दुचाकी घेतली पण... काही शंका
बरेच दिवस वेगवेगळे पर्याय शोधुन, माहिती काढुन, चार लोकांना विचारुन शेवटी एक दुचाकी घेतली.
ऐपत ६००००/-(कमि/जास्त), रोज चा वापर ६०-८०कि.मी(कधि कधि १०० देखिल), आणि सर्वात महत्वाचं "मि स्प्लेंडर किंवा पॅशन वर बस्णारच नाहि" अशी हिची धमकी अस्ल्याने चाळुन चाळुन शेवटी हिरो चि आय स्मार्ट ठरवली.(स्प्लेंडरच पण हिला नाही समजलं)
गाडी विकणारा प्रामाणिक पणे त्याचं काम करित होता.
तो-"सर कंपनी तो १०२ बोलती है, लेकिन गाडी ७५-८० तो देगी."
मी-"किसीने खरिदी है पय्ले?"
तो-"अरे, बोहोत."
मी-"उन्कु, कितना दिया."
तो-"किसीने ८० बोला किसीने ९०, एक सरने तो १०५ बताया, लेकिन हमें सच नहि लगता."
मी-"तो, क्या क्या खबरदारी लुं, तो ज्यादा एवरेज देगि?"
तो-"५०० कि.मी. तक ४० कि स्पीड से दोडाईये, ज्यादा एवरेज देगी.बाकी रेग्युलर सर्विसींग और चेकअप."
(आणखी बरिच प्रश्नोत्तरे..)
त्याने त्याचं काम चोख केलं.
पैसे मोजले, टाकी भरली, गाडी थेट गावि. गाव जास्त लांब जरी नसलं तरी जाणं-येणं, थोडं फार फिरणं, असं करत करत गाडी पहिल्यांदा रिजर्व ला लागली तेव्हा माझ्या हिशोबाने गाडी ने ६० चि सरासरी दिली.
त्याने सांगितलेले सगळे नियम पाळुन काळजी घेउन सुद्धा हे म्हणजे खुपंच कमि झालं.
त्याला फोन केला, त्याने गाडी घेउन बोलवलं.
पहिल्या सर्विसींग साठी चे ५०० कि.मि. झाले होते म्हणुन सर्विसींगलाच घेउन गेलो.
यावेळेस मेकॅनिकला रडकहाणि सांगितली.
तो-"अवो सर, १००० कि.मी. ला कुठं एवरेज मिळ्तो का?"
मी-"मग?"
तो-"कमित कमि २०००-३००० तरी."
मी-"मग तो पर्यंत?"
तो-"गाडी ४० ने चालवायची, एक दोन सर्विसींग होऊ द्या, एवरेज काढुन देउ ना तुम्हाला."
संध्याकाळी गाडी घेतली. वापरली. पुन्हा तेच, जरा फरक नाही.
लावला टोल्-फ्री ला फोन.
टोल्-फ्री ला फोन लावल्यावर जो अनुभव येतो तोच.(हे दिल्लीत बसलेले होते. सगळं हिंदीत.)
भावनारहीत सांत्वन, फुकट्चे सल्ले आणि फिक्कट शब्दात तक्रार नोंदणी.
फायदा ईतकाच झाला की त्यांनी ती तक्रार विक्रेत्याला पोहोचवली व फोन वरुन वरचंच सगळं मराठीत झालं व विक्रेत्याने हि बोलवलं.
गाडी घेउन गेलो, तर यावेळेस मेकॅनिक लोकांचे मुकादम/पर्यवेक्षक/सुपरवाईजर किंवा आणखी काही, असे जे कोणी असतात ते मला भेटले.
रड्कहाणी पुन्हा.
पण या सरांनी कमित कमि २-३ सर्विसींग होउ द्या आपण एवरेजचं करुन देउ, असा भरवसा दिला, आणि एकदा गाडी आणा आपण एवरेज चेक करुन घेउ असंही सांगितलं.
ऑफिससमोरच्या गॅरेज वाल्याला एकदा विचारलं तर त्याने तर थेट ५००० कि.मी. नंतर एवरेज मिळेल असं सांगितलं.
