Skip to main content

रामायण कथा - वाली पत्नी तारा -एक कुशल राजनीतीज्ञ

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 27/06/2015 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे. वानर समाज पुरुष प्रधान होता. स्त्रिया केवळ भोग्य वस्तू. पतीच्या मृत्यू नंतर, त्याच्या भावाची अधीनता स्त्रीला स्वीकारावी लागत असे. इथे तर प्रत्यक्ष ज्या भावाने, तारेच्या पतीचा षड्यंत्र रचून वध केला, त्या सुग्रीवला पती म्हणून स्वीकारावे लागले. सुग्रीवची कनिष्ठ पत्नीचा दर्जा ही तिला स्वीकार करावा लागला. तारेला किती मानसिक यातना झाल्या असतील, याची कल्पना करवत नाही. तरी ही आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी आणि वानरांच्या हितासाठी तिने सर्व यातना आनंदाने सहन केल्या. रामायणात तारे सारखी प्रखर स्त्री अन्य नाही. तारा केवळ वालीची पत्नी आणि किष्किंधा नगरीची सम्राज्ञी नव्हती अपितु राजकार्यात ही तिचा पर्याप्त दखल होता. गुप्तचर तंत्राचा कसा वापर करावा हे ही तिला माहित होते. राज्यात आणि संपूर्ण भरतखंडातल्या घडामोडींचे त्याचे ज्ञान ही तिला होते. वालीपासून लपून राहणार्या सुग्रीवने, वालीला द्वंद युद्धासाठी ललकारले आणि तो पराजित झाला. पण तारचे मस्तक ठणकले, सुग्रीवच्या असे दुस्साहस कारण काय, हे शोधून काढण्याचे तिने ठरविले. गुप्ताचरांकडून इत्यंभूत माहिती मिळवली. त्याच दिवशी भरपूर मार खाऊन ही सुग्रीवने पुन्हा द्वंद युद्धासाठी वालीला ललकारले, निश्चितच या मागे काही षड्यंत्र असणारच असे तारेला वाटले. तिने वालीला युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तारेने वालीला किमान सकाळपर्यंत तरी थांबण्याचा सल्ला दिला. पण क्रोधग्रस्त वाली तिचे ऐकायला तैयार नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून तारेने गुप्तचरांकडून मिळालेली सूचना आपल्या पतीला दिली. इक्ष्वाकू वंशातील श्रीराम आणि लक्ष्मण ज्यांनी दंडकारण्यातल्या खर दूषण सहित हजारों राक्षसांचा वध केला आहे आणि दंडकारण्यातल्या जनतेची राक्षसी अत्याचारांपासून मुक्तता केली आहे. अश्या श्रीरामांशी सुग्रीवने मैत्री केली आहे आणि श्रीरामाने त्यांना किष्किंधाचे राज्य देण्याचे ही प्रलोभन दिले आहे. तारेने बालीला सल्ला दिला, परिस्थितीला ओळखा, या घटकेला श्रीरामासारख्या पराक्रमी व्यक्तीशी वैर पत्करणे हिताचे नाही. त्यांना शरण जा. सम्मानपूर्वक रुमाला सुग्रीवच्या स्वाधीन करून, त्याचा युवराज पदावर अभिषेक करण्याचा करा. वालीला तिची सूचना आवडली नाही. कदाचित् वालीला असे वाटले असेल, श्रीराम न्यायी आहेत दोन भावांच्या युद्धात ते पडणार नाही. वालीने तारेच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. वालीचे हितचिंतक वानरांनी वालीच्या मृत्यूची वार्ता तारेला कळवली आणि तिला अंगद सहित पलायन करण्याचा सल्ला दिला. पण तारेने ते मान्य केले नाही. ती कुठे ही पळून गेली नाही. अपितु युद्धाच्या जागी गेली. त्या परिस्थितीत ही आपला क्रोध आवरून, आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले. वाली वधाचा दोष तिने श्रीरामावर लावला नाही. तारेला माहित होते इक्ष्वाकु कुलभूषण श्रीरामचंद्र हे न्यायी आहेत, ते कधी ही अन्याय करत नाही. जे काही घडले त्याला तिचा पतीच कारणीभूत आहे. तिने वाक्चातुर्य दाखवत श्रीरामाला तिचा ही वालीप्रमाणे वध करण्याची विंनती केली. तिची मात्रा बरोबर लागू पडली. श्रीरामाने सुग्रीवचा किष्किंधा नगरीच्या राजपदावर अभिषेक केला आणि वाली पुत्र अंगद याचा युवराज पदावर अभिषेक केला. अश्यारितीने तारेने आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले. भविष्यात त्याचा राजा होण्याचा मार्ग मोकळा केला. क्रोधीत लक्ष्मण नगरात आले. तेंव्हा सुग्रीव तारेच्या निवासी होते. या वरून कळते, तारेने सुग्रीवला ही आपल्या मुठीत ठेवले होते. लक्ष्मणाच्या येण्याची वार्ता ऐकून वानरराज सुग्रीव घाबरून गेले, या विकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुग्रीवणे तारेलाच पुढे केले. वेळप्रसंग ओळखून ताराने लक्ष्मणाची मनधरणी केली, हे वीर राजकुमार ही क्रोध करण्याची वेळ नाही. सुग्रीवच्या मनात तुमचे कार्य करण्याची इच्छा आहे, काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. क्रोधग्रस्त असल्यामुळे तुला कामासक्त माणसाच्या परिस्थितीची कल्पना नाही. कामासक्त होऊन वानरराज माझ्याकडे आले होते, कामाच्या अधीन झाल्यामुळे त्यांच्या हातून चूक झाली असेल, त्यांना आपला बंधु समजून क्षमा करावी. महर्षयो धर्मतपोऽभिकामाः कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः । अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु कथं न सज्जेत सुखेषु राजा ॥ किष्किंधाकांड (३३/५) (तपस्यारत महर्षी ही कामाच्या अधीन होतात, सुग्रीव तर एक चंचल वानर आहे, तो कामाच्या अधीन झाला, त्यात चूक काय). तारा पुढे म्हणाली, जरीही सुग्रीव कामासक्त झाले असतील तरी ही त्यांनी आपले कार्यसिद्ध करण्याचा उद्योग सुरु केलेला आहे. लवकरच लाखोंच्या संख्येने वानर इथे येऊन पोहचतील आणि कार्याला सुरवात करतील. अश्या रीतीने तारेने लक्ष्मणाचा क्रोध काही अर्थी शांत केला. सुग्रीवला भेटल्यावर ही लक्ष्मणाचा क्रोध पुन्हा जागा झाला. लक्ष्मणाने अत्यंत कठोर शब्दात सुग्रीवची नालस्ती सुरु केली. या वेळी मात्र ताराने कठोर भूमिका घेतली. तिने कठोर शब्दात लक्ष्मणाला बजावले, सुग्रीव हे वानरांचे राजा आहेत. राजा समोर कटू बोलणे कुठल्याही परिस्थितीत उचित नाही. तिने लक्ष्मणाला सांगितले, सुग्रीव कृतघ्न तर नाही, पण असत्य ही बोलत नाही. ते निश्चितच अधम राक्षसांचा वध करून, सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त करतील. तारा पुढे म्हणाली, वर्षोनुवर्षे दुखी असलेल्या माणसाला सुख मिळाले आणि त्याचा उपभोग घेण्यात तो दंग झाला तर त्यात गैर काय. थोडा उशीर झाला, म्हणून त्याच्याशी कठोर वागणे उचित नाही. तारेने लक्ष्मणा समोर श्रीरामाच्या न्यायाची प्रशंसा केली. तिने रावणच्या सैन्यबलाचे ही वर्णन करत लक्ष्मणाला स्पष्ट शब्दात बजावले: ते न शक्या रणे हन्तुमसहायेन लक्ष्मण:l रावण: क्रूरकर्मा च सुग्रीवेण विशेषत:l (किष्किंधाकांड ३५/१७) [सारांश: कुणा एकट्याला रावणाचा आणि राक्षसांचा वध करणे अशक्य आहे. वानरराज सुग्रीवची मदतची श्रीरामाला ही तेवढीच आवश्यकता आहे]. अश्यारितीने आपल्या वाक्चातुर्य आणि युक्तिवादाने तारेने लक्ष्मणाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. लक्ष्यात असू द्या, ज्या प्रमाणे सुग्रीवला तुम्ही मदत केली, त्याच प्रमाणे सुग्रीवच्या मदतीची तुम्हाला ही तेवढीच गरज आहे. लक्ष्मणाला तिचा युक्तिवाद पटला. त्याला सत्य परिस्थितीची जाणीव झाली. त्याचा क्रोध शांत झाला. अश्या रीतीने तारेने लक्ष्मणाच्या क्रोधापासून सुग्रीव आणि वानरांचे रक्षण केले. तारेचे प्रखरव्यक्तित्वाचा प्रभाव त्या वेळचा समाजावर पडला, म्हणून तारेला प्रात:स्मरणीय पंच कन्येत स्थान मिळाले. अहल्या द्रोपदी कुंती तारा मंदोदरी तथा:l पंचकन्यादस्मरेनित्यं महदपातक नाशनम् l या पाच ही स्त्रियांनी अन्याय सहन केला नाही आणि आपले उद्दिष्ट साध्य केले. पण तारा या पाच ही स्त्रियेत सर्वश्रेष्ठ आहे कारण तिने केवळ स्वत:चाच स्वार्थ नाही सिद्ध केला अपितु संपूर्ण वानरजातीचे ही हित साध्य केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27355
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

