Skip to main content

निखिल वागळे

लेखक काळा पहाड यांनी शनिवार, 27/06/2015 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. याविषयीची भाऊ तोरसेकरांची टिप्पणी इथे आहे: http://jagatapahara.blogspot.in/2015/06/blog-post_9.html मी मुंबापुरीशी निगडीत नसल्यामुळे महानगर आणि निखील वागळे बद्दल फक्त ऐकून होतो. पण आजचा सवाल नावाची डोकेदुखी सुरू झाल्यानंतर काही दिवस ती पहाण्यात गेल्यानंतर वागळेची पार्शियल वृत्ती ध्यानात आल्यावर तो चॅनलच बंद केला. नंतर या महाशयांना तो चॅनल अंबानींनी विकत घेतल्यावर हाकलण्यात आल्याचं कळलं. सध्या मी मराठी नावाचा थोडा का होईना चालू असणारा चॅनल आम्ही बंद ठेवतो. वागळेचे अनिरुद्ध जोशींशी बोलतानाची क्लिप इथे आहे: http://www.knowyourlaw.com/nikhil-wagle-change-religion/ या महाशयांवर या क्लिप मुळे अजून एखादा गुन्हा दाखल झाल्याचं ऐकिवात नाही. पहिलं म्हणजे ही क्लिप मी मराठी चॅनलनं किंवा त्यांच्या ओनर्स नी ऐकली नसेल का? असं असताना सुद्धा निखिल वागळे अजून तिथे कसं काम करतायत? दुसरं म्हणजे दुसर्‍या चॅनल्स नी ही क्लिप जनतेला का ऐकवलेली नाही? हा माणूस सरळ सरळ धमकी देत असताना शिवसेना जिला या माणसाशी लढण्याची खुमखुमी आहे ती काय करतेय?

वाचने 53186
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

बाप रे ! काय माणुस आहे हा !! जातिवाचक शब्द वापरल्याबद्दल अ‍ॅट्रॉसिटी ची केस लावुन वागळेलाच जेल मध्ये टाकायला हवं. अर्थात ती क्लिप खरी असेल तर. कारण बाकी काही जबाबदारी क्लिप टाकणार्‍याने घेतली नाहीये. पेशावर मॅसॅकर नंतर साहेबांनी उधळलेल्या मुक्ताफळाला एकाने फार चांगलं उत्तर दिलंय. इथे बघु शकता

एखादा माणूस दिसता क्षणी संतापाची तिडिक जावी अशा माणसांपैकी निखिल वागळे हा एक माणूस आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

ह्म्म.. तुम्ही वटवागूळ आणि ते वटवटवागळे, त्यामुळे तुम्हाला राग येणे साहजिकच आहे. ह-घ्या.

पुरोगामी , सेक्युलर अशा चांगल्या संद्न्यांना शिविचं स्वरूप देण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे,त्यांच्यापैकी बगळे काका पहिल्या पाचात येतात.

प्रती+प्रीती क्रिया

हा संघाचा डाव आहे... -->ग्रेटथुंकर "या निखिलने भल्या भल्यांना घाम फोडला होता महानगरातून असे आमचे हे म्हणत होते परवा पाय मुरगळला तेव्हा शेकताना श्री गुरुजी भावजींबरोबर आल्याचा चहा पिताना"..... सार्वकालीन माई. मोदींंचे चांगले दिवस बघवत नाहीत म्हणून हा बनाव आहे. ---> श्री गुरुजी हा केजरीवाल यांना प्रकाश झोतापासून आणि मत प्रदर्शनापासून दूर ठेवण्याच्या षडयंत्राचा भाग आहे आणी कांग्रेस आणी भाजपा आतून मिळालेले आहेत. ---> पिंप-तळाचे उंदीर ह्या प्रकरणाची साहीत्य संपादकांनी चवकशी केली पाहिजे. पिचकारी वाचक "निसो-घुसो आणि धसो" कोपरा वाचाळ संघ

ध्वनिफितीतला वागळेंचा आवाज सहज ओळखू येतोय. या माणसाच्या मनांत असलेला ब्राह्मणांविषयीचा द्वेष पूर्णपणे उघड झालाय. हा इतका उखडलाय, म्हणजे त्या जोशीनेही काहीतरी आक्षेपार्ह लिहिले असावे. पण तरीही, दाभोळकर आणि पानसरे यांच्या खुनाला हा वागळे, सरळसरळ ब्राह्मण समाजाला जबाबदार धरतोय. त्याचा पुरावा त्याने दिलाच पाहिजे नाहीतर कोणीतरी त्याच्यावर खटला भरायला हवा.

In reply to by तिमा

जाला वर शोधल्यानंतर वागळे बद्दल पोलिसांच्या कडे तक्रार दाखल केली गेलीय असं कळलं: http://www.afternoonvoice.com/brahmins-demand-journalists-arrest.html वागळेवर या पूर्वी सुद्धा तक्रारी दाखल झाल्यात. बीजेपीच्या पुणे कम्युनिकेशन सेल नं आणि अखिल भारतीय ब्राम्हण महासंघानं सुद्धा मोदींबद्दल लिहिलेल्या ट्वीट साठी तक्रारी दाखल केलेल्या आहेतः http://www.newslaundry.com/2015/06/08/complaint-filed-against-journalis…

In reply to by संदीप डांगे

महानगर सोडल्या पासून वागळेचा पट्टा कुणाच्या ना कुणाच्या हातात आहे.... आता कदाचित पट्टा पकडणारा कोणी नसल्याने वाटेल ते भुंकत/ बरळत असावा...

वागळे एक चांगले पत्रकार आहेत, निरपेक्ष बुद्धीने काम करणार्या फार कमी पत्रकारांमध्ये वागळेंचे नाव घेतले जाते. वेळोवेळी त्यांना धमकवण्याचे प्रकार होत असतात, हे बरोबर नाही. पत्रकारीता जिवंत राहयची असेल तर वागळेंसारख्या निरक्षीर बुद्धीने काम करणार्या पत्रकारांशिवाय पर्याय नाही.

In reply to by यसवायजी

नव्याने जन्मेन मी ही मालीका चालू आहे मिपावर. प्रायोजक : सपट लोशण

In reply to by पैसा

त्यांचे टंकताना चुकलेले असेल... ;)

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

निरक्षीर होय, चुकून निरक्षर वाचले हो मी. शब्द खटकला तेव्हा परत वाचले, मग कळले तुम्हाला काय म्हणायचेय ते. बाकी उपरोध चान करता तुम्ही.

वागळे हा पराकोटीचा विकृत आणि अत्यंत माजलेला आहे हे या क्लिपवरून सहज दिसून येतंय. इतकी विकृती माणसात कशी काय येते याचे मला कायम आश्चर्य वाटत आलं आहे.

इतके सगळे असुन सुध्दा वागळेंचा शो चालु आहे म्हणजे त्याला तसा बर्यापैकी टी.आर.पी मिळत असणार. झाले आहे काय कि जसे चितळ्यांनी स्वतःच्या पुणेरी विक्षिप्तपणाला आपला यु.एस.पी बनवला आहे,रजनीकांतने स्वतःच्या विचित्र अ‍ॅक्शनला स्वतःचा यु.एस.पी बनवला आहे तसाच वागळेंनी आपल्या आक्रस्ताळेपणाला स्वतःचा यु.एस.पी बनवला आहे आणि लोकांना त्याची सवयही लावली आहे.

व्यक्तीबद्दल बोलगे नलगे. प्रस्तुत व्यक्ती जर केजरीवाल सरकारचा पराभव झाला असता तर इसिस मध्ये भरती होण्याची तयारी ठेवली होती. अशांना धर्म सोडण्याची संधीच देऊ नये. (आधीच हाकलावे.) Link: pic.twitter.com/hqEqxRFnb4

ह्या क्लिप मध्ये वागळे जोशी ह्या आडनावाचा उच्चार ज्या तिरस्काराने करीत आहेत ते यांना तीव्र'मानसिक आजार' झाला आहे असे वाटते आहे. त्याने माझ्या आडनावाचा कितीही 'उध्दार' केला तरी तो पत्रकार म्हणून मला अर्धा आवडतो. त्याचा अनाठायी हिंदुत्व द्वेष सोडला तर तसा बरा आहे. ( शुद्ध मराठी बोलतो हे काय कमी आहे ?) नमो चे सरकार चांगले सुरु आहे त्यामुळे काँग्रेस ने पोसलेल्या अनेक पत्रकारांचा अंगाचा तिळपापड होतो आहे हे ही ह्या क्लिप मधून समजले. पत्रकारांचे परदेश दौरे नमोनी बंद केले त्यामुळे निखील चा मानसिक आजार बळावेल आणि बिघडेल ही ... त्याच्या अस्थीत्वाने अती दुर्मिळ झालेला विक्षिप्त समाजवादी विचार अजूनही नामशेष झाला नाही एवढे समजते. पुढेमागे तो विचार नामशेष होईलच आणि तो करण्यात निखिलचाच महत्वाचा वाटा असेल.

निखील वागळे धर्म बदलणार आहे अशी बातमी आहे. मुळात ते कुठल्या धर्माचे आहेत? मला वाटले ते निधर्मी आहेत त्यामुळे धर्म बदलणार म्हणण्यापेक्षा धर्मीय होणार म्हणावे लागेल. तरी देखील, मला वाटते ही अशीच अफवा असेल. नाहीतर इथे कुठला धर्म त्यांना घेण्यास उत्सुक असेल?

चेंबूरच्या सिंधी कॉलनी मध्ये उत्कृष्ट दाल पकवान व स्टील च्या पेल्यातून लस्सी किंवा खरे ताक खास न्यःयारीसाठी खाण्यास जायचे आहे कॉलेज च्य दिवसात झणझणीत व तेलकट न्याहारी उतारा म्हणून बेस्ट होती किंवा चेंबूर च्या सिग्नल वर भटाची तिखट जाळ मिसळ

In reply to by काळा पहाड

नाय नाय... गल्ली बरोबरे. वागळ्यांबद्दल आणखी काय लिहायचं? त्यापेक्षा लस्सी, ताक, दालपकवान वगैरेवर लिहिणे हां मिपाच्या ब्याण्डविड्थचा जास्त विधायक उपयोग आहे.

In reply to by dadadarekar

दोन दिसापुर्वी चेंबरात मोनोरेलमध्ये ब्याटरीच्या विजेचा धक्का लागून एका माणसाचे दोन्ही हात व इतर शरीरही भाजले. रात्री अडीच वाजता आमच्याकडे आणला होता. इतके मोठे बर्न केस असल्याने त्याला बर्नच्या ऐरोळीच्या स्पेशल दवाखान्यात पाठवला. ...... दुसर्‍या दिवशी पेप्रात नेटावर कुठेतरी बातमी असेल म्हणुन शोधलं. पण कुठे मिळाली नाही. मनुष्य मोनोरेलचा एंप्लोयी आहे. ......... आणीबाणीच्या काळात म्हणे पेपरांवर दडपण असायचे. आणि आजच्या सरकारने सगळी पेपरं खिशात घातली आहेत , हे लोकांच्या लक्षात तरी येतय का ? वागळे परवडला !

माझ्या मते वागळे ला मी मराठी वर अजून जम बसवता आला नाही आहे त्यांचे सोनेरी दिवस त्याच्यावर होणारी विडंबने थोडक्यात सतत प्रकाश झोतात राहण्याची सवय असलेला वागळे आता त्या मानाने मागे पडला तेव्हा प्रकाश झोतात राहण्यासाठी त्याने ह्या अनिरुद्ध जोशी समवेत कुंभाड रचले किंवा मुद्दामहून त्या जोशी च्या दूरध्वनी ला अशी विकृत उत्तरे दिली जेणेकरून विरोधी पक्षातून जातीचे राजकारण करणार्‍यांनी त्याची तळी उचलावी असा त्याचा कावा दिसतो थोडक्यात विकृतपणा कमी व धंदेवाईक पणा जास्त दिसून येतो तसे आमची शोभा ताई सुद्धा देवेंद्राला उद्देशून टीव टीव करते. विचारजंत पत्रकार हे एखाद्या विचारसरणी च्या रंगात इतके रंगून जातात की त्या विचारसरणीच्या राजकीय नेत्यांच्या पेक्ष्या जास्त राडा हे प्रत्रकार मिळेल त्या माध्यामातून घालतांना दिसतात. चाय पेक्ष्या किटली गरम असा सर प्रकार असतो

