मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दीपक कुवैत आणि प्यारे ह्यांच्या बरोबर झालेला ठाणे कट्टा - १५ जून २०१५

खटपट्या · · काथ्याकूट
या पुर्वी मी कधी कट्टा व्रुत्तांत लीहील्या नसल्याकरणाने (कधी कट्ट्याला गेलोच नाही :)) मुविंनी यावेळचा कट्टा व्रुत्तांत लीहीण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी जरी वुत्तांत लीहीत असलो तरी कट्ट्याला उपस्थीत सर्व मिपाकर प्रतिसादामधे आपापला व्रुत्तांत लीहू शकतात्/लीहावा. असो. तर होणार होणार म्हणताना दीपक कुवेत यांचा ठाणे कट्ट्याचा दीवस उजाडला. या कट्ट्याला दोन उत्सवमुर्ती होत्या, एक दीपक कुवेत पनीरवाले आणि दुसरे अल्जीरीयाचे प्यारे. या वेळेस ट्क्याने काहीही गोंधळ होउ न देता अमीत गार्डन हे ठीकाण पक्के करुन टाकले. (असेही पुणे कट्ट्याच्या गोंधळाला टका जबाबदार नव्हताच. असे माजे स्पष्ट मत हाये. बाकीच्यांचे काहीही असो.) त्यामुळॅ फक्त कोण कोण येणार याचीच चर्चा चालू होती. मी, टका आणि मामलेदार कळव्यातलेच असल्यामुळे आम्ही येणारच होतो. यजमानच होतो आम्ही. संध्याकाळी ७:०० ची वेळ काही गोंधळ न घालता ठरली असल्यामुळे मी कामावरुन लवकर निघून ६:३० लाच घरी येऊन बसलो. कारण कट्टा ठीकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर होते. बरोबर ७:३० वाजता प्यारे यांचा अमित गार्डनच्या नामफलकाबरोबर घेतलेला सेल्फी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर थडकला. आणि त्याखाली प्रश्न "कोणी हाय का?". लगेच टकाने मला अमित गार्ड्नकडे कूच होण्याची आज्ञा दीली. ५ मिनिटात येतो असे टायपून मी अमित गार्डन येथे पोहचलो. पोहोचल्यावर मी प्यारे यांना लगेच ओळखले आणि माझी ओळख करुन दीली. दीवसभराच्या धावपळीने प्यारे थकल्यासारखे वाटत होते. हाय हलो आणि जुजबी विचारपूस झाल्यावर आम्ही अमित गार्डनमधे बसण्याचा निर्णय घेतला. पण मिसळपाव या नावाने आरक्षण आहे का अशी विचारपूस केली असता तेथील द्क्षिण भारतीय माणसाने आमच्याकडे विचित्र प्रश्नार्थक नजरेने पाहीले. शेवटी ७/८ लोकांचे आरक्षण असल्याचे कळले. तिकडे टका डॉ. खरे यांची कळवा स्थानकावर वाट पहात होता. थोड्याच वेळात तो मुवि, भटक्या खेडेवाला, कंजूष, विनोद१८ आणि उत्सवमुर्ती दीपक पनीरवाले यांना घेउन आला. डॉक नंतर येणार असे कळले. सर्वांनी आपापली ओळख करुन देताच, मुवि यांनी बैठकीचा ताबा घेतला. आल्या आल्याच मुवींनी "हा कट्टा एका त्रासदायक डूआयडी चा मिपावरील शेवटाच्या प्रित्यर्थ होणार असल्याचे जाहीर केले". लगेच डूआयडीवर चर्चा सुरू झाली. डूआयडी कसे ओळखावेत, त्यांना कसे तोंड द्यावे, त्यांच्या त्रासापासून कसे वाचावे याबाबतीत बराच खल झाला. तसे काही चांगले डूआयडीदेखील आहेत मिपावर...