आवडले. बाकी ताराने वालीहत्येप्रसंगी दाखवलेला धीरोदात्तपणा रामाच्या न्यायी बुद्धीला स्स्मरुन नव्हे तर परिस्थितीचे योग्य भान ठेवुन चतुरपणे वागुन दाखवला असे वाटते,

काका आपले हे विवेचन मनापासुन आवडले. आपले बरेच लिखाण मी वैयक्तीक स्तरावर प्रौढांसाठीच्या बालकथा या सदरात मानत आलो आहे पण आज हा धागा वाचुन याला नक्किच छेद बसला. बाकी स्मरणीय पाच मधे सिता नाही याचे काय कारण असावे बरे ?

In reply to by द-बाहुबली

बाकी स्मरणीय पाच मधे सिता नाही याचे काय कारण असावे बरे ? अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा || पंचकन्यांना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् || सीता आहे की यात...!!

In reply to by योगी९००

त्यांनी श्लोक लिहला तो असा होता
अहल्या द्रोपदी कुंती तर मंदोदरी तथा: पंचकन्यादस्मरेनित्यं महदपातक नाशनम्

In reply to by द-बाहुबली

आता कुंतीचे नाव वाचुन व तिने अन्याय सहन केला नाही ही लेखकाची ओळ बघुन झटका बसला होताच पण म्हटलं सुरुवात सितामैया का अनुपस्थीत आहे हे विचारुन करावी :)

In reply to by द-बाहुबली

कुंती की सीता...हे कंफ्युजन आहे नक्की.. कदाचित ह्या श्लोकाचा draft version रामायणानंतर बनला असेल. त्या मध्ये द्रौपदी आणि कुंतीची नावे नसावीत. (द्रौपदी ऐवजी अंजनी किंवा उर्मिला (लक्ष्मणाची बायको) चे नाव कदाचित असावे) त्यानंतर महाभारतात कुंती चे नावे सीतेच्या जागी टाकले गेले असावे..आणि दुसर्‍यानावाऐवजी द्रौपदी चे नावाची शिफारस झाली असावी.

In reply to by विवेकपटाईत

टंकन करताना चूक झालील आहे तारा एवजी तर टंकित झाले आहे. (रात्रीच्या वेळी टंकन केल्याने कधी कधी २-३ वाचले तरी चूक दिसत नाही). बाकी सीता एवजी कुंती हाच शब्द आहे. अंतर्जालावर ही सीता एवजी कुंती शब्द अधिकांश ठिकाणी आढळला. बाकी मला तारे बाबत लिहायचे होते.

In reply to by विवेकपटाईत

हा पंचकन्यांचा श्लोक अगदी अलीकडचा म्हणजे ४००/५०० वर्षांपूर्वीचा किंबहुना त्याहूनही अलीकडील आहे. त्याचे उगमस्थान आता आठवत नाहीये.

In reply to by विवेकपटाईत

इं अ़ख्खे इंटरनेट हे प्रक्षिप्त कांड आहे. जून्या लोकाना विचारावे. कुंतीपेक्षा सीता आदरणीय वाटते. नवराचे सहाय्य नसताना तिने मुलांचा संभाळ केला. कुंती मात्र नवरा मेल्यावर दीनवाणी होऊन दीराकडे गेली. कर्णाच्या नाशालाहे तीच कारणीभूत ठरली.

In reply to by dadadarekar

लाक्षागृहातुन सुटताना आपल्याऐवजी इतरांचेदेह ठेवावेत ही कल्पनाही कुंतीचीच होती

छान...तारा विषयी हे माहित नव्हते. लेख आवडला.. बाकी वालीला वाली कोण होता ते समजले...पण वालीसारख्या गर्विष्ठ माणसाला त्याची जाण नव्हती. समजा वालीने तिचे ऐकले असते व श्रीरामांना शरण गेला असतात तर वेगळेच रामायण घडले असते..( कदाचित वाली कडूनच रावणाला मारून रामचंद्रांनी सीतेस परत आणले असते...)

