Skip to main content

पेटीएम

गुरुवार, 02/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल क्रेडिट/ डेबीट कार्डाऐवजी पर्याय म्हणुन पेटीएम सारखी आर्थिक व्यवहारसाधने आढळतात. माझा बाळ्बोध समज असा की ह्या नव्या पाकिटात आपण लागतील त्यानुसार काही पैसे ठेवायचे व खर्च करायचे. यात सकृतदर्शनी फायदा असा की पाकिट कुणी उडवले तर त्यात अस्लेली रक्कमच जाइल. खात्यातली सर्व रक्कम वा क्रेडीट कार्ड मर्यादे इतकी रक्कम जाणार नाही. पाकिटात पैसे आपणच भरणार. मग ते पैसे खात्यातुन पाकिटात ठेवताना जालचोर हेरु शकतात का? पेटीएम वा तत्सम पर्याय किती सुरक्षित आहेत? हे व्यवहार संगणकावर करता येतात की अ‍ॅपच वापरावे लागते? (जो उठतोय तो अ‍ॅप उतरवुन घ्याय्चा आग्रह धरतोय. किती अ‍ॅप उतरवुन घेणार? एक दिवस बोलायला/ वाचायला एक हस्तसंच आणि अ‍ॅपसाठी एक स्वतंत्र हस्तसंच ठेवायची वेळ येईल)

वाचने 6955
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

भ्रमणध्वनी वर app उतरवून त्यावरती काही करणे थोडे (मलातरी) धोक्याचेच वाटते. त्यामुळे मोबाइल वरून पेमेंट शक्यतो मी करत नाही. पेटीएम बद्दल एवढेच माहिती आहे कि उबेर साठी पेटीएम चे अकौंट लागते. पण त्यावातीरिक्त त्या अकौंट कधीच उपयोग केला नाही. बाकी प्रतिसादांच्या प्रतीक्षेत.. !

In reply to by सव्यसाची

>>>> भ्रमणध्वनी वर app उतरवून त्यावरती काही करणे थोडे (मलातरी) धोक्याचेच वाटते. बँक ऑफ महाराष्ट्राने तर भ्रमनध्वनीवर अ‍ॅप उतरवून घेणे कंपलसरी केलंय. काही बील पेड करायचे असले एक कोड क्रमांक त्यावरच येतो यात काय धोका आहे ? Paytm वर मी खरेदी केली आहे पण डिबिट कार्डावरुन त्यात काही अजून धोका वाटला नाही. erecharge या अ‍ॅप्लीकेशनवरुनही मी प्रिपेअर कार्ड रिचार्ज केले आहेत सेम प्रोसेस. अजुन काही तरी धोका वाटला नाही ? काय धोके होऊ शकतात ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, खरेतर त्या वाक्यामध्ये मला काय म्हणायचे ते नीट लिहिता आले नाही. 'काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो असे मला वाटत राहते म्हणून apps वरून payment मी टाळतो' असे मला म्हणायचे होते. कदाचित ते सेफ असेलही, कदाचित नसेलही. त्याबद्दल मला तितकीशी कल्पना नाही. मलाही वाचायला आवडेल जर कुणी इथे या विषयावर लिहिणारे असतील तर. जेव्हा ऑनलाइन पेमेंट ची वेळ येते तेव्हा संगणकावरूनच करतो. तेही नेट कॅफे किंवा तत्सम ठिकाणी कधीच नाही.

पेटीएम गेली ३-४ वर्षे मि वापरतोय . वेबसाईट / अ‍ॅप कसंहि वापरु शकता . अजुन तरी मला काहि प्रोब्लेम आलेला नाही. .

पेटीएम वरून जास्तीत जास्त फ्रॉड होतात.त्यांच्याकडची माहिती तेवढी सुरक्षित रहात नाही असे ऐकले. खरे खोटे माहीत नाही. आंतरजालीय पेमेंटसाठी मी मुद्दाम एक कमी लिमिट असलेले क्रेडिट कार्ड वापरते. त्याला डबल सिक्युरिटी असते. डेबिट कार्ड सुद्धा कधीच वापरत नाही.

In reply to by पैसा

>>> पेटीएम वरून जास्तीत जास्त फ्रॉड होतात.त्यांच्याकडची माहिती तेवढी सुरक्षित रहात नाही असे ऐकले. विदा नसल्यामुळे अफवा अशाच जास्त पसरतात आणि आपण सामान्य ग्राहक धोका नको म्हणुन व्यवहारच टाळतो. असेच होत राहीले तर, भविष्यात डिजीटल क्रांती किती विश्वासु असेल देवास ठाऊक ? आता आपल्याच प्रतिसादामुळे पेटीएम मधुन कोणाचा काही खरेदी करायचा विचार करायचा असल्यास झालाचा ना त्यांचा कॉन्फीडन्स लुज. ( पेटीएम मधे माझे कोणतेही हितसंबंध नाही) वाईट अनुभव अगदी खात्रीने कोणी सांगितल्याशिवाय अशा अ‍ॅप बद्दल काही मतं व्यक्त करणे जरा धाडसाचेच ठरते, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेटीएमचा मला प्रत्यक्ष अनुभव नाही. पण माझा भाऊ अ‍ॅक्सिस बँकेत मंनेजर होता. त्याच्या काही कस्टमर्सकडून पेटीएम कडून अशी माहिती लीक झाल्याचे त्याने ऐकले आहे. एअरटेल मनी वाल्यांचा मला वाईट अनुभव आहे. माझ्या आयसीआयसीआय क्रेडिट कार्डाचे नंबर सकट डिटेल्स घेऊन त्यानी मला फोन केला होता. व्हेरिफिकेशनच्या नावावर. मी चुकून जन्मतारीख सांगितली आणि मेसेज आला की पिन बदलला. ५ मिनिटात हे फ्रॉड आहे असे लक्षात आले तोपर्यंत त्यानी ४५०० ट्रान्सफर करून घेतले होते. लगेच कार्ड ब्लॉक केले. बिल डेस्कवाल्यानी ताबडतोब त्यावेळचा आयपी घेऊन ट्रान्झॅक्शन एअरटेल च्या उत्तर प्रदेशातील एका ऑफिसमधून झाल्याचे सांगितले. मात्र रक्कम छोटी असल्याने त्याचा जास्त पाठपुरावा कोणीच केला नाही. असे किती लोकांना गंडा घालत असतील देवजाणे. असल्या उचल्या लोकांकडे जाण्यापेक्षा बँकेच्या क्रेडिट कार्डाने व्यवहार करावेत.

