Skip to main content

पैंजणे

लेखक सटक यांनी शुक्रवार, 26/06/2015 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
कुंद काळ्या रात्रीला, वेढून येशी साजणे वीज या उमटे जिव्हारी झळकता ती पैंजणे ! उसळता बेभान वारा, क्शणिक सोडे तंडणे प्राण कानी होत गोळा छनकता ती पैंजणे ! आज सजणा धुंद झाला, तू जुईचे लाजणे थिरकला गात्री प्रणय हा विखुरता ती पैंजणे ! पुसुन नेले पावसाने, नाही..नाही.. सांगणे एक श्वासी लक्श कंठी गात आता पैंजणे !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2652
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्यवादा एक कारण, वरती धागा आणणे ! सूज्ञ तुम्ही येथले बहु, बाकी न लगे सांगणे !!

In reply to by सटक

आवडते का तुम्हासहि, नवनीत चीप होणे न व्हावे इतुकिच इच्छा, बाकी तुमचे तुम्ही जाणणे! ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

येथ आहे नवीन मी, अन अधिक ह्वे ते वाचणे ! चार गोष्टी अधिक कळता, होइल नूतन जाणणे !! आपणासी अगर ठावे, मार्ग नूतन जोखणे ! सांगता मज निश्चयाने, त्याच पंथी चालणे !! जे मी लिहितो आहे त्याचे बरे-वाईट परिक्शण व्हावे ही इच्छा!