वालीने सुग्रीवाला त्याच्या राज्यातून हाकलून तर दिलेच होते पण त्याची पत्नी (रुमा ) सुद्धा बळजबरीने स्वतःकडे ठेवली होती. रावणाने सीतेचे हरण केले होते आणि श्रीरामाला तिला सोडवून रावणाला शासन करायचे होते. रावणाला हरवण्यासाठी वालीची मदत घेतली असती तर ते न्यायोचित ठरले नसते म्हणून सुग्रीवाला वानरराज करून त्याची मदत घेणे श्रेयस्कर होते. (सुग्रीवाकडे तारा स्वेच्छेने राहिले होती, वालीने रूमाला बळजबरीने आपल्याकडे ठेवले होते. बाकी जाणकार यावर लिहितीलच.)बाकी वालीच्या नुसत्या नावानेच रावण टरकायचा. वालीने त्याला एकदा बेदम धुतला होता.

In reply to by दुश्यन्त

वानरांमध्ये हे आजही दिसते. ताकदवान नर दुसर्याला हाकलून सर्व माद्यांवर स्वामित्व प्रस्थापित करतो. त्यामुळे सुग्रीवाला तारा किंवा वालीला रुमा हे साहजिकच आहे. बाकी वालीकडुन रावणाच्या गर्वहरणाचा भाग हा उत्तरकाण्डात आहे जे सरळसरळ प्रक्षिप्त आहे.

In reply to by प्रचेतस

रावण जेंव्हा अजिंक्य बनला तेंव्हा बहुतांश देवांना वा सामर्थ्यवान मनुश्याना त्याने कैद अथवा पराभुत केले त्याकाळात फक्त वाली हा एकमेव होता ज्याने रावणाला अक्षरशः बदडुन काढ्ले व प्राणदान दिले. हा प्रसंग सिताहरणा पुर्वीचा आहे. म्हणूनच रामाला त्याने म्हटले होते तु फक्त सांगितले असतेस तर मीच तुला रावणाकडुन सिता परत आणुन दिली असती.(रावण संहीतेमधील माहितीनुसार)

In reply to by द-बाहुबली

अरे दादूस, ही कथा फ्ल्याशब्याकच्या स्वरूपात उत्तरकाण्डात येते. नुसता वालीच नाही तर कार्तवीर्यानेसुद्धा रावणाला हरवले आहे. पण हे सर्वच काण्ड प्रक्षिप्त आहे.

In reply to by प्रचेतस

वालीने रावणाला पराभूत केले याचा पहिला उल्लेख मी अंगद शिष्टाई मध्ये ऐकला आहे. (मला वाटते तो युद्धकांडाचा भाग आहे). तो ४ लोकांची नावे घेतो ज्याच्याकडून रावणाला पराभव स्वीकारावा लागला. वाली आणि सहस्रार्जुन हे दोन आठवतात. उरलेल्यांपैकी एक गंधर्व असावा असे थोडेसे आठवत आहे. रावण जेव्हा अंगदाला रामाची साथ का करतो आहेस असे उपहासाने विचारतो तेव्हा त्याने रावणाला त्याच्या ४ पराभवाची आठवण करून दिली आहे. वाली आणि रावणाच्या युद्धाचा शेवट अंगदाने खूप भारी केला आहे. तो म्हणतो कि हे युद्ध संपले तेव्हा वालीने रावणाला उचलून आणला आणि माझ्या (अंगदाच्या) पाळण्यावर खेळणा म्हणून बांधला. उत्तरकांड मला एवढे आठवतही नाही पण अंगद शिष्टाई हि बरीच आधी येते.

म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे.
हे वाक्य अजिबातच पटले नाही. सर्वात महत्वाची सीता आहेच. त्याखालोखाल कैकेयीचा नंबर लागतो. किंबहुना वाल्मिकींनी काही प्रमुख पात्रे सोडून कुठल्याच पात्रांना महत्त्व दिलेले नाही. त्यांचा सहभाग जेव्हढ्यास तेव्हढाच येतो त्यात कैकेयीही आणि ताराही.

In reply to by प्रचेतस

वाल्मीकि ऋषींनी जवळपास ताराच्या राजनीतिक (शिष्टाई) जेवढे शब्द खर्च केले आहे. ते इतर कुणासाठी ही नाही.

माझ्या माहितीप्रमाणे पंचकन्यामधील तारामती ही हरिश्चंद्र-तारामतीमधील तारामती होय. जरी वालीची पत्नी तारामती चे कार्य महान होते त्यामुळे तीचे नाव पंचकन्यामधे हवे तर, दमयंतीचे, उर्मीला म्हणजेच लक्ष्मिणाची पत्नीचेही असावे.

In reply to by अर्जुन

पंचकन्या मध्ये जे नावे आहेत त्या सर्व स्त्रियांनी अन्यायाचा विरोध करून आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. हरिश्चंद्राची तारामती त्यात येत नाही.

In reply to by विवेकपटाईत

पंचकन्यांमध्ये ज्या स्त्रियांचा उल्लेख झाला आहे त्या सर्व स्त्रियांच्या पातिव्रत्याबाबत त्या त्या काळच्या समाजाने संशय घेतलेला आहे.व कालपरत्वे समाजाने त्यांचे श्रेष्ठत्व ही मान्य केले आहे. माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार असा संशय हरिश्चंद्र तारामती मधल्या तारामतीबाबत घेतला गेलेला नसावा.(चू.भू.दे.घे.) सीतेला तर प्रत्यक्ष अग्निपरिक्षाच द्यावी लागली. कुंतीबाबत मात्र गोंधळ होऊ शकतो. जरी ती लग्नाअगोदरच माता झाली असली तरी तिच्या पातिव्रत्याबाबत संशय घेतल्याचा उल्लेख महाभारतात कदाचित नसावा.(पुन्हा चू.भू.दे.घे.) त्यामुळे पंचकन्यात कुंती ऐवजी सीतेचाच उल्लेख असणे तर्काला धरुन आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

तारा व मंदोदरी यांच्या पातिव्रत्याबद्दल कुणी शंका घेतली होती?

