✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वास्तु.....

ए — एक एकटा एकटाच, Sat, 06/13/2015 - 11:09
फाटकाचं दार हलकेच लोटुन आत शिरलो तर सगळी बिजागरं, एकसाथ कुरकुरली इतक्या वर्षानीं आज ह्याला आठवण झाली माझ्यापासुन दूर होत, जोरात कुजबुजली माजलेल्या गवताने घुसखोरी केलेल्या अंगणात किरकिरत तो स्वतःच, स्वता:ला झोके देत होता "कुठे उलथला होतास? खेळ अर्ध्यातच सोडलास" पहाताच मला, तारलयीत विचारत होता माडी चढुन वर गेलो तर माझ्या खोलीतल्या खिडकीची तावदानं, तावातावानं आदळत होती अशा कैक सांजा आई ताटकळली होती तिथे जणू यांचा हिशेबच, उघडझाप करुन देत होती अचानक छताकडं मान वळवून पाहिले तर तो म्हातारा वासा, शेवटच्या घटका मोजताना दिसला ओळख लागताच अगदी बाबांच्या आवाजात म्हणाला "आता माझ्याच्यानं नाही होत रे!! सांभाळ ह्या घराला!!" तुझी वाट बघताना, अखेरीस बाबांचा धीर सुटला होता हे आईने कळवळून सांगुनसुद्धा मला तेव्हा पटलं नाही कितीही उशीर झाला तरी माझ्यासाठी जागणार्‍या आईनेही मग अखेरच्या क्षणी माझ्यासाठी थांबायची तसदी घेतली नाही उशिरा उमगले, उतारवयात त्यांची फक्त अवहेलनाच झाली मुजोरपणामुळे माझ्या, भरल्या घरात एकांतवासाची शिक्षा झाली त्यांच्या आठवणी डोळ्यांत उतरताच, हलकेच जाणवले की..... ती थकलेली "वास्तु"... आता तिच्या रिकामेपणातही भरुन आली

प्रतिक्रिया द्या
2194 वाचन

💬 प्रतिसाद (13)

मस्त रे...

विशाल कुलकर्णी
Sat, 06/13/2015 - 12:01 नवीन
मस्त रे... सजीव असो वा निर्जीव, आयुष्याच्या संध्याकाळी अशी अवस्था कुणाच्याच वाट्याला येवू नये राव :( कविता आवडलीच..
  • Log in or register to post comments

कविता आवडली

पैसा
Sat, 06/13/2015 - 12:37 नवीन
येता जाता सतत अशा कितीतरी वास्तू अबोलपणे निष्प्राण होताना पाहते. त्यांचं म्हणणं ऐकायला कोणाजवळ वेळ आहे?
  • Log in or register to post comments

छानच. सगळं डोळ्यासमोर आलं

मधुरा देशपांडे
Sat, 06/13/2015 - 13:16 नवीन
छानच. सगळं डोळ्यासमोर आलं अगदी.
  • Log in or register to post comments

सुंदर.

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/13/2015 - 20:29 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

अत्यंत प्रभावी....

पद्मावति
Mon, 06/15/2015 - 14:21 नवीन
एकेकाळी भरलेलं गोकुळ असणार्‍या एका देखण्या वास्तूला नंतर असच पार मिटून, विझून गेलेलं फार जवळून बघीतलय मी. त्यामुळे तुमच्या कवितेला पूर्णपणे रिलेट करून शकते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

एक एकटा एकटाच
Mon, 06/15/2015 - 21:26 नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार....
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिली आहे.

रातराणी
Fri, 06/26/2015 - 00:53 नवीन
सुरेख लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

अशीच एक वास्तु डोळ्यासमोर उभी

सूड
Fri, 06/26/2015 - 16:54 नवीन
अशीच एक वास्तु डोळ्यासमोर उभी राह्यली. छान लिहीलंय.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

एक एकटा एकटाच
Sat, 06/27/2015 - 15:10 नवीन
आपल्या सगळ्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

"उशिरा उमगले, उतारवयात

जडभरत
Tue, 06/30/2015 - 10:40 नवीन

"उशिरा उमगले, उतारवयात त्यांची फक्त अवहेलनाच झाली मुजोरपणामुळे माझ्या, भरल्या घरात एकांतवासाची शिक्षा झाली"-

डोळ्यात पाणीच आलं. माणासं का अशी दुष्ट होऊ शकतात, कळतच नाही. लहानपणी त्या मुलाचं सगळं हगलं मुतलेलं, ओकलेलं काढायचं, स्वतःचा घास कमी करून त्याला खाऊ घालायचं, डोळ्यात तेल घालून त्याला जपत जपत मोठं करायचं, आणि मोठेपणी त्यानंच लाथाडून जायचं.
  • Log in or register to post comments

कविता

जडभरत
Tue, 06/30/2015 - 10:41 नवीन
बादवे, पण कविता खूप झक्कास जमलीय! मला आवडली खूप! आवडली म्हणण्यापेक्षा तिनं मला खिन्न केलं असं म्हणणं सयुक्तिक ठरेल.
  • Log in or register to post comments

धन्यवाद भरत.

एक एकटा एकटाच
Tue, 06/30/2015 - 20:28 नवीन
धन्यवाद भरत. प्रतिक्रियेबद्दल आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जडभरत

मस्तच

कविता१९७८
Tue, 06/30/2015 - 20:58 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा