Skip to main content

दुचाकी घेतली पण... काही शंका

लेखक म्हया बिलंदर यांनी शनिवार, 23/05/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस वेगवेगळे पर्याय शोधुन, माहिती काढुन, चार लोकांना विचारुन शेवटी एक दुचाकी घेतली. ऐपत ६००००/-(कमि/जास्त), रोज चा वापर ६०-८०कि.मी(कधि कधि १०० देखिल), आणि सर्वात महत्वाचं "मि स्प्लेंडर किंवा पॅशन वर बस्णारच नाहि" अशी हिची धमकी अस्ल्याने चाळुन चाळुन शेवटी हिरो चि आय स्मार्ट ठरवली.(स्प्लेंडरच पण हिला नाही समजलं) गाडी विकणारा प्रामाणिक पणे त्याचं काम करित होता. तो-"सर कंपनी तो १०२ बोलती है, लेकिन गाडी ७५-८० तो देगी." मी-"किसीने खरिदी है पय्ले?" तो-"अरे, बोहोत." मी-"उन्कु, कितना दिया." तो-"किसीने ८० बोला किसीने ९०, एक सरने तो १०५ बताया, लेकिन हमें सच नहि लगता." मी-"तो, क्या क्या खबरदारी लुं, तो ज्यादा एवरेज देगि?" तो-"५०० कि.मी. तक ४० कि स्पीड से दोडाईये, ज्यादा एवरेज देगी.बाकी रेग्युलर सर्विसींग और चेकअप." (आणखी बरिच प्रश्नोत्तरे..) त्याने त्याचं काम चोख केलं. पैसे मोजले, टाकी भरली, गाडी थेट गावि. गाव जास्त लांब जरी नसलं तरी जाणं-येणं, थोडं फार फिरणं, असं करत करत गाडी पहिल्यांदा रिजर्व ला लागली तेव्हा माझ्या हिशोबाने गाडी ने ६० चि सरासरी दिली. त्याने सांगितलेले सगळे नियम पाळुन काळजी घेउन सुद्धा हे म्हणजे खुपंच कमि झालं. त्याला फोन केला, त्याने गाडी घेउन बोलवलं. पहिल्या सर्विसींग साठी चे ५०० कि.मि. झाले होते म्हणुन सर्विसींगलाच घेउन गेलो. यावेळेस मेकॅनिकला रडकहाणि सांगितली. तो-"अवो सर, १००० कि.मी. ला कुठं एवरेज मिळ्तो का?" मी-"मग?" तो-"कमित कमि २०००-३००० तरी." मी-"मग तो पर्यंत?" तो-"गाडी ४० ने चालवायची, एक दोन सर्विसींग होऊ द्या, एवरेज काढुन देउ ना तुम्हाला." संध्याकाळी गाडी घेतली. वापरली. पुन्हा तेच, जरा फरक नाही. लावला टोल्-फ्री ला फोन. टोल्-फ्री ला फोन लावल्यावर जो अनुभव येतो तोच.(हे दिल्लीत बसलेले होते. सगळं हिंदीत.) भावनारहीत सांत्वन, फुकट्चे सल्ले आणि फिक्कट शब्दात तक्रार नोंदणी. फायदा ईतकाच झाला की त्यांनी ती तक्रार विक्रेत्याला पोहोचवली व फोन वरुन वरचंच सगळं मराठीत झालं व विक्रेत्याने हि बोलवलं. गाडी घेउन गेलो, तर यावेळेस मेकॅनिक लोकांचे मुकादम/पर्यवेक्षक/सुपरवाईजर किंवा आणखी काही, असे जे कोणी असतात ते मला भेटले. रड्कहाणी पुन्हा. पण या सरांनी कमित कमि २-३ सर्विसींग होउ द्या आपण एवरेजचं करुन देउ, असा भरवसा दिला, आणि एकदा गाडी आणा आपण एवरेज चेक करुन घेउ असंही सांगितलं. ऑफिससमोरच्या गॅरेज वाल्याला एकदा विचारलं तर त्याने तर थेट ५००० कि.मी. नंतर एवरेज मिळेल असं सांगितलं. दरम्यान हे एवरेज काढणं/ चेक करनं म्हणजे नेमकं काय याची चौकशि केली तर समजलं की गाडी ला एक बाटली लावुन, त्याची नळी पेट्रोल च्या ठिकाणी बसवतात व त्या बाटलीत १०० मि.लि. पेट्रोल टाकुन गाडी चालवायची, गाडी जे अंतर कापेन गुणिले १० कि भेटलाच गाडीचा एवरेज. हा.का.ना.का. सांगितल्याप्रमाणे गाडी घेउन गेलो. ते नळी, बाटली जोडणे सोपस्कार पार पाडले, आणि विक्रेत्याचा तोच पहिला माणुस सोबत घेतला. गाडी ६.८ कि.मी. पळाली. त्याने हि एवरेज कमि देतेय असं कबुल केलं, व आता दुसर्‍या सर्विसींग ला आणा किंवा एकदिवस गाडी ठेउन जा असा सल्ला दिला. आता शंका. १) कंपनी सांगते त्यापेक्षा किती कमि एवरेज ची अपेक्षा ठेवावी? २) अपेक्षित एवरेज केव्हापासुन मिळतो? ३) अपेक्षित एवरेज मिळण्यसाठी गाडी किती वेळ(किंव किती कि.मी पर्यंत) कमि गतिने चालवावि? ४) १००मि.लि. चे परिक्षण किती विश्वासार्ह आहे? ५) १००मि.लि. च्या परिक्षणाची काही नोंद वगैरे नस्ल्याने काही फरक पडेन का? ६) ईतकं करुनही जर गाडी कमिच एवरेज देत असेल तर, पुढची कारवाई काय असावी? i-Smart घेउन i-Fool झालो की काय असं वाटलं म्हणून ईथे विचारलं

वाचने 24607
प्रतिक्रिया 109

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

आमाला फ्री भेटलत … ५०० किमी झाले की करा ल्युब! तशी शेपरेट घ्यायची गरज नाई. २ मिनटाच काम असते. सेंटरवाल्यालाच पकडा.

परवाच सरांसोबत अ‍ॅक्टिवा वर प्रवास करत होतो. सुरु करतानाच पुढच्या चाकात कमी हवा असल्याचं सरांच्या निदर्शनास आणुन दिलं. पंपावर जाउन हवा भरली, तर त्याने हि, "कदाचीत पंक्चर असेल चेक करुन घ्या." असा सल्ला दिला. साधारण १०-१५ कि.मि. नंतर एका पंक्चर वाल्याकडून चेक केलं तर त्याने ते कसलंतरी पाणी चाकावर ओतुन जिथे बुडबुडे आले तिथे दाभणासारखी सुई भस्सकन घातली आणि दुसर्‍या तसल्याच सुईने एक चिक्कट दोरा त्यात ओवला. झालं. असं एकेक करुन त्याने ६ पंक्चर काढले.
  1. ट्युब्लेस टायर्सचे पंक्चर असेच काढतात का?
  2. एकाच वेळेस ६ पंक्चर होते की त्याने काहीतरी करुन ६ पंक्चर काढले?
  3. ट्युब्लेस टायर्स पंक्चर होउनही लौकर कळत नसेल तर कसे लक्ष ठेवावे?
  4. ट्युब्लेस टायर्सची ट्युबवाल्या टायर्स पेक्षा वेगळी काय आणी कशी काळजी घ्यावी?

In reply to by सत्याचे प्रयोग

ह्या हिशोहिने त्य हुशेन बोल्ट्ला पण हरविन कुणी
अगागागागा.. अरे भाई, कहना क्या चाहते हो? पारच वाट लागली डोस्क्याची..

दुचाकीस्वारांच्या जातीत महिला भरपूर संख्येने असूनही या चर्चेत कितीशा महिलांनी मत नोंदवलं आहे?

In reply to by कौन्तेय

दुचाकीस्वारांच्या जातीत महिला भरपूर संख्येने असूनही या चर्चेत कितीशा महिलांनी मत नोंदवलं आहे?
मुद्दा बरोबरय पण १. इथे मोटरसायकलवर चर्चा चालली आहे. बहुतांश महिला स्कुटर प्रकारच्या दुचाकी चालवितात त्यामुळे त्यांना या धाग्यात इंटरेस्ट नसणे शक्य आहे. २. महिलांना तांत्रिक बाबींपेक्षा सुरक्षा आणि / किंवा स्कुटरचे बाह्यरुप कसे आहे यात जास्त रस असावा असे वाटते. उदा. कोणता रंग जास्त चांगला दिसेल ? लुक्स कसे आहेत वगैरे वगैरे. जाणकार म्हैला जास्त प्रकाश टाकू शकतील.

In reply to by टवाळ कार्टा

व्हयं गां. इसारलूच व्हतू बगा म्यां. आत्ता आठिवलं. आमी लयचं जालं तर काळ्या / निळ्या इजारीवर कंच्याबी रंगाची बंडी घालतू. देवा, एक डाव मापी द्या. :)

In reply to by काळा पहाड

बस ??? पुरुषांचे रंगांचे ज्ञान स्त्रियांपेक्षा फारच कमी असते. तुम्ही वांगी कलर, मोरपंखी कलर, रानी कलर, आंबा कलर अशी रंगांची नावे ऐकली आहेत काय ?

In reply to by धर्मराजमुटके

पिवळट हिरवा, हिरवट जांभळा, जांभळट निळा, नवरट डांबरी.....

In reply to by म्हया बिलंदर

ह्ये सगळे कलर अपाचे नायतर यामाहा एफ्झी आणि वेस्पात मिळतात. नशीब चटणी कलर मागत नाहीत.

In reply to by म्हया बिलंदर

चिंतामणी कलर माहितेय का??

हे सगळं सर्विस सेंटर मधे कसं बरं रिप्लिकेट करणार????? गाडी स्टँडवर लाऊन अ‍ॅव्हरेज काढता येत नाही, त्यासाठी ती चालवावी लागते.
परंतू तुम्ही म्हणता तसेही गाडीचे अ‍ॅव्हरेज काढले जात नाही. गाडी एका जागी उभी करुनच ही टेस्ट केली जाते. खाली दिलेल्या लिंकनी कदाचीत तुमचे समाधान होइल अशी आशा करतो. http://www.bikesindia.org/reviews/how-realistic-the-certified-fuel-effi… बाईकच्या कंपनीला अशी सुविधा अधिकृत सर्विस सेंटरला देणे अशक्य नाही. कदाचीत आपले पितळ उघडे पडेल अशी बाईक कंपनीला भीती वाटत असेल. म्हणून मी जर का कंपनी असा दावा करते तर ती कंपनी तिच्या अधिकृत सर्विस सेंटरला आयडीअल कंडिशन्समध्ये गाडिचे अ‍ॅव्हरेज काढून का देत नाही? दूध का दूध पानी का पानी समोरच होईल. असे म्हटले होते.

In reply to by मार्मिक गोडसे

खिक्क...कस्ले विनोदी लिहिता हो...सविस्तर प्रतिसाद नंतर देईन

खिक्क...कस्ले विनोदी लिहिता हो...सविस्तर प्रतिसाद नंतर देईन
मी बाइकचे अ‍ॅव्हरेज काढण्याच्या डायनो टेस्टबद्दल लिहिलेय. त्यात विनोदी असे काय आढळले? अजून कोणत्या वेगळ्यापद्धतीने बाइकचे आयडीअल कंडिशन्समध्ये अ‍ॅव्हरेज काढत असतील तर ते जाणून घ्यायला आवडेल. सविस्तरच द्या. ज्ञानात भर पडणे महत्वाचे.

In reply to by मार्मिक गोडसे

अर्रे हा प्रतिसाद द्यायचा राहूनच गेलेला विनोदी यासाठी लिहिले कारण बाईकचा standard average हा ARAI या मान्यताप्राप्त संस्थेकडून आलेला असतो...उठसूठ कितीही वेळा टेस्टिंग केले तरी त्यात बदल होऊ शकत नै तसेच जर बाईक कंपनीने असे उठसूट कोणाही सोम्या-गोम्यासाठी (तुम्ही त्यातले नै असेच आपण समजू) सर्व्हिस सेंटरमध्ये टेस्टिंगची सोय ठेवली तरी नेहमी तेच तेच रिझल्ट मिळणार पण त्यासाठी सर्व्हिस सेंटरला त्याचा मेंटेनंस किती? ते लोक सरळ फाट्यावर मारणार असा non-productive खर्च

फुस्स !
उठसूठ कितीही वेळा टेस्टिंग केले तरी त्यात बदल होऊ शकत नै
असहमत. असे ARAI छातीठोकपणे सांगू शकत नाही. कंपनी बनविलेली प्रत्येक गाडी ARAI कडून टेस्ट करून घेत नाही. असे असते तर एकाच कंपनिच्या सारख्याच मॉडेलच्या दोन वेगवेगळ्या बॅचच्या बाइकच्या अ‍ॅव्हरेजमध्ये फरक पडला नसता. माझ्या चुलत भावाची नवी कोरी स्प्लेन्डर ४५ च्या पुढे अ‍ॅव्ह्रेरेज देत नव्हती. कंपनिच्या अधिकृत सर्विस सेंटरला नियमीत सगळ्या सर्विस करूनही गाडीच्या अ‍ॅव्ह्रेरेजमध्ये काहीही फरक पडला नाही. सर्विस सेंटरवाले गाडीत दोष आहे हे मानायला तयार नव्हते. मी स्वतः गाडीचे अ‍ॅव्हरेज काढून बघीतले पुन्हा रिझल्ट तोच. शेवटचा उपाय म्ह्णून गाडीचे ब्लॉक पिस्टन बाहेरच्या गॅरेजवाल्याकडून बदलले. महिन्याभरात गाडीने ६० च्या पुढे अ‍ॅव्हरेज दिले. कंपनीने अ‍ॅव्हरेजच्या बाबतीत दावा जरूर करावा त्याचबरोबर जबाबदारीही घ्यावी. वाटल्यास टेस्टिंगचे पैसे घ्यावेत. जो ग्राहक अ‍ॅव्हरेजसाठी गाडी घेतो तो आयुष्यभर पेट्रोलवर ज्यादा पैसे खर्च करण्यापेक्षा टेस्टिंगला पैसे देण्यास नक्कीच नकार देनार नाही. धन्यवाद!

In reply to by टवाळ कार्टा

गेल्याच आठवडयात एका i-smart वाल्याला विचारलं तर त्याने, "सध्या तरी २७(नेमकं??) देतेय पण ते शोरुम वाले म्हणतात की पहिल्या सर्विसींग नंतर(म्हण्जे नुकतीच घेतलेली असेल) जास्त देईल." असं सांगीतलं. मला २७ पेक्षा जास्त भेटतोय म्हणुन समाधानी व्हावं की अपेक्षेपेक्षा कमी म्हणुन कुजत बसावं?

In reply to by म्हया बिलंदर

आय स्मार्ट ला २७ मायलेज? ह्म्म!! ४१ मायलेजवाली व्यागन आर का काय ती गाडी घेउन टाका मस्तं फिरा गारेगार एसीमधुन.

In reply to by सुबोध खरे

नाही ओ सर... अजुन १०० होतंच नाही ६० च्या आसरासंच पळतेय.

In reply to by म्हया बिलंदर

तुमच्या चालविण्यातच कायतरी गडबड असेल. आता बायकोला सांगू नका. विचारले तर बिनधास्त ५० सांगायचे. त्यांना ते पण जास्त वाटेल.

२७ मायलेज कसे मिळेल पेट्रोल चोरी तरी होत असेल अथवा टाकी किंवा कार्ब्यूरेटर मधून गळती होत असेल. माझ्या हिरो होंडा मधील पिस्टन रिंग खराब झालेल्या असताना सुद्धा ४५ मिळत होते.

२७ फक्त??????? कुच तो गडबड है दया..