In reply to by dadadarekar

ह्याच धाग्यावर ह्याचा इतरत्र उल्लेख आलेला आहे. तारा ही वाली व नंतर सुग्रीवाची पत्नी झाली. अर्थात इथे पातिव्रत्याबद्दल संशय जरी घेतला गेला नसला तरी दोन विवाह करणारी स्त्री पतिव्रता असू शकते का? असा प्रश्न पुराणकाळात कधीतरी मांडला व नंतर सोडवला गेला असावा. खरेतर मंदोदरीबद्दल फक्त रावणाची पत्नी ह्या व्यतिरिक्त मला काहीही माहीती नव्हते पण इथेच वाचले कि रावणाच्या मृत्युनंतर ती बिभीषणाची पत्नी झाली. म्हणजे तारा व मंदोदरी ह्या दोघींना एक सारख्याच परिस्थितीतुन जावे लागले. मुळात ह्या पंचकन्या प्रॅक्टीकल जीवन जगल्या आहेत. केवळ पतीभक्ती हाच जर निकष असता तर सत्यवान सावित्रीमधल्या सावित्रीलाही ह्यांच्यामध्ये स्थान मिळायला हवे होते.

नमस्कार विवेकपटाईत, लेख आवडला. तारेची राजकीय परिपक्वता प्रशंसनीय आहे. वालीवरून प्रा. लीना रसतोगी यांच्या 'प्रभाते मनी राम चिंतीत जावा' या लेखाची आठवण झाली : http://tarunbharat.net/ftp/e-paper/2012/2012-03-23/mpage5_20120323.htm उपरोक्त लेखात म्हंटलंय की वालीने रावणास हरवल्यानंतर त्यांच्यात समेट झाला. त्यानुसार कोण एकावर हल्ला झाल्यास दुसऱ्याने मदत करावी असं ठरलं. या करारानुसार रावणाचं राक्षस सैन्य किष्किंधेच्या उत्तरेस वालीच्या संरक्षणनिमित्ते उभं राहिलं. प्रा. लीना यांच्या मते वालीला असल्या मदतीची गरज नव्हती. मात्र तारा जर राजकारणात सक्रीय असेल तर तिला या प्रसंगाचं यथार्थ आकलन असणार. तिने या व्यवहारास कशी काय अनुमती दिली? वालीचा काहीतरी फायदा झालेला असावा. उत्तरेकडून आक्रमणाचा कोणी विचारही करणार नाही अशी काहीशी व्यूहनीती (स्ट्रॅटेजिक थिंकिंग) यामागे असावी. माझ्या ऐकीव माहितीनुसार दशरथाने रावणाच्या वाढत्या आक्रमणांना पायबंद घालायची योजना चर्चेस आणली होती (संदर्भ आठवत नाही!). मात्र इतर राजांकडून प्रतिसाद मिळला नाही. वाली/तारा कदाचित सावध झालेले असू शकतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अरे दादूस, ही कथा प्रचेतस - Sun, 28/06/2015 - 08:34 नवीन अरे दादूस, ही कथा फ्ल्याशब्याकच्या स्वरूपात उत्तरकाण्डात येते. नुसता वालीच नाही तर कार्तवीर्यानेसुद्धा रावणाला हरवले आहे. पण हे सर्वच काण्ड प्रक्षिप्त आहे. प्रतिसाद द्या

लेखन आवडले. मी लहानपणी वाचलेली पंचक्न्यांची नावे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी अशी आहेत. कुंती त्यात नव्हती. पण यात माझा यत्किंचितही अभ्यास नाही.

In reply to by प्रचेतस

माझी एक दोन तेलुगु भाषी मित्रांशी या बाबत चर्चा झाली आहे. ही मंडळी हरिश्चन्द्राच्या पत्नीचे नाव चन्द्रमती असल्याचा आग्रह धरतात .

योगी९००, >> ( कदाचित वाली कडूनच रावणाला मारून रामचंद्रांनी सीतेस परत आणले असते...) वालीने मारतांना रामास हेच सांगितलं. तो म्हणाला की सीतेला तर माझ्या विनंतीवरून रावणाने परत केली असती. नेमका इथे श्रीरामाच्या राजकीय दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. श्रीराम वनवासात पाठवले गेले तेच मुळी रावणाला पायबंद घालण्यासाठी. खर, दूषण, शूर्पणखा इत्यादि प्रकरणांतून आज ना उद्या रामरावण युद्ध पेटणारच होतं. वालीला मध्ये घेतलं तर रावणाची शिरजोरी पूर्वीप्रमाणे चालूच राहिली असती. वालीचा काटा काढणं अत्यावश्यक होतं. श्रीराम वालीला आपल्या शत्रूचा मित्र म्हणजे स्वत:चा शत्रू समजतात. श्रीरामाची विचारप्रक्रिया रोचक आहे. वालीशी संधान बांधलं असतं तर वाली आणि रावण हे दोन प्रबळ शत्रू तसेच राहिले असते. याउलट वालीला ठार मारलं तर सुग्रीव भविष्यात कायमचा अंकित राहील. शिवाय पराक्रमी वानरसैन्यही वापरायला मिळेल. याच वानरसैन्याच्या आधारे वालीने रावणाला नमवलं होतं. फक्त वालीला अधर्माने ठार मारण्यासाठी सबब हवी होती. ती रूमाहरणाच्या निमित्ताने मिळाली. श्रीनामाने या प्रसंगी अतिशय धूर्तपणे आणि चलाखीने निर्णय घेतला आहे. वालीसंधानाचा आजून एक आयाम आहे. सीतेने श्रीरामास त्याच्या इच्छेविरुद्ध कांचनमृगाच्या पाठलागावर पाठवलं. नंतर लक्ष्मणासही रामाच्या आज्ञेविरुद्ध रानात पाठवलं. मग रावणाने तिला पळवलं. यावरून सीता रावणाशी संगनमत करून पळून गेली असा आरोप करता येतो. सीतेला आणि रामाला दोघांनाही याची जाणीव होती. यावर एकंच उपाय होता. तो म्हणजे श्रीरामाने रावणास ठार मारून सीतेस सोडवणे. वालीमार्फत सीता परत आली असती तर तिच्यावरच्या या आरोपास पुष्टी मिळाली असती. पुढे, अशोकवनाचा यथेच्छ विध्वंस केल्यावर हनुमानने सीतेस पाठीवरून वाहून रामाकडे परत नेण्याचा प्रस्ताव मांडला होता. संगनमताच्या शक्यतेचा निरसनार्थ तिने या प्रस्तावास नकार दिला. सीताहरणासंबंधी श्रीराम आणि सीतेची विचारप्रक्रिया एकंच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पंच कन्या कोणत्या या बद्दल चर्चा सुरु आहे त्या अनुषंगाने ह्या भाषिता ची आठवण झाली - अयोध्या ,मथुरा, माया , काशी , कांची , अवन्तिका , पुरी द्वारावती श्चैव सप्तैते मोक्षदायीका: यातील माया नगरी म्हणजे सध्याचे कोणते शहर या बद्दल संभ्रम आहे . हे शहर म्हणजे सध्या हिमाचल मध्ये असलेले मायापुरी असे कोणी सांगितले . या बद्दल आणखी खात्री लायक माहिती उपलब्द्ध आहे का ? पुरी द्वारावती म्हणजे द्वारका असे मी समजतो

In reply to by गामा पैलवान

माहितीबद्दल धन्यवाद... सीतेने श्रीरामास त्याच्या इच्छेविरुद्ध कांचनमृगाच्या पाठलागावर पाठवलं. नंतर लक्ष्मणासही रामाच्या आज्ञेविरुद्ध रानात पाठवलं. मग रावणाने तिला पळवलं. यावरून सीता रावणाशी संगनमत करून पळून गेली असा आरोप करता येतो.....वालीमार्फत सीता परत आली असती तर तिच्यावरच्या या आरोपास पुष्टी मिळाली असती. बापरे..इतका विचार होता या मागे हे माहित नव्हते..