वगैरे. दरम्यान परत टका कळव्यात जाउन डॉ. खरे यांना घेउन आला. मामलेदार यांनी यायला जमणार नसल्याचे कळवले. (मामलेदार, आपको जनता माफ नही करेगी.) :) अजून एक मिपाकर पम्या हे कळव्यात राहतात असे कळल्याने त्यांनाही बोलावण्याचा प्रयत्न झाला पण त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही. माझी ही मिपाकरांबरोबर पहीलीच भेट असल्यामुळे थोडे दडपण आले होते. पण सर्व मिपाकर आपण वर्षानुवर्षे भेटत आहोत अश्या रीतीने बोलू लागल्याने दडपण गळून पडले. विनोद१८ यांनी आपली परखड मते मांडायला सुरवात केली, मिपाचा ईतिहास, बाकीची मराठी संस्थळे यावर साधक बाधक चर्चा झाली. कंजूष हे बराच पायी प्रवास करतात त्यामुळे त्यांना पारसिकनगरचे डोंगर दर्‍या यांची ईत्यंभूत माहीती असल्याचे कळले. भटक्या खेडेवाला यांनी दोन्/तीन सुंदर पुस्तकांची नावे सांगीतली. मिपाचा डोलारा कसा चालतो, कोण कोण संपादक आहेत याबद्दल मुविंनी छान माहीती दीली. मागील ६ तारखेच्या कट्ट्याचे फोटो का नाही टकले यावर चर्चा झाली. डूआयडी वर प्रतिबंध घालण्याचे काही जालीम उपाय डॉ. खरे यांनी सुचवले. तसेच त्यांनी धुम्रपान आणि तंबाखू याचे शरीराच्या अंतर्गत भागात काय परीणाम होतात हे सांगीतले. ह्रुदयविकारवरही त्यांनी खूप छान माहीती दीली. एकंदर कट्ट्यावरच्या गप्पा रंगत चालल्या होत्या. दरम्यान दोनवेळा वेज प्लॅटर येउन गेले, त्याचे फोटो बहूतेक कंजूषकाकांकडे आहेत. ते ईनोसहीत प्रकाशीत करण्यात येतील. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन गट पाडून पेय आणि वेगवेगळे पदार्थ मागवण्यात आले. बाजूलाच उल्हास नदी आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे डासांचा त्रास होत होता. मी सर्व सदस्यांना आमच्या निसर्गरम्य परीसराबद्दल माहीती दीली, पण सर्वच सदस्य आमच्या भागाबद्दल माहीती ठेउन होते. दोन तीन वेळा स्टार्टर आणि पेय येउन गेल्यामुळे सर्वांची पोटे भरली होती. त्यामुळे परत मेन कोर्स मधे कोणाला ईंटरेस्ट नव्हता. म्हणून मग दाल खीचडी (की खीचडा?) मागवण्यात आला. मधून मधून मी आणि कंजूष कट्ट्याचे फोटो काढत होतो. हॉटॅल मालकाने बाजुलाच रांगेत मांडून ठेवलेल्या खुर्च्यांचा वापर करुन काही फोटो काढण्यात आले. ७:३० ला सुरू झालेला कट्टा ११:०० वाजेपर्यंत संपत नव्हता, शेवटी बील मागवून निघायचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर साहेबांनी स्वयंस्फुर्तपणे ज्यांना मुब्रा स्थानकाकडे जायचे होते त्यांना मुंब्र्यात सोडायची जबाबदारी घेतली. टकाने घेतलेली कार कामाला आली. उत्सवमुर्ती प्यारे यांनी टकाच्या घरी जायचा निर्णय घेतला व दुसरे उत्सवमुर्ती दीपक कुवेत यांना मी मुब्र्यात सोडून आलो. अशा रीतीने कधी संपूच नये असा वाटणारा हा कट्टा संपान्न झाला.. abcd डावीकडून उभे - भटक्या खेडेवाला, मुवि, प्यारे आणि टका. बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. सुबोध खरे. abcd रंगलेल्या गप्पा. abcd दोन उत्सवमुर्ती

वाचने 20381 वाचनखूण प्रतिक्रिया 160

मदनबाण Tue, 06/16/2015 - 12:29
चला खटपट्या साहेब शेवटी कट्टेकरी झाले तर ! ;) बाकी कायअप्पावर अपडेट स्टेटस आणि फोटो पाहिलेत. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

मुक्त विहारि Tue, 06/16/2015 - 13:30
@ खटपट्या ===> आता लिहायला सुरुवात केलीच आहेस, तर अजुन तुझे लेख येवू देत. लवकरच (बहुदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात) ठाण्याला अजुन एक कट्टा होत आहे.

In reply to by नाखु

खटपट्या Tue, 06/16/2015 - 16:01
या ठिकाणी साहीत्य संपादकांची मदत मिळेल का ? खालील लींका वापरलेल्या आहेत. http://s5.postimg.org/9ln4fr3if/WP_20150615_23_09_00_Pro.jpg http://s5.postimg.org/6g2ipjkw7/WP_20150615_21_26_28_Pro.jpg http://s5.postimg.org/52avu8lmv/WP_20150615_20_59_44_Pro.jpg http://s5.postimg.org/9s0tiucnb/WP_20150615_20_26_55_Pro.jpg

मामलेदार यांनी यायला जमणार नसल्याचे कळवले. (मामलेदार, आपको जनता माफ नही करेगी.) :)
पुढच्या वेळी नक्की येणार हो !!! ( बाबा पनीरवाले व प्यारे अल्जीरियावाले यांना न भेटता आल्यानं निराश !) बाकी ते बाबा पनीरवाले खाद्यंतीला कधी बोलावणार काही कळलं का?

प्रभाकर पेठकर Tue, 06/16/2015 - 14:58
जब्बरदस्त पोटशूळ उठला आहे. इनोने काम भागायचे नाही. युएईत कोणी आहेत का मिपावाले? एक गल्फी (सेल्फीच्या चालीवर) कट्टा करून टाकू. सुंदर आटोपशिर वर्णनाने कट्टा आवडल्या (मिपावर असेच म्हणतात नं?) गेला आहे.

प्यारे१ Tue, 06/16/2015 - 16:02
कट्टा दीपक साठी आयोजित करण्यात आला होता. मी योगायोगाने मुंबईत असल्याने कट्टयाला उपस्थित होतो त्यामुळे कट्टयाचे शीर्षक बदलण्यात यावे ही नम्र विनंती. कट्टा छानच झाला. रोम रोम में बसा 'मिपाधर्म' संस्कार है चा प्रत्यय आला. बाकी मिपा हिमनगासारखं वर 1/8 आणि खाली 7/8 आहे यात दुमत नाही!

पैसा Tue, 06/16/2015 - 17:25
मजा केलेली दिसतेय! पुणे कट्टा आणि मुंबईकट्टा यात पुणे आणि मुंबई इतकाच फरक दिसतोय!

In reply to by पैसा

मुक्त विहारि Tue, 06/16/2015 - 17:32
आम्हा मुंबईकरांचे पाणीच निराळे. असो, जास्त चोखंदळपणा न करता, चार मिपाकर ठरवतील ते कट्ट्याचे ठिकाण.

In reply to by मुक्त विहारि

टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 13:14
जास्त चोखंदळपणा न करता, चार मिपाकर ठरवतील ते कट्ट्याचे ठिकाण.
आणि एकाने ठरवलेले ठिकाण बाकीचे "लगेच" मान्य करतात हो ;)

मृत्युन्जय Tue, 06/16/2015 - 17:28
मस्त झालेला दिसतोय कट्टा. एक तरी ठाणे कट्टा करायचा आहे. आमच्या गावात आम्ही अजुन कट्टा करु शकलेलो नाही याचा सल आहे मनात. काहिनाही तर किमान वडापाव कट्टा करुयात ठाण्याला. साला तो राजमाता आणि दुर्गाचा वडापाव म्हणजे जीव की प्राण. लय लय लय लय वर्षे झाली खाउन. मिस माय ठाणे डेज :(

In reply to by मृत्युन्जय

खटपट्या Tue, 06/16/2015 - 18:34
कधीही या म्रुट्युंजय, रच्याकने, राजमाता आणि दुर्गाच्या वडापाव ईतकाच गजानन चा वडापावही खूप प्रसीद्ध आहे. ५वी ते १०वी, गजाननच्या वडापाववर जगलेला - खटपट्या. =))

In reply to by टवाळ कार्टा

प्रमोद देर्देकर गुरुवार, 06/18/2015 - 13:17
@ टक्क्या , खटपट्या:- आपल्या कळव्यात मनिषनगरला गेट क्रमांक १ जवळ पण एक गुरुकृपा वडापाववाला आहे. त्याच्याकडचे सगळेच पदार्थ खुप छान आहेत. उदा. इडली, मेदुवडा, अळुवड्या, ढोकळा वगैरे पण वडापावसाठी लोक खास जातात. खुप गर्दी असते तिथे.

In reply to by प्रमोद देर्देकर

टवाळ कार्टा गुरुवार, 06/18/2015 - 13:23
नाय रे...तो इतका खास नसतो...त्यापेक्षा गेट नं.२ ला संध्याकाळी एक वडापावची गाडी लागते...तिथे खाउन बघ...भारी आहे टेस्ट

In reply to by टवाळ कार्टा

खटपट्या Wed, 06/17/2015 - 13:53
मी पण पाँसर व्हायला तयार हाये. तसे ठाण्यात बरेच काही बघण्यासारखे आहे. संपूर्ण पश्चिम भारतातील सर्वात मोठे जैन मंदीर ठाण्यात आहे. अतिशय प्राचीन अशी पारशी अग्यारी ठाण्यात आहे अतीशय प्राचीन ठाणे बंदर जीथुन आखाती देशात मालाची ने आण होत असे. अतीप्राचीन असे ठाण्याचे मासुंदा तलाव त्या शेजारील सेंट जॉन बॅप्टीस चर्च. १५० वर्षे जुने ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय. उपवन येउर अशी बरीच पहाण्यासारखी ठिकाणे ठाण्यात आहेत. कट्यासाठी उपवन्/येउर ही ठीकाणे उत्तम..

In reply to by खटपट्या

टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 13:57
मंदिरे बघून डायरेक्ट उपवन/येउर =)) मानसिक म्हातारे अजूनच सिक होउ शकतात आणि हिरवट मने आणखीनच हिरवीजर्द होउ शकतात उपवन/येउर बरेच बदलले आहे आता ;)

In reply to by खटपट्या

मृत्युन्जय Wed, 06/17/2015 - 14:19
गजाननचा वडापाव मी कसा खाल्ला नाही? च्यायला कुठे आहे हे? गेल्या ५ -१० वर्षात उघडले आहे का? माझ्या आठवणी २० वर्षापुर्वीच्या आहेत. ठाणे म्हणजे माझा सॉफ्ट कॉर्नरः १. राजमाता आणि दुर्गाचा वडापाव २. मामलेदार आणी गोखलेची मिसळ ३. जनसेवाचे आइसक्रीम ४. अलोकची सॉफ्टी ५. कुंजविहारचे कागदाच्या लगद्याची लस्सी ६. कुंजविहारचा वडापाव (याचे आकर्षण केवळ याच्या साइज मुळे आण्णि अनलिमिटेड चटण्या, कांदा आणि मिरच्यांमुळे. बाकी चव ठीकठाक) नॉस्टेल्जिक झालो राव.

In reply to by मृत्युन्जय

खटपट्या Wed, 06/17/2015 - 15:39
मराठी माध्यमातील बेडेकर शाळा आहे त्यापुढे गेल्यावर एक चौक लागतो. त्या चौकातच आहे "श्री गजानन वडापाव" आणि आत्ताचा नाहीये, फार्फार जूना आहे. २० वर्षाच्याही पूर्वीचा...ईथली चटणी एकदम फेमस आहे. एक वडापाव घेउन लोक फक्त चटणीबरोबर दोन पाव संपवतात. पीठले असते तशी दीसते दीसायला. ही पहा अशी (फोटो दीसेल की माहीत नाही) abcd

In reply to by मृत्युन्जय

किसन शिंदे Wed, 06/17/2015 - 21:08
यातली मामलेदारची आणि गोखलेंची मिसळ अजूनही तग धरून आहे आणि बाकी सगळं इतिहासजमा झाल्यातच आहे. तसं म्हणायला ही सगळी ठिकाणं अजूनही चालू आहेत, पण पहिल्यासारखी प्रसिद्धी नाहीये आणि गर्दीही फार नसते. राजमाताचा वडा आणि तिथली चटणी हा त्याचा युएसपी होता, पण अलिकडे बेसनाचं कच्चं आवरण घातलेला बटाट्याचा गोळा, पिठल्यालाही लाजवेल अशी बेसनाची चटणी. साहजिकच लोकांचा ओढा कमी झालाये. कुंजविहारच्या मिसळीत फार पूर्वी झुरळ मिळाल्याची बातमी आली होती, तिथून पुढे या वडापावालाही घरघर लागली. आलोकच्या सॉफ्टीला पूर्वी जी चव मिळायची कालांतराने ती बदलली, त्याचबरोबर नाशिकच्या 'फेमस मटका कुल्फी' बर्‍यापैकी जोर पकडला, त्यामुळे आलोकची सॉफ्टीही खूप मागे पडलीये. नेहमी वेगळं आणि चटपटीत खाण्याच्या जीभेच्या सवयीमुळे ठाण्यात मी नेहमी नव्या ठिकाणांच्या शोधात असतो, त्यातून काही ठिकाणं तिथल्या अप्रतिम दर्जाच्या चवीमुळे आता आवडीची झाली आहेत. १) पाचपाखाडीतल्या प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी २) देवांगची मटका कुल्फी, रबडी वाटी ३) गोखलेतली उपवासाची मिसळ ४) सुरूची मिसळ हाऊस! (हे आता अलिकडे सापडलेय. इथे मिसळ खाल्यानंतर मामलेदारची मिसळही मला फारच फिकी वाटू लागलीये) ५) भास्कर कॉलनीतला हनुमानाच्या मंदिरासमोरचा वडापाव ६) श्रद्धा स्नॅक्स सेंटरचे समोसे आणि मूगभजी(हे खूप जूने आहे) - हाडाचा ठाणेकर

In reply to by किसन शिंदे

वेल्लाभट गुरुवार, 06/18/2015 - 13:35
भास्कर कॉलनीतला हनुमानाच्या मंदिरासमोरचा वडापाव
ती भास्कर कॉलनी नव्हे. ती ब्राह्मण सोसायटी.

In reply to by वेल्लाभट

स्वाती दिनेश गुरुवार, 06/18/2015 - 15:46
ब्राह्मण सोसायटीच ती.. आनंदाश्रमवरुन थोडं पुढे जाऊन उजवीकडे जायचं की उमा निळकंठ व्यायाम शालेकडे जाणार्‍या रस्त्यावर डावीकडे कोपर्‍यावर एक मारुतीचे मंडिर आहे, त्याच्या समोर एक वडापाववाले आहेत, मस्त असतो तो ही वडा! काय आठवणी काढताय रे.. आता इतक्यात कुठले ठाणे आणि कुठला वडापाव आणि कुठची मामि.. :( स्वाती

In reply to by अत्रन्गि पाउस

किसन शिंदे गुरुवार, 06/18/2015 - 18:57
मल्हार सिनेमाकडून तीन हात नाक्याकडे जाताना उजवीकडे एक छोटा रस्ता दमाणी इस्टेटकडे जातो त्या रस्त्याच्या अगदी सुरूवातीलाच आहे सुरूची मिसळ हाऊस. मोजून आठ माणसांना आत बसायला आहे. :)

In reply to by मृत्युन्जय

स्वाती दिनेश गुरुवार, 06/18/2015 - 15:14
गजानन वडापाव ठाण्यातला पुरातन वडापाव वाला आहे .खूप खूप पूर्वी त्याची टपरी आताचे वामन हरी पेठे आहे ना, तेथे होती. आता सुशील डेअरीच्या इथे,कौस्तुभ सोसायटीच्या खाली आहे. त्याच्या शेजारीच शेगाव कचोरीचे जॉइंट झाले आहे.

