Skip to main content

पाऊस .. तेव्हाचा

लेखक गोल्या यांनी मंगळवार, 16/06/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
खर्‍याखुर्‍या प्रेमासारखा पाऊस तेव्हा दाटायचा बरोब्बर सात जूनला येवून तो भेटायचा....!! अडचणी होत्या चिकार सर्व दूर करायचा, मन हुरहुरलं की हात तो धरायचा ....!! तेव्हाचा पाऊस खरा खरा पाऊस वाटायचा, प्रत्येकाच्या आठवांत घर तो थाटायचा ....!! लहान, थोर, वडीलधारे आदर तो राखायचा, सार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद तो माखायचा....!! रसायन, फवारे वगैरे लाडावलेला नसायचा, येरे येरे पावसाच्या गाण्यालाही फसायचा....!!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2063
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

@ रसायन ,फवारे वगैरे लाडावलेला नसायचा, येरे येरे पावसाच्या गाण्यालाही फसायचा....!!!!>> ह्हे ह्हे ह्हे! हा साधेपणा आवडला.

आवडली. बाकी लहानपणीपासून दुष्काळी भागातच आहे. काही वर्षांपूर्वी जिकडे राहायला आले तिथेही पाऊस कमी होत होत आता दुष्काळच आहे! प्रत्येकाच्या आठवांत घर तो थाटायचा ....!! >>> आठवांत म्हणजे काय?

कविता आवडली.

खर्‍याखुर्‍या प्रेमासारखा पाऊस तेव्हा दाटायचा. -दिलीप बिरुटे