पंचकन्या मध्ये जे नावे आहेत त्या सर्व स्त्रियांनी अन्यायाचा विरोध करून आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. हरिश्चंद्राची तारामती त्यात येत नाही. असे नसून त्या पांच सर्वोत्तम पतीव्रता आहेत.अर्थात श्लोक लिहणार्याचा मते,इथे आपण वाद घालण्य्यात काहीच अर्थ नाही कारण आपल्याला नावे निवडन्याचे नियम माहीत नाहीत.

In reply to by अर्जुन

श्लोक म्हणताना वृत्ताचे बंधन पाळुन जी नावे बसली ती घातली गेली असावीत. इतकाच नियम

उत्तम लेख. तारा या व्यक्तिरेखेविषयी खरोखर काहीच मला माहीत नव्हते. या फार कमी माहीत असलेल्या व्यक्तिरेखेची इतकी छान ओळख करून दिल्याबदद्ल धन्यवाद. रमेश आठवले याच्या प्रश्नाचे उत्तर माझ्या माहितीनुसार. कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा कारण मलाही काही नक्की माहीत नाही. मायपुरी हे हरिद्वार चे एक नाव आहे जशी अन्य नावे- कपीलस्थान, गंगाद्वार इत्यादी. मायादेवी ही हरिद्वार ची अधिश्तत्रि देवता मानल्या जाते. या देवतेमुळे हरिद्वार चे नाव पडले माया, मायापुरी.

सॉरी माझ्या वर दिलेल्या प्रतिसादात रमेश आठवले यांच्या प्रश्नाचे उत्तर असे म्हणायचे होते. चुकुन रमेश आठवले याच्या प्रश्नाचे असे झाले आहे. क्षमा करा. आज टंकलेखनात फार चुका होत आहेत.

छान लिहिलंय . तारा पंच कन्यांमध्ये गणली जाते . पण हे जे लिहिलं आहे त्याला आधार काय आहे ? आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी आणि वानरांच्या हितासाठी>>> ह्यात तारा चा फायदाच होता ना. मग तिच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच येत नाही . उलट सुग्रीवाने तिचा सन्मानाने स्वीकार हि केला आणि तिच्या मुलाला युवराज हि केला . माझ्या माहितीप्रमाणे पंचकन्यामधील तारामती ही हरिश्चंद्र-तारामतीमधील तारामती होय. >>> नाही . हि पंचकन्यांमध्ये गणली गेलेली तारा हि सुग्रीवाची पत्नी आहे कि चंद्राची पत्नी आहे ह्याबद्दल थोडं confusion आहे . बघून सांगते . आणि कुंतीचा उल्लेख बहुदा चुकीने झाला असावा . तिथे सीता आहे पांच सर्वोत्तम पतीव्रता आहेत>>>+११११११ वालीचा काटा काढणं अत्यावश्यक होतं>>

समजा वालीने सुग्रीवाला हाकलून दिलं नसतं . वालीने सुग्रीवावर अन्याय केला नसता तरीही श्री रामांनी वालीचा काटा काढला असता काय ? आणि सुग्रीव हा वालीचा सख्खा भाऊच असल्यामुळे वाली मेला तरी सुग्रीव आणि रावण मित्रच राहिले असते ना . वालीच्या मृत्यू मागे त्याचा काटा वगेरे काढण्याचा हेतू नसून त्याने सुग्रीवावर केलेल्या अन्यायामुळे त्याला मारण्यात आलं होतं . वालीमार्फत सीता परत आली असती तर तिच्यावरच्या या आरोपास पुष्टी मिळाली असती.>>> ती कशी काय ?वालीला घाबरून रावणाने सीतेला परत केली तर ती त्याच्याबरोबर पळून गेली ह्या आरोपास पुष्टी कशी मिळते ? युद्ध करनं हा रामांचा हट्ट असता तर दूताकरवी संधी करण्याचा आणि सीतेला परत करण्याचा प्रस्ताव पाठवलाच नसता . दुसरी गोष्ट म्हणजे वाली जसा रावणाचा वध करू शकला असता तसाच हनुमंत हि रावणाचा वाढ करू शकला असता . मग रामांनी त्यालाही सामील करून घ्यायला नाही पाहिजे होतं .

