धुंद होवुन गरजतो पाऊस आहे
हाय ओला बरसतो पाऊस आहे...
माय काळी आज पान्हावे नव्याने
स्पर्शण्या तिज तरसतो पाऊस आहे...
रान हिरवे नाचले बेभान आता
मोर होउन लहरतो पाऊस आहे
वीज कोसळते, सरी होती कट्यारी
शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...
बघ धरा ओलावली आता कशाने?
भेटताना हरखतो पाऊस आहे...
का चकोरा येतसे ग्लानी सुखाने?
की तयाला भरवतो पाऊस आहे...?
चल 'विशाला' जावुया रंगून आता
अंगणी या बहरतो पाऊस आहे...
विशाल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2957
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मतला मस्तच
खूब सही मतला, आवडला ….
वा!
मस्त पाऊस कविता!
धन्यवाद :)
धन्यवाद :)
बहुत खूब!
बहुत खूब!
जमलंय.
जमलंय.
खूब आहे शायरी ही धुंद थोड़ी
खूब आहे शायरी ही धुंद थोड़ी
टंक काही तू परागा सांगतो पाऊस आहे!
_/\_
_/\_
जबरदस्त
मस्त विशाल दा......
अजुन येउ देत
अतिशय सुरेख.
अतिशय सुरेख.
_/\_
_/\_
खूपच छान! अजून येत राहू द्या!
खूपच छान! अजून येत राहू द्या! :)
टोपी काढण्यात आली आहे! खूप
टोपी काढण्यात आली आहे! खूप छान लिहिता तुम्ही!
धन्यवाद रातराणी _/\_
In reply to टोपी काढण्यात आली आहे! खूप by रातराणी
धन्यवाद रातराणी _/\_
वा! सुंदर!
वा! सुंदर!