वागळे पूर्वी आयबीएन लोकमत वर असताना रोज चर्चेच्या शेवटी चर्चेच्या विषयावर घेतलेल्या एसेमेस पोलचे निकाल दाखवायचा. बहुसंख्य पोलचे निकाल त्याच्या अपेक्षेविरूद्ध लागायचे. तो मी-मराठीवर गेल्यावर अचानक त्या वाहिनीवरील एसेमेस पोलचे निकाल त्याला हवे तसे लागू लागले. जानेवारी २०१५ मध्ये मोदींच्या पहिल्या ७-८ महिन्यांच्या कारकीर्दीवर बर्‍याच वाहिन्यांनी देशभर जनमत चाचणी घेतली होती. आजतक, एसी नेल्सन्-एबीपी माझा, झी इ. अनेक चाचण्यात असे दिसून आले की मोदींच्या कारभारावर ६०-६५% हून अधिक जनता समाधानी किंवा खूप समाधानी होती व १५% पेक्षा कमी जनता नाखूष किंवा खूप नाखूष होती. मी-मराठीवर याच विषयावर चर्चा होऊन शेवटी एसेमेस पोल दाखविला तेव्हा हे आकडे बरोबर उलटे दाखविले होते. मी-मराठीवर जाऊन वागळे पोल मॅनेज करतो याची तेव्हाच खात्री झाली होती. अविनाश धर्माधिकारी हे अत्यंत संयमित, अभ्यासू व प्रगल्भ आहेत. इतर वाहिन्यांवरील चर्चेत ते असतात. परंतु वागळे सूत्रधार असलेल्या चर्चेत ते कधीही नसतात. याचे कारण वागळेचा उन्मत्तपणा, जातीयवाद आणि विकृती.

In reply to by आनंदी गोपाळ

गोपू आय मीन गोपाळराव, माझ्या एकट्यावरच का हो दात धरला? माझ्याप्रमाणे इतर अनेक जण वागळेच्याच वर्गात होते की. तू आय मीन तुम्ही इतरांचे प्रतिसाद वाचलेले दिसत नाही. मुद्दामच माझ्यावर दात धरला असं दिसतंय. जरा याच धाग्यातील खालील प्रतिसाद वाचतोस का आय मीन वाचता का? या सर्वांचं पण 'हबिणंडण' कर की आय मीन करा की. http://www.misalpav.com/comment/711622#comment-711622 http://www.misalpav.com/comment/712006#comment-712006 http://www.misalpav.com/comment/711717#comment-711717 http://www.misalpav.com/comment/711741#comment-711741 http://www.misalpav.com/comment/711770#comment-711770 http://www.misalpav.com/comment/711914#comment-711914 http://www.misalpav.com/comment/711957#comment-711957 http://www.misalpav.com/comment/712045#comment-712045 वागळे, दिग्विजय, लालू, मुलायम, सिब्बल, लादेन, कसाब, हफीज सईद इ. ना अहोजाही करण्याची मला कधी गरज वाटली नाही. त्यांची तेवढीसुद्धा पात्रता नाही. या व्यक्तींचा अहोजाहो, जी, श्री. इ. आदरपूर्वक उल्लेख करायला मी म्हणजे सुशीलकुमार शिंदे किंवा दिग्विजय नाही.

ओह अच्छा! भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉगवरून काहीतरी क्लिप अन त्यावरून वागळे यांना शिव्या देण्याचा धागा आहे तर! धाग्याच्या नावावरून अर्थबोध होत नव्हता. भाजपाच्या राज्यात वागळे अजूनही गजाआड नाहीत म्हणजे क्लिप किंवा एकंदर धाग्यात काही दम नसावा असे दिसते.

त्याला अटकेत टाकून फुकटची प्रसिद्धी का बरे द्यायची काही ब्राह्मण संघटना त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करणार होत्या मला विचारणा केली होती , मी म्हटले फुकटची प्रसिद्धी कशाला द्यायची त्याला आणि ह्यांना सुद्धा मुद्दा मिळाला तर कशाला सोडतील मात्र सध्या महाराष्ट्रात विरोधक थंडावले आहे व युती चा कारभार साधा सरळ चालला आहे , त्यामुळे ह्याचा टी र पी थंडावला असावा म्हणून हा बिथरला आहे एवढेच एक होता वागळे अशी गात व्हायची ह्याची