तुडतुडी, १. >> वालीला घाबरून रावणाने सीतेला परत केली तर ती त्याच्याबरोबर पळून गेली ह्या आरोपास पुष्टी कशी मिळते ? सीतेने कांचनमृगाची इच्छा प्रदर्शित केल्यावर श्रीराम म्हणाले की सोन्याचं हरीण कोणी पाहिलं नाही किंवा त्याविषयी कधी ऐकलं नाही. हा मायावी प्रकार दिसतो आहे. तस्मात दुर्लक्ष कर. पण तरीही तिने श्रीरामाला हरणामागे जाण्यास प्रवृत्त केलं. नंतर लक्ष्मणास देखील पाठवलं. साहजिकच ती उघड्यावर पडली. आता लोकप्रवाद असा असू शकतो की तिने हे सारं हेतुपुरस्सर केलं. ती रावणाला आतून सामील होती. जर ती साममार्गाने परत आली असती तर हा आरोप धुतला गेला नसता. रावणाने तिचं हरण करून एके प्रकारे आपलं भवितव्य काळकुट्टं करून घेतलं. या आरोपावर एकमेव उत्तर म्हणजे श्रीरामाने रावणास ठार मारणे. श्रीरामाने रावणास संधी करण्यासाठी दूत पाठवला तो राजनीतीच्या नियमांना अनुसरून. जर रावण शरण आला असता तर मोठा पेचप्रसंग उद्भवला असता. हनुमानाने श्रीरामास जाणीव करून दिली की बिभीषणास लंकेचं राज्य कबूल केलं आहे. जर रावणाने संधी मान्य केली तर बिभीषणास दिलेल्या वचनाचा भंग होईल. तर श्रीराम म्हणाले की रावणाला मी अयोध्येचं राज्य देईन आणि आम्ही चौघेही भाऊ रानात जाऊन राहू. मग सीतेचा त्याग करायची जरुरी उरली नसती. श्रीरामांची कुठल्याही परिस्थितीस तोंड द्यायची तयारी होती. २. >> दुसरी गोष्ट म्हणजे वाली जसा रावणाचा वध करू शकला असता तसाच हनुमंत हि रावणाचा वाढ करू शकला असता . >> मग रामांनी त्यालाही सामील करून घ्यायला नाही पाहिजे होतं . हनुमंत रावणाचा वध करू शकला असता असं माझ्या मते वाल्मिकींनी कुठेही सूचित केलं नाहीये. ३. >> समजा वालीने सुग्रीवाला हाकलून दिलं नसतं . वालीने सुग्रीवावर अन्याय केला नसता तरीही श्री रामांनी वालीचा >> काटा काढला असता काय ? या जरतर परिस्थितीविषयी भाष्य करणं अवघड आहे. :-) दोन पर्याय दिसतात. अ. वालीशी समेट करणे : जर वालीला कळलं असतं की सीतेला रावणाने अन्यायाने पळवली आहे, तर त्याने रावणास तिला परत करायला लावलं असतं. राम रावण युद्ध झालंही नसतं. श्रीरामाने मग वालीमार्फत राजनैतिक दबाव टाकून रावणाच्या कारवायांना पायबंद घालायचा प्रयत्न केला असता. आर्जवशक्ती वापरून वालीला आपलंसं केलं असतं. या पर्यायातून सीतेवरील आरोप पूर्णपणे धुतला गेला नसता. आ. वाली व सुग्रीव यांच्याशी युद्ध करून त्यांना हरवून त्यांना नष्ट वा अंकित करणे : हा अतिशय कठीण पर्याय आहे. शिवाय वानरराज्यावर आक्रमण करायला कोणतंही कारण उपलब्ध नाही. श्रीराम मर्यादेत वागणारे असल्याने हा पर्याय संभाव्य दिसंत नाही. हे झालं माझं आकलन. तुमची व/वा वाचकांची मते वेगळी असू शकतात. :-) आ.न., -गा.पै.

राम रावण युद्ध झालंही नसतं. >>> exactly . म्हणजेच युद्ध होणं आवश्यक होतं . मी माझ्या पराक्रमाने सीतेला सोडवून आणली हे रामांना जगाला दाखवून द्यायचं होतं . युद्ध न करताच सीता परत येण्याचा तिच्यावरच्या आरोपाशी काही संबंध नसून श्री रामांच्या पराक्रमाशी आहे . त्यासाठी वालीचा काटा काढलेला असू शकतो . श्रीराम म्हणाले की रावणाला मी अयोध्येचं राज्य देईन आणि आम्ही चौघेही भाऊ रानात जाऊन राहू.>>> :-D . ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत . कारण वेळ आल्यावर मात्र त्यांना राज्यापेक्षा सीतेचा त्याग करण जास्त सोपं वाटलं काहीही लेख आणि काहीही अनुमाने.>>>+11111111

या मध्ये माझा एक प्रश्न जेव्हा राम ला जटायूकडुन माहिती मिळते की सीतेचे रावणाने हरण केले आहे. तेव्हा तो तसाच दक्षिणेकडे तिच्या शोधात निघाला परंतु तेव्हा ही बातमी रामाने कोणा तर्फे अयोध्येला जर क़ळवली. असती तर मग वानरांची मदत न घेता स्वतःचे सैन्य त्याला येवुन मिळाले असते. कारण सीतेचे अपहरण झाले ती जागा (पंचवटी) अयोध्येलाच जास्त जवळची होती. ( चुभुद्याघ्या)

In reply to by तुडतुडी

पानिपत असो वा लंका प्रकरण , उत्तर भारतीय राजानी दक्षिणेतल्या सटरफटर लोकाना वापरून स्वतःचा स्वार्थ साध्य केला आहे.

मला वाटते तुमच्यासाठी एक खास कट्टा ठरवून तिकडे तुमचा तसाच 'खास-सत्कार' करावा, तयारी असेल तर तसे कळवा, म्हणजे तसा धागा टाकता येइल. ??

In reply to by विवेकपटाईत

पाणपताच्या वेळी दिल्लीच्या बादशाने पुणेकराना मोठी खंडणी व चौथाइ की काय यांची लालूच दाखवली होती. ( बरॉबर ना ? ) रामानेही सुग्रीव बिभिषणाला अशीच लालूच दाखवली होती. .... दोन्ही वेळेला खरे तर ती त्या त्या राज्यांची ( दिल्ली व अयोध्या )वैयक्तिक दुखणी होती. पण त्यांचे सैन्य लढलेच नाही. दक्षिणी लोकच जणु काय फार मोठे पुण्यकर्म करायला जात आहोत अशा आवेशात लढायला पुढे सरसावले. अगदी नगण्य किंमतीत उत्तरेच्या राजांनी स्वार्थ साधला. हानी मात्र दक्षिणी लोकांच्या वाट्याला आली .

तुडतुडी, १. >> ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत . कारण वेळ आल्यावर मात्र त्यांना राज्यापेक्षा सीतेचा त्याग करण जास्त सोपं वाटलं श्रीराम दुसऱ्या दिवशी होणारा राज्यभिषेक अव्हेरून १४ वर्षांच्या वनवासास चटकन तयार होतात. त्यांची आयुष्य रानात काढायची प्रतिज्ञा अगदीच तकलादू नसावी. श्रीरामांना झुकतं माप द्यायला माझ्या मते हरकत नसावी. तुम्ही म्हणता ती वेळ प्रजेने श्रीरामावर आणलेली आहे. अकारण राज्यत्याग करायचा नसतो. सीतेला जवळ ठेवून जर राज्यत्याग केला असता तर कित्येक लोकं त्याच्या मागोमाग रानात जाऊन राहिले असते. तो पूर्वी वनवासास निघालेला तेव्हा असंच झालं होतं. शिवाय बाकीचे भाऊही वैतागले असते ते वेगळंच. सीतेला फक्त त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं आहे. तेसुद्धा प्रजेने आक्षेप घेतला म्हणून. त्याने दुसरं लग्न केलं नाही. बापाप्रमाणे दासी ठेवल्या नाहीत. राज्य केलं ते कर्तव्य म्हणून. २. >> म्हणजेच युद्ध होणं आवश्यक होतं . मी माझ्या पराक्रमाने सीतेला सोडवून आणली हे रामांना जगाला दाखवून द्यायचं होतं . >> युद्ध न करताच सीता परत येण्याचा तिच्यावरच्या आरोपाशी काही संबंध नसून श्री रामांच्या पराक्रमाशी आहे . >> त्यासाठी वालीचा काटा काढलेला असू शकतो . बरोबर. मूळ हेतू रावणास पायबंद घालणं हा होता. त्यासाठी साम वा दंड हे दोन पर्याय होते. सीताहरणामुळे साम निकालात निघाला. सीताहरण ही रामाच्या मूळ योजनेस मिळालेली अनपेक्षित कलाटणी आहे. तिच्यामुळे सीतामुक्ती हा उपहेतू उत्पन्न झाला. मात्र हा उपहेतू मूळ हेतूस पूरक आहे. आ.न., -गा.पै.

