मनाप्रमाणे सजवून दिली. मुलं शाळेत जाणारी होती. एका रविवारी सकाळपासून गोव्याच्या पाळोले किनार्यावर गेलो होतो. तेथे एक तंबू भाड्याने घेतला. सकाळी सामान तंबूत ठेवून समुद्रात गेलो. जेवून दुपारी आम्ही झोपलो मुले वाळूत खेळत होती. संध्याकाळी कारने घरी परत आलो. रात्री जेवणं होईस्तोवर मुलं पेंगुळलेली झाली होती दुपारी उन्हात खेळण्याचा परिणाम स्पष्ट दिसत होता. त्यांच्या बेडरूम मध्ये गादया घालून दिल्यावर पटकन झोपली. दिवसभर पाण्यात खेळून दमली होती. बाहेर हॉल मध्ये म्युझिक सिस्टीम होती तिथे गालीचा घातलेला होता. मी बायकोला म्हणालो थोडा वेळ गाणी ऐकुया . मग दोन लोड घेतले आम्ही सर्व दिवे बंद करून गालीच्यावर आडवे झालो आणि मी नवीन घेतलेल्या ४.१ ( पाच स्पीकर असलेली) म्युझिक सिस्टीम मध्ये शफल मोड वर गाणी लावली तीन सीडी मधून वेगवेगळ्या क्रमाने गाणी वाजू लागली. एक दोन गाणी होईपर्यंत मूड बनला तोच परत लता दीदींचा आलाप आणि मालवून टाक दीप हे गाणे लागले. सर्व दिवे बंद रात्री साडे दहाला गोव्यासारख्या ठिकाणी चिडीचूप शांतता आणि तुमच्या चारी बाजूला शांतपणे पाझरणारे लता दीदींचे सूर. स्वतःच्या उबदार घरट्यात. बाहेर भुरभुरणारा पाउस. दिवसभर फिरून तृप्त झालेले मन आणि मिठीत तुमची आवडती.यापेक्षा काय हवे. एक एक सूर पाझरत होता आणि मनात खोल उतरत होता.
गार गार या हवेत घेउनि मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग
राजसा किती दिसत लाभला निवांत संग.
सुख सुख म्हणतात ते अजून काय असते?
३) २०१५ एप्रिल चा महिना. मी आपल्या बायकोशी कटकट करत होतो कि तू साड्या नेसतच नाहीस. बरेच दिवस झाले रोज तेच तेच ड्रेस घालायचे मग साड्या आणून काय फायदा इ इ.
बायको अर्ध मारेथोन धावते. (२१ किमी /३ तासात) एरोबिक्स करते म्हणून सडपातळ आहे. त्यामुळे साडी अजूनही तिला खुलून दिसते.
मी आपल्या दवाखान्यात रोज सकाळी साडे आठ वाजता न्याहारी करून जातो. तिचा दवाखाना माझ्या दवाखान्याच्या बाजूच्याच खोलीत आहे. तेंव्हा पेशंट आले तर उत्तम पैसे मिळतात. नाही आले तर वेळ मिळतो गप्पा मारायला. तिची वेळ दहा वाजताची. ती एकतर थर्मास मध्ये कॉफी घेऊन येते. किंवा तिच्या दवाखान्यात कॉफी मेकर आहे त्यात आम्ही बनवतो नाहीतर धंदा मंद असेल तर हॉटेलात बसून कॉफी घेतो. एक वाजता दोघे घरी परत.
एक दिवस सोमवार सकाळ -- मी सकाळ पासून रुग्ण बघत बघत कावलो होतो. साडे दहा वाजले होते सकाळपासून दोन तास सतत रुग्ण येतच होते. एवढ्यात
तिच्या स्वागत सहायिकेने मला बोलावणे पाठवले, सर म्याडम आल्या आहेत आणि तुम्हाला बोलावत आहेत.मी रुग्ण हातावेगळा केला आणि तीच्या दवाखान्यात दार ढकलून आत गेलो. बघतो तर काय बाईसाहेब झक्क पैकी निळी आणि काळी साडी ( माझ्या चोईसची) साडी त्यावर माचींगचा ब्लाउज गळ्यात मोत्यांची माळ इ इ जामानिमा करून आलेल्या. मी छानपैकी शिटी मारली. बायको लटक्या रागाने म्हणाली अरे हा आपला दवाखाना आहे घर नाही पेशंट काय म्हणतील? . मी म्हणालो पेशंट को मारो गोली. मग काय तिच्या कडे पाहत बसलो. तिने तिच्या छोट्याशा म्युझिक सिस्टम वर गाणी लावली. तर काय गाणे लागले " मालवून टाक दीप" छान पैकी बायको कडे पाहत वातानुकुलीत खोलीत गरम गरम कॉफी चा स्वाद घेत बसलो.
आयुष्यात माणसाला आणखी काय हवं असतं?
वाचने
21806
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहव्वा! युं की....., मजा आ
मस्त!!!
साहेब
In reply to मस्त!!! by ट्रेड मार्क
खरच की...
In reply to साहेब by सुबोध खरे
खरेसहेब्,धन्यवाद.एक स्त्री
मस्त !
काहीही काय? जोशी साहेब
In reply to मस्त ! by मनोज श्रीनिवास जोशी
वा
सुंदर लिहिलंय. हे गीत माझे
दुसर्या गीताच्या अर्थावर
In reply to सुंदर लिहिलंय. हे गीत माझे by श्रीगुरुजी
हजार वेळा धन्यवाद!!!!
In reply to दुसर्या गीताच्या अर्थावर by मराठी_माणूस
बरोबर आहे…
In reply to दुसर्या गीताच्या अर्थावर by मराठी_माणूस
विरहगीत आहे. काहीही हं ट्री!!
In reply to बरोबर आहे… by ट्रेड मार्क
लिंकबद्दल धन्यवाद! हा लेख
In reply to दुसर्या गीताच्या अर्थावर by मराठी_माणूस
अर्थ आणि पार्श्वभूमी या
In reply to सुंदर लिहिलंय. हे गीत माझे by श्रीगुरुजी
व्वा
अगदि मस्त.
आणखी काहीही नको असतं. :)
धाग्याचं शतकं झाल्याबद्दल
पुस्प्गुच असा मूळ पाठ आहे.
In reply to धाग्याचं शतकं झाल्याबद्दल by कॅप्टन जॅक स्पॅरो
भाषा दर बारा मैलांगणिक बदलते.
In reply to पुस्प्गुच असा मूळ पाठ आहे. by सूड
मुळात सिंव्हगड रोड मधलेच
In reply to भाषा दर बारा मैलांगणिक बदलते. by कॅप्टन जॅक स्पॅरो
छान लेख .