✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग १

ग
गवि यांनी
Fri, 06/12/2015 - 11:06  ·  लेख
लेख
सदस्यहो.. हा धागा, हे पान मिसळपावच्या नवीन उपक्रमाचा भाग आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या बातम्या सतत ऐकू येतात. अनेकदा एखादी बातमी खूप इंटरेस्टिंग असते आणि कोणाशीतरी ती शेअर करावीशी वाटते. पण खूप लिहायला वेळ नसतो. खूप लिहायला एकदम सुचतही नाही. पण मित्रांमधे बातमीचा उल्लेख केला की सर्वांची मिळून त्यावर चर्चा रंगते. मॅगीबंदी असो किंवा म्यानमारमधली कारवाई..(ती आपल्याच हद्दीत झाली म्हणे).. इत्यादि.. बातमीचा मजकूर , हेडलाईन, आणि तिची मूळ लिंक शेअर करणं.. तसंच त्यावर वेगवेगळे दृष्टिकोन असलेल्या लोकांना आपापली मतं देता येणं या कारणांसाठी कोणीही या धाग्यात बातमी आणि प्रतिसाद लिहू शकेल. वाचनाच्या सोयीसाठी शंभरच्या आसपास प्रतिसाद झाले की धाग्याचा पुढचा भाग काढला जाईल.. शंभरच्या आसपास प्रतिसाद पोहोचल्यावर त्यावेळच्या एखाद्या प्रतिसादलेखकाच्या नावानेच नवा भाग सुरु करण्यात येईल. सध्या मुंबईत ईस्टर्न फ्रीवेवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या जबरदस्त अपघाताची बातमी चर्चेत आहे. मॅगी थोडीथोडी मागे पडते आहे. म्यानमारच्या हद्दीत लष्करी कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे नेते आता इतर "शेजारी देशांना" गर्भित इशारे देताहेत. हे आधीपेक्षा वेगळं धोरण असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात सुटी सिगरेट विकण्यावर बंदी आली आहे. चांगलं आहे. बाकी जगात काय विशेष ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36743 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

टोलनाक्यावर खाजगी वाहनांना

गवि
Fri, 06/12/2015 - 12:10 नवीन
टोलनाक्यावर खाजगी वाहनांना वगळण्याचा निर्णय अंमलात आला न आला तोच कोर्टाने त्यावर ताशेरे प्रश्न स्थगितीचा विचार वगैरे सुरु केलं. आजची लोकसत्ताची हेडलाईन. रस्ते चांगले हवेत तर पैसे भरलेच पाहिजेत वगैरे कोर्ट सुनावत आहे. खाजगी वाहनवाल्यांना होलसेलमधे गर्भश्रीमंत असं संबोधत आहे. बारबालाबंदी, गुटखाबंदी , टोलबंदी ..सरकारने निर्णय घ्यायचे (नोटिफ़िकेशनद्वारे) आणि कोर्टाने स्थगिती किंवा उलट निर्णयाने सरकारचा पोपट बनवायचा हे रिपीट होतं आहे. आधीच पूर्ण कायदेशीर अभ्यास करुन निर्णय घेत नाही का सरकार ? http://www.loksatta.com/mumbai-news/why-toll-exemption-to-wealthy-class-high-court-1112842/
  • Log in or register to post comments

गर्भश्रीमंत

कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 12:22 नवीन
खाजगी गाडीवाले अगदी गर्भश्रीमंत नाहीत पण उच्च मध्यमवर्गीय नक्कीच आहेत. ३ लाखाची गाडी , तिचे वार्षिक २ सर्विस ( १०,०००) , विमा (५०००) आणि वीकेंड साठी ४ रू. प्रतिकिमी ने ५००० किमी प्रवास ( २०,०००) .म्हणजे महिना साधारण ३००० रू. कार वर खर्च करणार्‍या फॅमिलीच्या टोलमाफीचा खर्च बाकी जनतेने का भरायचा ? अजून तरी भारतात कार ही लक्झरी समजली जाते. त्यामुळे हा खर्च जनतेच्या पैशातून वसूल करण्यास न्यायालयाने विरोध केला आहे. बादवे : यावर सकाळी एक जण म्हणाला , मग आम्ही शेतकरी नाही तर त्यांच्या पॅकेजचा खर्च आमच्या टॅक्समधून कसा काय वसूल करतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

