Skip to main content

जन्म घेतला तेव्हाच....!!

लेखक गोल्या यांनी गुरुवार, 11/06/2015 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म घेतला तेव्हाचं खोदून कबर आलो औपचार म्हणून आयुष्य घालवीत होतो आलो त्याच्या कडून जायचे त्याच्याच पाशी प्याला जीवनाचा घोट घोट संपवित होतो परत करावयाचा उसना देहाचा अंगरखा हा मिजाशीने त्याला म्हणुन वागवीत होतो पुरी होती करावयाची कहाणी जिंदगी ची आयुष्याची कोरी पाने मी जगुनी भरवीत होतो उभ्या आडव्या धाग्यातून निसटणार शिताफिने नाती स्नेहाची मी वृथा गुंतवित होतो होता सोडायचाच मंच दुनियेचा तोंड रंगुवुनी पात्र मात्र वठवित होतो!! ------------------------------------- धागा संपादित केला आहे.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1919
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

उभ्या आडव्या धाग्यातून निसटणार शिताफिने नाती स्नेहाची मी वृथा गुंतवित होतो
छान.

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

Thnks