✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रामायण कथा - वाली पत्नी तारा -एक कुशल राजनीतीज्ञ

व
विवेकपटाईत यांनी
Sat, 06/27/2015 - 09:53  ·  लेख
लेख
वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे. वानर समाज पुरुष प्रधान होता. स्त्रिया केवळ भोग्य वस्तू. पतीच्या मृत्यू नंतर, त्याच्या भावाची अधीनता स्त्रीला स्वीकारावी लागत असे. इथे तर प्रत्यक्ष ज्या भावाने, तारेच्या पतीचा षड्यंत्र रचून वध केला, त्या सुग्रीवला पती म्हणून स्वीकारावे लागले. सुग्रीवची कनिष्ठ पत्नीचा दर्जा ही तिला स्वीकार करावा लागला. तारेला किती मानसिक यातना झाल्या असतील, याची कल्पना करवत नाही. तरी ही आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी आणि वानरांच्या हितासाठी तिने सर्व यातना आनंदाने सहन केल्या. रामायणात तारे सारखी प्रखर स्त्री अन्य नाही. तारा केवळ वालीची पत्नी आणि किष्किंधा नगरीची सम्राज्ञी नव्हती अपितु राजकार्यात ही तिचा पर्याप्त दखल होता. गुप्तचर तंत्राचा कसा वापर करावा हे ही तिला माहित होते. राज्यात आणि संपूर्ण भरतखंडातल्या घडामोडींचे त्याचे ज्ञान ही तिला होते. वालीपासून लपून राहणार्या सुग्रीवने, वालीला द्वंद युद्धासाठी ललकारले आणि तो पराजित झाला. पण तारचे मस्तक ठणकले, सुग्रीवच्या असे दुस्साहस कारण काय, हे शोधून काढण्याचे तिने ठरविले. गुप्ताचरांकडून इत्यंभूत माहिती मिळवली. त्याच दिवशी भरपूर मार खाऊन ही सुग्रीवने पुन्हा द्वंद युद्धासाठी वालीला ललकारले, निश्चितच या मागे काही षड्यंत्र असणारच असे तारेला वाटले. तिने वालीला युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तारेने वालीला किमान सकाळपर्यंत तरी थांबण्याचा सल्ला दिला. पण क्रोधग्रस्त वाली तिचे ऐकायला तैयार नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून तारेने गुप्तचरांकडून मिळालेली सूचना आपल्या पतीला दिली. इक्ष्वाकू वंशातील श्रीराम आणि लक्ष्मण ज्यांनी दंडकारण्यातल्या खर दूषण सहित हजारों राक्षसांचा वध केला आहे आणि दंडकारण्यातल्या जनतेची राक्षसी अत्याचारांपासून मुक्तता केली आहे. अश्या श्रीरामांशी सुग्रीवने मैत्री केली आहे आणि श्रीरामाने त्यांना किष्किंधाचे राज्य देण्याचे ही प्रलोभन दिले आहे. तारेने बालीला सल्ला दिला, परिस्थितीला ओळखा, या घटकेला श्रीरामासारख्या पराक्रमी व्यक्तीशी वैर पत्करणे हिताचे नाही. त्यांना शरण जा. सम्मानपूर्वक रुमाला सुग्रीवच्या स्वाधीन करून, त्याचा युवराज पदावर अभिषेक करण्याचा करा. वालीला तिची सूचना आवडली नाही. कदाचित् वालीला असे वाटले असेल, श्रीराम न्यायी आहेत दोन भावांच्या युद्धात ते पडणार नाही. वालीने तारेच्या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही. वालीचे हितचिंतक वानरांनी वालीच्या मृत्यूची वार्ता तारेला कळवली आणि तिला अंगद सहित पलायन करण्याचा सल्ला दिला. पण तारेने ते मान्य केले नाही. ती कुठे ही पळून गेली नाही. अपितु युद्धाच्या जागी गेली. त्या परिस्थितीत ही आपला क्रोध आवरून, आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले. वाली वधाचा दोष तिने श्रीरामावर लावला नाही. तारेला माहित होते इक्ष्वाकु कुलभूषण श्रीरामचंद्र हे न्यायी आहेत, ते कधी ही अन्याय करत नाही. जे काही घडले त्याला तिचा पतीच कारणीभूत आहे. तिने वाक्चातुर्य दाखवत श्रीरामाला तिचा ही वालीप्रमाणे वध करण्याची विंनती केली. तिची मात्रा बरोबर लागू पडली. श्रीरामाने सुग्रीवचा किष्किंधा नगरीच्या राजपदावर अभिषेक केला आणि वाली पुत्र अंगद याचा युवराज पदावर अभिषेक केला. अश्यारितीने तारेने आपल्या पुत्राच्या हिताचे रक्षण केले. भविष्यात त्याचा राजा होण्याचा मार्ग मोकळा केला. क्रोधीत लक्ष्मण नगरात आले. तेंव्हा सुग्रीव तारेच्या निवासी होते. या वरून कळते, तारेने सुग्रीवला ही आपल्या मुठीत ठेवले होते. लक्ष्मणाच्या येण्याची वार्ता ऐकून वानरराज सुग्रीव घाबरून गेले, या विकट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सुग्रीवणे तारेलाच पुढे केले. वेळप्रसंग ओळखून ताराने लक्ष्मणाची मनधरणी केली, हे वीर राजकुमार ही क्रोध करण्याची वेळ नाही. सुग्रीवच्या मनात तुमचे कार्य करण्याची इच्छा आहे, काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. क्रोधग्रस्त असल्यामुळे तुला कामासक्त माणसाच्या परिस्थितीची कल्पना नाही. कामासक्त होऊन वानरराज माझ्याकडे आले होते, कामाच्या अधीन झाल्यामुळे त्यांच्या हातून चूक झाली असेल, त्यांना आपला बंधु समजून क्षमा करावी. महर्षयो धर्मतपोऽभिकामाः कामानुकामाः प्रतिबद्धमोहाः । अयं प्रकृत्या चपलः कपिस्तु कथं न सज्जेत सुखेषु राजा ॥ किष्किंधाकांड (३३/५) (तपस्यारत महर्षी ही कामाच्या अधीन होतात, सुग्रीव तर एक चंचल वानर आहे, तो कामाच्या अधीन झाला, त्यात चूक काय). तारा पुढे म्हणाली, जरीही सुग्रीव कामासक्त झाले असतील तरी ही त्यांनी आपले कार्यसिद्ध करण्याचा उद्योग सुरु केलेला आहे. लवकरच लाखोंच्या संख्येने वानर इथे येऊन पोहचतील आणि कार्याला सुरवात करतील. अश्या रीतीने तारेने लक्ष्मणाचा क्रोध काही अर्थी शांत केला. सुग्रीवला भेटल्यावर ही लक्ष्मणाचा क्रोध पुन्हा जागा झाला. लक्ष्मणाने अत्यंत कठोर शब्दात सुग्रीवची नालस्ती सुरु केली. या वेळी मात्र ताराने कठोर भूमिका घेतली. तिने कठोर शब्दात लक्ष्मणाला बजावले, सुग्रीव हे वानरांचे राजा आहेत. राजा समोर कटू बोलणे कुठल्याही परिस्थितीत उचित नाही. तिने लक्ष्मणाला सांगितले, सुग्रीव कृतघ्न तर नाही, पण असत्य ही बोलत नाही. ते निश्चितच अधम राक्षसांचा वध करून, सीतेला रावणाच्या तावडीतून मुक्त करतील. तारा पुढे म्हणाली, वर्षोनुवर्षे दुखी असलेल्या माणसाला सुख मिळाले आणि त्याचा उपभोग घेण्यात तो दंग झाला तर त्यात गैर काय. थोडा उशीर झाला, म्हणून त्याच्याशी कठोर वागणे उचित नाही. तारेने लक्ष्मणा समोर श्रीरामाच्या न्यायाची प्रशंसा केली. तिने रावणच्या सैन्यबलाचे ही वर्णन करत लक्ष्मणाला स्पष्ट शब्दात बजावले: ते न शक्या रणे हन्तुमसहायेन लक्ष्मण:l रावण: क्रूरकर्मा च सुग्रीवेण विशेषत:l (किष्किंधाकांड ३५/१७) [सारांश: कुणा एकट्याला रावणाचा आणि राक्षसांचा वध करणे अशक्य आहे. वानरराज सुग्रीवची मदतची श्रीरामाला ही तेवढीच आवश्यकता आहे]. अश्यारितीने आपल्या वाक्चातुर्य आणि युक्तिवादाने तारेने लक्ष्मणाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली. लक्ष्यात असू द्या, ज्या प्रमाणे सुग्रीवला तुम्ही मदत केली, त्याच प्रमाणे सुग्रीवच्या मदतीची तुम्हाला ही तेवढीच गरज आहे. लक्ष्मणाला तिचा युक्तिवाद पटला. त्याला सत्य परिस्थितीची जाणीव झाली. त्याचा क्रोध शांत झाला. अश्या रीतीने तारेने लक्ष्मणाच्या क्रोधापासून सुग्रीव आणि वानरांचे रक्षण केले. तारेचे प्रखरव्यक्तित्वाचा प्रभाव त्या वेळचा समाजावर पडला, म्हणून तारेला प्रात:स्मरणीय पंच कन्येत स्थान मिळाले. अहल्या द्रोपदी कुंती तारा मंदोदरी तथा:l पंचकन्यादस्मरेनित्यं महदपातक नाशनम् l या पाच ही स्त्रियांनी अन्याय सहन केला नाही आणि आपले उद्दिष्ट साध्य केले. पण तारा या पाच ही स्त्रियेत सर्वश्रेष्ठ आहे कारण तिने केवळ स्वत:चाच स्वार्थ नाही सिद्ध केला अपितु संपूर्ण वानरजातीचे ही हित साध्य केले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
27234 वाचन

💬 प्रतिसाद (87)

प्रतिक्रिया

छान विवेचन...

मुक्त विहारि
Sat, 06/27/2015 - 10:36 नवीन
आवडले..
  • Log in or register to post comments

आवडले. बाकी ताराने

मृत्युन्जय
Sat, 06/27/2015 - 11:12 नवीन
आवडले. बाकी ताराने वालीहत्येप्रसंगी दाखवलेला धीरोदात्तपणा रामाच्या न्यायी बुद्धीला स्स्मरुन नव्हे तर परिस्थितीचे योग्य भान ठेवुन चतुरपणे वागुन दाखवला असे वाटते,
  • Log in or register to post comments

धन्यवाद , असे लपलेले कांगोरे

उगा काहितरीच
Sat, 06/27/2015 - 11:21 नवीन
धन्यवाद , असे लपलेले कांगोरे दाखवुन दिल्या बद्दल .
  • Log in or register to post comments

काका आपले हे विवेचन मनापासुन

द-बाहुबली
Sat, 06/27/2015 - 11:27 नवीन
काका आपले हे विवेचन मनापासुन आवडले. आपले बरेच लिखाण मी वैयक्तीक स्तरावर प्रौढांसाठीच्या बालकथा या सदरात मानत आलो आहे पण आज हा धागा वाचुन याला नक्किच छेद बसला. बाकी स्मरणीय पाच मधे सिता नाही याचे काय कारण असावे बरे ?
  • Log in or register to post comments

स्मरणीय पाच

योगी९००
Sat, 06/27/2015 - 11:40 नवीन
बाकी स्मरणीय पाच मधे सिता नाही याचे काय कारण असावे बरे ? अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा || पंचकन्यांना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् || सीता आहे की यात...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

त्यांनी श्लोक लिहला तो असा

द-बाहुबली
Sat, 06/27/2015 - 11:42 नवीन
त्यांनी श्लोक लिहला तो असा होता
अहल्या द्रोपदी कुंती तर मंदोदरी तथा: पंचकन्यादस्मरेनित्यं महदपातक नाशनम्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

आता कुंतीचे नाव वाचुन व तिने

द-बाहुबली
Sat, 06/27/2015 - 11:46 नवीन
आता कुंतीचे नाव वाचुन व तिने अन्याय सहन केला नाही ही लेखकाची ओळ बघुन झटका बसला होताच पण म्हटलं सुरुवात सितामैया का अनुपस्थीत आहे हे विचारुन करावी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

कुंती की सीता...

योगी९००
Sat, 06/27/2015 - 12:57 नवीन
कुंती की सीता...हे कंफ्युजन आहे नक्की.. कदाचित ह्या श्लोकाचा draft version रामायणानंतर बनला असेल. त्या मध्ये द्रौपदी आणि कुंतीची नावे नसावीत. (द्रौपदी ऐवजी अंजनी किंवा उर्मिला (लक्ष्मणाची बायको) चे नाव कदाचित असावे) त्यानंतर महाभारतात कुंती चे नावे सीतेच्या जागी टाकले गेले असावे..आणि दुसर्‍यानावाऐवजी द्रौपदी चे नावाची शिफारस झाली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

अम्हीही सीताच ऐकले होते.

dadadarekar
Sat, 06/27/2015 - 14:12 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

+1

अत्रन्गि पाउस
Sun, 06/28/2015 - 00:47 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

टंकन करताना चूक झाली. सीता

विवेकपटाईत
Sat, 06/27/2015 - 15:26 नवीन
टंकन करताना चूक झाली. सीता नाव राहून गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

टंकन करताना चूक झालील आहे

विवेकपटाईत
Sat, 06/27/2015 - 15:47 नवीन
टंकन करताना चूक झालील आहे तारा एवजी तर टंकित झाले आहे. (रात्रीच्या वेळी टंकन केल्याने कधी कधी २-३ वाचले तरी चूक दिसत नाही). बाकी सीता एवजी कुंती हाच शब्द आहे. अंतर्जालावर ही सीता एवजी कुंती शब्द अधिकांश ठिकाणी आढळला. बाकी मला तारे बाबत लिहायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

हा पंचकन्यांचा श्लोक अगदी

प्रचेतस
Sat, 06/27/2015 - 17:52 नवीन
हा पंचकन्यांचा श्लोक अगदी अलीकडचा म्हणजे ४००/५०० वर्षांपूर्वीचा किंबहुना त्याहूनही अलीकडील आहे. त्याचे उगमस्थान आता आठवत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

इं.

dadadarekar
Sun, 06/28/2015 - 09:04 नवीन
इं अ़ख्खे इंटरनेट हे प्रक्षिप्त कांड आहे. जून्या लोकाना विचारावे. कुंतीपेक्षा सीता आदरणीय वाटते. नवराचे सहाय्य नसताना तिने मुलांचा संभाळ केला. कुंती मात्र नवरा मेल्यावर दीनवाणी होऊन दीराकडे गेली. कर्णाच्या नाशालाहे तीच कारणीभूत ठरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

.

dadadarekar
Sun, 06/28/2015 - 09:29 नवीन
लाक्षागृहातुन सुटताना आपल्याऐवजी इतरांचेदेह ठेवावेत ही कल्पनाही कुंतीचीच होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

छान....

योगी९००
Sat, 06/27/2015 - 11:37 नवीन
छान...तारा विषयी हे माहित नव्हते. लेख आवडला.. बाकी वालीला वाली कोण होता ते समजले...पण वालीसारख्या गर्विष्ठ माणसाला त्याची जाण नव्हती. समजा वालीने तिचे ऐकले असते व श्रीरामांना शरण गेला असतात तर वेगळेच रामायण घडले असते..( कदाचित वाली कडूनच रावणाला मारून रामचंद्रांनी सीतेस परत आणले असते...)
  • Log in or register to post comments

वालीने सुग्रीवाला त्याच्या

दुश्यन्त
Sat, 06/27/2015 - 17:16 नवीन
वालीने सुग्रीवाला त्याच्या राज्यातून हाकलून तर दिलेच होते पण त्याची पत्नी (रुमा ) सुद्धा बळजबरीने स्वतःकडे ठेवली होती. रावणाने सीतेचे हरण केले होते आणि श्रीरामाला तिला सोडवून रावणाला शासन करायचे होते. रावणाला हरवण्यासाठी वालीची मदत घेतली असती तर ते न्यायोचित ठरले नसते म्हणून सुग्रीवाला वानरराज करून त्याची मदत घेणे श्रेयस्कर होते. (सुग्रीवाकडे तारा स्वेच्छेने राहिले होती, वालीने रूमाला बळजबरीने आपल्याकडे ठेवले होते. बाकी जाणकार यावर लिहितीलच.)बाकी वालीच्या नुसत्या नावानेच रावण टरकायचा. वालीने त्याला एकदा बेदम धुतला होता.
  • Log in or register to post comments

वानरांमध्ये हे आजही दिसते.

प्रचेतस
Sat, 06/27/2015 - 17:49 नवीन
वानरांमध्ये हे आजही दिसते. ताकदवान नर दुसर्याला हाकलून सर्व माद्यांवर स्वामित्व प्रस्थापित करतो. त्यामुळे सुग्रीवाला तारा किंवा वालीला रुमा हे साहजिकच आहे. बाकी वालीकडुन रावणाच्या गर्वहरणाचा भाग हा उत्तरकाण्डात आहे जे सरळसरळ प्रक्षिप्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त

रावण जेंव्हा अजिंक्य बनला

द-बाहुबली
Sun, 06/28/2015 - 02:09 नवीन
रावण जेंव्हा अजिंक्य बनला तेंव्हा बहुतांश देवांना वा सामर्थ्यवान मनुश्याना त्याने कैद अथवा पराभुत केले त्याकाळात फक्त वाली हा एकमेव होता ज्याने रावणाला अक्षरशः बदडुन काढ्ले व प्राणदान दिले. हा प्रसंग सिताहरणा पुर्वीचा आहे. म्हणूनच रामाला त्याने म्हटले होते तु फक्त सांगितले असतेस तर मीच तुला रावणाकडुन सिता परत आणुन दिली असती.(रावण संहीतेमधील माहितीनुसार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे दादूस, ही कथा

प्रचेतस
Sun, 06/28/2015 - 08:34 नवीन
अरे दादूस, ही कथा फ्ल्याशब्याकच्या स्वरूपात उत्तरकाण्डात येते. नुसता वालीच नाही तर कार्तवीर्यानेसुद्धा रावणाला हरवले आहे. पण हे सर्वच काण्ड प्रक्षिप्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

वालीने रावणाला पराभूत केले

सव्यसाची
Sun, 06/28/2015 - 11:43 नवीन
वालीने रावणाला पराभूत केले याचा पहिला उल्लेख मी अंगद शिष्टाई मध्ये ऐकला आहे. (मला वाटते तो युद्धकांडाचा भाग आहे). तो ४ लोकांची नावे घेतो ज्याच्याकडून रावणाला पराभव स्वीकारावा लागला. वाली आणि सहस्रार्जुन हे दोन आठवतात. उरलेल्यांपैकी एक गंधर्व असावा असे थोडेसे आठवत आहे. रावण जेव्हा अंगदाला रामाची साथ का करतो आहेस असे उपहासाने विचारतो तेव्हा त्याने रावणाला त्याच्या ४ पराभवाची आठवण करून दिली आहे. वाली आणि रावणाच्या युद्धाचा शेवट अंगदाने खूप भारी केला आहे. तो म्हणतो कि हे युद्ध संपले तेव्हा वालीने रावणाला उचलून आणला आणि माझ्या (अंगदाच्या) पाळण्यावर खेळणा म्हणून बांधला. उत्तरकांड मला एवढे आठवतही नाही पण अंगद शिष्टाई हि बरीच आधी येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला

प्रचेतस
Sat, 06/27/2015 - 17:58 नवीन
म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे.
हे वाक्य अजिबातच पटले नाही. सर्वात महत्वाची सीता आहेच. त्याखालोखाल कैकेयीचा नंबर लागतो. किंबहुना वाल्मिकींनी काही प्रमुख पात्रे सोडून कुठल्याच पात्रांना महत्त्व दिलेले नाही. त्यांचा सहभाग जेव्हढ्यास तेव्हढाच येतो त्यात कैकेयीही आणि ताराही.
  • Log in or register to post comments

वाल्मीकि ऋषींनी जवळपास

विवेकपटाईत
Sun, 06/28/2015 - 08:24 नवीन
वाल्मीकि ऋषींनी जवळपास ताराच्या राजनीतिक (शिष्टाई) जेवढे शब्द खर्च केले आहे. ते इतर कुणासाठी ही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तारामती कोणती?

अर्जुन
Sun, 06/28/2015 - 00:06 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे पंचकन्यामधील तारामती ही हरिश्चंद्र-तारामतीमधील तारामती होय. जरी वालीची पत्नी तारामती चे कार्य महान होते त्यामुळे तीचे नाव पंचकन्यामधे हवे तर, दमयंतीचे, उर्मीला म्हणजेच लक्ष्मिणाची पत्नीचेही असावे.
  • Log in or register to post comments

@अर्जुन

रमेश आठवले
Sun, 06/28/2015 - 00:29 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन

पंचकन्या मध्ये जे नावे आहेत

विवेकपटाईत
Sun, 06/28/2015 - 08:27 नवीन
पंचकन्या मध्ये जे नावे आहेत त्या सर्व स्त्रियांनी अन्यायाचा विरोध करून आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. हरिश्चंद्राची तारामती त्यात येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन

पंचकन्यांमध्ये ज्या

कानडाऊ योगेशु
Mon, 06/29/2015 - 23:33 नवीन
पंचकन्यांमध्ये ज्या स्त्रियांचा उल्लेख झाला आहे त्या सर्व स्त्रियांच्या पातिव्रत्याबाबत त्या त्या काळच्या समाजाने संशय घेतलेला आहे.व कालपरत्वे समाजाने त्यांचे श्रेष्ठत्व ही मान्य केले आहे. माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार असा संशय हरिश्चंद्र तारामती मधल्या तारामतीबाबत घेतला गेलेला नसावा.(चू.भू.दे.घे.) सीतेला तर प्रत्यक्ष अग्निपरिक्षाच द्यावी लागली. कुंतीबाबत मात्र गोंधळ होऊ शकतो. जरी ती लग्नाअगोदरच माता झाली असली तरी तिच्या पातिव्रत्याबाबत संशय घेतल्याचा उल्लेख महाभारतात कदाचित नसावा.(पुन्हा चू.भू.दे.घे.) त्यामुळे पंचकन्यात कुंती ऐवजी सीतेचाच उल्लेख असणे तर्काला धरुन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

.

dadadarekar
Tue, 06/30/2015 - 06:25 नवीन
तारा व मंदोदरी यांच्या पातिव्रत्याबद्दल कुणी शंका घेतली होती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

ह्याच धाग्यावर ह्याचा इतरत्र

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 07/16/2015 - 14:36 नवीन
ह्याच धाग्यावर ह्याचा इतरत्र उल्लेख आलेला आहे. तारा ही वाली व नंतर सुग्रीवाची पत्नी झाली. अर्थात इथे पातिव्रत्याबद्दल संशय जरी घेतला गेला नसला तरी दोन विवाह करणारी स्त्री पतिव्रता असू शकते का? असा प्रश्न पुराणकाळात कधीतरी मांडला व नंतर सोडवला गेला असावा. खरेतर मंदोदरीबद्दल फक्त रावणाची पत्नी ह्या व्यतिरिक्त मला काहीही माहीती नव्हते पण इथेच वाचले कि रावणाच्या मृत्युनंतर ती बिभीषणाची पत्नी झाली. म्हणजे तारा व मंदोदरी ह्या दोघींना एक सारख्याच परिस्थितीतुन जावे लागले. मुळात ह्या पंचकन्या प्रॅक्टीकल जीवन जगल्या आहेत. केवळ पतीभक्ती हाच जर निकष असता तर सत्यवान सावित्रीमधल्या सावित्रीलाही ह्यांच्यामध्ये स्थान मिळायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

लेखन आवडले... :)

मदनबाण
Sun, 06/28/2015 - 09:16 नवीन
लेखन आवडले... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar
  • Log in or register to post comments

लेख आवडला...

गामा पैलवान
Sun, 06/28/2015 - 12:11 नवीन
नमस्कार विवेकपटाईत, लेख आवडला. तारेची राजकीय परिपक्वता प्रशंसनीय आहे. वालीवरून प्रा. लीना रसतोगी यांच्या 'प्रभाते मनी राम चिंतीत जावा' या लेखाची आठवण झाली : http://tarunbharat.net/ftp/e-paper/2012/2012-03-23/mpage5_20120323.htm उपरोक्त लेखात म्हंटलंय की वालीने रावणास हरवल्यानंतर त्यांच्यात समेट झाला. त्यानुसार कोण एकावर हल्ला झाल्यास दुसऱ्याने मदत करावी असं ठरलं. या करारानुसार रावणाचं राक्षस सैन्य किष्किंधेच्या उत्तरेस वालीच्या संरक्षणनिमित्ते उभं राहिलं. प्रा. लीना यांच्या मते वालीला असल्या मदतीची गरज नव्हती. मात्र तारा जर राजकारणात सक्रीय असेल तर तिला या प्रसंगाचं यथार्थ आकलन असणार. तिने या व्यवहारास कशी काय अनुमती दिली? वालीचा काहीतरी फायदा झालेला असावा. उत्तरेकडून आक्रमणाचा कोणी विचारही करणार नाही अशी काहीशी व्यूहनीती (स्ट्रॅटेजिक थिंकिंग) यामागे असावी. माझ्या ऐकीव माहितीनुसार दशरथाने रावणाच्या वाढत्या आक्रमणांना पायबंद घालायची योजना चर्चेस आणली होती (संदर्भ आठवत नाही!). मात्र इतर राजांकडून प्रतिसाद मिळला नाही. वाली/तारा कदाचित सावध झालेले असू शकतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

काहीही लेख आणि काहीही अनुमाने

प्रचेतस
Sun, 06/28/2015 - 12:15 नवीन
काहीही लेख आणि काहीही अनुमाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

गामाजी

सतीश कुडतरकर
Wed, 07/01/2015 - 11:59 नवीन
अरे दादूस, ही कथा प्रचेतस - Sun, 28/06/2015 - 08:34 नवीन अरे दादूस, ही कथा फ्ल्याशब्याकच्या स्वरूपात उत्तरकाण्डात येते. नुसता वालीच नाही तर कार्तवीर्यानेसुद्धा रावणाला हरवले आहे. पण हे सर्वच काण्ड प्रक्षिप्त आहे. प्रतिसाद द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

सुरेख, ...

सुधीर कांदळकर
Sun, 06/28/2015 - 12:12 नवीन
लेखन आवडले. मी लहानपणी वाचलेली पंचक्न्यांची नावे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी अशी आहेत. कुंती त्यात नव्हती. पण यात माझा यत्किंचितही अभ्यास नाही.
  • Log in or register to post comments

होय. हाच श्लोक आहे आणि तारा

प्रचेतस
Sun, 06/28/2015 - 12:16 नवीन
होय. हाच श्लोक आहे आणि तारा ही हरिश्चंद्र तारामती मधली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर

तारामती-चन्द्रमती पाठभेद

रमेश आठवले
Sun, 06/28/2015 - 18:09 नवीन
माझी एक दोन तेलुगु भाषी मित्रांशी या बाबत चर्चा झाली आहे. ही मंडळी हरिश्चन्द्राच्या पत्नीचे नाव चन्द्रमती असल्याचा आग्रह धरतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्यांचे सगळे उरपाटे असते.

dadadarekar
Sun, 06/28/2015 - 23:21 नवीन
तिकडे गणपती ब्रह्मचारी व कार्तिकेय रि . सि . चा नवरा आहे . असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

