Skip to main content

सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग १

लेखक गवि यांनी शुक्रवार, 12/06/2015 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
सदस्यहो.. हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या बातम्या सतत ऐकू येतात. अनेकदा एखादी बातमी खूप इंटरेस्टिंग असते आणि कोणाशीतरी ती शेअर करावीशी वाटते. पण खूप लिहायला वेळ नसतो. खूप लिहायला एकदम सुचतही नाही. पण मित्रांमधे बातमीचा उल्लेख केला की सर्वांची मिळून त्यावर चर्चा रंगते. मॅगीबंदी असो किंवा म्यानमारमधली कारवाई..(ती आपल्याच हद्दीत झाली म्हणे).. इत्यादि.. बातमीचा मजकूर , हेडलाईन, आणि तिची मूळ लिंक शेअर करणं.. तसंच त्यावर वेगवेगळे दृष्टिकोन असलेल्या लोकांना आपापली मतं देता येणं या कारणांसाठी कोणीही या धाग्यात बातमी आणि प्रतिसाद लिहू शकेल. वाचनाच्या सोयीसाठी शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यावेळच्या एखाद्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच नवा भाग सुरु करण्यात येईल. सध्या मुंबईत ईस्टर्न फ्रीवेवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या जबरदस्त अपघाताची बातमी चर्चेत आहे. मॅगी थोडीथोडी मागे पडते आहे. म्यानमारच्या हद्दीत लष्करी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे नेते आता इतर "शेजारी देशांना" गर्भित इशारे देताहेत. हे आधीपेक्षा वेगळं धोरण असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात सुटी सिगरेट विकण्यावर बंदी आली आहे. चांगलं आहे. बाकी जगात काय विशेष ?

वाचने 36842
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by खटपट्या

हरवतील सर. बी पॉझिटिव्ह. फुटबॉल इज अ स्लीपिंग मॉन्स्टर दॅट्स वेकिंग अप इन इंडिया. बघा क्रिकेट ला मागे टाकेल येत्या १० वर्षात

In reply to by वेल्लाभट

खेळाडू काय, चुकूनमाकून ब्राझीलजर्मनीलाही हरवतील...ते एक असो. मेन मुद्दा हा की क्रिकेट हाच एकमेव खेळ मानणारे भारतीय तिकडे ढुंकूनही पाहतील किंवा नाही?????????

In reply to by बॅटमॅन

लाइव्ह प्रक्षेपण असेल आणि सोय असेल तर नक्की बघतील. भारतामध्ये भरपूर फुटबॉल प्रेमी आहेत .( ८० % वर्ल्डकप ते वर्ल्डकप उगवतात ते सोडा :) )

भुजबळांबद्दलची बातमी बहुदा आजची सर्वात मोठी बातमी असावी. सत्तेत नसतांना सत्ताधार्‍यांचा गुडबुकात रहाणे ज्यांना जमत नाही त्यांनी निदान तोंडाळपणा करुन वैर तरी घेउ नये. शरद पवारांकडुन भुजबळ योग्य ते शिकले नाहीत हेच खरे. पवार कसे बरोबर मोदींच्या गुडबुकात आहेत, अशी कारवाई त्यांच्यावर आणि अजित पवारांवर होईल तेव्हा खरे अच्छे दिन आले असे म्हणावे लागेल.

In reply to by वॉल्टर व्हाईट

बातमी वाचली. काय माणसे आहेत! हे माहित असलेले, जगापुढे आलेले आहे. बातमीत म्हटल्याप्रमाणे छापे पडतील असा अंदाज होताच! मग काय उपयोग? जे झाले तेही नसे थोडके, पण जो वेळ मिळाला त्यात काय काय झाले असेल त्याचा विचार केलेला बरा. झाल्या गोष्टींची पापे फेडणे असे काही होताना तर दिसत नाही. म्हणजे असे नसावेही. ज्याने त्याने कसे वागायचे हे ठरवणे इतकेच असावे.

In reply to by रेवती

जे झाले तेही नसे थोडके, पण जो वेळ मिळाला त्यात काय काय झाले असेल त्याचा विचार केलेला बरा.
हे जेव्हा कधी काळी आपल्याला कळेल तेव्हा कळेल, तोवर फक्त अंदाज बांधु शकतो. सहाजिकच कोणीही अश्या वेळेस त्यांना सगळ्यात जास्त नुकसान पोहचवणार्‍या वस्तुंची उतरत्या क्रमाने यादी बनवेल आणि शक्य तितके नुकसान वाचवेल. आता धाडीत जर पैसा अडका, कागदपत्रे सापडली फक्त तर यापेक्षा धोकादायक असे काय गायब केले गेले हा प्रश्न राहीलच.

In reply to by वॉल्टर व्हाईट

योगायोगाने, बाळासाहेबांना ज्यांनी धोका दिला असे दोन्ही 'मोहरे' या एकाच वर्षात देशोधडीला लागण्याच्या मार्गावर आहेत. राणे आणि भुजबळ.

In reply to by काळा पहाड

भुजबळांवरच्या कारवाई मधे भाजप पेक्षा त्यांच्या पक्षातल्या लोकांचाच हात असावा असे वाटते. भाजप आणि राका च्या राजात काहीतरी सेटींग असावे.

रिलायन्स जिओ ( ४जी) ला उत्तर म्हणून अनिल अंबाणींच्या आर कॉम कम्पनी ने सिस्टेमा शाम टेलीसर्व्हिसेस शी करार केलाय. या करारतून आर कॉम ने स्वतःचे भाग भांडवल कमी केलय. नक्की काय अर्थ घ्यायचा कराराचा? http://www.firstpost.com/business/rcom-sistema-m-ultimately-one-exit-22…

काल डॉनल्ड ट्रंप नी प्रेसिडेन्शिअल रेस मध्ये स्वतःचं नाव दाखल केलं. ओप्रा म्हणे सेकंड चेअर असेल. कालपासून ट्विटर वर मजेदार प्रतिक्रिया येतायेत.

जादा पैसे दिले तर अमर्याद एफएसआय! जादा पैसे देऊन आता मुंबईत हवा तेवढा एफएसआय मिळू शकेल अशी तरतूद असणारे गृहनिर्माण धोरण युती सरकारने आणले आहे. या धोरणातील काही तरतुदींना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचाच विरोध होता; पण बिल्डरधार्जिण्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर दवाब आणून या धोरणाचा मसुदा प्रकाशित करायला लावला आहे. मज्जाच मज्जा :)

गे मॅरेजेस बद्दल अमेरिकन सुप्रीम कोर्टाने LGBT सपोर्टर्सच्या बाजुने निर्णय दिला आहे. या निर्णयाने अमेरिकेच्या सगळ्या ५० राज्यात गे मॅरेजेस लिगल झाली आहेत.

बेस्ट बसच्या धडकेने जबर जखमी झालेल्या दोन तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडलेल्या... मात्र त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी कोणीही पुढे येईना... तेच हात मोबाइलवर फोटो, व्हिडीओ काढून ते व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात गुंतलेले... महाराष्ट्र टाईम्समधील ही बातमी

आइडिआ आणि एरटेलने 3G data महाग केला कालपासून ३००रु/१जीबी. रिलाअन्सने थोडे दिवस प्रमोशनल ओफर दिली रु२९० /३जी अनलिमेटिड रेग्युलर १९७रु/३जी/१जीबी कालपासून विंडोज १० सुरू झाली.pc/tablet/mobile सर्वांसाठी एकच ओएस.

हिंदी महासागरातील Réunion या फ्रेंच बेटाच्या किनार्‍यावर मोठ्या विमानाच्या विंग फ्लॅपचा तुकडा वाहून आला आहे. हा तुकडा एम एच ३७० या फ्लाइटच्या विमानाचा असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या १७ महिन्यांत प्रथमच या अपघातग्रस्त विमानाचा एखादा अवशेष प्रत्यक्ष मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. बातमी: Debris Is Thought to Come From Malaysia Airlines Flight 370. मिपाकर गवि यांचा या अपघाताबाबतचा लेखः MH370 - फ्लाईट डीलेड..

काही महिन्यांपूर्वी मी रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंटरी प्रकल्पाविषयी मिपावर लिहिले होते. या डॉक्युमेंटरीचा विशेष शो स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी पुण्यात आयोजित केला गेलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती. लोकवर्गणीच्या माध्यमातून या प्रकल्पाला मदत करणार्‍या लोकांच्या नावाची यादी शेवटी दाखवली आहे. त्यात काही मिपाकरांचीही नावे आहेत. ROSB RSVP via FB.

आज योगायोगाने काही प्रेरणादायी वाचायला मिळालं. वाईट लोकांच्या वाईट कर्मांविषयी नेहमीच चर्चिलं जातं. पण कधी चांगल्या लोकांच्या सकारात्मक योगदानाविषयी कळलं की समाधान वाटतं. अशीच एक प्रेरणादायी घडामोड. Take a Gander at This Amazing, Yet Little Known, 9-11 Story संबंधीत माहितीपट.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची प्रसिद्ध उपहारगृहांबाबत खालील लेखांत वाचायला मिळाले. A Walk Down Memory Lane: Country's Famous Pre-Independence Eateries Part I, Part II. यातील पंचम पुरीवालाबाबत मिपावर लेखन झालं आहे. तसेच पुण्यातील आप्पांची खिचडी मी आठ वर्षांपूर्वी खाल्ली आहे :-) .