Skip to main content

<<<<< सुगी >>>>>>

लेखक गोल्या यांनी रविवार, 14/06/2015 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
वारा सुटू दे गं बाई ढग फुटू दे गं बाई माझ इवलुसं गावं चिंब नटु दे गं बाई....!! घसा कोरडा पडला ओढा नाला विहिरींचा तुझ्या पहिल्या सरी नं तहान मिटू दे गं बाई ....!! असा कसा आळसला कष्टकरी बळी राजा तुझ्या न्यार्या चैतन्यानं कामा झटू दे गं बाई....!! माती मधी निजलेलं माझ हिरवं सपान थेंब थेंब पावसानं पुरं उठू दे गं बाई ....!! दूर कर दुष्काळाला वैरी तुझा अन माझा तुझ्या ओल्या गं मायेनं सुगी लुटू दे गं बाई .....!!!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1792
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

प्रत्येक कडवं आवडलं.
दूर कर दुष्काळाला वैरी तुझा अन माझा तुझ्या ओल्या गं मायेनं सुगी लुटू दे गं बाई .....!!!!!
हे झक्कासच