⇆ व्यवहार ⇆
नाण्याला दोन बाजू असतात, त्यातली एक बाजू आपण पाहू शकतो आणि दुसरी बाजू ही थोड्याशा प्रय़त्नाने अभ्यासली जाऊ शकते. माध्यमे , facebook किवा इतर व्यक्त होण्याचा साधनांवर प्रोटागोनीस्ट अेन्तागोनीस्ट हा वाद चालू असतो. कुणी काय केल किवा कुणी कशी हुकुमशाही गाजवली अथवा गाजवतोय या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा ती (सत्तेची ) फेज कुणी अभ्यासत का नाही ? मुळापासून रोगाचा इलाज करण्यापेक्षा त्याच्या लक्षणाची चिकिस्ता करून उथळ पांडित्य प्रदर्शन जास्त चालू आहे. वीट आलाय सगळ्याचा, मुळात नाण्याला दोन बाजू असतात हे मान्य, पण या नाण्याचा व्यवहार कसा होतो या बाबत आपण अनभिज्ञच असतो, सत्ता हातात आल्यावर तत्त्वांपेक्षा (इतर) गोष्टींना प्राधान्य का दिले जाते, अथवा जुन्याच चुकांची पुनरावृत्ती होत असते तेव्हा (प्रोटागोनीस्ट अेन्तागोनीस्ट) यांच्या भूमिका बदलेल्या असतात. मग ज्याला विरोध आहे तो व्यवहार का अभ्यासला जात नाही ? पण तसं होणार नाही कारण उथळ पांडित्य प्रदर्शन करण्यार्यांची बाजारपेठ सध्या जोरात आहे, आणि त्याचे व्यवहार आपल्या आकलना पलीकडचे आहेत, तिथे फक्त नाण्यांची चर्चाच होत असते
| लेख वर्गीकरण |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
पैलाच लेख
नवलेखकाचा पैलाच लेख हाये :)
मिपाकरांनी ल्हान पोराले समजून घ्यावं.
पैलाच लेख
In reply to पैलाच लेख by कपिलमुनी
धन्यवाद,….
पुढील लेख विस्ताराने लौकरच लिहितो
कहना क्या चाहते हो? एवढ्या
कहना क्या चाहते हो? एवढ्या तात्त्विक पातळीवर लिहिण्याच्या ऐवजी उदाहरणं लिहिली असती तर बरं झालं असतं...
विरोधक विरोधाची भाषा बोलतेय
In reply to कहना क्या चाहते हो? एवढ्या by आदूबाळ
विरोधक विरोधाची भाषा बोलतेय आन सत्ताधीश सत्तेची भाषा बोलतेत. तिकडंचे हिकडं झाले आणि हिकडंचे तिकडं गेले की तेच करतेत. वगैरे वगैरे.. त्या ऐवजी प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणून का पाहित नैत हे लोक्स असा प्रश्न पडलाय वो.
कल्लाव काय ?
विरोधक विरोधाची भाषा बोलतेय
In reply to विरोधक विरोधाची भाषा बोलतेय by अस्वस्थामा
कलल्ला हो
समजलं.
समजलं.
लेखाची लाबी जरा कमी करता आली
लेखाची लाबी जरा कमी करता आली तर बघा, व नेमक्या शब्दात भावना व्यक्त करा. एकदम इतके सगळे वाचताना नक्किच दमछाक होते आहे.
शिर्षकामध्ये त्या बाणांचे
शिर्षकामध्ये त्या बाणांचे काही प्रयोजन आहे का ? का माझ्या आयडीसारखं ?
मला कळलेलं..
In reply to शिर्षकामध्ये त्या बाणांचे by उगा काहितरीच
कुठली बाजू घेण्यात आपला फायदा आहे, हा विचार करुन कधी 'प्रोटागोनीस्ट' तर कधी 'अेन्तागोनीस्ट' अश्या बाजु (नाण्याच्या) बदलणार्या 'व्यवहारी' लोकांचं प्रतिक आहे हो ते.. ;-) हाय की नाय हो, लेखकराव?
असो. विचार कळला, पण मांडणी जरा व्यवस्थितपणे करावी, ही विनंती
मला कळलेल / मला अपेक्षित हेच ते
In reply to मला कळलेलं.. by चिगो
आपण सुज्ञ आहात , मी यापेक्षा जास्त जास्त सुचवू इच्छित नव्हतो , मांडणी बाबत लक्षात ठेवीन
प्रतिसादा बद्दल आभारी
⇆ व्यवहार दर्शवण्यासाठी
In reply to शिर्षकामध्ये त्या बाणांचे by उगा काहितरीच
⇆ व्यवहार दर्शवण्यासाठी