तुडतुडी, १. >> ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत . कारण वेळ आल्यावर मात्र त्यांना राज्यापेक्षा सीतेचा त्याग करण जास्त सोपं वाटलं श्रीराम दुसऱ्या दिवशी होणारा राज्यभिषेक अव्हेरून १४ वर्षांच्या वनवासास चटकन तयार होतात. त्यांची आयुष्य रानात काढायची प्रतिज्ञा अगदीच तकलादू नसावी. श्रीरामांना झुकतं माप द्यायला माझ्या मते हरकत नसावी. तुम्ही म्हणता ती वेळ प्रजेने श्रीरामावर आणलेली आहे. अकारण राज्यत्याग करायचा नसतो. सीतेला जवळ ठेवून जर राज्यत्याग केला असता तर कित्येक लोकं त्याच्या मागोमाग रानात जाऊन राहिले असते. तो पूर्वी वनवासास निघालेला तेव्हा असंच झालं होतं. शिवाय बाकीचे भाऊही वैतागले असते ते वेगळंच. सीतेला फक्त त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं आहे. तेसुद्धा प्रजेने आक्षेप घेतला म्हणून. त्याने दुसरं लग्न केलं नाही. बापाप्रमाणे दासी ठेवल्या नाहीत. राज्य केलं ते कर्तव्य म्हणून. २. >> म्हणजेच युद्ध होणं आवश्यक होतं . मी माझ्या पराक्रमाने सीतेला सोडवून आणली हे रामांना जगाला दाखवून द्यायचं होतं . >> युद्ध न करताच सीता परत येण्याचा तिच्यावरच्या आरोपाशी काही संबंध नसून श्री रामांच्या पराक्रमाशी आहे . >> त्यासाठी वालीचा काटा काढलेला असू शकतो . बरोबर. मूळ हेतू रावणास पायबंद घालणं हा होता. त्यासाठी साम वा दंड हे दोन पर्याय होते. सीताहरणामुळे साम निकालात निघाला. सीताहरण ही रामाच्या मूळ योजनेस मिळालेली अनपेक्षित कलाटणी आहे. तिच्यामुळे सीतामुक्ती हा उपहेतू उत्पन्न झाला. मात्र हा उपहेतू मूळ हेतूस पूरक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पातिव्रत्याचा भंग होऊनही अहिलेला रामाने पुन्हा स्थान मिळवून दिले. त्याच रामाने प्रज्रेने निव्वळ संशय घेतला म्हण्न सीतेला पुन्हा वनवासात ढकलले हा किती मोठा विरोधाभास आहे. प्रजेला समजावून सांगण्यात राम कमी पडला असे वाटते.

श्रीराम दुसऱ्या दिवशी होणारा राज्यभिषेक अव्हेरून १४ वर्षांच्या वनवासास चटकन तयार होतात. >>> ते पुत्रकर्तव्य म्हणून . मग पतिकर्तव्य पाळायला काय झालंय ? सीतेला लग्नाच्या वेळी दिलेली वचनं कुठे गेली ? तुझ्या प्रत्येक सुखदुखात सहभागी असेन , तुला अंतर देणार नाही , तुझं योग्य पालन पोषण करेन bla bla bla. दुसरं लग्न केलं नाही कारण त्यांनी खूप आधीच तशी प्रतिज्ञा केली होती . ती प्रतिज्ञा मोडली असती तर त्यांना नावं ठेवण्यात आली असती . त्यापेक्षा सीतेला दूर करून त्यांनी लोकनिंदा टाळली . सीतेला जवळ ठेवून जर राज्यत्याग केला असता तर कित्येक लोकं त्याच्या मागोमाग रानात जाऊन राहिले असते. >>> हे तर अतिशय हास्यास्पद आहे . सीतेला अयोध्येत स्वतः बरोबर ठेवली असती तर लोक अयोध्येतच राहिले असते ना . सीतेला फक्त त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं आहे. तेसुद्धा प्रजेने आक्षेप घेतला म्हणून.>>> प्रजेला आक्षेप घेण्याचा अधिकार कोणी दिला ? सीता त्यांच्या बापाच्या घरचं खात होती का? आणि प्रजेनं आक्षेप घेतला असेल तर त्यांच्यासमोर सत्य प्रकट करून रामांनी योग्य तो न्याय करायला हवा होता .कारण यथा राजा तथा प्रजा . रामाचं उदाहरण देवून पुढे कित्येक नवर्यांनी आपल्या बायकांवर अन्याय केला असेल . आणि नुसता आक्षेप तर घेतला होता ना . त्यापासून प्रजेला काही नुकसान तर होणार नवतं . पूर्वी त्यांच्या वनवासी होण्यावर प्रजेने प्रचंड आक्षेप घेतला होता . अगदी त्यांच्या रस्त्यात आडवे पडले . पण कोणालाही न जुमानता ते वनात गेलेच ना त्याच रामाने प्रज्रेने निव्वळ संशय घेतला म्हण्न सीतेला पुन्हा वनवासात ढकलले हा किती मोठा विरोधाभास आहे. >>>exactly

In reply to by तुडतुडी

इथेच प्रश्न उभा राहतो, सीता कोण होती. सीता भूमी कन्या होती. भूमीतच गडप झाली. भूमीतून काय उत्पन्न होते, आपल्या सर्वांना माहित आहे. बाकी रामायण कथा सीता यात स्पष्ट केले आहे. r