..बरोबर आहे मुद्दा.पण मुळात

गवि
Fri, 06/12/2015 - 12:33 नवीन
..बरोबर आहे मुद्दा.पण मुळात सिस्टीम क्लीन नसल्याने भरपूर कर भरुनही पुन्हा "चांगले रस्ते हवेत तर त्याचे पैसेही तुम्हीच भरा" असल्या निर्लज्ज अपेक्षा केल्या जातात. ..हाच जो काही उच्च मध्यमवर्गीय गट आहे ना तोच तेवढा पगार/कमाईच्या हातात येण्याच्याही आधी कर भरतोय. ..ना वरचे भरताहेत ना खालचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सॉफ्ट टारगेट

कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 12:38 नवीन
उच्च मध्यमवर्गीय गट खासकरून नोकरदार हा कराच्या बाबतीत सॉफ्ट टारगेट झाला आहे . कोर्टाने सुद्धा "चांगले रस्ते हवेत तर त्याचे पैसेही तुम्हीच भरा" याला पाठिंबा देणे चुकीचे आहे. सरकारला आहे त्या पैशात चांगले रस्ते बांधा असे सुनवायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

..एक्झॅक्टली..आणि त्यापेक्षा

गवि
Fri, 06/12/2015 - 12:44 नवीन
..एक्झॅक्टली..आणि त्यापेक्षा प्रश्न असा की कोर्टात कोणीतरी हितसंबंधी पार्टी जाणारच..तिथे न टिकणारे निर्णय मुळात जाहीर करुन तोंडघशी का पडतात? ..कायद्याच्या दारात काय टिकेल ते आधी कळत नाही? ..बीफबंदी मे बी नेक्स्ट..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

गवि वर तुम्ही म्हणालात की

गणपा
Sat, 06/13/2015 - 07:55 नवीन
गवि वर तुम्ही म्हणालात की सरकार एक निर्णय घेतं नी मग कोर्ट ते फिरवतं मग सरकार आधीच विचार करुन निर्णय का घेत नाही. अहो साधं गणित आहे हे. सत्ताधारी सरकार पुढल्या पाच वर्षांची तजवीज करुन ठेवतं. ते असेच निर्णय घेतात ज्या बद्दल त्यांना खात्री असते की कोर्टात त्यांना नक्की आव्हान मिळुन निर्णय फिरवला जाईल. उद्या लोकांसमोर बोंबा मारायला मोकळे की आम्ही तुमच्या हिताचे निर्णय घेतलेले पण न्यायालयाने ते फिरवले. ज्यांच्या विरोधात सरकारने निर्णय घेतलेले असतात त्यां 'हित'संबंधीयांना या बाबत आधिच माहिती दिलेली असते तस्मात ती बाजू ही सावरलेली असते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मुळात मी टोल का भरायचा?

वेल्लाभट
Fri, 06/12/2015 - 14:32 नवीन
मुळात मी टोल का भरायचा? मी इनकम टॅक्स भरतो मी गाडीबरोबर रोड टॅक्स भरतो इतर अनेक टॅक्स भरतो. रस्ता ही मूलभूत सोय आहे त्याला मी वर अजून पैसे का देऊ? लूट आहे ही. पण लोकं एकत्र होतच नाहीत. मला परवडतंय मी का उगाच विरोध करू? असं म्हणतील. परवडायचा प्रश्नच नाही हा. कोर्टाला सांगावं कुणीतरी. प्रश्न तत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

प्रश्न तत्वाचा आहे.

टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 14:41 नवीन
प्रश्न तत्वाचा आहे.
या वाक्यावर पुणॅकरांचा कॉपीराईट आहे ना? आणि आधी साधे हेल्मेट घालायला कायदा करावा लागतो अश्या ठिकाणी वरच्या अपेक्षा ठेवणे म्हणजे लैच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

समस्त पुणेकरांना सल्ला.

