<<<<< सुगी >>>>>>
वारा सुटू दे गं बाई
ढग फुटू दे गं बाई
माझ इवलुसं गावं
चिंब नटु दे गं बाई....!!
घसा कोरडा पडला
ओढा नाला विहिरींचा
तुझ्या पहिल्या सरी नं
तहान मिटू दे गं बाई ....!!
असा कसा आळसला
कष्टकरी बळी राजा
तुझ्या न्यार्या चैतन्यानं
कामा झटू दे गं बाई....!!
माती मधी निजलेलं
माझ हिरवं सपान
थेंब थेंब पावसानं
पुरं उठू दे गं बाई ....!!
दूर कर दुष्काळाला
वैरी तुझा अन माझा
तुझ्या ओल्या गं मायेनं
सुगी लुटू दे गं बाई .....!!!!!
अतिशय सुर्रेख!
असेच म्हणतो! फारच छान.
असाच लोभ असावा
छान आहे कविता..
चांगलय.
मस्त कविता आहे!