In reply to by खटपट्या

मृत्युन्जय गुरुवार, 06/18/2015 - 16:41
मला माहिती नाही खरा. कदाचित असे असेल की मी नेहमीच राजमाता आणि दुर्गा (त्यातही दुर्गा जास्त) मध्ये जायचो त्यामुळे लक्षात नसेल आले :(. आता परत ठाण्याला येइन तेव्हा खरे.

भाते Tue, 06/16/2015 - 17:55
सचित्र कट्टा वृत्तांत आवडला. इथे त्रोटक वृत्तांत लिहिला आहे आणि प्रत्यक्ष कट्टयाला (इथे न सांगण्यासारख्या) बऱ्याच विषयांवर चर्चा झाली असेल याची आधीच्या कट्टयाच्या अनुभवांवरून खात्री आहे. दिपक गेल्या वेळेपेक्षा थोडासा बारिक झालेला दिसतोय. डायटिंग करतो आहेस का रे बाबा? पुढला जुलैच्या पहिल्या आठवडयातला ठाणा कट्टा तरी विकांताला किंवा किमान शुक्रवारी ठेवा. म्हणजे मला कट्टयाला येता येईल.

In reply to by मुक्त विहारि

सूड Wed, 06/17/2015 - 21:22
पण पहिले तुम्हीच.
ते तर आहेच हो, पण हे बदलापूरातून ...गेला बाजार पुण्यातून झालं. मुंबैच्या मध्यवर्ती ठिकाणचं काही कळायला नको का? =))

In reply to by सूड

खटपट्या Wed, 06/17/2015 - 15:42
मलाही हाफीसातून फोटो दीसत नाहीये पण आठवतात त्याप्रमाणे बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. खरे

In reply to by कंजूस

टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 14:29
ब्राउसर मध्ये नाही आणि फायरवॉलचे माहित नै आणि मला अरे-तुरेच करा...मी फार फार लहान आहे तुम्च्यापेक्षा =))

कंजूस Wed, 06/17/2015 - 14:29
या फोटो न दिसण्याबद्दल मागच्या वर्षी वल्ली यांना विचारले होते. त्यांनी सांगातले काहीजण office मधून मिपा पाहतात तिथे काही साइटस ब्लॅाक केलेल्या असतात. फोटो हे मुळात दुसय्रा साइटच्या http auto request असतात.कोणाकडे Photobucket /google /Flicker/postimg यापैकी blocked केलेल्या साइटवरचे फोटो असल्यास दिसणार नाहीत.

टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 16:14
हाप-शेंचुरीनिमित्त खटपट्यांचा सत्कार एक वही व एक पेन देउन कर्ण्यात येत आहे (अभ्याने फुकटात फ्लेक्ष बनवून दिला तर तो कळवा नाक्यावर ५ मिनिटांसाठी लावण्याचे आश्वासन मोफत)...लवकरच आणखी लेखनास सुरवात करावे हे विनंती शुभेछ्छूक - समस्त कळवा + खारेगाव (पारसिक नगर सकट) हाथ कि सफाई संघटना

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Wed, 06/17/2015 - 20:41
जेंव्हा २ किंवा त्यापेक्षा अधिक मिपाकर एकमेकांना प्रत्यक्ष भेटतात, त्या क्षणापासून कट्टा सुरु होतो. त्यावेळी खाद्य-पेयाचा समाचार घेतलाच पाहिजे असे नाही. तुम्ही ठाण्याला रहात असाल तर, जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक कट्टा ठाण्यालाच होणार आहे. आम्ही कट्ट्याचे जाहीर आमंत्रण देतो. त्या कट्ट्याचे पण जाहीर आमंत्रण इथेच प्रकाशीत केल्या जाईल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

खटपट्या Wed, 06/17/2015 - 21:18
मला एकदा सूड, सगा, सचेतस आणि गुरुजी यांच्या कट्ट्याला जायचे आहे. काय ती जुगलबंदी एकदाच बघता येईल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 06/18/2015 - 07:02
लै मज्जा येते गुर्जींनापण छळायला :-D (स्मायल्या आणा रे.) स्मायली बिन मै यु..कैसे जिया..कैसे जिया स्मायली बिन...!! =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु गुरुवार, 06/18/2015 - 12:00
त्ता मुवींना एक फक्त जुगलबंदी कट्टा ठेवावा लागणारः आकर्षण येन प्रकारे: स्पांडुबा-बुवा बुवा-सगा+वल्ली बॅट्या-स्वघोषीत प्रवक्ता प्रगो-प्यारे

सांघीक

श्रीगुरुजी+क्लिंटन्+संदीप डांगे+मृत्युंजय वि पिंपातले उंदीर्+नांदेडीयन+आजानुकर्ण या सांघीक कलगी तुर्यामध्ये काही भिडू येऊन जाऊन असतील प्रो कब्बडीसारखे. नंतर "यंदा कर्तव्य" या सदाहरीत विषयासाठी एका बाजूने टक्या+कॅप्टन्+जेपी तर दुसरी कडून विषयाची तीव्रता आणि प्रतिसाद निक्ड पाहून पै ताई सक्षम भिडू मैदानात उतरवतील. मुवींसाठी मिपा जुगलबंदी कट्टा आयोजन समीतीकरीता अभा मिपा महानगरी कट्टा संघ अंकीत.

In reply to by नाखु

बॅटमॅन गुरुवार, 06/18/2015 - 13:13
ओ मी नाय ओ कसलाच प्रवक्ताबिवक्ता. तो मान निरर्थक अत्मकुंथन करणार्‍यांकडे आहे. (नेहमीचे नव्हेत, ते दुसरे.)

In reply to by बॅटमॅन

नाखु गुरुवार, 06/18/2015 - 14:14
छे च्छे ! तुल प्रवक्ता म्हटलंच नाहीय्ये,तू इकडून मैदानात उतरल की, आप्सूक उतरणार्य तुझ्या (जिव्हाळ्याच्या) प्रतिस्पर्ध्या बद्दल आहे ते. मुद्दाम येडा बनून पेढा खाणार्या बॅट्याचा पक्का शाना मैतर नाखु

In reply to by नाखु

संदीप डांगे गुरुवार, 06/18/2015 - 18:38
नाखुकाका, आम्हास संघाची (टीमची ओ.. नायतर भलतंच समजाल) अ‍ॅलर्जी आहे. त्यामुळे मी संघाबाहेर बरा. परत कुठल्या बाजूने मैदानात उतरू हे नेमकी वेळ येईपर्यंत मलाही सांगता यायचे नाही. (बाकी नाखुंनी माझं नाव मिपावरच्या दिग्गजांसोबत घेतले हे वाचून मनात गुदगुल्या झाल्या :-) )

In reply to by संदीप डांगे

नाखु Fri, 06/19/2015 - 11:06
नाही तसे काही नाही आम्च्याकडे "वाईल्ड कार्ड" प्रवेश पद्धत आहे तेव्हा काळजी नसावी आणि तसेही हे चमू खो-खो पद्ध्तीने असल्याने तुम्हाला दोन्ही बाजूंनी खेळण्याची संधी देऊ. खुलासेदार नाखु

In reply to by प्रसाद१९७१

खटपट्या Wed, 06/17/2015 - 19:19
उलट मुंबईकरांना ठाणेकर आपल्यातलेच समजतात. कारण मुंबई पूर्वी फार लहान होती. जसा जसा मुंबईचा विस्तार होत गेला तसा ठाण्याचा काही भाग मुंबईला जोडला गेला.

In reply to by प्रसाद१९७१

मृत्युन्जय Wed, 06/17/2015 - 19:22
ठाणेकर स्वतःला मुंबैइकर समजतात का हा देखील एक उप्प्रश्न आहे. मला विचाराल तर ठाणेकर मुंबै म्हटले की दात विचकतो आणि मुलुंडपल्याडच्या कुठल्याही भागाला मुंबई म्हणताना मुंबईकराची जीभ चाचरते,

In reply to by मृत्युन्जय

अत्रन्गि पाउस गुरुवार, 06/18/2015 - 17:19
वरचे लोक्स वरळीला/हाजीअलीकडे मुंबई संपते असे मानतात ... आणि सेन्ट्रल वरची स्टेशने त्यांना अगदीच नाईलाज म्हणून लक्षात असतात ...

In reply to by प्रसाद१९७१

भटक्या योगी Fri, 06/19/2015 - 11:46
अजिबात नाही......आणि आम्हा ​ठाणेकरांना 'ठाणेकर' म्हणूनच ओळखलं जाव, मुंबईकर नाही ​:)

काळा पहाड गुरुवार, 06/18/2015 - 00:58
कळविणेस अत्यंत आनंद होतो, की समांतर-मिपा कट्टा १५ जून लाच बाजूच्याच हॉटेल मध्ये संपन्न झाला. त्यावेळचा एक फोटो हाती लागला आहे. खालच्या चित्रात डावीकडून उजवीकडे १. नाना २. हितेश ३. ग्रेटथिंकर ४. सद्दाम आणि ५. टॉपगिअर्ड vidrohi

In reply to by काळा पहाड

मुक्त विहारि गुरुवार, 06/18/2015 - 09:30
बहूदा त्यांनी "पायरेट्स ऑफ द कॅरेबियन", मधल्या "जॅक स्पॅरो" कडून म्रुत्युंजय अमृत, घेतले असावे. खरे तर माईंचा जन्म इसवीसना पुर्वीचा असावा, असे त्यांच्या प्रतिसादावरून वाटते.

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि गुरुवार, 06/18/2015 - 09:46
असेही असेल.... माई तेरा महिमा अपार.... बाद्वे, शतक लागले का? आजकालची सही : आम्ही धाग्यांचे शतक लावायला ४-५ प्रतिसाद देवू शकतो.* *अटी लागू

In reply to by श्रीरंग_जोशी

खटपट्या गुरुवार, 06/18/2015 - 09:50
आणि मी काय तुमच्यासारखा लेखक नाय. जसं सुचतं तसं लीवतो. सुचायला डोस्क जरा थंड होउद्या. सद्या दोन तीन कामात व्यस्तं आहे.

In reply to by खटपट्या

श्रीरंग_जोशी गुरुवार, 06/18/2015 - 09:55
म्हणूनच 'बहुधा' लिहिलं होतं. डोब्रा वाचले होतेच फक्त बयोच्या आधी प्रकाशित झाले असा समज होता.
तुमच्यासारखा लेखक नाय
अन होऊ पण नका. ललित लेखनाची एक ओळही लिहिता येत नाही मला :-( .

भाते गुरुवार, 06/18/2015 - 11:02
मुवि, गेल्या वर्षी पावसाळ्यात (पाऊस नसताना) केलेली पळसदरीची वर्षासहल आठवली. अर्थात, पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे अजुन भरपुर वेळ आहे आपल्याकडे. या वर्षीचा वर्षासहलीचा धागा येऊ द्या. मिपा प्रथेप्रमाणे सर्वसमंतीने तारिख आणि ठिकाण ठरेलचं!

In reply to by भाते

मुक्त विहारि गुरुवार, 06/18/2015 - 11:38
साधारण पणे जुलैच्या १ल्या किंवा २र्‍या आठवड्यात. माणशी ५००/-रु. खर्च अपेक्षित आहे.

दमामि गुरुवार, 06/18/2015 - 11:36
सोमवार असल्याने कट्टा हुकला. रच्याकने,कुठचा हो तो डुआयडी?????