वेल्लाभट
Fri, 06/12/2015 - 14:52 नवीन
समस्त पुणेकरांना सल्ला. (मिपाकरच असं नाही) गुपचुप ठरवून एक दिवस सगळ्यांनी मुंबईस निघावे आणि टोलपाशी येऊन गाड्या (चारचाकी) बंद करून तिथेच उभे रहावे. वाटल्यास एक महाआंदोलनकट्टा म्हणावं त्यास. जाचक टोलच्या सक्ती विरोधात ठिय्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खिक्क...पण असे झाले तर थोडीफर

टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 15:00 नवीन
खिक्क...पण असे झाले तर थोडीफर तरी जाग येईल चायला ठाणे ते मुलुंड आणि उलट यायचे झाले तर ३५ + ३५ = ७० रु. टोलसाठी जातात आणि पेट्रोल्ला सुध्धा तितकेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

कहर आहे तो तर.

वेल्लाभट
Fri, 06/12/2015 - 15:03 नवीन
कहर आहे तो तर. एमटीएनएल साठी मुंबई मध्ये ठाणे येतं. एम एम आर डी ए साठी नाही. युसलेसगिरी आहे ही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मागे मी एका ठिकाणी असे लिहिले

सुबोध खरे
Sat, 06/13/2015 - 12:14 नवीन
मागे मी एका ठिकाणी असे लिहिले होते कि रस्ते करण्यासाठी टोल लावणे हे स्थानिक राजकारण्यांना चराऊ कुरण उपलब्ध करून देण्यासाठी आहे. पहिली गोष्ट रस्ते तयार करण्यासाठी पैसा लागतो हि वस्तुस्थिती आहे मग त्यासाठी पेट्रोल किंवा डीझेल वर सरळ एक रुपया अधिभार लावा. जो जितका जास्त रस्ते वापरेल तितके जास्त पैसे भरेल केवळ टोल नका पार केल्याचा भुर्दंड भरायचा आणि ज्याने त्याच्या अलीकडे १०० किमी गाडी चालवून एक पैसाही भरायचा नाही. दुसरी गोष्ट चार चाकी वाहनांनीच टोल का भरायचा? दुचाकी वाहने काय स्वर्गातून आली आहेत. हि गरिबांना "खुश" करण्याची वृत्ती बंद होणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट मी गरीब आहे म्हणून ती मला फुकट मिळाली पाहिजे हि गेली ७० वर्षे "कल्याणकारी सरकारने"तयार केलेली मनोवृत्ती ताबडतोब बंद करणे आवश्यक आहे. या वृत्तीमुळे फक्त ट्रक नि टेम्पोवर टोल लावला तर ते भाव वाढवून आपल्याच खिशातून बाहेर काढणार म्हणजे महागाई होऊन शेवटी गरीबच मारला जाणार. टोल नाक्यावर होणार्या वाहतूक खोळम्ब्यामुळे वाया जाणारे इंधन कितीतरी हजार कोटी रुपयांचे आहे शिवाय त्यामुळे होणारे प्रदूषण आणि वाया जाणारे मनुष्य (तास)बळ याचा हिशेब पूर्ण पणे आतबट्ट्याचा आहे. पण लक्षात कोण घेतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

"कोणाच्या खिश्यात किती पैसे

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/12/2015 - 12:37 नवीन
"कोणाच्या खिश्यात किती पैसे आहेत ?" हा टोल लावण्यासाठी निकष नसावा तर... (अ) सर्वसामान्य करव्यवस्थेतून मिळणार्‍या पैश्यांपेक्षा जास्त पैसे उभे करणे कोणत्या प्रकारच्या रस्त्यांना आवश्यक आहे ? (आ) टोलच्या दराचा आणि तो चालू ठेवण्याचा कालावधी यांचा केलेल्या कामाशी आणि दिलेल्या इतर संलग्न सेवांशी (विश्रामगृहे, इ) अर्थाअर्थी संबंध असावा. याविरुद्ध... बर्‍याच फुटकळ आणि दुरावस्थेतल्या रस्त्यांवरही अनिश्चित कालाकरिता टोल आकारला जातो आहे... त्यांचा केवळ टोलभैरवांचे खिसे भरण्यापलिकडे काही फार उपयोग होत नाही असेच दिसते !
  • Log in or register to post comments

गवि खरच खुप छान उपक्रम

होबासराव
Fri, 06/12/2015 - 12:45 नवीन
.
  • Log in or register to post comments

वन्यजीवप्रेमीसाठी ही बातमी

कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 12:52 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

ब्लू बुल म्हणजे नीलगाय ना?

आनंदी गोपाळ
Fri, 06/12/2015 - 15:07 नवीन
ब्लू बुल म्हणजे नीलगाय ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

निराशाजनक बातमी. जावडेकरांनी

एस
Fri, 06/12/2015 - 15:16 नवीन
निराशाजनक बातमी. जावडेकरांनी भारतातल्या पर्यावरणाची एकंदरीतच संपूर्ण वाट लावायची ठरवलेली दिसते. हे पर्यावरण मंत्री आहेत की पर्यावरणविध्वंस मंत्री आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पर्यावरणविध्वंस मंत्री :)

नाव आडनाव
Sat, 06/13/2015 - 10:25 नवीन
पर्यावरणविध्वंस मंत्री :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+१

पैसा
Sat, 06/13/2015 - 10:28 नवीन
५ वर्षे झाल्यावर हे सरकार गेले तरी तोपर्यंत बहुधा ५०० वर्षांत भरून निघणार नाही एवढी हानी झालेली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आपने हमारे मूँहकी बात छीन ली.

आनंदी गोपाळ
Sat, 06/13/2015 - 10:59 नवीन
आपने हमारे मूँहकी बात छीन ली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सहमत

dadadarekar
Fri, 06/26/2015 - 20:12 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

वेलकम बॅक

कपिलमुनी
Sat, 06/27/2015 - 01:07 नवीन
नव्या अवतारात स्वागत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

काल मुंबई सातारा कात्रज

सतिश गावडे
Fri, 06/12/2015 - 13:19 नवीन
काल मुंबई सातारा कात्रज बाह्यवळण मार्गावर वडगाव पुलावर अपघात झाला. पुलावर डंपरने मारुती ओमनी गाडीला ठोकर दिल्याने डंपर आणि ओमनी दोन्ही पुलावरून खाली कोसळले. यात सहा जीव बळी गेले. अपघात हे सांगून होता नसतात हे जरी खरे असले तर एकुणातच लोकांचा वाहन वापराबाबतीमधला निष्काळजीपणा, बेदरकारपणा वाढत आहे. पूर्वी लोक साथीच्या रोगाने मरायचे. आता वाहन अपघातांमध्ये मरत आहेत. "नही जाती किसिकी रास्तेपे जान, मेरा भारत महान" या ओळींना काहीच अर्थ उरलेला नाही.
  • Log in or register to post comments

इमर्जन्सी ब्रेक

कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 13:03 नवीन
काही वर्षापूर्वी असाच अपघात या पुलावर झाला होता. डंपर , कंटेनर , बस यांना इमर्जन्सी ब्रेक नसतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

असे अपघात टाळता येऊ शकतात.

मोहनराव
Fri, 06/12/2015 - 13:18 नवीन
असे अपघात टाळता येऊ शकतात. आपल्याकडे डंपर , कंटेनर, बस यांच्या सुरक्षिततेकडे फार कमी लक्ष दिले जाते. निव्वळ मालवाहतुक, प्रवासी वाहतुक या नजरेने पाहिले जाते. ABS वगैरे सुविधा खुप कमी गाड्यामध्ये असते. तसेच वाहन चालवणारा बेदरकारपणे चालवतो. हे लोक रात्री अपरात्री गाड्या चालवुन कधीकधी झोपेत गाड्या चालवतात. दारू पिऊन चालवणे तर कॉमन आहे. या सर्वाला कुठेतरी आळा बसायलाच हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

..हायवे एन्ट्री पॉईंट्सना

गवि
Fri, 06/12/2015 - 13:29 नवीन
..हायवे एन्ट्री पॉईंट्सना मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाहतूकबंदी केली तर? .ड्रास्टिक भासला तरी इफेक्टिव्ह आहे उपाय असं वाटतं..इव्हिल अवर्स आहेत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

रेल्वे फाटकासारखे गेट च

सदस्यनाम
Fri, 06/12/2015 - 13:34 नवीन
रेल्वे फाटकासारखे गेट च (टाईमावर ऊघड्णारे/बंद होणारे) बसवावे लागतील. स्वयंशिस्तीने किंवा पोलीसाने हे होणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

त्यापेक्षा वाहनांतला अन

सदस्यनाम
Fri, 06/12/2015 - 13:42 नवीन
त्यापेक्षा वाहनांतला अन रस्त्यातला फरक नागरिकांना कळणे महत्वाचे आहे. गावात मोठ्या गाड्या (ट्रक/बस) ट्राफीक जाम करत हळूहळू जात असतात तर हायवेवर त्यांना कार्स आणि बाईक आड्व्या घालत ओव्हरटेक करत असतात. फक्त स्वतःपुरते बघणे हेच कारण असते. ट्राफीक सेन्स फक्त लायसन्स, पीयुसी आणि थोडेफार सिग्नल अन भीती एवढाच राह्यलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सदस्यनाम

..हायवे एन्ट्री पॉईंट्सना

मोहनराव
Fri, 06/12/2015 - 13:50 नवीन
..हायवे एन्ट्री पॉईंट्सना मध्यरात्री १ ते पहाटे ५ वाहतूकबंदी केली तर?
इतके स्तुत्य वाटत नाही कारण रात्री यांना मज्जाव केला तर दिवसा कोंडी करतील. मला वाटते यांच्या वेळा ठरलेल्या असाव्यात. दिवसभरात पुरेशी झोप होईल अश्या यांच्या कामाच्या वेळा कायद्याने निश्चित कराव्यात. वाहन कायदे व सुव्यवस्था कडक करुन दारु पिऊन गाडी चालवणार्‍यांवर योग्य ती कारवाई करावी. एक अनुभव: माझ्या मामाच्या शेतातील कांदा मुख्य बाजारपेठेत बेंगलोरला विक्रीकरता न्यायचा होता. संध्याकाळी ट्र्क निघाला. रात्री भाडेतत्वावर घेतलेल्या ट्रकवाल्याने ट्रक धाब्यावर जेवणासाठी थांबवला. ड्रायवरने स्वत:ची टंकी दारुने फुल करायला चालु केली. मामाने विचारले असता म्हणाला..साहेब याशिवाय गाडी रस्यावर सरळ धावु शकणार नाही!! नाहीतर मी गाडी चालवु शकत नाही!! आता मामा काय बोलणार. अडला हरि... मामा सरळ बसने गेला. सकाळपर्यंत ट्र्क बाजारपेठेत हजर होता!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सकाळ मधिल याविषयी बातमी

विवेक्पूजा
Fri, 06/12/2015 - 15:12 नवीन
"मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला मुंबइकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकाने कसेबसे वाचविले खरे; मात्र, या प्रयत्नात चालकाने ट्रॅव्हल्स महामार्गावरील दुभाजकाकडे घेतली. त्याच वेळी पाठीमागून वेगाने आलेल्या डंपरचालकाने अचानक "ब्रेक‘ लावला. मात्र, तरीही डंपरचा वेग कमी झाला नाही."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

फोनवर बोलत चाललेल्या एका

खेडूत
Fri, 06/12/2015 - 13:07 नवीन
फोनवर बोलत चाललेल्या एका महिलेमुळे हा अपघात झाला असं पुढे आलंय !
  • Log in or register to post comments

पुण्यातले लोक (बहुधा बाहेरचेच

काळा पहाड
Fri, 06/12/2015 - 13:46 नवीन
पुण्यातले लोक (बहुधा बाहेरचेच असावेत) फार माजोरडे झालेत आज काल. या शिक्षित किंवा खालच्या स्तरावरच्या लोकांचं प्रबोधन वगैरे करणं शक्य आहे असं मला वाटत नाही. ट्रॅफिक पोलिसांना तिथल्या तिथं शिक्षा करण्याचे (म्हणजे नडग्या तोडण्याचे) अधिकार द्यायला हवेत असं माझं मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

हा तर एकदम उत्तम उपाय !

सामान्यनागरिक
Fri, 06/12/2015 - 14:23 नवीन
शे पाचशे रुपयांचा दंड लावुन काही होत नाही. वाहतुकीचे नियम तोडणार्यांना तेथेच चौकात उभे करुन शंभर फटके दिले पाहिजेत. शहरांत तर वाहरुक आणी बाणी घोषित करावी. तोडला नियम की मार फटके असेकेल्याशिब्वाय सुधरणार नाहीत. आपण सुद्धा आपल्या मुला मुलींना दुचाक्या घेऊन देतो तेंव्हतोआपल्याला खात्री असते का की यांना वाहतुकीचे नियम नीट समजले आहेत ? हीचे मुले पुढे चारचाकी गाड्या घेऊन फिरतात आणि समाजाला धोका होतो. माझ्या माहितीते कितीतरी मुले आहेत ज्यांना चौकात पोलिसाने अडवले तर पन्नास रुपये द्यावेच लागतात असे वाटते. त्यात काही अयोग्य आहे असे त्यांना वाटतच नाही आपली काही चुक आहे म्हणुन दंड भरावा लागला हेच त्यांना माहीत नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

ट्रॅफिक पोलिसांना तिथल्या

टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 14:24 नवीन
ट्रॅफिक पोलिसांना तिथल्या तिथं शिक्षा करण्याचे (म्हणजे नडग्या तोडण्याचे) अधिकार द्यायला हवेत असं माझं मत आहे.
यामुळे फक्त चिरिमीरीच्या रकमेत वाढ होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

मपो

नाखु
Fri, 06/12/2015 - 15:07 नवीन
चा खरा अर्थच मला पोसा असा आहे. त्यामुळे कुठलेही नियम हे फक्त आणि फक्त पैसे उकळण्यासाठीच जन्माला घातले आहेत. आणि अंमल्बजावणी करताना काय होईल हे वेगळे सांगायला नको. बोकाफिल्डींग पाव्तीबहाद्दरांना रोज पाहणारा नाखुस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

होवू दे झालं तर. निदान ती

काळा पहाड
Fri, 06/12/2015 - 15:07 नवीन
होवू दे झालं तर. निदान ती चिरीमिरी जास्त असल्यामुळे तरी लोक नीट वागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शक्यच नाही

टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 15:17 नवीन
शक्यच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

नाय वो त्यानी

नाखु
Fri, 06/12/2015 - 15:18 नवीन
पैशे फेकले की आप्ण अंगाव गाडी घालायला मोकळे असा संदेश जाऊ लागलाय मुंबै बाका नगरीत. अलिकडच्या हिट रन बातमीतील कुटुंबाची बातमी पाहिलेला नाखुस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

निदान ती चिरीमिरी जास्त

संदीप डांगे
Sat, 06/13/2015 - 02:10 नवीन
निदान ती चिरीमिरी जास्त असल्यामुळे तरी लोक नीट वागतील.
राज ठाकरेही असंच म्हणायचे. पण चिरमिरीची रक्कम दंड व शिक्षेपेक्षा देणारा-घेणारा यांच्या मानसिकतेवर अवलंबून असते. उदा. सिग्नल तोडल्यावर १ लाख रुपये दंड भरायचा आहे. पोलिस इथेही तोडपाणीच करणार कारण गुन्हा घडला की नाही हे सांगणारा तोच अधिकृत व्यक्ती आहे. गुन्हेगार म्हणेल भरतो १ लाख तरी पोलिस म्हणेल जाउ द्या ना साहेब मला पन्नास द्या प्रकरण मिटवून टाकतो. अधिकारी व्यक्तीला 'वाटले' तर गुन्हा दाखल होतो. कायदे पाळले तर ते कडक असतात, अन्यथा बस सुविचार. जो पर्यंत अशाप्रकारात नॉन-ह्युमन थर्डपार्टी येणार नाही तोपर्यंत हे बदलणार नाही. गडकरीसाहेब म्हणतायत की ४ तासांत घरपोच दंडपावती पोचेल म्हणून. सर्वत्र गुगल कार चालेल तेव्हाच हे सगळं थांबेल बहुतेक. आपण मनुष्यजातही भारी आहोत. निर्जीव पदार्थांना आज्ञा पाळायला शिकवू शकतो पण सजीव माणसासमोर हात टेकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

फोनवर बोलत चाललेल्या एका महिलेमुळे

होबासराव
Fri, 06/12/2015 - 13:25 नवीन
हे असले नमुने डोक्यात जातात, रोज दिसतात असले पढतमुर्ख. गाडि चालवताना मान तिरपी करुन फोन कान आणि खांद्याच्या मध्ये ठेवुन बोलणे, दुचाकि वर सुद्धा व्हॉट्स अप वापरणे, लिफ्ट मध्ये शिरताना सुद्धा तेच.हे आपल्या सुरक्षेचा विचार तर करत नाहिच पण ह्यांच्या मुळे इतर लोक धोक्यात येतात हे सुध्द्दा कळत नाहि.
  • Log in or register to post comments

टोल भरुनसुद्धा पुन्हा खराब रस्ते असतातच !

सामान्यनागरिक
Fri, 06/12/2015 - 14:15 नवीन
टोल किती असावा आणि असावा की नाही हातर एक मोठाच मुद्दा आहे. पण जबरा टोल भरुन सुद्धा रस्त्यांची देखभाल व्यवस्थीत होतांना दिसत नाही. उदा : नाशिक मुंबई चौपदरी रस्ता. कितीतरी ठिकाणी तडे गेलेले आहेत आणि खड्डे पडले आहेत अगदी धुळ्यापर्यंत ! यांना काही निकष लावले जात नाहीत का ? की खड्डा झाल्यावर अमुक इतक्या दिवसांत बुजवल्या गेला पाहिजे अनेक ठिकाणी ' वळण रस्त्याचे ( डायव्हर्शन )" चे बोर्ड लावलेले दिसतात. रात्रीच्या वेळीतर खुपच त्रास होतो. बरे रस्त्याचे काम सुरु केलेकी त्याला किती वेळ लागावा यालासुद्धा काही नियम नाहीत. महिनोन महिने वळण रस्ते चालु असतात. यांच्यावर देखरेख ठेवणारठेकोणीच नाही का त्यांनाही 'पटवले' जाते ? काही दिवसांनी या बद्दलसुद्धा लोकहित कोर्ट खटले चालु होतील. असा काही नियम का बनवला जात नाही की रस्त्याच्या कामासाट्।ई वळण रस्त्याचे बोर्ड लावले की ते काम होई पर्यंत टोल मधे एखाद दोन रुपय कमी भरावे लागतील ? काम केले नाही कसेही केलेतरी पूर्ण टोल भराच. आम्ही आंम्हाला जमेल तसे दुरुस्ती करु किंवा करणारही नाकरुतुम्ही मुकाट टोल भरा असा कारभार आहे.
  • Log in or register to post comments

विचित्र बातमी

कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 14:57 नवीन
खालील दुव्यांवर क्लिक करा http://news.sky.com/story/1499464/toothed-eels-fall-from-sky-over-alaskan-city http://www.bustle.com/articles/89273-its-actually-raining-toothed-eels-in-fairbanks-alaska-the-only-thing-worse-would-be-one
  • Log in or register to post comments

अशा बातम्या मधूनच येत असतात.

गवि
Fri, 06/12/2015 - 15:19 नवीन
अशा बातम्या मधूनच येत असतात. नेमके किती ईल्स (अ‍ॅक्चुअली ईल्स नव्हेतच.. ईलसदृश मासे) आकाशातून पडले ते कोणी लिहीत नाही स्पष्ट. एकूण आठवड्यात मिळून वट्ट चार मासे इकडेतिकडे पडलेले सापडले. डिस्कव्हरी न्यूजच्या साईटवर बघितल्यास स्पष्टीकरण मिळेल. सी गल्स समुद्रातून हे मासे पंजात पकडून ते खाण्यासाठी जमिनीवर विशिष्ट ठिकाणी जात असताना ते अनेकदा निसटून खाली पडतात. http://news.discovery.com/animals/lamprey-eels-fall-from-sky-over-alaska-150609.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एम ई आर एस - साउथ कोरियात पसरलेला नवा आजार

वेल्लाभट
Fri, 06/12/2015 - 15:01 नवीन
मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम - सार्स समूहातला हा एक आजार असून सध्या दक्षिण कोरियात तो पसरत आहे. http://edition.cnn.com/2015/06/11/asia/south-korea-mers-outbreak/ http://edition.cnn.com/2014/05/02/health/mers-5-things/
  • Log in or register to post comments

भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन...

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 06/12/2015 - 15:32 नवीन
भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये घुसून केलेल्या कारवाईत किमान १०० वर अतिरेक्यांना यमसदनी पाठवलं. पहिल्यांदाच भारतीय सेनेने सिमे पलिकडे अशा प्रकारची मोहीम राबवली. सर्वच स्तरांवर अत्यंत गुप्तता बाळागत ही मोहीम भारतिय लष्कराने यशस्वी करुन दाखवली. मनात आणले तर आपण काय करु शकतो याची एक झलकच या निमित्ताने बघायला मिळाली. ह्या कारवाई मधे सैन्यदलाचा जितका दावा आहे तेवढे यश मिळाले नाही. फक्त सात आठ अतिरेकी मारले गेले. अशा प्रकारच्या बातम्याही काही वृत्तपत्रात आल्या आहेत. पण त्या मुळे केलेल्या कारवाईचे आणि या कारवाईद्वारे ईतर शेजारी देशांना भारताने दिलेल्या संदेशाचे महत्व कमी होत नाही. कारण लगेचच "भारताने पाकिस्तानला म्यानमार समजू नये" असा इशारा पाकिस्तान ने भारताला दिला. भारतिय लष्कराचे आणि त्यांना पाठबळ देणार्‍या भारतिय नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन. भारतिय लष्कराने अशा प्रकारच्या आणखी कारवाया करणयाची खरोखर गरज आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

आता या बातमीत

नाखु
Fri, 06/12/2015 - 15:41 नवीन
नक्की दोष कुणाचा मदत मिळाली तरी आत्महत्याm अश्या बातम्यांचा पुढे पाठपुरावा होत नाही. नगरच्या जामखेड प्रकरणाला राजकीय्+जातीय रंगरंगोटी देऊन झाल्यावर वास्तव बाहेर आले ते कल्प्नातीत होते. घरच्यांनीच हत्याकांड केले होते. वरच्या बातमीत मुख्यमंत्र्यांचा नक्की काय दोष होता किंवा त्यांनी काय करावे असे टीका करणार्या बोंडूक्वाले+मिपा "तज्ञांना" वाटते. अब्दुल नारायण डिसूझा + नाखु
  • Log in or register to post comments

सॉरी गवि

इरसाल
Fri, 06/12/2015 - 15:48 नवीन
खुप दिवसांनी तुम्ही काहीतरी खरडलेत म्हणुन रहावले नाही . ;) Image removed. असपण हे धाग्याच्या शीर्षकाशीच संबंधीत आहे. :))
  • Log in or register to post comments

झिंबाब्वे

कपिलमुनी
Fri, 06/12/2015 - 16:42 नवीन
झिंबाब्वेचा एक्स्चेंज रेट १ यूएसए डॉलर = 35,000,000,000,000,000 झिंबाब्वे डॉलर. आणि ही एक नोट असली की तुम्ही करोडपती Image removed.
  • Log in or register to post comments

एक अमेरिकन डॉलर = ६४ रुपये हे

सतिश गावडे
Fri, 06/12/2015 - 16:48 नवीन
एक अमेरिकन डॉलर = ६४ रुपये हे कोण ठरवतं? किंवा कसं ठरतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हे खरं तर अतिशयच काँप्लिकेटेड

काळा पहाड
Fri, 06/12/2015 - 17:12 नवीन
हे खरं तर अतिशयच काँप्लिकेटेड आहे, पण थोडक्यात सांगायचं तर जेव्हा तुम्ही रुपये विकता आणि डॉलर विकत घेता, तेव्हा ते दुसर्‍या बाजूने रुपये खरेदी करायला आणि डॉलर विकायला कोणीतरी असावं लागतं आणि त्याला तुम्ही सांगितलेली किंमत पसंत असायला हवी. पूर्वी हे सोपं होतं कारण ज्याच्याजवळ जितकं सोनं तितकी त्याची करन्सी मजबूत. पण तो प्रकार मोडीत निघाला. आता सगळ्या करन्सीज डॉलर ला मध्यवर्ती करन्सी धरून ठरवल्या जातात. पण याच्यात बरेच बाकीचे पण फोर्सेस अंतर्भूत असतात. जसं की एखाद्या देशातील व्याजाच्या दराचा, करन्सी लिक्विडिटीचा, देशातील स्थैर्याचा आणि इन्व्हेस्टमेंट येतीय की परत जातीय याचाही परिणाम होतो. पण एका शब्दात सांगायचं तर 'बाजारातल्या शक्ती' हा दर ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा