Skip to main content

सखी तुझ्या अंतरात होतो

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 22/06/2015 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे कुणाच्या घरात होतो सखी तुझ्या अंतरात होतो दहाजणींतून देखणी तू तसाच मी शंभरात होतो जिथे तिथे गाय लंगडी अन सदैव मी वासरात होतो अता जमीनीवरी परंतु कधीतरी अंबरात होतो उन्हात मी जन्म काढला पण तुझ्यासवे एक रात होतो डॉ.सुनील अहिरराव ---------------- धागा संपादित केला आहे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1683
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

ह्या ओळी विशेष रिलेट झाल्या दहाजणींतून देखणी तू तसाच मी शंभरात होतो वाह!!!!

सुरेख कविता!