दिल धडकने दो
खूप दिवसांपासून झोया अख्तर ह्यांच्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. ‘दिल धडकने दो’ चित्रपट आला आणि आम्ही ठरविले की सगळी कामे बाजूला ठेवून चित्रपटाला जायचे.
कॉमेडी-ड्रामा जानरा असलेल्या ह्या चित्रपटाने तगडी स्टार कास्ट घेउन प्रेक्षकांच्या हृदयाचा ताबा घेतला आहे.
झोया अख्तर ह्यांचे दिग्दर्शन आणि एकाहून एक दिग्गज कलाकार अशी सुरेली महफिल जमल्यावर उत्तम चित्रपट तयार होणार हे सांगणे न लागे!
उच्च वर्गीय कुटुंबाची ही कथा आहे. नात्यानात्यांमधील हलके प्रसंग उत्तम प्रकारे मांडले आहेत. सुरवातीला थोडा स्लो वाटणार चित्रपट मध्यंतरानंतर वेग घेतो. रणवीरने सदर केलेला स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा मुलगा, त्याहूनही स्वतंत्र व्यक्तिमत्व असणारी तरीही आई वडिलांच्या शब्दाला मान देणारी प्रियांका प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा मिळवून जातात.
अत्यंत अदबीने वागणारा, मिळालेल्या संधीचे चीज करणारा आणि पहिल्या प्रेमाला कधीही न विसरणारा फरहान अख्तर मात्र छोटा रोल प्रचंड मोठा करून जातो. अनुष्का शर्माने साकार केलेली डान्सर मनाला भावून जाते.
अनिल कपूरची अनेक रूपे चित्रपटाची जमेची बाजू! वेगवेगळ्या भावना आणि प्रसंगातून जाणारा पिता अनिल कपूर ह्यांनी अप्रतिम वठवला आहे.
चित्रपटाची गाणी मनाचा ठाव घेतात. मला आवडलेले गाणे 'गल्ला गुडीया'! हाय एनर्जी चे हे गाणे यंदा ठीकठिकाणी लाऊड स्पीकर वर ऐकायला मिळणार हे निश्चित!
राहुल बोस आणी झरीना वहाब ह्यांचे रोलस त्यांच्या क्षमतेच्या मानाने बरेच छोटे असले तरी त्यांनी आपली जबाबदारी चोख बजावली आहे.
शेफाली शाह ह्यांनीही आपली भूमिका उत्तम वठवली आहे.
अलगद उलगडत जाणाऱ्या प्रेमाच्या अनेक छटा हळूवारपणे प्रेक्षकांच्या समोर ठेवणारा हा चित्रपट जरूर बघा.
जालावरून साभार
जालावरून साभार
याद्या
4817
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
हम्म
ट्रायोलॉजी..
तुमच्या वाक्यातला मतितार्थ
In reply to ट्रायोलॉजी.. by जेपी
हं
बकवास
+१
In reply to बकवास by NiluMP
ह्या वर्षी पाहिलेला सर्वात
In reply to +१ by सिद्धार्थ ४
पहावासा वाटतोय. संधी मिळताच
उच्च वर्गीय कुटुंबाची ही कथा
थोडक्यात चांगली ओळख!
हिंदी सिनेमा आहे का?
उच्चवर्णीय
त्या रणवीरला पाहिलं तरी
In reply to उच्चवर्णीय by निनाद मुक्काम …
कसला अर्मट, उद्धट, अचरट,
In reply to त्या रणवीरला पाहिलं तरी by रेवती
मस्त परीक्षण. नेमकया शब्दात मुद्देसुद वर्णन केले आहेस.
मेलोड्रामा
चित्रपट एवढा आवडला नाही.
बिर्याणी.