✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

व्यायामी ओव्या

व — वेल्लाभट, Sat, 06/27/2015 - 15:22
ब्लॉग दुवा हा अवघ्या जगाला नको त्याची हाव आरोग्याचा ठाव घेतो कोण ठेविले अनंते तैसे न रहावे नेटके ठेवावे शरीरासी पायात सामर्थ्य हातामधे बळ स्नायूंना हो पीळ असावाच असो जिम किंवा असो खोली छोटी असावी सचोटी व्यायामात कुणी उचलती वजने ही फार संसाराचा भार पुरे कुणा वेल्ला म्हणे जेथे सहा बिस्किटे पहा असे तेथे पहिलवान करावेच अॅब्स भले प्लँक बिंक नेहमीच थिंक पॅाझिटिव्ह करावी न व्यर्थ जनाचिया पर्वा पहा आणि ठरवा आरशात आरोग्यचि एक उद्दिष्ट असावे आपण झटावे त्याच्यासाठी जरी देव पूर्ण करेल कामना संकटी सामना स्वतःचाच जरी हे न रागे खवळेल रक्त रोखण्या सशक्त असावेच जरी हे शरीर मनाच्या हवाली मनाची खुशाली शरीरात व्यायामाची शिस्त बाळगावी चित्ती शरीर संपत्ती चिरंतन नको मद्य आणि धुराचिया आस प्रकृतीचा -हास कशासाठी पैसा मिळवावा व्हावे न अधीन आरोग्यचि धन जाणावे जी पुढे जावे मात्र करावी न स्पर्धा आनंदचि अर्धा होई त्याने वेल्ला म्हणे जोही अंतर्बाह्य स्ट्रॉंग तोचि लास्ट लॉंग याद राखा - अपूर्व ओक अर्नोल्ड आमचे आदर्श

प्रतिक्रिया द्या
6116 वाचन

💬 प्रतिसाद (23)

मस्त...

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 06/27/2015 - 15:29 नवीन
बजरंग बली की जय.... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अरे वाह....बहोत अच्छे !!

पद्मावति
Sat, 06/27/2015 - 15:35 नवीन
आवडल्या ओव्या. मस्तं...
  • Log in or register to post comments

आवडल्या, मस्त पण वाचता वाचता

विवेकपटाईत
Sat, 06/27/2015 - 19:42 नवीन
आवडल्या, मस्त पण वाचता वाचता जो व्यायाम होतो त्याला काय म्हणतात....
  • Log in or register to post comments

लय भारी

टवाळ कार्टा
Sat, 06/27/2015 - 19:50 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

मस्त ओव्या.

मधुरा देशपांडे
Sat, 06/27/2015 - 19:53 नवीन
मस्त ओव्या.
  • Log in or register to post comments

वाचुनी ओव्या

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/27/2015 - 21:44 नवीन
वाचुनी ओव्या बसती नाना चाव्या अतृप्त म्हणे घेती ठाव मनाचा
  • Log in or register to post comments

झक्कास!

सटक
Sat, 06/27/2015 - 22:04 नवीन
स्ट्रॉंग बॉडीमध्ये राहे स्ट्राँग मन करा रे चिंतन आर्नोल्ड!!
  • Log in or register to post comments

तुम्हाला दाद म्हणून

बोका-ए-आझम
Sun, 06/28/2015 - 03:06 नवीन
तुम्हाला दाद म्हणून हा एक अभंग पेश-ए-खिदमत आहे - प्रेमभंग होता करावा व्यायाम गाळावाच घाम जिममध्ये! एक गेली तरी दुसरी मिळेल तशीपण बनेल पर्सन‌ॅलिटी! सर्किट करावे ट्रेडमिलवर धावावे सायकलिंग करावे कार्डिओव्हॅस्क्युलर! मग अपचन आमांश हृदयविकार नाही हो होणार वेल्ला म्हणे!
  • Log in or register to post comments

अरे वाह !

वेल्लाभट
Sun, 06/28/2015 - 09:26 नवीन
जमलाय ! क्या बात. उताराच सांगून टाकलात प्रेमभंगाचा :) हे बघा Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

स्वानुभव...

अमितसांगली
Sun, 06/28/2015 - 09:37 नवीन
प्रेमभंग होता करावा व्यायाम गाळावाच घाम जिममध्ये! एक गेली तरी दुसरी मिळेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

विचार हा बाणवावा मनी,

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 06/28/2015 - 09:01 नवीन
विचार हा बाणवावा मनी, दुर्बलाचा नसे कोणीही धनी चिमण म्हणे व्हा बलोपासनी, राहुनी सदा निर्व्यसनी ||१|| छातीपुढे लोंबकाळे ढेरी, अवकाळी आमंत्रण यमाघरी नियमे व्यायाम जो करी, बळकट त्याची आयुष्यदोरी ||२|| उचलुनी वजने मारुनी जोर, बनवावे दंड लोहापरी थोर बलोपासने करावे दुर्बलांचे रक्षण, शक्तींपासुन त्या असुर ||३|| शक्तीउपासना करोनी नित्य, बनले रामदास ते समर्थ आचरुनी हे सत्य, द्यावा जीवनास नवा अर्थ ||४|| चिमणव्यायामग्रंथावली खंड- ४२!!
  • Log in or register to post comments

हरिहरि..... !

वेल्लाभट
Sun, 06/28/2015 - 09:28 नवीन
हरिहरि..... ! वा बुवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_ आपली आणि आत्मुगुर्जींची

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 06/29/2015 - 07:03 नवीन
_/\_ आपली आणि आत्मुगुर्जींची कृपा _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

सही है...

अमितसांगली
Sun, 06/28/2015 - 09:37 नवीन
मस्त जमुन आलय सगळ...
  • Log in or register to post comments

मस्त !

मदनबाण
Sun, 06/28/2015 - 09:52 नवीन
मस्त !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaar
  • Log in or register to post comments

चला आता करायचीच सुरूवात !

उगा काहितरीच
Sun, 06/28/2015 - 10:22 नवीन
चला आता करायचीच सुरूवात !
  • Log in or register to post comments

मुळ ओवी आणि प्रतिसादातील

खटपट्या
Sun, 06/28/2015 - 11:28 नवीन
मुळ ओवी आणि प्रतिसादातील ओव्या जबरदस्त.
  • Log in or register to post comments

मस्त मस्त.वरिजनल आणि प्रतिसाद

अजया
Sun, 06/28/2015 - 11:54 नवीन
मस्त मस्त.वरिजनल आणि प्रतिसाद पण!
  • Log in or register to post comments

छान

सविता००१
Sun, 06/28/2015 - 11:59 नवीन
सगळ्या ओव्या मस्त
  • Log in or register to post comments

सुंदर कविता

श्रीकृष्ण सामंत
Mon, 06/29/2015 - 06:18 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

मस्त!

पथिक
Mon, 06/29/2015 - 14:51 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

तिकडे लिहीलेलं तेच लिहीलंय

सूड
Mon, 06/29/2015 - 15:29 नवीन
तिकडे लिहीलेलं तेच लिहीलंय असं समजा वेल्लाकाका!! ;)
  • Log in or register to post comments

वववावववव

स्पा
Mon, 06/29/2015 - 15:31 नवीन
वववावववव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा