वॉट्सअप आणि वॉट्सऍप
लेखनप्रकार
"वॉट्सअप म्हणजे रे काय भाऊ?"
"अरे,वॉट्सअप म्हणजे तो एक पश्चिमी देशात दोन व्यक्तीत संवाद साधण्य़ापूर्वी उच्चारलेला वाक-प्रचार आहे.हेलो आणि हाय ह्या ऐवजी हा वाक-प्रचारही वापरला जातो."
"म्हणजे भारतात,दोन मराठी माणसं भेटल्यावर,
"काय चालंय?" म्हणतात.
किंवा दोन गुजराथी माणसं भेटल्यावर,
सुं चाले छे?म्हणतात.
किंवा दोन हिंदी भाषिक भेटल्यावर,
"क्या चल रहा है?" म्हणतात
असं म्हटल्यासारखं का रे भाऊ?"
"अगदी बरोबर.वॉट्सअप हा वाक-प्रचार त्यांच्याकडे पूर्वापार आहे."
"अरे,मग, वॉट्सऍप म्हणजे रे काय भाऊ?"
"अरे,स्मार्ट फोनवर संवाद साधण्यासाठीची एक ऍप आहे ती."
"ऍप म्हणजे रे,काय भाऊ?"
"अरे,ऍप म्हणजे ऍप्लीकेशन."
"म्हणजे ज्याला सॉफ्टवेअर म्हणतात ते का रे?"
"बरोबर.त्याला प्रोग्राम असंही म्हणतात."
"मग,हे वॉट्सऍप अमेरिकेत जास्त लोकप्रिय का नाही रे,भाऊ?"
"अरे,तंत्रविज्ञान हेच दाखवतं की,त्याचा शिरकाव फक्त सामाजिक संबंध ठेवण्यासाठी,किंवा समुदायाच्या वर्तूळात अंतर्भूत होण्यासाठीच उपयोगी असतं.आणि जर का त्याला संस्कृतीचा पाया नसेल तर मग काय म्हणावं? तंत्रविज्ञान्याला संस्कृतीपेक्षा वरचढ राहून चालत नाही रे, बाबा!"
"भारत आणि ब्राझीलमधे हे वॉट्सऍप जास्त लोकप्रिय आहे.असं मला कुणी तरी सांगीतलं.खरं तर, ही ऍप अमेरिकेत स्थापित झाली.पण तिथे कुणीच कसं वापरीत नाहीत रे,भाऊ?"
"अरे,त्याचं कारण असं असावं की,आयमेसेजीस सर्वजणच वापरतात,अमेरिकेत आयफोन बराच लोकप्रिय आहे,त्यामुळे ह्या लोकांचं वॉट्सऍपशिवाय काम भागत असणार."
"अरे भाऊ, वॉट्सऍप अमेरिकेत लोकप्रिय नाही म्हणून मला काही फरक पडत नाही रे.पण हे अमेरिकन्स मोठे व्यापार धार्जीणे आहेत.ह्याचाच अर्थ असा की,अमेरिकेत वॉट्सऍपचे व्यापारी प्रतिमान,तिकडच्या किंमतीवर किंवा व्यापारी नम्यतेवर फारसा परिणाम करणारं नसावं,असंच ना रे भाऊ?"
"अगदी बरोबर.अमेरिकेत स्मार्टफोनचं वापरणं लोकसंखेच्या 64% आहे.आणि सर्व स्मार्टफोनवरून त्यांना मेसेजीसची देवाण-घेवाण करता येते.त्यासाठी त्यांना नवीन ऍप अपलोड करायला नको.भारतातल्या स्मार्ट्फोनवर वॉट्सऍपची ऍप मुळातच अपलोड केलेली असते.त्यामुळे त्यांना ती जवळ जवळ फुकट वापरता येते.पण संवाद साधण्यासाठी एकमेकाने त्या ऍपचा वापर करायला हवा.हे मला प्रो.देसाईनी सांगीतलं.
कुठचीही गोष्ट फुकट मिळाल्यावर त्याचा वापर करण्याचा माणसाचा कल असतो.ती कुणाही माणसाची वृत्ती असते.असंही प्रो.देसाई पुढे म्हणाले."
"आपल्या दोघांकडेही स्मार्टफोन नाही.त्यामुळे आपण ह्या विषयावर चर्चा उगाचच करतो नाही का रे भाऊ?"
"अरे,आपल्याकडे नसलेल्या गोष्टीकडे कुतूहल म्हणून बघण्याचीही माणसात मनोवृत्ती असतेच ना? मग कशाला रे,वाईट वाटून घेतोस.?"
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
वाचने
12049
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
नक्की काय म्हणायचं आहे...?
In reply to नक्की काय म्हणायचं आहे...? by संदीप डांगे
कदाचित
- ग्रुपमधून काढल्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनवर चाकूहल्ला
- व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला अटक
अमेरिकेत गाडी चालवताना चालकाने टेक्स्टिंग केल्याने अपघात होणे व त्यात प्राणहानी होणे हे बरेच घडायचे. गेली अनेक वर्षे यावर भरपूर जनजागॄती झाली आहे. बहुधा आता प्रमाण कमी झाले असावे. या कारणामुळे झालेल्या अपघातांच्या बातम्या गेल्या एकदोन वर्षांत कमी झाल्या असे निरीक्षण आहे.In reply to कदाचित by श्रीरंग_जोशी
भारत आणि ब्रझिल
स्पष्टीकरण
In reply to स्पष्टीकरण by श्रीकृष्ण सामंत
१. अमेरिकेत स्मार्टफोनचं
In reply to १. अमेरिकेत स्मार्टफोनचं by संदीप डांगे
आणखी स्पष्टीकरण
In reply to १. अमेरिकेत स्मार्टफोनचं by संदीप डांगे
पूर्ण सहमत ..
In reply to पूर्ण सहमत .. by स्वीत स्वाति
वरती दिलं आहे
In reply to पूर्ण सहमत .. by स्वीत स्वाति
आय मेसेज
ह्ही ह्ही!
असहमत.......!
In reply to असहमत.......! by रॉजरमूर
कमाल करता हां तुम्हीपण!!
In reply to कमाल करता हां तुम्हीपण!! by सूड
असा सूड घेऊ नका हो!
In reply to असा सूड घेऊ नका हो! by श्रीकृष्ण सामंत
तांत्रिक बाबी जाऊद्या हो
In reply to तांत्रिक बाबी जाऊद्या हो by श्रीरंग_जोशी
सहमत
In reply to सहमत by श्रीकृष्ण सामंत
धन्यवाद
In reply to असहमत.......! by रॉजरमूर
किती सरसकटीकरण.
In reply to किती सरसकटीकरण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थॅन्कस
In reply to थॅन्कस by श्रीकृष्ण सामंत
Take it as genral
In reply to किती सरसकटीकरण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किती "सर" सकटीकरण ?
In reply to किती "सर" सकटीकरण ? by रॉजरमूर
उदा.म्हणून लावा मोबाइल दिला.
In reply to असहमत.......! by रॉजरमूर
चुकीचं निरीक्षण
In reply to चुकीचं निरीक्षण by श्रीकृष्ण सामंत
बरोबर आहे
))))कदाचित भारतात
In reply to ))))कदाचित भारतात by कंजूस
धन्यवाद
एकच माणून दोन किंवा तीन मोबाइल नंबर का वापरतो ?
In reply to एकच माणून दोन किंवा तीन मोबाइल नंबर का वापरतो ? by धर्मराजमुटके
धन्यवाद
ज्यांना आपल्याला नंबर
व्हॉट्सअॅप/२ सिम कारणे
पुर्वीचे
पुर्वीचे
अवांतर शंका....
In reply to अवांतर शंका.... by गामा पैलवान
मराठीसाठी मी बाराह डायरेक्ट देवनागरी वापरतो
उदय तानपाठक यांचे विचार
In reply to उदय तानपाठक यांचे विचार by श्रीरंग_जोशी
बाकी आपण सुज्ञ आहात !
In reply to उदय तानपाठक यांचे विचार by श्रीरंग_जोशी
प्रचंड आवडली पोस्ट.
In reply to प्रचंड आवडली पोस्ट. by मधुरा देशपांडे
बर्याच वैताग लेल्या दिसताय
In reply to बर्याच वैताग लेल्या दिसताय by पाटीलअमित
हो अगदीच. बहुतेक असे ग्रुप्स
In reply to प्रचंड आवडली पोस्ट. by मधुरा देशपांडे
खरे आहे मधुरा.
उदय तानपाठक यांचे विचार
कडक लिंबाचा किस पोस्ट अनेक