Skip to main content

शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/06/2015 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
धुंद होवुन गरजतो पाऊस आहे हाय ओला बरसतो पाऊस आहे... माय काळी आज पान्हावे नव्याने स्पर्शण्या तिज तरसतो पाऊस आहे... रान हिरवे नाचले बेभान आता मोर होउन लहरतो पाऊस आहे वीज कोसळते, सरी होती कट्यारी शस्त्र ओले परजतो पाऊस आहे... बघ धरा ओलावली आता कशाने? भेटताना हरखतो पाऊस आहे... का चकोरा येतसे ग्लानी सुखाने? की तयाला भरवतो पाऊस आहे...? चल 'विशाला' जावुया रंगून आता अंगणी या बहरतो पाऊस आहे... विशाल
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2939
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

मस्त पाऊस कविता!

_/\_

मस्त विशाल दा...... अजुन येउ देत

_/\_