madhyantari ashi batami vachali hoti ki ratan tata ni paytm madhe investment keli ahe

ऑनलाइन , व्हर्चुअल पेमेंटवर विश्वास नाही. क्याश व चेक हेच बेस्ट आहेत. लहान सहान रकमेला डेबिट कार्ड वापरतो. पण वर खाली कुठे क्यामेरा नाही ना ? कीपॅडवर दुसरा हात झाकून वगैरे करतो.

मुळात मला असा प्रश्न पडतो कि , समांतर चलन निर्माण करण्याचा अधिकार कंपन्यांना आहे का ? (उदाहरणार्थ सोडेक्सो कुपन. पेटीएम, एअरटेल मनी, तत्सम ). चलन निर्माण करण्याचा अधिकार केवळ सरकारकडेच असतो ना , मग हे असे समांतर चलनाला सरकार परवानगी कशी देते?

In reply to by उगा काहितरीच

या प्रकारास समांतर चलन असे म्हणण्याबाबत असहमत. हे सर्व प्रकार वापरकर्त्यांच्या सोयीसाठी आहेत. प्रत्येक वेळी रोख चलन बाळगणे व वापरणे सोयीचे नसू शकते. प्रिपेड कॅश कार्ड पण असेच असते. या चर्चेत ज्यांचा उल्लेख आहेत ते फोनवरून किंवा जालावरून वापरण्याचे प्रकार आहेत. बिटकॉईन हे समांतर चलनाचे उत्तम उदाहरण आहे. ज्यावर भारतासकट अनेक देशांत बंदी आहे. अवांतरः रोख चलन का वापरू नये (माझे विचार).

इथे मिसळ पाव वर एका मुलीने टाकला होता आपला अनुभव . पेटीम ने कसे मूर्ख बनवले ते. आठवा !! अकौंट खाली केला तिच्या वडिलांचा ..

In reply to by अभिजित - १

हा तो लेख - Bank account मधुन पैसे परस्पर काढ्ले गेलेत.... याबाबतचा उल्लेख तुम्ही ज्याप्रकारे केला ते जरा अनुचित वाटले. मी तेच खालील वाक्यात लिहिले असते. पेटीएमच्या वापरातून झालेल्या आर्थिक फसवणूकीबाबतचं अनुभवकथन पूर्वी मिपावर येऊन गेलय.

काय आहे भारतातील system ची अव्यवस्था, तिच्या कडून होणारी फसवणूक. कोणताही प्रश्न सोडवण्य पेक्षा तो दाबून टाकून सगळे काही स्वच्छ आहे हे दाखवण्याची टिपिकल प्रवूत्ती याचा मला भयंकर राग येतो. त्या मुळे माझी भाषा पण अशा ठिकाणी नको इतकी harsh होते. त्याला माझा नाईलाज आहे. पेटीम हि पैसे खाणारी कंपनी आहे याबाबत काहीच शंका नाही. खालील ५६८ review वाचा. ७० टक्के लोकांनी १ star दिलाय . फक्त १० टक्के लोक ५ star देत आहेत. http://www.mouthshut.com/websites/PayTm-com-reviews-925631912#allreviews May 2, 2015 - Police told media that Paytm's directors Vijay Shekar Sharma and Harendra Pal Singh have been named in the FIR under sections of forgery and IT Act. http://timesofindia.indiatimes.com/india/Madhya-Pradesh-police-books-Pa…

In reply to by अभिजित - १

माझ्या प्रतिसादाचा रोख तुमच्या विधानातील दुसर्‍या मिपाकराबाबतच्या रोखाकडे होता. त्यांच्याबद्दल नकळतपणे अनादर व्यक्त झाल्यासारखे वाटले. स्वतःच्या झालेल्या फसवणुकीबद्द्ल सार्वजनिक व्यासपीठावर लिहिणे ही धैर्याची बाब आहे. संभाव्य धोक्याबाबत इतरांना जागरूक करण्याचे काम यातून होत असते.

तिने खरेच खूप चांगले काम केले. तिचे मी पण आभार मानतोच. तसे काही वाटत असेल तर माझा खरेच तो उद्देश नव्हता. फक्त लोकांना पेटीम विषयी कडक feedback देणे , जेणे करून त्यांचे डोळे उघडतील इतकाच माझा उद्देश होता आणि म्हणून मी तशी भाषा वापरली. कारण इथे बरेच लोक पेटीम विषयी सहानुभूती बाळगून आहेत असे दिसले.