तुडतुडी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं लिहितो. १. >> मग पतिकर्तव्य पाळायला काय झालंय ? सीतेला लग्नाच्या वेळी दिलेली वचनं कुठे गेली ? तुझ्या प्रत्येक >> सुखदुखात सहभागी असेन , तुला अंतर देणार नाही , तुझं योग्य पालन पोषण करेन bla bla bla. पतीकर्तव्य म्हणून तिला रावणाच्या कचाट्यातून मुक्त केली. मात्र नंतर राजकर्तव्य म्हणून तिला दूर ठेवावं लागलं. अत्रींच्या आश्रमात तिची आवश्यक ती काळजी घेतली गेली आहे. तसंच मुलांचं संगोपनही व्यवस्थितपणे झालं आहे. २. >> दुसरं लग्न केलं नाही कारण त्यांनी खूप आधीच तशी प्रतिज्ञा केली होती . ती प्रतिज्ञा मोडली असती तर त्यांना नावं >> ठेवण्यात आली असती . आपली प्रतिज्ञा पाळणे हेच तर त्याचं वैशिष्ट्य आहे. ३. >> त्यापेक्षा सीतेला दूर करून त्यांनी लोकनिंदा टाळली . माझं मत थोडं वेगळं आहे. पतीकर्तव्य आणि राजकर्तव्य यात राजकर्तव्याला त्याने प्राधान्य दिलं. कारण पतीकर्तव्य खाजगी आहे, तर राजकर्तव्य सार्वजनिक आहे. ४. >> सीतेला अयोध्येत स्वतः बरोबर ठेवली असती तर लोक अयोध्येतच राहिले असते ना . नेमकी तिथेच प्रजाजनांत फूट पडत होती. ती टाळण्याकडे रामाचा कल होता. ५. >> प्रजेनं आक्षेप घेतला असेल तर त्यांच्यासमोर सत्य प्रकट करून रामांनी योग्य तो न्याय करायला हवा होता . सीतेने अग्निदिव्य करून तिच्यापरीने स्वत:चं निर्दोषत्व सिद्ध केलं आहे. मात्र खरा आक्षेप वेगळाच आहे. सीतेला आणि लक्ष्मणाला वनवासाची आज्ञा झाली नव्हती. ते आपणहून गेले. वनवासाचं राजकीय उद्दिष्ट नक्की होतं. अशा प्रसंगी सीतेकडून प्रमाद घडला. रामाला अगोदर कांचनमृगाच्या मागे त्याच्या इच्छेविरुद्ध पाठवलं. मागोमाग लक्ष्मणालाही रामाच्या आज्ञेविरुद्ध पर्णकुटीहून दूर पाठवलं. ही पार्श्वभूमी पाहता तिने रामाची निकटवर्तीय म्हणून वावरणं प्रजेच्या दृष्टीने कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उद्भवतो. तत्कालीन पौरजनांनी जे मत प्रदर्शित केलं ते पूर्णपणे वस्तुस्थितीवर आधारित आहे. या मताच्या आधारे जर लोकं राज्य सोडून जाऊ लागले तर रामाच्या प्रजाकर्तव्यात बाधा येते. ६. >> रामाचं उदाहरण देवून पुढे कित्येक नवर्यांनी आपल्या बायकांवर अन्याय केला असेल . हा रामासमोरील प्रश्न नव्हे. ७. >> आणि नुसता आक्षेप तर घेतला होता ना . त्यापासून प्रजेला काही नुकसान तर होणार नवतं . नुकसान होऊ शकलं असतं. वालीचा आणि रावणाचा नाशही संभाव्य नुकसान टाळण्यासाठीच केला होता. ८. >> पूर्वी त्यांच्या वनवासी होण्यावर प्रजेने प्रचंड आक्षेप घेतला होता . अगदी त्यांच्या रस्त्यात आडवे पडले . >> पण कोणालाही न जुमानता ते वनात गेलेच ना पूर्वी वनवासात जाण्यामागे पित्याची आज्ञा पाळणं हे कर्तव्य होतं. आता मात्र पतीकर्तव्य आणि राजकर्तव्य यांत तेढ उत्पन्न झाली. त्यात राजकर्तव्याचं पारडं जड ठरलं. ९. >> त्याच रामाने प्रज्रेने निव्वळ संशय घेतला म्हण्न सीतेला पुन्हा वनवासात ढकलले हा किती मोठा विरोधाभास आहे. प्रजेचं नुकसान संभाव्य असलं तरी ते टाळायला हवं ही राजकर्तव्याची प्रेरणा यामागे आहे. उगीच गंमत म्हणून सीतेला आश्रमात पाठवलेली नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रामाबरोबर राहिली असती सीता तर प्रजेचे काय बिघडणार होते ? सीता रावणाच्या ताब्यात होती. पण त्यानंतर राज्य बिभिषणाचे म्हणजे रामाच्या मित्राचेच आहे. मग सीतेची उपस्थिती प्रजेला का खpuu नये ? सीता हेरगिरी करणार होती की काय ? हायला , आमचे लाडकेमुसलमान राजे दुसर्‍या राजांच्या बायका धरुन आणत होते... त्या राजाबरोबर रहायच्या . जनता मुकाटपणे रहायची. आणि रामाने स्वतःचीच बायको ठेउन घ्यायची म्हटली तर जनतेची बडबड सुरु झाली ! सीता संगनमताने रावणाबरोबर गेली हाही असाच फुकाचा वाद आहे. सीताहरणासाठी रावण अचानकपणे आला होता. त्याने आणि सीतेने प्लॅन करायला आधी तो सीतेला कधी भेटला तरी होता का ? की इ मेल फ्याक्स केला होता ? मी येतोय तू तयारीत रहा म्हणून ?

In reply to by dadadarekar

dadadarekar, १. >> सीता हेरगिरी करणार होती की काय ? प्रजेला नेमका हाच संशय आला. २. >> हायला , आमचे लाडकेमुसलमान राजे दुसर्‍या राजांच्या बायका धरुन आणत होते... त्या राजाबरोबर रहायच्या . >> जनता मुकाटपणे रहायची. आणि रामाने स्वतःचीच बायको ठेउन घ्यायची म्हटली तर जनतेची बडबड सुरु झाली ! भविष्यात कोणी मुस्लिम राजे अमुक एका प्रकारे वर्तन करणार आहेत असं कळलं असतं तर अयोध्येच्या जनतेने आपलं मत कदाचित बदललं असतं. दुर्दैवाने तशी सूचना मिळाली नाही. ३. >> सीताहरणासाठी रावण अचानकपणे आला होता. त्याने आणि सीतेने प्लॅन करायला आधी तो सीतेला कधी भेटला >> तरी होता का ? कोणामार्फत तरी संधान बांधता येतं ना? रावण सर्वशक्तिमान राजा होता. ४. >> सीता संगनमताने रावणाबरोबर गेली हाही असाच फुकाचा वाद आहे. तुमच्या आमच्या दृष्टीने फुकाचा वाद असेल, पण तत्कालीन अयोध्येच्या जनतेच्या दृष्टीने नाही. आ.न., -गा.पै.