मी होतो किनारा आणि ती होती उधाणलेली लाट
थांबवावं वाटलं खूप तरी निसटून जायची स्पर्श करून .
येताना यायची धावत,खळखळत अल्लड मुलासारखी
जाताना जायची माझ्याजवळ आठवणींचे शिंपले सोडून
तिचं येणं ,कधी अलगद कधी बेभान होऊन आदळणं
झिजवत होतं मला कणकण जाणीव करून देत होतं काय ठेवलय वाढून
आता उरलोय कणाकणातून , अंगावर घेऊन भरावाची ओझी
आठवणींचे मोती घेऊन उरलोय तळाशी तिच्या परत येण्याची आशा घेऊन …………
| लेखनविषय: |
|---|
वाचने
954
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे
थोडी कविता असली पाहिजे.
+१
In reply to थोडी कविता असली पाहिजे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा व्वा! छान उतरल्या आहेत