Skip to main content

रानी

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 22/06/2015 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
नथं नाकातं खुलली लाली गालात फुलली कई होटातं ऊलली कोन्या जगातं भुलली खाली झुकली नजर कायं दिसलं गोजरं मले पाऊनं खरचं तूह्यं हासनं लाजरं तुले कोनाची कदरं डोई घेतला पदरं चालू नकोसं तर्तरं जीवं उळते वधरं पापन्याची फळंफळं पदराची सळंसळ कायं मनी गळंबळं सांग मले घळंघळं डूलं डुलतातं कानी मानं सुरई च्या वानी मोठ्या मोठ्या डोयातनी रूपं साकारलं रानी
लेखनविषय:

वाचने 1452
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

रचना आवडली. हे प्रेमकाव्य आहे असे वाटते.

In reply to by श्रीरंग_जोशी

सिं...सिं...सिं...सिर्रंग भाऊ... त...त...त...तसं काही नाही प...प...प...पण क...क...क...कसं?...

In reply to by ऊध्दव गावंडे

कवितेचा अर्थ कोणता तर जो वाचणार्‍याला भावेल तसा असं कुणीतरी मिपावर लिहिलं होतं. असो, इतरांच्या प्रतिक्रियांची वाट पाहतो. अर्थाबद्दल आताच चर्चा करून इतरांचा रसभंग करणे योग्य होणार नाही.

थोडी चर्चा करून रसभंग करतोच-जळगाव ,अमळनेर ,नंदुरबार भागातली अहिराणी बोली आहे का ?लग्न न झालेल्या मुली नाकात नथ घालतात का ?कोणता दागिना घालतात?

पापन्याची फळंफळं आणि मानं सुरई च्या वानी या दोन ओळी तर खूपच आवडल्या.