नथं नाकातं खुलली
लाली गालात फुलली
कई होटातं ऊलली
कोन्या जगातं भुलली
खाली झुकली नजर
कायं दिसलं गोजरं
मले पाऊनं खरचं
तूह्यं हासनं लाजरं
तुले कोनाची कदरं
डोई घेतला पदरं
चालू नकोसं तर्तरं
जीवं उळते वधरं
पापन्याची फळंफळं
पदराची सळंसळ
कायं मनी गळंबळं
सांग मले घळंघळं
डूलं डुलतातं कानी
मानं सुरई च्या वानी
मोठ्या मोठ्या डोयातनी
रूपं साकारलं रानी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1452
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
रचना आवडली
धन्यवाद ...
In reply to रचना आवडली by श्रीरंग_जोशी
कसं कसं? :-)
In reply to धन्यवाद ... by ऊध्दव गावंडे
थोडी चर्चा करून रसभंग करतोच
सुरेख!
सुंदर!!