वागळेंचे त्या क्लीपमधले बोलणे सडेतोड आहे व ते अनेकांना झोंबलेले दिसतेय. याचा अर्थ वागळेंच्या बोलण्यात तथ्य असावे.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

बोलणे सडेतोड होते, पण त्यात ब्राह्मण जातीस भटजी म्हणून हीणवण्याचा टोन होता. एकदा नव्हे दोन/तीनदा त्यांनी जातीवाचक उच्चार केला. हेच जर एखाद्या खालच्या (तथाकथीत) जातीला उद्देशून बोलले असते तर तथाकथीत पुरोगामे गप्प बसले असते काय ? मुळ मुद्दा निनावी मेसेज करण्याबद्द्ल होता. त्याबद्द्ल ते बोलले असते तर योग्य होते. विनाकारण ब्राह्मणी कावा आणि बरेच काही निरर्थक बोलण्याची गरज नव्हती. त्यांच्या बोलण्यात काय तथ्य होते यावरही प्रकाश टाकावा..

क्लिप मध्ये वागळे एकदम पिसाळल्या सारखे ओअरडत होते. समोरच्याला बोलायची, त्याची बाजु मांडण्याची बिलकुल संधी देत नव्हते. जोशींनी नक्की त्यांचे काय बिघडवले होते ते समजले नाही. पण जोशी हे अडनाव ऐकल्यावर तर त्याचा तोलच सुटला. त्यानंतर वागळे जे काही बोलले त्याला बरळले म्हणाबे लागेल. तरीही जोशी शांत राहुन डीसेंट कॉन्हर्सेशन करायचा प्रयत्न करत होते. वागले शाहु, फुले, आंबेडकर यांचे उगाचच नाव जपत होते. या तीघांविषयी वागळेनां फारशी माहीती दीसत नाही. वागळेंच्या आचार विचार आणी बोलण्यावरुन तरी शाहु, फुले, आंबेडकर यांचे कोणतेही साहीत्य अथवा विचार वागळेनी अभ्यासलेला वाटत नाही.

आंबेडकरांनी आपल्या हजारों, लाखों अनुनायांसह धर्म बदलला म्हणुन हींदु धर्माचे काय आणी कीती नुकसान झाले? (जाणकारांनी माहीती द्यावी) तर वागळेनी घर्म बदलुन कुणाला काय फरक पडणार आहे? कदाचीत वागळेलाच थोडा अल्पकालीन फायदा होईल. वागळेंनी धर्म बदलायचे ठरवले तर त्याच्या घरचे तरी त्याच्याबरोबर आपला धर्म बदलतील काय? त्याला सपोर्ट तरी करतील काय? बहुतेक तुझी नाटके TV वरच ठेव, घरी आणु नको असाच सल्ला (दम) मीळेल.

In reply to by dadadarekar

इस्लाम १८%, ख्रिस्चन २% यांची संख्या बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे बदललेली नाही. आणी १% जैन्,बौद्ध आपल्याकडे आधीपासुनच होते. तेव्हा बाबासाहेबांच्या धर्मांनरामुळे हींदु धर्माला फारसा फरक पडलेला नाही.

In reply to by नेत्रेश

तुम्ही तुमचा शर्ट बदलता तो तुम्हाला स्वतःला फरक पडण्यासाठी की कुठल्या तरी कंपनीला फरक पडण्यासाठी ? धर्म बदलणारा माणुस त्याला काहीतरी फरक पडणे अपेक्षितसते म्हणुन धर्मांतर करतो. हिंदू धर्माला फरक पडावा म्हणून नव्हे.

In reply to by dadadarekar

पण स्वत: मध्ये फरक पडण्यासाठी शर्ट किंवा धर्म बदलणारा माणुस मी ते करुन दाखवीन अशा धमक्या दुसर्याना देताना पाहीला नाही. या क्लिप मध्ये तर वागळे स्वतःचा धर्म बदलण्याची धमकी देतो आहे. जसेकाही याच्या धर्म बदलण्यामुळे हींदु धर्माचे फार मोठे नुकसान किंवा बदनामी होणार आहे.

In reply to by नेत्रेश

पण मी काय म्हणतो दादा आणि नेत्रेश भाऊ..वागळे साहेब या फुकाच्या वल्गना का करत आहेत? करून टाका ना म्हणा धर्मांतर. हिंदू धर्माला तर काहीच फरक पडणार नाही हे उघड सत्य आहे. आणि वागलेंना काय फरक पडेल ते त्यांना धर्मांतर केल्यावर कळेलच. स्वत: च्या धर्माचे वाभाडे काढण्याची हिम्मत दुसऱ्या एखाद्या धर्मात जाऊन करून बघा म्हणा (उदा. इस्लाम स्वीकारून इस्लाम वर टीका किंवा ख्रिश्चन स्वीकारून ख्रिश्चन वर टीका ..किंवा अजून काही) त्यांनी क्लीप मध्ये वापरलेल्या भाषेप्रमाणे "त्यांच्या पार्श्वभागात दम असेल तर हे करून दाखवा!"

एबीपी माझा वरील प्रसन्न जोशी हा वागळेचाच धाकटा भाऊ आहे. मिपावर देखील वागळेचे भाऊबंद आहेत. वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे.

दोन लोक फोनवरून एकमेकांशी भांडले जी त्यांची खाजगी बाब होती पण तिला मुद्दामहून इतकी प्रसिद्धी दिलेली दिसते. मुळात संभाषण रेकॉर्ड कोणी केल हे हि महत्वाच आहे कारण रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला फोन सुरु होतानाच माहिती होत कि यातून काहीतरी "ज्वलंत" कंटेंट मिळणार आहे. यावरून उद्देश स्पष्ट होऊ शकतात. वागळेंनी पुराव्याशिवाय आरोप केले असतील तर त्यांच्यावर कारवाही होणे शक्य आहे आणि योग्यही. पण इथे कोणीही त्या जोशी नामक व्यक्तीविषयी अक्षरही काढले नाही याचे आश्चर्य वाटले. एखाद्याला मुद्दामहून तोपर्यंत डिवचत राहायचे जोपर्यंत तो चिडत नाही आणि संयम सुटून बरळत नाही हि युक्ती बरेच लोक वापरतात. ते जुने आप वाले योगेंद्र यादव हि तसेच! इथे हि असेच काहीतरी केलेले दिसते. रात्री एखाद्याला निनावी संदेश पाठवणे अयोग्य नाही का? वरती लेखामध्ये दिलेल्या लिंकवर "motivational SMS " पाठवला असे म्हटलंय! :D हे म्हणजे सरळ सरळ "आपला तो बाब्या… " असे झाले. बाकी कायद्यानुसार कारवाही व्हावीच पण कोणी स्वतःहून धर्म बदलणार असेल तर ती त्याची खाजगी बाब आहे त्याची इतकी प्रसिद्धी कशासाठी? आणि एक प्रश्न, भटजी म्हणणे खरोखर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली येते का?(माहितीकरिता विचारला आहे, जाणकारांनी सांगावे)

In reply to by शब्दबम्बाळ

कुणी धर्म बदलला आणि नव्या धर्माबद्दल अभिमान बाळगला की जुन्या धर्माचे लोक का चवताळतात हे समजत नाही.. आपल्या कोरसमधून एकजण कमी होतोय , याची भीती वाटुन ते बेताल होतात का ?

वागळे ही फक्त व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे.>>>>>अनिरुद्ध जोशी ही सुद्धा व्यक्ति नसुन प्रव्रुत्ती आहे.

ह्यावरून सरळ स्पष्ट होत आहे की वागळे हे हातात असलेल्या अधिकारांचा दुरुपयोग करायला फार वेळ घेणार नाही. जो माणूस बाहेर निर्भीड निरपेक्ष पत्रकार म्हणून ओळखला जातो तो प्रत्येक्षात अश्या कोत्या, हिणकस मनोवृत्त्तीचा आहे हे कळून येते. फुले, आंबेडकर ह्यांचे आदर्श समोर ठेवतात मग जातीवाचक संबोधने का वापरतात ? ह्यालाच " माज" ह्यापलीकडे काहीही म्हणू शकत नाही. जर अशा प्रकारचा आक्रस्ताळेपणा वागळे जर करत असतील म्हणूनच त्यांना एका मोठ्या वाहिनीने ह्यांना नारळ दिला आहे.

शिव्या घाला, थोबाडीत मारा काही पण करा बस माझा TRP वाढला पाहिजे - इति .वागळे

In reply to by कोंकणी माणूस

दोन हाणा पण सरपन्च म्हणा!!!!