दरम्यान हे एवरेज काढणं/ चेक करनं म्हणजे नेमकं काय याची चौकशि केली तर समजलं की गाडी ला एक बाटली लावुन, त्याची नळी पेट्रोल च्या ठिकाणी बसवतात व त्या बाटलीत १०० मि.लि. पेट्रोल टाकुन गाडी चालवायची, गाडी जे अंतर कापेन गुणिले १० कि भेटलाच गाडीचा एवरेज. हा.का.ना.का.
सांगितल्याप्रमाणे गाडी घेउन गेलो. ते नळी, बाटली जोडणे सोपस्कार पार पाडले, आणि विक्रेत्याचा तोच पहिला माणुस सोबत घेतला. गाडी ६.८ कि.मी. पळाली. त्याने हि एवरेज कमि देतेय असं कबुल केलं, व आता दुसर्या सर्विसींग ला आणा किंवा एकदिवस गाडी ठेउन जा असा सल्ला दिला.
आता शंका.
१) कंपनी सांगते त्यापेक्षा किती कमि एवरेज ची अपेक्षा ठेवावी?
२) अपेक्षित एवरेज केव्हापासुन मिळतो?
३) अपेक्षित एवरेज मिळण्यसाठी गाडी किती वेळ(किंव किती कि.मी पर्यंत) कमि गतिने चालवावि?
४) १००मि.लि. चे परिक्षण किती विश्वासार्ह आहे?
५) १००मि.लि. च्या परिक्षणाची काही नोंद वगैरे नस्ल्याने काही फरक पडेन का?
६) ईतकं करुनही जर गाडी कमिच एवरेज देत असेल तर, पुढची कारवाई काय असावी?
i-Smart घेउन i-Fool झालो की काय असं वाटलं म्हणून ईथे विचारलं
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दादानु इंजिनं नवीन असा. जरा
कंपनी सांगते ते वजा २० धरून
एक रोचक शंका
बरोबर तर्क आहे तुमचा.
थोड्या वेळाने सविस्तर लिहितो.
वाट पाहतोय
तुम्ही पहा तो लावेल. :)
वाट असे कोण लिहिणार =))
वाटेविषयीचं बोलतोय मी.
आणि सर्वात महत्वाचं "मि
म्हया, मी हिरोच्या जवळपास
गाडी जुनी झाल्यावार
कॅप्टन जॅक स्पॅरोंशी सहमत.
हो तशी पय्लीच म्हणायची. पण
धन्यवाद
सर्विसींग्,ऑईल बदलने, चाकातली
कारण त्यांनी विकत घेतली आहे :
कळले तुझ्या ऑटो कन्स्लटंट
छान...
माझे मत
monthly average
७ वर्षे जुन्या होंडा शाईनचा
रिझर्व ते रिझर्व हीच बेस्ट पद्धत.
मस्त
रिझर्व ते रिझर्व
सहमत.
तारांकीत म्हणजे खोटे नाही
'तारांकित म्हणजे खोटे' हे
त्यामुळे जाहिरातीतल्या
जास्तची अपेक्षा कोण करतेय?
बाईक कंपन्यांचे टेस्ट ट्रॅक्स
मिळेल की....कंपन्या ज्या
सुमारे ३०० किमीचा प्रवास ताशी
धन्यवाद, खरंच त्यानंतर तो
अॅवरेज चा विचार का करता ???????
नितिन मालक तुम्हीच खरे
एवरेज चा विचार
मला एक प्रश्न विचारावासा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailerबाईकच्या मॅन्युअल मध्ये ऑईल
ओक्के. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailerहे खरेय का?
चुकीचे आहे. म्यानुअलनुसारच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingCastrol किंवा कोणत्याही
शेल
काल मी Motul 7100 20w50 इंजि.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoहे
बाईक मॅन्यूअल मधे जे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoकोण करतेय असा हट्ट?
प्रतिसाद पूर्ण वाचा
मला हेवनवासी झालेल्यांची आठवण