योगी९००,

गामा पैलवान
Sun, 06/28/2015 - 12:42 नवीन
योगी९००, >> ( कदाचित वाली कडूनच रावणाला मारून रामचंद्रांनी सीतेस परत आणले असते...) वालीने मारतांना रामास हेच सांगितलं. तो म्हणाला की सीतेला तर माझ्या विनंतीवरून रावणाने परत केली असती. नेमका इथे श्रीरामाच्या राजकीय दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. श्रीराम वनवासात पाठवले गेले तेच मुळी रावणाला पायबंद घालण्यासाठी. खर, दूषण, शूर्पणखा इत्यादि प्रकरणांतून आज ना उद्या रामरावण युद्ध पेटणारच होतं. वालीला मध्ये घेतलं तर रावणाची शिरजोरी पूर्वीप्रमाणे चालूच राहिली असती. वालीचा काटा काढणं अत्यावश्यक होतं. श्रीराम वालीला आपल्या शत्रूचा मित्र म्हणजे स्वत:चा शत्रू समजतात. श्रीरामाची विचारप्रक्रिया रोचक आहे. वालीशी संधान बांधलं असतं तर वाली आणि रावण हे दोन प्रबळ शत्रू तसेच राहिले असते. याउलट वालीला ठार मारलं तर सुग्रीव भविष्यात कायमचा अंकित राहील. शिवाय पराक्रमी वानरसैन्यही वापरायला मिळेल. याच वानरसैन्याच्या आधारे वालीने रावणाला नमवलं होतं. फक्त वालीला अधर्माने ठार मारण्यासाठी सबब हवी होती. ती रूमाहरणाच्या निमित्ताने मिळाली. श्रीनामाने या प्रसंगी अतिशय धूर्तपणे आणि चलाखीने निर्णय घेतला आहे. वालीसंधानाचा आजून एक आयाम आहे. सीतेने श्रीरामास त्याच्या इच्छेविरुद्ध कांचनमृगाच्या पाठलागावर पाठवलं. नंतर लक्ष्मणासही रामाच्या आज्ञेविरुद्ध रानात पाठवलं. मग रावणाने तिला पळवलं. यावरून सीता रावणाशी संगनमत करून पळून गेली असा आरोप करता येतो. सीतेला आणि रामाला दोघांनाही याची जाणीव होती. यावर एकंच उपाय होता. तो म्हणजे श्रीरामाने रावणास ठार मारून सीतेस सोडवणे. वालीमार्फत सीता परत आली असती तर तिच्यावरच्या या आरोपास पुष्टी मिळाली असती. पुढे, अशोकवनाचा यथेच्छ विध्वंस केल्यावर हनुमानने सीतेस पाठीवरून वाहून रामाकडे परत नेण्याचा प्रस्ताव मांडला होता. संगनमताच्या शक्यतेचा निरसनार्थ तिने या प्रस्तावास नकार दिला. सीताहरणासंबंधी श्रीराम आणि सीतेची विचारप्रक्रिया एकंच आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

सप्त नगरी कोणत्या ?

रमेश आठवले
Sun, 06/28/2015 - 20:47 नवीन
पंच कन्या कोणत्या या बद्दल चर्चा सुरु आहे त्या अनुषंगाने ह्या भाषिता ची आठवण झाली - अयोध्या ,मथुरा, माया , काशी , कांची , अवन्तिका , पुरी द्वारावती श्चैव सप्तैते मोक्षदायीका: यातील माया नगरी म्हणजे सध्याचे कोणते शहर या बद्दल संभ्रम आहे . हे शहर म्हणजे सध्या हिमाचल मध्ये असलेले मायापुरी असे कोणी सांगितले . या बद्दल आणखी खात्री लायक माहिती उपलब्द्ध आहे का ? पुरी द्वारावती म्हणजे द्वारका असे मी समजतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

माया - हरिद्वार

स्पार्टाकस
Mon, 06/29/2015 - 03:38 नवीन
माया - हरिद्वार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

धन्यवाद...

योगी९००
Mon, 06/29/2015 - 08:55 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद... सीतेने श्रीरामास त्याच्या इच्छेविरुद्ध कांचनमृगाच्या पाठलागावर पाठवलं. नंतर लक्ष्मणासही रामाच्या आज्ञेविरुद्ध रानात पाठवलं. मग रावणाने तिला पळवलं. यावरून सीता रावणाशी संगनमत करून पळून गेली असा आरोप करता येतो.....वालीमार्फत सीता परत आली असती तर तिच्यावरच्या या आरोपास पुष्टी मिळाली असती. बापरे..इतका विचार होता या मागे हे माहित नव्हते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मला हा विचार पटतो. म्हणजे

द-बाहुबली
Mon, 06/29/2015 - 10:05 नवीन
मला हा विचार पटतो. म्हणजे सितेने रावणाचा बदलाच घेण्याचा आग्रह धरणे ही संपुर्णपणे पटणारी बाब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

अति उत्तम

अरवीन्द नरहर जोशि.
Sun, 06/28/2015 - 21:03 नवीन
अति उत्तम
  • Log in or register to post comments

नक्की क सली न नावे?

अर्जुन
Sun, 06/28/2015 - 23:10 नवीन
पंचकन्या मध्ये जे नावे आहेत त्या सर्व स्त्रियांनी अन्यायाचा विरोध करून आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. हरिश्चंद्राची तारामती त्यात येत नाही. असे नसून त्या पांच सर्वोत्तम पतीव्रता आहेत.अर्थात श्लोक लिहणार्याचा मते,इथे आपण वाद घालण्य्यात काहीच अर्थ नाही कारण आपल्याला नावे निवडन्याचे नियम माहीत नाहीत.
  • Log in or register to post comments

श

dadadarekar
Sun, 06/28/2015 - 23:19 नवीन
श्लोक म्हणताना वृत्ताचे बंधन पाळुन जी नावे बसली ती घातली गेली असावीत. इतकाच नियम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्जुन

उत्तम लेख. तारा या

पद्मावति
Sun, 06/28/2015 - 23:47 नवीन
उत्तम लेख. तारा या व्यक्तिरेखेविषयी खरोखर काहीच मला माहीत नव्हते. या फार कमी माहीत असलेल्या व्यक्तिरेखेची इतकी छान ओळख करून दिल्याबदद्ल धन्यवाद. रमेश आठवले याच्या प्रश्नाचे उत्तर माझ्या माहितीनुसार. कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा कारण मलाही काही नक्की माहीत नाही. मायपुरी हे हरिद्वार चे एक नाव आहे जशी अन्य नावे- कपीलस्थान, गंगाद्वार इत्यादी. मायादेवी ही हरिद्वार ची अधिश्तत्रि देवता मानल्या जाते. या देवतेमुळे हरिद्वार चे नाव पडले माया, मायापुरी.
  • Log in or register to post comments

सॉरी माझ्या वर दिलेल्या

पद्मावति
Sun, 06/28/2015 - 23:55 नवीन
सॉरी माझ्या वर दिलेल्या प्रतिसादात रमेश आठवले यांच्या प्रश्नाचे उत्तर असे म्हणायचे होते. चुकुन रमेश आठवले याच्या प्रश्नाचे असे झाले आहे. क्षमा करा. आज टंकलेखनात फार चुका होत आहेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

रमेश आठवले
Mon, 06/29/2015 - 07:14 नवीन
@स्पार्टाकस आणि @ पद्मावति- दोघांनाही धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

छान लिहिलंय . तारा पंच

तुडतुडी
Mon, 06/29/2015 - 14:56 नवीन
छान लिहिलंय . तारा पंच कन्यांमध्ये गणली जाते . पण हे जे लिहिलं आहे त्याला आधार काय आहे ? आपल्या पुत्राच्या भविष्यासाठी आणि वानरांच्या हितासाठी>>> ह्यात तारा चा फायदाच होता ना. मग तिच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच येत नाही . उलट सुग्रीवाने तिचा सन्मानाने स्वीकार हि केला आणि तिच्या मुलाला युवराज हि केला . माझ्या माहितीप्रमाणे पंचकन्यामधील तारामती ही हरिश्चंद्र-तारामतीमधील तारामती होय. >>> नाही . हि पंचकन्यांमध्ये गणली गेलेली तारा हि सुग्रीवाची पत्नी आहे कि चंद्राची पत्नी आहे ह्याबद्दल थोडं confusion आहे . बघून सांगते . आणि कुंतीचा उल्लेख बहुदा चुकीने झाला असावा . तिथे सीता आहे पांच सर्वोत्तम पतीव्रता आहेत>>>+११११११ वालीचा काटा काढणं अत्यावश्यक होतं>>
  • Log in or register to post comments

समजा वालीने सुग्रीवाला हाकलून

तुडतुडी
Mon, 06/29/2015 - 15:05 नवीन
समजा वालीने सुग्रीवाला हाकलून दिलं नसतं . वालीने सुग्रीवावर अन्याय केला नसता तरीही श्री रामांनी वालीचा काटा काढला असता काय ? आणि सुग्रीव हा वालीचा सख्खा भाऊच असल्यामुळे वाली मेला तरी सुग्रीव आणि रावण मित्रच राहिले असते ना . वालीच्या मृत्यू मागे त्याचा काटा वगेरे काढण्याचा हेतू नसून त्याने सुग्रीवावर केलेल्या अन्यायामुळे त्याला मारण्यात आलं होतं . वालीमार्फत सीता परत आली असती तर तिच्यावरच्या या आरोपास पुष्टी मिळाली असती.>>> ती कशी काय ?वालीला घाबरून रावणाने सीतेला परत केली तर ती त्याच्याबरोबर पळून गेली ह्या आरोपास पुष्टी कशी मिळते ? युद्ध करनं हा रामांचा हट्ट असता तर दूताकरवी संधी करण्याचा आणि सीतेला परत करण्याचा प्रस्ताव पाठवलाच नसता . दुसरी गोष्ट म्हणजे वाली जसा रावणाचा वध करू शकला असता तसाच हनुमंत हि रावणाचा वाढ करू शकला असता . मग रामांनी त्यालाही सामील करून घ्यायला नाही पाहिजे होतं .
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा