आज तोही आला होता त्याच्या आईबरोबर.
ठिगळ लावलेला शर्ट आणि मळकी पँट.
हॉलमधे एका कोपऱ्यात त्याला बसायची तंबी देवून आई गेली कामाला.
इकडेतिकडे भिरभिरनारी नजर त्याची शेवटी बुकशेल्फवर स्थिरावली.
मान वाकडी तिकड़ी करून तो पुस्तकांची नाव वाचू लागला.
इतका वेळ डायनिंग टेबलवर बसून त्याला न्याहळीत असलेल्या तिला आता खुदकन हसु आलं.
"काय रे, कितवीत आहेस?"
चपापुन त्यानं उत्तर दिलं.."सहावीत"
"पुस्तक वाचणार?" त्याला विचारत ती बुकशेल्फ जवळ गेली.
आशाळभूत नजरेनं बघणार्या त्याला एक पुस्तक हातात घेऊन तिनं खुणेनच विचारलं, "हे?"
उत्तरादाखल त्यानं मान हलवली आणि हातात पुस्तक येताच जणु काही जगातली सर्वात सुंदर वस्तु मिळाल्यासारखा त्याचा चेहरा खुलला.
आईच काम झाल्यावर बाहेर आली तसं त्यानं उठून पुस्तक टेबलवर ठेवलं.
"घेऊन जा, वाचून झाल की दे परत." ती म्हणाली.
उत्तरादाखल त्यानं नाही म्हणून मान हलवली.
ती का रे म्हणेपर्यंत तो आईबरोबर बाहेर गेला देखील.
आवडलं नसेल मनाशी म्हणत तिने पुस्तक परत जागच्या जागी ठेवलं.चला त्यानिमित्त तुला हात तरी लागला. एक हात पुस्तकांवर फिरवून ती तिच्या कामात गुंग झाली.
नंतर तो पुन्हा पुन्हा येत राहिला. तिनं आता त्याला हवं ते पुस्तक घ्यायची परवानगी दिली. वाचलेलं कळल नाही की तो तिला विचारू लागला. त्याला समजून सांगायला तीही पुन्हा वाचायला लागली.
पंधरा दिवसांवर आला तिच्या दर्शनचा वाढदिवस तशी ती तयारीत रमली. त्यादिवशी सगळे खरेदिला बाहेर गेले तेव्हा तिने विषय काढला " ए यावर्षी बुक सेट देवुया का रिटर्न गिफ्ट?"
"What? no way mamma! पुस्तक काय आम्हाला कमी आहेत का वाचायला? ऑलरेडी इतका होमवर्क असतो. That will be so uncool!"
"Uncool? असाही शब्द आहे? मला not cool माहिती होता. so funny! "
" Mamma you are unbelievable! एनीवे पुस्तकं नकोच आपण तो नवीन गेम आलाय ना तोच देवुया रिटर्न गिफ्ट. माझ्या सगळ्या फ्रेंडस कडे ps3 आहे."
तिची बाजू घ्यावी म्हणून तिनं नवऱ्याकडे एक करूण कटाक्ष टाकला. त्याने नुसतेच खांदे उडवून पुन्हा फोन मधे डोकं खुपसलं. मित्रांना रिटर्न गिफ्टच्या आडून दर्शनने त्याला गिफ्ट काय हवं हे ही सांगितलच.
मोठ्या धूमधडाक्यात बडे झाला. त्यालाही बोलावलं होतच तिने. केक कापला. सगळ्यांनी गिफ्ट दिले. दर्शन आणि त्याचे मित्र दर्शनचा नवा ps3 सेट करण्यात बिजी झाले. तो लांबूनच सगळ पहात होता. त्याची आई कामात होती. त्याची चुळबूळ तिच्या लक्षात आली तशी तिनं एका प्लेटमधे केक घेऊन त्याला दिला. हॉलच्या एका कोपऱ्यात त्यानं तो शांत बसून संपवला. आईला अजून काम होतं म्हणून तो तसाच गुडघ्यावर उजव्या हाताचं कोपर टेकवुन तळहात गालावर ठेवून आईची वाट पहात बसला. तिचं लक्ष गेलं तसं तिनं एक छान चमचमत्या कागदात गुंडाळलेलं रिबीन नी बांधलेलं पूडक त्याच्यासमोर धरलं. तो काही हात पुढे करेना म्हणल्यावर तिनेच त्याचा हात हातात घेऊन ते त्याच्या हातावर ठेवलं आणि म्हणाली,"अरे तुझ्यासाठीच आणलय हे. काही म्हणत नाही आई. मी सांगते."
त्याचे डोळे चमकले. हसत हसत त्याने शिस्तीत आधी रिबीन सोडली. मग तो चमचमनारा कागद काढला. आतल्या नव्याकोर्या पुस्तकाच्या कव्हरवर हात फिरवला आणि पहिलं पान उघडून त्यानं ते पुस्तक नाकाजवळ नेलं. खोल श्वास घेतला. ती तिथेच उभी होती. त्यानं वर बघून छान हसला आणि म्हणाला, " thank you!"
डोळ्यातलं पाणी मागे सारून ती पुन्हा पाहुन्याच्या सरबराइत मग्न झाली. रात्री उशीरा सगळी मुलं आप आपलं रिटर्न गिफ्ट घेऊन, cool party dude म्हणून घरी परत गेली. त्याच्याही आईने सगळं आवरुन आता येते म्हणाली तशी त्याने पुस्तकांतून डोकं वर काढून पुन्हा ते होतं तसं कागदात गुंडाळल. रिबीन लावली आणि परत तिला देवू लागला. ती म्हणाली, " बाई अहो, त्याच्यासाठी आणलीत ती पुस्तकं. तुम्ही म्हणा बरं असू दे."
तशी त्याची आई म्हणाली, " काय सांगू ताई, चार रोज़ झाले घर लय गळतय. नवा पत्रा लागसत्वर आमी समोरच्या दुकानाच्या आडोश्याला झोपतुया. पाऊस आला की पुस्तक भिजल म्हणून पोर रातभर झोपनार नाय. आमचा पत्रा लावून झाला की मी नेते तुमच्याकडण.असू द्या तवर इथंच."
जड मनानी तिनं पुस्तक त्याच्याकडून घेतलं. आलेला हुंदका मागे सारून बरं म्हणाली. दार बंद करून अस्ताव्यस्त पडलेल्या गिफ्ट रॅप च्या पसार्यातुन ps3 चा रिमोट हातातच घेऊन झोपलेल्या दर्शनच्या कपाळावर तिनी ओठ टेकवले. कितीतरी वेळ त्याला कुरुवाळत ती बसून राहिली. एकच विचार तिला खात होता, कामवालीच गळनार घर दुरुस्तही होईल पण आपल हे न दिसता गळनार घर कसं दुरुस्त करायच?
वाचने
6410
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त..
मस्त..
छान लिहिलंय. लिहित रहा!
+++१११
In reply to छान लिहिलंय. लिहित रहा! by मधुरा देशपांडे
छान लेखनशैलि ...
लेख भिडुन गेला!छान लिहिताय.
छान !
पण आताशा
खरंय...
In reply to पण आताशा by भिंगरी
छान लिहिलय :). लहानपण आठवलं.
छान लिहिलंय.
लेख छान..
च्यायला सेम विचार येऊन गेला.
In reply to लेख छान.. by चिगो
अवांतर प्रतिसादामुळे लेखिका
In reply to च्यायला सेम विचार येऊन गेला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिगरी?
In reply to अवांतर प्रतिसादामुळे लेखिका by रातराणी
मटेरीअलिझ्म!
In reply to लेख छान.. by चिगो
ओहो..
In reply to मटेरीअलिझ्म! by रातराणी
मटेरीअलिझ्म!
In reply to मटेरीअलिझ्म! by रातराणी
अगदी...
In reply to मटेरीअलिझ्म! by रातराणी
गळनार घर कसं दुरुस्त करायच?हे खटकलेच... पहिले तर मला हे PS3 बद्दल आहे असे वाटले.. गेमचे पण क्रेज असते हो त्या वयात.. माझ्याकडे भरपुर पुस्तके होती, पण आई ने कधी गेम घेऊन दिला नाही, म्हणून दुस-याच्या प्ले-स्टेशन कडे आशाळभूत नजतेने बघत दिवस काढलेले... आणि प्रत्येक व्हीडिओ गेम वाइट नसतो आयांना वाटतो तसा.. जेव्हढे चांगले रिसोर्स मॅनेजमेंट “Age of Empires” ने शिकवलेय, तेव्हडे पुस्तकात शिकणे अवघड आहे... तुमचे Thank You चे स्पष्टीकरण तर अजिबात पटले नाही.. कोणती आई मुलांसाठी ही अपेक्षा ठेवते ? म्हणूनच तर आईला श्रेष्ठत्व प्राप्त झालेय ना...आणि मुंलाना ते आज ना उद्या ध्यानात येणारच आहे.. कथेतल्या मुलासाठी आई हे सर्व करणारच हे ग्रुहीत आहे.. जेव्हा अनपेक्षित मिळाले तेव्हाच असतो Thank You.. :) हा बाकी तिच्या नव-याने Thank You म्हणायला हरकत नाही... :) For the Cool Party !असेच म्हणतो.
In reply to लेख छान.. by चिगो
कथा वावडली. सुंदर लेखनशैली !
छान लिहिलंय!
छान लिहिले आहे...
सर्वांना धन्यवाद!
आवडली...
छानच लिहिलय. कथा आवडलि.
गोष्ट आवडली पण शेवटचा सूचकपणा
छान लिहिलंय!
चांगला विशय आहे.
कथा फार आवडली.
कथा आवडली . मला वाटते कि
कथा मस्त
कथा आवडली.पटली भावली.सुदैवाने
कथा वावडली
छान आहे....
जियो.... आवडेश !
सर्वांचे आभार :)
य्ये बात...
In reply to सर्वांचे आभार :) by रातराणी
छान लिहिलंय ..
खूप छान! हृदयस्पर्शी!
छान लिहिलय. व्हिडीयो गेम हा
छानंच ! 'न दिसता गळणारं घर'
जुनी पिढी
काही गळत नाही घर
+११११११११११
In reply to काही गळत नाही घर by आदिजोशी
खुपच छान लेख.
अत्यंत सुंदर लेख.
कथा आवडली!!
अतिशय उत्तम