अनईझी.......!!
लेखनविषय:
काव्यरस
कृष्ण उभा यमुना किनारी
होऊनी अनईझी,
गोपिका तिकडे मजेत
वाट्सप्प वरती बीझी...!!
दुध लोणी गायब झाले
फास्ट फुडचा जमाना,
गोपी खाती नुडल्स
भरती बर्गर चा बकाना...!!
पुर्वी एकच पेंद्या होता
आता सारेच पेंद्या झाले
मैदानी खेळ सोडूनी,
फेसबुक वरती आले...!!
गोधन झाले आऊट डेटेड
गोकुळात मॉल आले,
गोवर्धन विकला गुण्ठे वारी
मथुरा कॉस्मोपॉलिटन झाले .!!!
वाचने
4097
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
:'(
=))
=))
=)) मस्त फ्राय्ली जिलबी! :-D
नीर् वाळा:- शेवटची कडि एकदम खटक्यावर पडलेने सदर जिलबी आस्वाद्य जाहली आहे! ;-)
=))
लाईकले आहे.
लाईक केलंय कवितेला!
*जांभई*
आत्रुप्त ----
त्रुप्त जाहलो
या कवितेला किती लाईक्स मिलणार!!
अत्यंत चांगली परिणामकारक कविता
कविता आवडली.
सद्यस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न भावला.
In reply to कविता आवडली by श्रीरंग_जोशी
सहमत.
मस्त. :)
धन्यवाद
जाण कारां नी सुचना कराव्या
बालक अजाण आहे.
आवडली.
लई आवडली संकल्पना ! मस्त !
झ क्का ! स !
:-)))))
"पेन" द्याचे मनोगती,
ऐसी लक्तरे दाखविती!
पण सांगण्या हाय दैवा !
मायबोली विसरशी पोरा !!
थो पुस्तकाच्या लायकीत बैस जरा !
कान्हा थांब तिथेच,आहे तिथे हैस बरा !
गोकुळनिवासी रस्ता कडेने तयार जिल्बी हात्गाडी विक्रेता संघातर्फे ताजी जिलबी नाम मात्र दरात
अभामिपामांकामिमसंचालीत
In reply to पेन by नाखु
:-D
In reply to पेन by नाखु
प्रिय नाखुश,
आज कालची पोरं टोरं अशीच फंकी भासा बोलत्यात म्हणून्शान हां form ...
बरं, आता नंतरची कविता कधी?
In reply to बरं, आता नंतरची कविता कधी? by सूड
जवा तुमची आद्न्या म्हाराज....!!
In reply to जवा तुमची आद्न्या म्हाराज.... by गोल्या
सुडुक च्या वाक्यात शेवटी "होणार?" हा एक शब्द ह्रायलेला आहे,हे ऐकू नै आलं तुम्हाला! ;-)
अत्यंत स"खोल माणूस हाय त्यों! :P
:'(